अवघी विठाई माझी (५) - सेलरी
सेलरी, मुंबईला मिळते. (ओगले आज्जींच्या पुस्तकात पण सेलरीचा उल्लेख आहे.)
पूर्वी फ़क्त सिटीलाईट मार्केटमधे दिसायची आता बर्याच ठिकाणी दिसते. सेलरी म्हणजे कोथिंबीरीचा मोठा अवतार, असे म्हणता येईल.
निदान बाह्यरुप तरी तसे दिसते. पण स्वादात खुपच फ़रक आहे.
सेलरीचा स्वाद खुपच तीव्र व किंचीत खारट असा असतो. तिचा पोत कुरकुरीत असतो. तिच्या ह्या गुणांमूळे तिचा संयोग बहुदा मऊसर आणि स्वादाला कमी असणार्या पदार्थांबरोबर करतात. जसे कि गोट चीज, अवाकाडो इत्यादी. तिचा स्वाद पहिल्यांदा उग्र वाटतो पण नंतर आवडू लागतो. (शेंगदाण्याप्रमाणे सेलरीचीही काहि जणांना अॅलर्जी असू शकते. खास करुन युरपमधे याचे प्रमाण जास्त आहे. अगदी दुरान्वयेही सेलरीशी संपर्क झाल्यास अश्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. )
सेलरी घेताना, तिच्या दांड्या जाडसर आणि मोठ्या अशा बघून घ्याव्यात. थोडी माती लागलेली असल्यास ती सेलरी स्वादाला जास्त चांगली असते. या दांड्या ताठ असाव्यात आणि पाने ताजी असावीत.
पदार्थात बहुदा तिचे दांडेच वापरतात. रेसिपीमधे पानांचा उल्लेख नसतो सहसा.
पानांना तोच स्वाद असतो पण ती कुरकुरीत नसल्याने सहसा वापरत नाहीत. अर्थात वापरली तरी तो स्वाद मिळतोच. त्यामूळे सूपमधे, गार्निश साठी पाने वापरता येतात.
दांडे चमकदार पांढरट हिरवे आणि पाने हिरवीगार असतात. पांढरे दांडे आणि पिवळी पाने असणारी
पण एक जात असते.
सेलरी उपयोगात आणण्याचे अनेक प्रकार आहेत. मी ती इथे कच्च्या रुपात, (गाजरा बरोबर )
क्रीम चीज डीप बरोबर वापरली आहे. सेलरी च्या दांड्य़ांचे बोटभर लांबीचे तूकडे करुन घेतले,
ते बर्फ़ाच्या थोंडगार पाण्यात तासभर बुडवून ठेवले. (असे केल्याने, ते जास्त कुरकुरीत होतात)
चीज डीपसाठी क्रीमचीज फ़ेटून घेतले. सेलरीची पाने, हिरवी मिरची व थोडे क्रीम ब्लेंड करुन घेतले.
सजावटीसाठी मिक्स्ड हर्बज आणि स्वीट पाप्रिका वापरले आहे.
सेलरीचे दांडे कापताना, कधी कधी खास करुन बाहेरच्या दांड्यांमधे एक चिवट धागा आढळतो, तो
ओढून काढावा लागतो. सेलरीच्या दांड्यांना एक नैसर्गिक पन्हळ असल्याने, डीप मधे बुडवून खाताना
त्यात डिप भरुन घेता येते.
सेलरीबाबत असे म्हणतात कि, सेलरी चावण्यात जितक्या कॅलरी खर्च होत्यात, त्यांच्या तूलनेत
सेलरीमधून नगण्य़ कॅलरी मिळतात.
सेलरीच्या बियांची पूड करुन, मिठात मिसळून, सेलरी सॉल्ट केले जाते. इतर पदार्थात खास करुन
स्टेक मधे ते वापरता येते. ब्लडी मेरी कॉकटेल मधे पण ते वापरातात. सेलरीच्या काड्या व पाने कोरड्या मीठात बूडवून ठेवली, तरी मिठाला तो स्वाद येतो. (हे सगळे फ़्रिजमधे ठेवायचे.)
