डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

नानबा
झक्की ज्या ज्या गटगला जातात त्या त्या गटगला असणारे सगळे त्यांचे कायमचे पंखे होतात कायमचे त्यामुळे झक्कींचे fan following एकदम जबरदस्त आहे. नुसते मायबोलीकरच नाही तर त्यांचे कुटूंबीय देखील झक्कींचे फॅन आहेत. Happy

आमच्याकडे भविष्यात एक मायबोलीकर होऊ घातलाय>>>>>> ते "माझी लेक..." येऊस्तोवर काय संदर्भ लागेना किंवा भलताच संदर्भ लागला. Wink
भाई, असेल असेल कदाचित. नितीनला रिंगणात घ्यायची गरज आहे पुढच्या वेळी, लै रॅगींग घेतो माबो करांची.

भाई काल नितीन ने त्याचा आयडी सांगितला की Wink इव्हन ड्यू आय पण सांगितला Proud

जबरSSSदस्त मज्जा आली कल्लोळाला!!!
किती बोललो, किती हसलो, किती खाल्लं, किती प्यायलो (:P) ह्याची गणतीच करता येत नाहीये. सगळ्यांना भेटून सही वाटलं!

लाल्वाक्का, तुस्सी ग्रेट हो!! इतकी उत्तम बडदास्त ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद Happy

झक्की फॅन क्लब >> नानबा अग झक्कींचे फॅन नसलेल्यांचाच वेगळा क्लब केलेला परवडेल Happy कारण त्यांची संख्या मोजकी असेल!!
बाकी झक्कींची टोलेबाजी सॉल्लिड सुरु होती नॉन स्टॉप!
इकडे संयुक्ता सोल्जर्स महिला हक्काबद्दल फार जागरुक होत्या, कुठल्या कुठल्या जुन्या पोस्टींबद्दल कुणाकुणाला पीडत होत्या. काही मनुवादी पुरुष आयडींना घेराव पण घातला गेला. काही काही पुरुष आयड्यांना तर न लिहिलेया पोस्ट्बद्दल पण फैलावर घेण्यात आले. असं असताना तिकडे झक्की मात्र खुश्शाल माइक हातात घेऊन तमाम उपस्थित महिला आयड्यांना "जाचक अन खटकणार्‍या स्त्रिया" असं म्हणाले तरी संतापण्याऐवजी त्यांना मात्र हशे आणि टाळ्या मिळाल्या ! म्हण्जे बघा Proud
(झक्कींना ही अशी वेगळी ट्रीट्मेन्ट मिळण्याचं खरं कारण वेगळंच आहे, असं कुणीसं कुणालासं सांगताना कुणीसं ऐकलं म्हणे!) Happy

मै, Biggrin

मै Proud

मै Lol
झक्की फॅन क्लब मधे दर ए वे ए ठी नंतर नियमीत नविन मेब्रं अ‍ॅड होत असतात. क्लब सोडून गेल्याचं किंवा कोणताही मेंबर गळल्याचं कधी ऐकू आलं नाही! Happy

लय लय कल्ला...राडा...मस्त मजा आली....
मॅन ऑफ दि मॅच टू लालू आणि अँडी.. ("मॅन" ऑफ दि मॅच असं लिहायची पद्द्धत असते म्हणून लिहिले आहे. कृपया वाचकांनी नोंद घ्यावी....आणि जाचकांनी सुध्दा)..
सर्व माबो करांना प्रत्यक्षात भेटून मजा आली....
झक्कींचं टायमिंग सचिन तेंडुलकर पेक्षा भारी आहे...झक्कींचा फॅन क्लब नाही "एसी" क्लब काढा...
अटलांटा करांचे आभार..विशेषत GPS आणल्या बद्दल्...मला लालू च्या घरात त्याचा खूप उपयोग झाला..नाहीतर नक्किच हरवलो असतो..

काही हायलाईट्स :

१. मै जाचक आणि खटकणार्‍या स्त्रियांच्या बाफ वर एकही पोस्ट न लिहिलेल्यांना पकडून ठेचत होती.. मग ते पुरुष असो वा स्त्रिया... मी तिथे काही उ आणि पां पोस्ट केलेले असल्याने माझी सुटका झाली.. Proud
२. रोज पार्ल्यात चहा मागणारी सशल दुपारी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली.. त्या आधी तिथे मानस आणि राहूलच्या बोर्ड वर कुठलसं गाणं पण लिहिलं होतं म्हणे..
३. आजी-माजी अ‍ॅडमीनची उपस्थिती गटगला चारचांद लावून गेली.
४. "जिन्स आणि टिशर्ट असा वेष असून सुध्दा तुम्ही कुंकू आणि मंगळसुत्र कसं काय घातलय??? " असा खरमरीत प्रश्न झक्कींनी सौ. वेबमास्टर ह्यांना विचारला.. Proud हे फक्त झक्कीच करू जाणे..
५. सायो, सिंडी, शोनू आणि बाई कुठल्यातरी एका सांस्कृतीक कार्यक्रमांला अनुक्रमे डुलक्या काढणे, खाली मान घालून बसणे, धृतराष्ट्र पोस मधे छताकडे बघणे आणि कानात बोटे घालणे हे करत होत्या. आता तो कार्यक्रम म्हणजे वैद्यांचं गाणं होतं की देसाईंचं उ.उ.वि. हे त्या चौघींनाच विचारा. Light 1
६. विशिष्ठ आयडी आणि त्यांचे कारनामे ह्या विषयांवर गटागटांमधे चर्चा झाली..
७. स्वाती आणि देव ह्यांनी सगळयांना "येता-जाता" डेलावेअरला यायचं आमंत्रण दिलय.. Proud
८. नितीन ने आपले दोन्ही आयडी कबूल केले.. !!!
९. मो आणि झाराकाकू ह्यांची गाणी म्हणजे surprise package! त्या दोघी इतकं भारी गातात हे मला माहित नव्हतं..!! त्यामुळे त्यांनी तोडलं, फोडलं, जिकलं वगैर वगैरे.. Happy
स्वातीचं "वाजले की बारा" तसेच राधा-कृष्णाची कविता, झकासची कविता आणि बाकी सगळेच सां.का. एकदम मस्त.. Happy
१०. नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या निघाल्या.. "नक्की ह्याच का त्या ?????????? " असा प्रश्न पडला.. Happy
११. आणि सगळ्यात शेवटी.. मी एकटाच गेल्याने सगळ्या "जाचक" काकवांनी मला लई फैलावर घेतलं !!! Sad

