Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे केस खुप गलल्तात तर मि
माझे केस खुप गलल्तात तर मि काय करु
Hair Straightening बद्दल
Hair Straightening बद्दल सविस्तर माहिती हवी आहे. त्याचे फायदे, तोटे, देखभाल, त्यासाठी होणारा खर्च इत्यादीबद्दल कृपया विस्तृत माहिती द्या...
शरयु, पान नंबर १ पासुन
शरयु, पान नंबर १ पासुन वाचायला सुरवात करा. सुरवात Hair Straightening पासुनच झाली आहे.
माझे केस (एरंडेल तेलाने)
माझे केस (एरंडेल तेलाने) गळायचे कमी आले पण खाली खुपच पातळ झाले आहेत ते दाट होण्यासाठी काय करु ?
माझ्या डोक्यात गेले कहि दिवस
माझ्या डोक्यात गेले कहि दिवस भयंकर खाज सुटतेय. उवा नाहित. कोंडा आहे. काय करु. सध्या सेल्सोन श्याम्पू वापरते आहे.
हसरी केस गळायचे कमी झाले ना
हसरी केस गळायचे कमी झाले ना मग थोडी थांब ते वाढले की टोकांना पण जाड होतील.
मी दोन तीनदा लावल एरन्डेल तेल
मी दोन तीनदा लावल एरन्डेल तेल पण अजुनहि म्हणावा तसा फरक पड्लेला नाहि. खुपच tension आलय.
स्विटु, टेंशन घेऊ नकोस...
स्विटु, टेंशन घेऊ नकोस...
एक बाई दुस-या बाईला : मला हल्ली जाम टेंशन आलेय, त्यामुळे केस खुप गळताहेत.
दुसरी बाई : एवढे कसले टेंशन घेतलेयस?
पहिली बाई : केस खुप गळताहेत याचेच टेंशन आलेय...
म्हणावा तसा फरक पडला नाही, याचाच अर्थ फरक पडायला सुरवात झालीय ना? एक्दोन आठवडे बघ ना वाट....
thanks साधना, थोडा धीर आला.
thanks साधना, थोडा धीर आला.
एरंडेल तेलाने मालिश करण्याआधि
एरंडेल तेलाने मालिश करण्याआधि ते कोमट करुन घ्या...चिकटपणा कमी जाणवतो, केसांच्या मुळांना आधी मालिश करा, मग केस विचरा, तेल आपोआप संपुण केसाला लागते, मग खाली तेल लावा..
एरंडेल + खोबरेल तेल मिक्स करुन मालिश केली तरि चालेल..
सीसा हे तेल केसांन साठी खुप छान आहे..केस गळायचे थांबतात..
एरंडेल तेलात कोणतेहि तेल मिक्स करुन मालिश केली तरि चालेल..केस दाट होतात्..आणी गळणे थांबते.. फक्त तेल कोमट करुन घ्या..
धन्स सुजा... सीसा तेल??
धन्स सुजा...
सीसा तेल?? कुठल्या कंपनीचे आहे??
Sweetupie बरोबर मीही आहे
Sweetupie बरोबर मीही आहे एरंडेल, सीसा, जास्वंद, बदाम- सर्व तेलं वापरून झाली. एरंडेलही लावत्येच आहे सध्या. पण केस गळण्यात काहीही फरक नाही. माझ्या केसांचं काहीही होऊ शकत नाही ह्या अंतिम सत्यापर्यंत पोचलेय आता २०० एमएलची बाटली आहे एरंडेलाची. निष्काम कर्मयोग भावनेने ती बाटली संपेपर्यंत लावणार आहे, पण त्याने काही उपयोग होईल असे वाटत नाही. सध्या 'लांब, दाट केस असते तर मी कशी दिसले असते', 'मी त्याचं कायकाय केलं असतं' असं स्वप्नरंजन मात्र मनापासून करते दु:खात सुख न् काय!
ज्यांचे केस चांगले आहेत, किंवा कोणत्याही उपायाने चांगले झालेत, त्यांना शुभेच्छा. केसांना जपा बायांनो. कापू-बिपू नका
पूनम ,मेंदी वापरलीस का? माझे
पूनम ,मेंदी वापरलीस का? माझे केसपण गळायचे भयंकर,पण मेंदीने खूपच कमी झालं गळण्याचं प्रमाण.आणि वाढायला पण लागले.माझे केस खुप कोरडे आहेत्,म्हणुन मी मेंदीत दहि,अंडे,आणि थोडं तेल टाकते.
माझ्या होस्टेलमध्ये उत्तर भारतीय पोरी मेंदी खूप वापरायच्या.१ जण तर रात्रभर लाउन झोपायची.सकाळी उठुन धुवायची,केस एकदम चमकदार.:)
खरोखर सेसा तेल फारच छान आहे.
खरोखर सेसा तेल फारच छान आहे. मि पण वापरते. मस्त मउ होतात केस याने.
साधना जर मुंबइत रहात असलीस तर सेसा ची जाहिरात सर्रास लोकल ट्रेन मध्ये बघायला मिळते.
पूनम कोरफडीचं तेल वापरुन वघ
पूनम कोरफडीचं तेल वापरुन वघ नियमित. त्यात अपाय पर निश्चित नाही. मी ग्रीन फार्मसीची तेलं (जास्वंद, कोरफड) वापरली आहेत आणि मला तरी आवडली.
टीपः यात कुठल्याही उत्पादनाच्या जाहिरातीचा काहीही हेतू नाही.
तेल (कुठलेही) लावल्यावर
तेल (कुठलेही) लावल्यावर कंगव्याने अजिबात विंचरु नये! कारण तेल लावताना केसांची मुळ जरा हलकी होतात आणी कंगव्याने विंचरल्यावर केस जास्त गळतात.