सेलरी, कच्चा टोमॅटो, हिरवी मिरची तेलात किंचीत परतून, ते वाटून त्याची चटणी करता येते.
वर उल्लेख केलाय त्या चीज बरोबरच्या डीशसाठी, सेलरीच्या काड्यांचे तूकडे, थोड्या लोण्यात
परतून घ्यायचे. मग त्यात थोडे पाणी घालून ते शिजवून घ्यायचे. मग त्यात थोडे क्रीम व
गोट चीज मिसळून आठ दहा मिनिटे बेक करायचे.
सलादसाठी, अवाकाडो चे तूकडे, सेलरीच्या दांड्यांचे तूकडे, आक्रोडाचा चुरा एकत्र करुन, त्यात
थोडे सावर क्रीम घालायचे.
सेलरीचे शास्त्रीय नाव एपियम ग्रॅव्हेलोएन्स. यात बर्यापैकी ब६. सी आणि के जीवनस्त्व असते.
चुना आणि इतर खनिजे पण ट्रेस रुपात असतात. सेलरीने रक्तदाब कमी होतो असे मानतात.
कोलेष्ट्रॉल कंट्रोल, कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी पण ती उपयोगी आहेत असे मानतात.(अर्थात हे उपाय
वैद्यकिय़ उपचारांना पर्याय नाहीत.)
सेलरीचे मूळ पण खातात (त्याला सेलरॅक असा वेगळा शब्द आहे. )
सेलरी, कांदा अन गाजर हे
सेलरी, कांदा अन गाजर हे त्रिकूट बर्याचशा सूप्स अन स्टॉक्समधे अगदी मस्ट कॉम्बिनेशन आहे. एमरिल लगासीचं फेवरिट.
स्मोकड सामन, क्रीम चीझ, पातीचा कांदा अन सेलरीचे तुकडे बारीक चिरून हे मिसळून मस्त डिप / स्प्रेड होतो.
दिनेशदा, छान ओळख करुन दिली
दिनेशदा, छान ओळख करुन दिली आहेत सेलरीची! मी पुण्याच्या जुन्या मंडईतून बर्याच वर्षांपूर्वी ह्या सेलरीला एका सलाडच्या कृतीसाठी घेऊन आले तेव्हा घरातल्यांनी ''कोण ही बया'' करत तिच्याकडे साशंकतेने पाहिल्याचं व त्याहूनही साशंकतेने तिला खाल्ल्याचं आठवतंय! मला खरं तर सेलरीची पानं खूप आवडतात. पण बहुतेक पदार्थांमध्ये सेलरीच्या दांड्याचाच वापर केलेला दिसतो. गार्निशिंगसाठी सेलरी पाने मस्तच! आणि सेलरीचा गंधही काहीसा तिखट आणि वेगळाच असतो.
मेधा या भाज्यांबद्द्ल मराठीत
मेधा या भाज्यांबद्द्ल मराठीत फारसे लेखनच नाहि, म्हणुन क्रिस्पी, क्रंची वगैरे शब्दाना मराठीत शब्दच सापडत नाहीत. शब्दार्थ वर शोधायला पाहिजे.
छान माहिती
छान माहिती
दिनेशदा, क्रिस्पी, क्रंचीला
दिनेशदा, क्रिस्पी, क्रंचीला पर्याय म्हणजे कुरकुरीत, कुडकुडीत, खटखटीत, खुटखुटीत असे काही विशेषण योग्य वाटल्यास बघा!
आपण हे शब्द तयार पदार्थाना
आपण हे शब्द तयार पदार्थाना वापरतो ना ! मांसल ला दळदार हा पर्याय होता, पण तो शब्द आपण फळांसाठी वापरतो.
