ए.वे.ए.ठि. नको पण वॄत्तांत आवर...
डीसीला झालेल्या महाग्गटग आणि महानगटग बद्दल लिहीलेल्या वॄत्तांतानी आईसलँड्ला फुटलेल्या ज्वालामुखी एवढी जागा व्यापल्यामुळे पुढील सर्व ए. वे. ए. ठि, गटग, वर्षा-वसंत-हेमंत्-विहार इत्यादी स्नेहसम्मेलनांच्या वॄत्तांतांवर पुढील नियम (हुकूमावरून) लागू करणेत येत आहेत. तसे न केल्यास आपली 'रिक्षा' जागोजागी अडवून तिच्यातली हवा (आणि हवाही) काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी...
१. सम्मेलनास एकापेक्षा अधिक (म्हणजे सव्वा, दिड, पावणेदोन इत्यादी) वॄत्तांत लेखक, लेखिका, कवी अगर व्यंगचित्रकार हजर असल्यास, चिठ्ठ्या टाकून लॉटरी पध्दतीने प्रत्येक क्षेत्रातून एका व्यक्तीची निवड केली जाईल आणि फक्त त्याच्या/तिच्या लेखाबद्दल 'रिक्षा' फिरविण्यास परवानगी दिली जाईल.
२. हजर नसलेल्या अति-उत्साही लेखक/लेखिका/कवी/व्यंगचित्रकार/टीकाकार इत्यादी मंडळींस या निवडीत भाग घ्यावयाचा असल्यास तशी लेखी विनंती बाटलीवाले भाई किंवा रंपावाले झक्की यांच्याकडे सम्मेलनाच्या दोन आठवडे आधी पाठवून परवानगी घ्यायची आहे. अर्जासोबत पाठवायच्या गोष्टी नांवात नमुद आहेतच.
३. काविळ झालेल्याला जग पिवळे, प्रेमात पडलेल्याला जग गुलाबी, आणि डुप्लिकेट आयड्यांस जग लाल दिसते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या लोकांस त्यांनी लावलेल्या चष्म्यातून कसे दिसते हे लिहावयाची गरज नाही. यासाठी नियम एक व एकच चष्मा लावावा अशी 'सौम्य शब्दात समज' देण्यात येत आहे..
४. वॄत्तांत लिहायची संधी मिळाल्यास, तो बाराकरांशी स्पर्धा, राग, असूया इत्यादी सूरांमधे न लिहीता स्वतःला काय वाटले या विषयावर असावा. आपला बाफ चालवायलादेखील बाराकर लागतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. बाराकर नेहमी गं आणि वि लिहीत असल्यामुळे वॄत्तांत लिहीताना ताळतंत्र सोडतात हे लक्षात ठेऊन वृत्तांत लिहील्यास तो अधिक विनोदी आणि मनोरंजक होईल याची खात्री धरावी. त्याचवेळी वर्षानुवर्षे पूर्ण अनुल्लेख केला तरी तांबडे चेहरे करून 'काही करा पण मला आपल्यात घ्या' असं ** मागत येणारे तेच तेच आयडी म्हणजे काही बाराकर नव्हेत याचीही खात्री बाळगावी.
५. वॄत्तांत लिहिताना, 'येत आहे', 'येणार आहे', 'येईल बहुतेक', 'येईल कधीतरी' असल्या घोषणा टाकून जागा अडवून ठेवायला ही काही येष्टीची बस नाही. त्याचप्रमाणे वॄत्तांत येईपर्यंत 'काहीच्या काही कविता' किंवा 'रेसिप्या' वापरून जागा अडवू नये.
वरील नियम हा एक नवीन आराखडा आहे. जसजसे नवीन विचार सुचतील (म्हणजे ऑफिसात काम नसेल) तसतसे या नियमात बदल करणेत येतील.
नियम न पाळल्यास तुमची रिक्षा फिरली तरी त्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करून अनुल्लेख केला जाईल खात्री असावी....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(ही जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे...)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(या नियमांचा आणि अॅडमिन अगर वेबमास्तरांचा काहीही संबंध नाही.....)
लेख विनोदी आहे बहुतेक... (मला
लेख विनोदी आहे बहुतेक... (मला न कळलेले टोमणे माझ्यावरच नसतील तरच विनोदी आहे.. )
पण तरी मला काय्पण टोटल लागत नाहीये.
काय काय अभ्यास करून येऊ? आकडे द्या.
किल्लेदार... तुमचा वॄत्तांत
किल्लेदार... तुमचा वॄत्तांत वाचला.. तुम्हाला सूट...
नीधपः याचे संदर्भ म्हणजे डीसीगटगचे प्रसिध्द झालेले ८/१० वॄत्तांत आहेत. ते वाचल्यावर लक्षात येईल.
आणि हो लेख विनोदी म्हणूनच लिहीला होता.. लोक हसले की नाही, माहित नाही
वृत्तांत हे (सहसा) विनोदी
वृत्तांत हे (सहसा) विनोदी असतात तेव्हा वाचणार्याच्या तोंडावर स्मित तरी येइल ह्याची लिहिणार्याने काळजी घ्यावी ~(तुमच्याच) हुकुमावरुन >>>>
पण काही लोकांनी या जन्मात हसणार नाही, चेहेर्यावर स्मित तर अजिबातच आणणार नाही असे 'पण' (शपथ) केले असतील तर लिहीणार्याने काय व कशी काळजी घ्यावी यासाठी काय हुकुम आहे ?
अश्या वाचकांना चार/पाच तास
अश्या वाचकांना चार/पाच तास आधी गरम कॉफीतून एरंडेल पाजून नंतर वॄत्तांत वाचण्यास द्यावा..
आणि हसू आणि इतर गडबडी आवरण्यासाठी त्यांनी केलेले चेहरे पाहून आपणच त्यांच्या वाटचे हसावे...
हुकूमावरून.....
Pages