डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

खुप खुप धमाल आली गटग. लालु, आणि मि. लालु .. जहापनाह तुसी ग्रेट हो!!
लालुचं आदरातिथ्याने भारावुन गेल्यासारखं झालं. अटलांटाकरांच गटग शुक्रवारी दुपारी चार पासुन सुरु झालं होतं ते आज सकाळच्या चहा नंतर ७ वाजता संपलं. एकंदर खुप खुप गप्पा, गॉसिपिंग, भरपुर खादादी. काल सकाळी आम्ही herndon च्या air and space museum मध्ये गेलो तर आमची इतकी मोठी गाडी पाहुन त्यांनी आमच्या group च नाव विचारलं. मा. बो चं नाव सांगितलं तर आम्हाला group discount म्हणुन parking चकट्फु मिळालं Proud

आदरातिथ्याबद्दल सर्वांना अनुमोदन. लालू आणि धनंजय यांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती. त्यांना मनापासून धन्यवाद. लालू, पुढच्या इलेक्शनमध्ये हिलरीला नक्की वोट करणार.. Proud

मेन्यु पण अगदी मस्त होता. खव्याच्या पोळ्या भारी होत्या. त्यासाठी पग्याला धन्यवाद.

नेहमीप्रमाणे बरेच पदार्थ वृत्तांतात कळले. रुनी तिरामिसु करते पण कुठे ठेवते कोणास ठाऊक? मला कधी मिळतच नाही. Proud

यावेळी बर्‍याच नवीन माबोकरांना भेटता आले. श्री अ‍ॅड्मिन आणि सौ अ‍ॅड्मिन, सशल, सीमा, अंजली, नानबा, बारिशकर, ज्ञाती, भावना, सुनित ही आणि इतर बरीच नवीन मंडळी भेटली. मस्त मजा आली.

झारा आणि मो ह्यांचे गाणे म्हणजे सुखद धक्का होता. ह्या दोघी आणि स्वाती फार छान गायल्या. ओळख परेड हा प्रकार भारी झाला खरंच. तिथे सर्वांनी काय काय गमतीजमती सांगितल्या.

आमचं शिट्टी मिनीगटग पण लई मस्त झालं. पुरणपोळ्या, कटाची आमटी वगैरे सिंड्रेलाने केले होते, पण ते सगळं तिनेच खाऊन फस्त केले बहुतेक. आम्हाला काहीच मिळाले नाही. पण पाणी-पुरी सामोसे वगैरे राहिले होते. तेवढेच खाल्ले मग आम्ही. Proud

पन्नाने प्रवासात खायला म्हणून लाडू आणि पोह्याचा चिवडा आणला होता. दोन्ही मस्त झाले होते. इशान होताच, त्यामुळे मला प्रवासात अजिबात कंटाळा आला नाही. तो नसता तर काही खरं नव्हतं. आमच्या गाडीतल्या बायका तर गाडीत लावलेल्या गाण्यांमध्येसुध्दा जाचक आणि खटकणार्‍या प्रथा शोधत होत्या. हे गाणं कसं स्त्रीविरोधी आहे, हे असं गाणं लिहिलंच कसं वगैरे काय काय बडबडत होत्या. Proud

पराग Lol सगळ्या एन्ट्र्या सही आहेत.

<<झक्कींना ही अशी वेगळी ट्रीट्मेन्ट मिळण्याचं खरं कारण वेगळंच आहे, असं कुणीसं कुणालासं सांगताना कुणीसं ऐकलं म्हणे!) >>

त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. लाच दिल्याशिवाय कामे न करणार्‍या लोकांना वाटत असेल तसे.

असे, फुकट दारू मिळाली म्हणून लाचार होणारे लोक आहेत की काय इथे? अहो 'अस्मानीच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा' असे हे महाराष्ट्रीय. त्यांना खर्‍या खोट्यातला फरक पैसे न घेताहि कळतो. मग फुकट दारू दिली तरी खोट्याला खरे म्हणत नाहीत.

नि कधी हो मी फुकट दारू दिली? फुकट प्यायलो मात्र खूप, परवा.
पण त्याच्याहि आधी पासून मला लालू यांच्याबद्दल आदरच आहे.

नि कधी हो मी फुकट दारू दिली? >> ती नाही का तुमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला तुम्हाला भेट म्हणून मिळालेली. तुम्ही आम्हाला दिलेली. Happy

परागच्या सगळ्या हायलाईट्सना १०००० मोदक...फक्त अजुन एक हायलाईट अ‍ॅड करतो....
१६) जुन्या अ‍ॅड्मीननी सादर केलेली कविता.....

वरच्या सगळ्या पोस्ट्स साठी 'मम'!

लालु, तुझं आणि धनंजय चं तसंच रुनी, नितीन, झक्कास, स्वाती दांडेकर यांचेही अनेक धन्यवाद!

