डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

मी येण्याचे नक्की केले आहे.
इतके दिवस नक्की न सांगून मी तुमची गैरसोय केली त्याबद्दल दिलगीर आहे.

माझी माहिती अशी आहे की शनिवारी सकाळी, ठरलेली वेळी (जी नंतर ठरवण्यात येईल) मी सौ. स्वाति आंबोळे यांचेकडे जाऊन, त्यांना घेऊन श्री वैद्यबुवा यांचे कडे जायचे. पुढे ते आम्हाला घेऊन मग श्री परदेसाईंकडे नेतील तिथे श्री. परदेसाईंच्या गाडीतून वॉशिंग्टन डीसी ला जायचे, स्नेहसंमेलन करायचे व शनिवारी रात्रीच परत श्री. परदेसाई यांचे कडे यायचे. तेथून श्री वैद्यबुवा आम्हाला त्यांच्या घरी नेतील. तिथून मी सौ. स्वाति आंबोळे यांना त्यांच्या घरी पोचवून देईन.

मला सौ. आम्बोळे व श्री. वैद्यबुवा कुठे रहातात ते माहित आहे.

या कार्यक्रमात काही बदल असल्यास शक्यतो ९ एप्रिल पर्यंत कळवावे. तसेच, मी काही घेऊन यायचे आहे का तेहि कळवावे.

धन्यवाद.

गम्मतच. शिव्या घालू नका मला, पण ..मी पण किनई तुमच्याच गाडीतून यायचं म्हणत आहे. पण नेमके देसाई गेलेत फिरायला. ते आल्यावर कळेल मला घेणारेत की नाही गाडीत! त्यांच्या गाडीत इतक्या तश्रिफा मावणार नाहीत असे वाटत आहे. कदाचित कार रेन्ट करावी की कसे तेही देसाईंनाच विचारून इथे अपडेट करेन. Happy

हो का Happy बर झालं बै. आता इतक्या एन्ट्र्या करून ठेवल्यावर देसाईंना करावंच लागेल काहीतरी Wink

झक्की साहेब तुम्ही देशापरदेशातली सगळी गटग हायज्याक करता हे काही चांगले नाही.

मै, देसाई नाही म्हणाले तर सवडीने घरी जेवायला बोलाव त्यांना हाकानाका.
आता स्वाती बघ. मी गाडीत पोहे आणणार म्हणून कशी सौजन्याने वागतेय. Proud

आणि हो, 'सुनो गौरसे दुनिया वालो, बुरी नझर हमपर ना डालो, चाहे जितना शोर मचाओ, सबसे आगे होंगे हिन्दुस्तानी, हिंदुस्तानी' हे हरभजनसिंग का हिमांशु रमेश्मियाँ का कुणितरी म्हंटलेल गाणे पण कुणाला येत असल्यास म्हणा! तसेच शहीद कपूर चे गाणे पण.

रात्री येताना श्री परदेसाईंच्या गाडीत सौ. स्वाति आंबोळे 'आता वाजले की बारा, चला बिगि बिगि घरा' का असे कुठले तरी गाणे म्हणणार आहेत. (आपल्या गाडीत कुणी सरदारजी नाहीत ना?)

आणि हो, 'सुनो गौरसे दुनिया वालो, बुरी नझर हमपर ना डालो, चाहे जितना शोर मचाओ, सबसे आगे होंगे हिन्दुस्तानी, हिंदुस्तानी' हे हरभजनसिंग का हिमांशु रमेश्मियाँ का कुणितरी म्हंटलेल गाणे पण कुणाला येत असल्यास म्हणा! तसेच शहीद कपूर चे गाणे पण.
<<< कुठे फेडाल हे पाप, शंकर महादेवन चं गाणं हिमेश च्या नावावर ?? Proud

>>>>> तुम्ही नेमकं तश्रीफ आणायचं नक्की केलं तेच खुप आहे. <<<<<
मागे कुणीतरी मला या "तश्रीफ" चा अर्थ "बुड टेकवा" असा सान्गितल्याच आठवतय, Proud खरोखर काय अर्थ आहे? Wink

>>>वसंता आला! ल>>><<<<
गॉड रामा, गॉड क्रिस्ना अशा आकारान्ती उच्चारासारखे वाट्टय हे,
काय तर म्हणे वसन्ता आला! Proud
अन डोळ्यापुढे चित्र उभे रहातय की गळ्यापाशी तिन गुन्ड्यान्चा सदरा घालुन, डोईवर टोपी तिरकी घातलेली अन कमरेतुन खाली घसरती खाकी हापचड्डी एका हाताने वर ओढत ओढत दुसर्‍या हाताच्या मनगटाने नाक पुशित पुशित एका हाकेसरशी ओ देऊन जे असे ध्यान दारातुन आत येईल, ते म्हणजे "वसन्ता" Proud
बघा, अकारान्ती अन आकारान्ती मुळे अर्थात किती फरक पडू शकतो! पहिल ते "वसन्त" आला अस बदला!
नैतर आधिची वासन्तीच ठीक होती! Happy
वासन्ती नावाच्या मुली दिसायला छानच अस्तात, उन्चनिन्च शिडशिडीत अस्तात, अन हो, प्रेमळही अस्तात अस माझ निरीक्षण लहानपणच!

माझ बारस होत बाराव्या दिवशीच नाशकात, तर आई अन मावशीने शिशिर, वसन्त अन जयन्त ही तीन नावे निवडुन त्यापैकी वसन्ता ठेवायच नक्की केलेल, तर मी रडून गोन्धळ घातला होता अशी आईची आठवण आहे Happy , मलाही पुसटस आठवतयच म्हणा Wink

बाकी वरील फोटो छान आहेत Happy

धन्यवाद..
काही दिवसांपूर्वी अशी अवस्था होती...
IMG_1537.jpg

हवामानखात्याचा अंदाज-
१०-११ एप्रिल - बहुतेक ढगाळ, कमाल ६५-६७ फॅ. किमान ५०.

मस्त आहेत फोटो. Happy
पण मला अ‍ॅलर्जीज ,अ‍ॅलर्जीज अँड मोअर अ‍ॅलर्जीज एवढच लक्षात आल ते बघुन. Proud आय होप, Dallas एवढा वाईट असणार नाही तिथला अ‍ॅलर्जी सिझन. आमच्याकडे ब्रॅडफोर्ड पिअर फुलल्यावर,स्नो झाल्यावर कस व्हाईट दिसत तस वाटत कधी कधी.
वरच्या त्या नॉमिनेशनच्या यादीत मध्ये "नवा चेहरा :जीटीजी न्यु फेस ऑफ दि यिअर " अशी एक कॅटेगोरी टाकावी ही विनंती. मी त्यात परंपरेला अनुसुरुन माझच नॉमीनेशन देईन अर्थातच. Proud

Pages