पुनम व इतर, माझे केस पण खुप
पुनम व इतर, माझे केस पण खुप गळायचे २ वषापुर्वी. मग मी त्याकरता ३-४ महिने होमेओपॅथी च्या डॉ. कडुन औषध घेतले . केस गळायचे थांबले ते अजुन तरी गळत नाहियेत.
पुनम केस गळण्यासाठी अंड
पुनम केस गळण्यासाठी अंड लावुन पाहा !! बराच फायदा होतो त्याने !! मेंदीत घालुन लावता येईल. मी तर तसच लावते. नन्तर शॅम्पु केला की झाल. काही वास येत नाही.
ए, त्या एरंडेल तेलाने केस
ए, त्या एरंडेल तेलाने केस चिकट होतात आणि गुंतात मग मालिश केल्यावर विंचरता कसे? मी सध्या भक्तिभावाने एरंडेल तेल लावते आहे पण ते केस चिकटून बसतात एकमेकांना.
अमया तू अंड कधी लावतेस?
अमया
तू अंड कधी लावतेस? म्हणजे नाहायाच्या just थोडा वेळ आधी डोक्याला चोळतेस का ?
आर्च! तु खोबरेल तेल मिसळत
आर्च! तु खोबरेल तेल मिसळत नाहीस का?नुसते ए.तेल लावले की खुप चिकट होतात.
मी एक दिड तास आधी
मी एक दिड तास आधी लावायचे.थोडे वाळल्यावर धुवायचे. आता वेळच नाही पण मला झाला होता फायदा. फेटुन घ्यायचे आणी लावायचे.
आणखीन एक , बरेच लोक शॅम्पु
आणखीन एक , बरेच लोक शॅम्पु लावुन धुतल्यावर वास येतो म्हणुन अंड आणि मेंदी एकत्र करुन लावतात. मेंदीत घातल तर मुळीच वास येत नाही. पण मी मात्र नुसतच अंड लावायचे.
प्राजक्ता, खोबरेल तेल नाही
प्राजक्ता, खोबरेल तेल नाही माझ्याकडे. आणू शकेन. पण ऑलिव्ह ऑईल मिक्स केलं तर चालेल का?
मी पण मेंदीमध्येच अंड (पिवळा
मी पण मेंदीमध्येच अंड (पिवळा बलक सोडुन, त्याने फार वाईट वास येतो.) घालुन लावते. ५-६ तासांनी धुते केस. मस्त चकाकी येते केसांना.
पुनम केस गळण्यासाठी अंड लावुन
पुनम केस गळण्यासाठी अंड लावुन पाहा !! बराच फायदा होतो त्याने<<<<<
अमया केस गळण्यासाठी की गळण थाम्बण्यासाठी?
रात्री तेल लावलं आणि केस
रात्री तेल लावलं आणि केस धुण्याच्या अगोदर १ तास फक्त अंड फेटुन लावलं तर चालेल ना?
महिन्यातुन एकदा असं अंड लावल तर चालेल ना? (केसांच्या मुळांना लावायचे की सगळ्या केसांना)
सगळ्यांना धन्यवाद गं मेंदी,
सगळ्यांना धन्यवाद गं मेंदी, अंडं हे उपाय झेपतील तसे नक्की करेन. झेलम, एरंडेल संपलं की कोरफडीचं तेल नक्की वापरेन. मी काय उपाय करायला तयारच असते, फरक पडत नाही म्हणून वाईट वाटतं मात्र
पण कधीकधी मला वाटतं, की मूळ केसही चांगले हवेत. माझ्याकडे दोन मोलकरणी आहेत, दोघींचेही केस इतके जाड आणि मस्त आहेत. काय लावतात त्या, तर चक्क मोहरीचं तेल डोक्याला! (स्वयंपाकालाही तेच वापरतात) खाणंही काय विशेष पौष्टिक खातात थोडीच? इथे मी चौरस आहार, दूध, फळं, पालेभाज्या, लाल भाज्या, फळभाज्या सगळं आठवणीने खाते, तरी ढिम्म फरक पडतो! दैवी देणगीच ती खरं आणि जोपासणं आपल्या हातात, इतकंच!
दैवी देणगीच ती खरं आणि
दैवी देणगीच ती खरं आणि जोपासणं आपल्या हातात, इतकंच!>> अगदी खरं पूनम. मीही एरंडेल तेल, बदाम तेल सगळे लावते पण काही फरक पडत नाही.
हो.... केस हे मुळातच असावे
हो.... केस हे मुळातच असावे लागतात... उपायांनी केस सुधारतात पण ते बिघडलेले सुधारतात. सुधारुन ते मुळ जसे असायला पाहिजेत तेवढेच होतात. माझ्या ऑफिसात एक बाईचे केस खुप कुरळे होते.. तिने वाढवायचे दोन चारदा प्रयत्न केले, पण वाढत वाढत ते एका लांबीपर्यंत यायचे आणि मग त्यांची वाढ खुंटायची.
मी आधीच लिहिल्याप्रमाणे माझ्या आईच्या घरात केसांचे वरदान.. मी गेली ३० वर्षे लहान केस घेऊनच वावरलेय, पण आता कापायचे थांबवल्यावर ते आपोआप आईच्या वळणावर गेले. मला खुप जण विचारतात इतक्या लांब केसांसाठी काय करतेस म्हणुन? त्यांना काय उत्तर द्यावे ते मलाही सुचत नाही. कारण मी पांढरे केस वाईट दिसतात म्हणुन मेंदी लावण्याव्यतिरिक्त अजुन काहीही केलेले नाही.
Pages