छान माहिती दिनेशदा...मस्त
छान माहिती दिनेशदा...मस्त चाललंय.
थोडे विषयांतर......आपली शतावरी साहेबाच्या भाषेत अॅस्परॅगस का? जरा साशंक आहे.
दिनेश धन्यवाद माहितीबद्दल.
दिनेश धन्यवाद माहितीबद्दल. सेलरी अशी खायची असते हे मला माहित नव्हते.
शिवाय मला सेलरी आणि सिलँट्रो एकच वाटत होत्या आजपर्यंत.. एकदा सिलँट्रो आणली कोथिंबीर मिळाली नाही म्हणुन आणी चक्क टाकुन दिली. अजिबात आवडली नाही.
सिलँट्रो आणली कोथिंबीर मिळाली
सिलँट्रो आणली कोथिंबीर मिळाली नाही>>> साधना, सिलँट्रो म्हणजेच कोथिंबीर गं. तुला पार्सले (Parsley) म्हणायचं आहे का? आपल्या भारतीय जेवणात पार्सलेची चव चांगली लागत नाही पण इटालियन जेवणात अगदी हवीच हवी .
फोटोतील बोल मधील चट्णीची
फोटोतील बोल मधील चट्णीची रंगसंगती अगदी जमली आहे. लो कॅल स्नॅक्स मध्ये सेलरी स्टॉक्स सांगतात नेहमी.
मस्त माहिती.!!
मस्त माहिती.!!
हो साधना, सिलान्ट्रो म्हणजेच
हो साधना, सिलान्ट्रो म्हणजेच कोथिंबीर. पार्सले चा स्वाद मलाही आवडत नाही.
मानुषी, अस्पारगस आहे माझ्या यादीत !! (तयारी चालू आहे. )
दिनेशदा मला विचारायचंय की
दिनेशदा मला विचारायचंय की शतावरी म्हणजे अस्पारागस का? हो आणि त्याचीही माहिती वाचायला उत्सुक आहे.
मस्त एकदम. शेवटी बनलेला
मस्त एकदम.
शेवटी बनलेला पदार्थ मस्त दिसतोय. फोटोही छान काढले आहेत तुम्ही!
दिनेशदा, फारच उत्तम मालिका
दिनेशदा, फारच उत्तम मालिका सुरु केलीये आपण. त्यामागची मेहेनत दिसून येते. धन्यवाद! मी बरेचदा सेलरी आणि मशरुम्स एकत्र उकडून, मिक्सर मधून काढते. त्या दाट मिश्रणात दूध, काळी मिरी पावडर आणि मीठ घालुन झक्कास सूप बनवते.
दिनेशदा छान माहिती देत आहात.
दिनेशदा
छान माहिती देत आहात. या सिरीज मधल्या बर्याच भाज्या पाहिल्या असुनही कशा करायच्या ते माहित नसल्या मुळे आणल्या गेल्या नाहित.
तुम्ही बनवलेला पदार्थ पण मस्त दिसतो. मी नेहमी लेख वाचण्याआधी स्क्रोल करुन बनवलेला पदार्थ काय आहे ते बघते.
मानुषी, शतावरी म्हणजेच अॅस्पॅरॅगस.
दिनेशदा मी सेलरी फक्त
दिनेशदा मी सेलरी फक्त पुस्तकातच वाचलेय. आज इथे प्रत्यक्ष पाहीली. धन्यवाद.
दिनेशदा ,रेसिपी ,सजावट दोन्ही
दिनेशदा ,रेसिपी ,सजावट दोन्ही छान .
मी सेलरीचा झुणका बनवते[जसा पात कांद्याचा बनवतात तसा ] .मस्त लागतो.
मामी तुमची रेसिपी पण आवडली पण दुधाऐवजी व्हाइट सॉस ट्राय करायला हव अस वाटत .