अजून आठवतील तसे हायलाईट्स टाकतो.. Happy

अजून काही..

१२. भाईंनी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन एकदम मस्त केलं.. !!
१३. लालू आणि परिवाराने केलेल्या आदरातिथ्याबद्द्ल आणि चोख व्यवस्थेबद्दल सगळ्यांनी वर लिहिलच आहे.. सगळ्यांना हॅट्स ऑफ आणि मनापासून धन्यवाद.
१४. रूनीचं तिरामिसू ऑस्स्स्स्सम.. !! स्वाती दांडेकर ह्यांनी खव्याच्या पोळ्या गरम करून त्या आग्रहाने सगळ्यांना वाढल्याबद्दल त्यांना धन्यवाद.. Happy
१५. मी फार्मव्हिल बाफ तसेच सकसची उत्पादने ह्यांची माझ्या ओळखी दम्यान रिक्षा फिरवली.. त्यामुळे इच्छुकांनी दोन्हीचा लाभ घ्यावा.. Proud

नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या निघाल्या.. "नक्की ह्याच का त्या ?????????? " असा प्रश्न पडला >> आप मेरी तारिफ कर रहे हो या मुझे गालीया दे रहे हो? Wink

मी मुळात फार शांत स्वभावाची आहे रे (खोडात गडबड झाली!)

रात्री झोपताना पण कानात बडबड आणि हसू ऐकु येत होत. हसुन हसुन तोंड दुखू लागल.. शुक्रवारी संध्याकाळी सुरु झालेल गटग काल रात्री पन्नाला घरी सोडल तेव्हा संपल. (तस आमच नवरा बायकोच गटग गेली १० वर्ष चालुच आहे म्हणा. :)फिदी: )
अशक्य मजा आली. लालू आणि मि. लालू ह्यांच नियोजन अगदी उत्तम.
आज अगदी सुनं सुनं वाट्टय. सार कस शांत शांत Sad

पराग Lol

झाराकाकू उत्तम गातात ह्याचं प्रूफ त्यांनी तूनळीचे दुवे देऊन दिलं होतं!

मो चा सुरेल अन चढत्या भाजणीचा आवाज हे खरचं surprise package! मोच्या पहिल्या तानेला मिळालेली जाणकारांची दाद सगळं सांगून गेली! Happy

>>नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या निघाल्या.. "नक्की ह्याच का त्या ?????????? " असा प्रश्न पडला.. >> सिमाचे पण बरेच अपेक्षाभंग झाल्याचे ऐकले Proud

हो हो.. मो ची गाणी म्हणजे सरप्राईज पॅकेज होत्या. सगळाच सांस्कृतीक कार्यक्रम धमाल झाला Happy

पग्या.. Lol

पराग, मिनीवृत्तांत मस्तच!!
मी श्री. आणि सौ. लालूंबद्दल सगळ्यांना मोदक!! व्यवस्था, आगत्य, घर सगळं सगळं पंचतारांकीत होतं. दोघंही एकदम हसतमुख आणि प्रसन्न होस्ट्स!! (लालू, अँडीला पण सगळी तारीफ दाखव गं ;))
सां. का. झक्की आणि नितीनच्या धावत्या समालोचनाने जास्त मनोरंजक होत होते. ओळख परेड पण जबरी झाली, स्पेशली झक्कींची. Happy
सगळ्यांना भेटून ख्ख्ख्खूप मज्जा आली.

सही धमाल केलेली दिसतेय !
लालु,
पांढरा रस्सा येउ दे रेसिपेज मधे :).
झा.रा नी कुठलं गाणं म्हंटलं? उसाला लागल कोल्हा ?

रुनी Lol
आदल्यारात्री धड न झोपुन नी दिवसभर कल्ला केल्यानंतर रात्रीच्या २ वाजता तोंडातुन शब्द सरळ कसे निघणार ग?? Proud

डीजे, झाराने 'माझे मन तुझे झाले' आणि 'उसाला लागल कोल्हा' ही गाणी म्हटली.

रॉनी, अमृता, कोणता शब्द???

तुम्ही जायची घाई केलीत स्वाती. नंतर पुन्हा हाटेलात मैफिल जमलेली. ती २ पर्यंत चालू होती. पुरेशी झोप न मिळाल्याने 'थुत्तरहुड' हा शब्द तोंडातुन निघाला बाकी काह्ह्ही नाही. Proud

Pages