किलबिल - नचिकेत छत्रे : टाकाऊतून टिकाऊ चिमणीचे घरटे

Submitted by संयोजक on 14 September, 2010 - 13:53

मायबोली आयडी : पौर्णिमा
नांव : नचिकेत छत्रे
वय : ७ वर्षे
वापरलेले साहित्य : नारळाच्या शेंड्या, झाडाची वाळलेली पानं, वाळलेलं गवत, कापूस, एक पेपर प्लेट (नारळाची करवंटीही वापरू शकतो), चिमणीचं चित्र, काडेपेटीची एक काडी, फेव्हिकॉल.

माझी मदत- साहित्य गोळा करून देणे, थोड्या कल्पना देणे..

शाळेमध्ये 'पक्ष्याचे घरटे' असं प्रोजेक्ट होतं.. त्यासाठी वापरलेले सर्व मुख्य साहित्य हे टाकाऊ आहे.

:Kilbil_TT_Paurnima.jpg

१) एका पेपरप्लेटवर मधोमध कापूस ठेवून, बाजूने वाळलेले गवत, नारळाची शेंडी, वाळलेली पाने इत्यादी फेव्हिकॉलने चिकटवले.
२) साध्या कागदावर एका पक्ष्याचा कटआऊट काढला, तो रंगवला.
३) काडेपेटीच्या काडीला हा कटआऊट चिकटवला आणि ही काडी मध्ये कापसावर चिकटवली.
४) घरटे तयार.

हे कोणाला भेट देता येणार नाही अर्थातच, पण प्रोजेक्टसाठी सगळे टाकाऊ साहित्य वापरूनही प्रोजेक्टला शाळेत 'ए' मिळाला आणि स्टारही Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहे. पिक्सार ला चित्र पाठवून दे. "बग्ज लाईफ" च्या दुसर्‍या भागासाठी साहित्य तयार आहे म्हणावं Happy

अरे हो की, काडीचं लक्षातच नाही आलं!

दाण्याला कापूस चिकटवून त्याची अंडी करणे हाही प्लॅन होता. कापूस हाताळून अंडी आपोआप काळीही झाली असती Proud पण वेळ झाला नाही अजिबात Sad आणि हे जे काही केलंय ते झटपट झालं आणि चांगलं दिसत असल्याने आम्ही त्यात अजून लक्षही घातलं नाही, खरंतर..

गजानन, वापरलेली काडी Lol हो, हो, पुढल्यावेळी नक्की!

धन्यवाद मित्रहो Happy

Pages