अफलातुन होते गटग. खूप मजा आली. माझे पहिलेच गटग, याआधी मी फक्त मेधाला भेटले होते. इतक्या आयडींना चेहरा मिळाला Happy

लालु आणि लालु फॅमिलीकडुन मस्त व्यवस्था. अतिशय घरगुती आणि अगत्याचे वातावरण. तिला आणि तिच्या सर्व मदतनिसांना हॅटस ऑफ.
जेवण मस्त, खरं तर गप्पांच्या नादात खाण्याकडे लक्ष होते कुठे.
स्वाती, झारा आणि मो ची गाणी म्हणजे कान तृप्त झाले. वेबमास्तर, स्वाती, झकास ची कविताही मस्त.
ओळख परेड भन्नाट.

लालूच्या घरी आदरातिथ्य एकदम भारी होतं ते सगळ्यांनी लिहिलंच आहे.त्यामध्ये एक अ‍ॅडिशन म्हणजे तिने आलेल्या लहान मुलांचापण विचार करुन ठेवला होता. एवढ्या सगळ्या गडबडीत सुध्दा तिने आठवणीने वरण-भात करुन ठेवला होता.त्यांना खेळायला खेळणी काढून ठेवली होती.त्यामुळे इकडे सां.का चालू असताना मुले खेळण्यात बिझी होती. Happy आमचा आदी तर तिच्या बॅकयार्डच्या लॉनवर आणि घसरगुंडी-झोपाळ्यावर इतका फिदा होता कि तो दुपारभर तिथेच खेळत होता,त्याला हॉटेलवर परत जाताना कार सीटमध्ये बसवण्यासाठी आम्हाला नाकी नऊ आले Proud

देसायांचे फोटो लय भारी.
लोक्स, फोटो पिकासा, वेबशॉट्स सारख्या साईट्स वर पण टाका ना, म्हणजे साईझ मोठी दिसेल.

पराग, परदेसई, मला मित्र म्हणून तुमच्या ऑर्कुटवर घ्या अशी विनंति केली आहे. कृपया मान्यता द्या.

हो.. अख्खं घर मावणं शक्य नव्हतं.. Happy
तरी मी बरच मागे जाऊन काढायचा प्रयत्न केला..

झक्की अहो अश्या विनंत्या करणं शोभत नाही तुम्हाला.. Proud

अजुनही अमृता न प्यालेल्या मार्गरिटाच्या प्रभावाखाली आहे त्यामुळे सगळे 'बदलून' येत आहे!

अनुस्वार गाळायच्याऐवजी भलतीकडेच दिले जात आहेत.
स्पेसीमेन १:
>>>> वैद्यांनी दाखवला कि थोडा डांस गाता गाता..>>>>>
येथे तिला 'डास' हा शब्द अभिप्रेत असावा. (म्हणजे डास कसा सगळीकडे भिरभिरत सगळ्यांच्या कानाशी गुणगुणतो नी मग आपण टाळ्या वाजवतो) [वैद्यबुवा दिवे घ्या हो]

स्पेसीमेन २:
>>>>>
मिळाल्याने 'थुत्तरहुड' हा शब्द तोंडातुन निघाला बाकी काह्ह्ही नाही
>>>

खरा शब्द 'रॉबिनफोड' होता हे इतर साक्षीदार सांगतीलच.

छे छे आज ऑफिसभर नुसती निळाई पसरली होती Sad

ज्यानी ज्यानी विनंत्या केल्या त्या मी मान्य केल्या आहेत. मुळ साईझ (माणसांची नव्हे फोटोंची) ८ मब आहे. जे हवे असतील त्याची विनंती पाठवा. मी फोटो पाठवतो..
किंवा vinay1desai@gmail.com वर मेल टाका मग पाठवतो... अजून Load करतो आहे.

विनय Happy

उ. अमेरीकेतलं पहिलं-वहिलं(?) महागटग यशस्वी केल्याबद्धल सगळ्यांचं अभिनंदन. आता अधिकृत वृत्तांत येउध्या.... (फोटो विचारण्याचं धाडस मी आता करणार नाही... Happy )

राज तुम्ही अटलांटात असून गटगला आला नाहीत हे काही चांगले नाही बरका, तुमच्या गावातुन एक भली मोठी बस करून लोक आले होते आणि तुम्ही मात्र आला नाहीत.

एवढं वाईट वाटून घेऊ नका. यावेळी राजेवाड्यात झालं पुढच्यावेळी तुमच्या 'राज'वाड्यात करु. हाकानाका. Wink

मी पण झक्की पंख्याचा मेंबर झालो.

झक्की, अहो, मजा आली हो तुमच्या बरोबर गप्पा मारुन..

>>पांढरा रस्सा येउ दे रेसिपेज मधे .

दीपांजली तू रहाते कुठे गं? पांढरा रस्सा केला रे केला की हा भटू दारात ऊभा रहातो. परवडेल का बोल ?
मी लालूकडे "आभारदर्शनाच्या" दिवशी -"Thanksgiving" ला कायम पांढरा रस्सा आणि "गावठी" turkey खायला जातो.

अरे राजांन्नो, ज्यांनी "फोटू" काढण्याचे कष्ट घेतले आहेत त्यांनी ते upload करा की कुठे आणि नाव आणि टोपणनावासकट. म्हणजे आम्हाला कोण "ते".., ते ओळखता तरी येतील.

कामानिमित्त मला लवकर निघावे लागले आणि ओळखपरेड miss झाली. क्षमस्व.

Pages