ए.वे.ए.ठि. नको पण वॄत्तांत आवर...
डीसीला झालेल्या महाग्गटग आणि महानगटग बद्दल लिहीलेल्या वॄत्तांतानी आईसलँड्ला फुटलेल्या ज्वालामुखी एवढी जागा व्यापल्यामुळे पुढील सर्व ए. वे. ए. ठि, गटग, वर्षा-वसंत-हेमंत्-विहार इत्यादी स्नेहसम्मेलनांच्या वॄत्तांतांवर पुढील नियम (हुकूमावरून) लागू करणेत येत आहेत. तसे न केल्यास आपली 'रिक्षा' जागोजागी अडवून तिच्यातली हवा (आणि हवाही) काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी...
१. सम्मेलनास एकापेक्षा अधिक (म्हणजे सव्वा, दिड, पावणेदोन इत्यादी) वॄत्तांत लेखक, लेखिका, कवी अगर व्यंगचित्रकार हजर असल्यास, चिठ्ठ्या टाकून लॉटरी पध्दतीने प्रत्येक क्षेत्रातून एका व्यक्तीची निवड केली जाईल आणि फक्त त्याच्या/तिच्या लेखाबद्दल 'रिक्षा' फिरविण्यास परवानगी दिली जाईल.
२. हजर नसलेल्या अति-उत्साही लेखक/लेखिका/कवी/व्यंगचित्रकार/टीकाकार इत्यादी मंडळींस या निवडीत भाग घ्यावयाचा असल्यास तशी लेखी विनंती बाटलीवाले भाई किंवा रंपावाले झक्की यांच्याकडे सम्मेलनाच्या दोन आठवडे आधी पाठवून परवानगी घ्यायची आहे. अर्जासोबत पाठवायच्या गोष्टी नांवात नमुद आहेतच.
३. काविळ झालेल्याला जग पिवळे, प्रेमात पडलेल्याला जग गुलाबी, आणि डुप्लिकेट आयड्यांस जग लाल दिसते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या लोकांस त्यांनी लावलेल्या चष्म्यातून कसे दिसते हे लिहावयाची गरज नाही. यासाठी नियम एक व एकच चष्मा लावावा अशी 'सौम्य शब्दात समज' देण्यात येत आहे..
४. वॄत्तांत लिहायची संधी मिळाल्यास, तो बाराकरांशी स्पर्धा, राग, असूया इत्यादी सूरांमधे न लिहीता स्वतःला काय वाटले या विषयावर असावा. आपला बाफ चालवायलादेखील बाराकर लागतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. बाराकर नेहमी गं आणि वि लिहीत असल्यामुळे वॄत्तांत लिहीताना ताळतंत्र सोडतात हे लक्षात ठेऊन वृत्तांत लिहील्यास तो अधिक विनोदी आणि मनोरंजक होईल याची खात्री धरावी. त्याचवेळी वर्षानुवर्षे पूर्ण अनुल्लेख केला तरी तांबडे चेहरे करून 'काही करा पण मला आपल्यात घ्या' असं ** मागत येणारे तेच तेच आयडी म्हणजे काही बाराकर नव्हेत याचीही खात्री बाळगावी.
५. वॄत्तांत लिहिताना, 'येत आहे', 'येणार आहे', 'येईल बहुतेक', 'येईल कधीतरी' असल्या घोषणा टाकून जागा अडवून ठेवायला ही काही येष्टीची बस नाही. त्याचप्रमाणे वॄत्तांत येईपर्यंत 'काहीच्या काही कविता' किंवा 'रेसिप्या' वापरून जागा अडवू नये.
वरील नियम हा एक नवीन आराखडा आहे. जसजसे नवीन विचार सुचतील (म्हणजे ऑफिसात काम नसेल) तसतसे या नियमात बदल करणेत येतील.
नियम न पाळल्यास तुमची रिक्षा फिरली तरी त्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करून अनुल्लेख केला जाईल खात्री असावी....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(ही जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे...)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(या नियमांचा आणि अॅडमिन अगर वेबमास्तरांचा काहीही संबंध नाही.....)
आपला बाफ चालवायलादेखील बाराकर
आपला बाफ चालवायलादेखील बाराकर लागतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. >>>>>>
मी म्हंटलं कुठे गेले देसाई? शालजोडी शिवत होते वाटतं.
