डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

नमस्कार.
माझा रक्तदाब पूर्ण मर्यादेत आहे. मला शीशी चा (अर्ध, पूर्ण) कसलाहि त्रास नाही. चौकशीबद्दल धन्यवाद.

सायो, ऑगा नि शेपू, दोन्ही न आवडणारे, या प्रकारात माझा नंबर पहिला!

मला बहुधा दहा वीस तरी पारितोषिके मिळणार आहेत असे दिसते. मी आलो नाही तर ती कुणाजवळतरी देऊन ठेवा. व मला कुणाजवळ दिली आहेत ते सांगा.

सायो, ऑगा नि शेपू, दोन्ही न आवडणारे, या प्रकारात माझा नंबर पहिला!
<< याचं प्राइझ म्हणून तुम्हाला सगळ्यांना ऑ.गा ची गिफ्ट सर्टिफिकिट्स देण्याची opportunity मिळेल.

सर्वात जास्त चिज केक आवडणारे मा बोलीकर....दोनच नॉमीनेशन्स आहेत >>>
दोन नाही तीन नॉमिनेशन्स आहेत. पण पुरस्कार कुणाला मिळणार हे पक्के आहे. उरलेले दोघे बहुतेकवेळा गोडायव्हाच खातात Wink

बारा माबोकरांनी सकाळी ७ पर्यंत माझ्या घरी पोहोचायचे आहे.

इतके सगळे अवॉर्ड देऊन वेळ उरल्यास (आणि लोकांना उत्साह असल्यास) 'उ उ वि' चा एक भाग सादर करण्यात येईल... Happy

लालू... जेवणाचे काही करून आणायचे असल्यास मला सांग... मी आणू शकेन..

माझा मोठा मुलगा विनय १० तारखेला येऊ शकत नाही. तो Model UN conference ला जात आहे. त्यामुळे लालू, कृपया
स्वाती_दांडेकर (२) - १ मोठी, १ लहान असा बदल कर, आणि काही मदत लागली तर सांग. विनय नसला तरी मी आणि समीर मदत करूच.

वैद्यबुवा, ते जाऊद्याहो, Happy आता फक्त दहा/अकरा दिवस उरलेत, लागा, तयारीला लागा! Happy
त्या वरल्या यादीत संभाव्य उपस्थितान्च्या सन्ख्येबरोबरच अजुन एक सुधारणा सुचवावी का? Happy
यन्दा कर्तव्य आहे/नाही अशान्च्या सन्ख्येबाबत काही टाकाव का त्यात? Proud

जीटीजीच्या शीर्षकासाठी मते मागवण्यात आली-

वसंत विहार (शॉर्ट्फॉर्म ववि होतो, यावर 'आक्षेप' आहे का?)
वसंतोत्सव (फक्त नावच. यात कोणत्याही जुन्या प्रथा पाळण्यात येणार नाहीत)
वसंत कूजन (हे जास्त समर्पक वाटतेय का? का?)

वरील नावांत 'वसंत' हे पुरुषी नाव असल्याने काहींनी विरोध दर्शवला. तर विहार, उत्सव फारच नेहमीची वाटली. कूजन शोभत नाही त्याऐवजी वसंत गोंधळ, वसंत कल्ला, वसंत आहार सुचवली गेली. पण सर्वानुमते 'वासंतिक कल्लोळ' ला मान्यता मिळाली. नावात 'वासंती' आहे.

नावात 'वासंती' आहे आणि 'तो' कल्लोळ आहे. म्हणजे बरोबरी झाली Wink

चीज केकचं अर्ध बक्षिस मला द्यायला कुणाची हरकत ? Proud

१२ एप्रिल, सकाळ वर्तमानपत्राची मुख्य बातमी, 'ओबामांच्या अंगणात वसंतसेनेचा वासंतिक कल्लोळ'

१२ एप्रिल, सकाळ वर्तमानपत्राची मुख्य बातमी, 'ओबामांच्या अंगणात वसंतसेनेचा वासंतिक कल्लोळ'
<<< Rofl

आम्ही संतसेना घेवुन येणार आहोत. त्यात संत झक्की, संत विनय, संत नयनिश, संत स्वातीबाई, संत सायोबाई, संत मैत्रेयीबाई वगैरे असणार आहेत. Happy

..

--

सासं च्या बीबीवर लोकांनी पुस्तकांच्या याद्या बिद्या टाकून जळवायचा चंगच बांधलाय. आपणही वासंतिक कल्लोळात आपल्याकडे असलेल्या पुस्तकांचं प्रदर्शन मांडून, त्याचं रसभरित वर्णन करुन जळवावं का?

Pages