(No subject)
रिक्षा, गटग, वृत्तांत,
रिक्षा, गटग, वृत्तांत, नियम......... अहाहा...... खमंग चुरचुरीत वास आला ;-)!
वरील कुठलेही नियम लक्षात
वरील कुठलेही नियम लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही.
धन्यवाद!
(No subject)
चष्मेबद्दुर
चष्मेबद्दुर
भारीच !! प्रत्येक ठिकाणाहून
भारीच !!
प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या लोकांस त्यांनी लावलेल्या चष्म्यातून कसे दिसते हे लिहावयाची गरज नाही. >>>> अहो.. पण तुमच्या त्याच त्या काळ्या चष्म्यातून जग आपलं एवेएठी पहायचा कंटाळा आलेल्यांना बाकीच्या रंगांच्या चष्म्यांची गरज पडत असावी..
पराग, वृत्तांत लिहीताना फक्त
पराग, वृत्तांत लिहीताना फक्त (जळुन) काळ्या, किंवा (स्पर्धेतुन) लाल झालेल्या काचांनी लिहु नये येवढच सांगतायत.
>> स्वतःला काय वाटले या
>> स्वतःला काय वाटले या विषयावर असावा. आपला बाफ चालवायलादेखील बाराकर लागतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.
(No subject)
(No subject)
अजुन कॅलिफोर्निया वृत्तान्त
अजुन कॅलिफोर्निया वृत्तान्त नाही आला, देसाईंनी सशल, झारा आणि खुद्द अॅडमिन ची रिक्शा पंक्चर केली वाट्ट
किंवा मग खरंच ते लोक तारेत
किंवा मग खरंच ते लोक तारेत असतील.
(No subject)
देसाई, एक महत्वाचा नियम:
देसाई, एक महत्वाचा नियम: वृत्तांत हे (सहसा) विनोदी असतात तेव्हा वाचणार्याच्या तोंडावर स्मित तरी येइल ह्याची लिहिणार्याने काळजी घ्यावी ~(तुमच्याच) हुकुमावरुन
मला ह्या गंभीर वृत्तांताचे
मला ह्या गंभीर वृत्तांताचे प्रयोजन कळले
वृत्तांत हे (सहसा) विनोदी
वृत्तांत हे (सहसा) विनोदी असतात तेव्हा वाचणार्याच्या तोंडावर स्मित तरी येइल ह्याची लिहिणार्याने काळजी घ्यावी ~(तुमच्याच) हुकुमावरुन >>>> सिंडी ह्याला रॉबीनफोड म्हणावे का थुत्तरहुड ???
काही पण म्हणा अर्थ एकच
काही पण म्हणा अर्थ एकच
अरे हे काय कंपुवाले एक
अरे हे काय कंपुवाले एक मेकांच्या पाठी खाजवताय बळच.
हम करे वो पाठिंबा... तुम करो
हम करे वो पाठिंबा... तुम करो वो पाठ खाजवणे..
अहो, तुमची पण पाठ खाजवुन....
अहो, तुमची पण पाठ खाजवुन.... आपलं तुम्हाला पण पाठिंबा देऊन आलोच की आम्ही?
(No subject)
मस्त , आणि चष्मा लावायचा
मस्त ,
आणि चष्मा लावायचा असेल तर फक्त थ्री डी चा चष्मा लावावा लागेल म्हणजे सगळ्यांचे आकार , उकार , प्रकार , भ. मे. स्पष्ट दिसतील आणि व्हर्चुअली अंगावर पण धावुन येतील .
(No subject)
अच्छा पाठिम्बा म्हणजे पाठी
अच्छा पाठिम्बा म्हणजे पाठी खाजवणे काय?
tonagyaa, लाल चेहरा टाकायला
tonagyaa, लाल चेहरा टाकायला विसरलास का?
(No subject)
(No subject)
तुमचे १-२ नियम आताच वाचले. पण
तुमचे १-२ नियम आताच वाचले. पण त्या अगोदरच माझा वृत्तांत प्रकाशित करून झाला होता. आता पहिली वेळ म्हणून थोडी माफी द्या की.
आणि आलोच आहे रिक्षामधून, तर फिरवायच्या अगोदर तुम्हाला रिक्षा पहायचीच असेल तर इथे पहा.
http://www.maayboli.com/node/15665
(No subject)
Pages