नभाचे शब्द स्वच्छंदी : गझल सहयोगचा मुशायरा

Submitted by मिल्या on 19 February, 2010 - 02:44
ठिकाण/पत्ता: 
दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ०० स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे संयोजन - अजय जोशी व बेफिकीर

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. त्यानिमित्ताने एक गझल मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आलेले आहे

तपशीलः

मुशायर्‍याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'

दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार

समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ००

स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे

संयोजन - अजय जोशी व बेफिकीर

सहभागी गझलकारः

डॉ. अनंत ढवळे

श्री. मिलिंद छत्रे

श्री. केदार पाटणकर

डॉ. ज्ञानेश पाटील

श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस

श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट

श्री. अजय जोशी

भूषण कटककर उर्फ बेफिकीर

प्रमुख आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ साहेब

कार्यक्रमाची रूपरेषा:

गझल सहयोग परिचय - २ मिनिटे

सर्व शायरांचा परिचय व व्यासपीठावर आगमन - एकंदर २ मिनिटे

बशर नवाझ साहेबांचे परिचय व आगमन - १ मिनिट

भटसाहेबांच्या २ गझलांचे वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर यांच्याकडून

चक्री मुशायरा - प्रत्येकी सहा स्वरचित व मराठी गझला (प्रकाशित वा अप्रकाशित)

इच्छुक रसिकांनी जरूर उपस्थित रहावे.

प्रवेश विनामुल्य

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अर्धा तासच होतो. काही चांगल्या गोष्टी व काही सुधारणा करता येण्यासारख्या गोष्टी आढळल्या. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मिल्याचे आणि फक्त मिल्याचेच सादरीकरण मला खूप आवडले. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे सर्व ग़ज़ला अत्यंत उच्च दर्जाच्या होत्या. मराठी ग़ज़ल किती प्रगल्भ आहे ते जाणवले. जर जास्त जाहिरात झाली असती तर जास्त रसिक येऊ शकले असते. Happy

शरद

खरोखर शब्दांचा आनंद देणारा कार्यक्रम! पहिल्यांदाच गझल कार्यक्रमाला गेले असले तरी खूप खूपच मस्त वाटले! मिल्या, तुझ्या गझल वाचताना जे सहजच उद्गार निघायचे, 'वाह,' 'क्या बात है' ते तिथे पुनश्च व्यक्त करायची संधीच मिळाली... गझलेवरचा खरा प्रतिसाद हा लेखी पेक्षा असा 'जिवंत' असण्यात काय आनंद आहे ते सतत 'पुन्हा एकदा..' च्या मागणीने स्वतःलाच कळत होते! ती संध्याकाळ शब्दांच्या विश्वात अक्षरशः तरंगतच होते मी! गंमत म्हणजे ते इतकं कानात साठवून घेतल्याने घरी गेल्यावर एकही शेर आख्खा आठवेना, याची पहिली ओळ, तर त्याची दुसरी ओळ, स्वतःचीच चिडचिड! पण यावरुनच, एक से एक गझल आपल्याला ऐकायला मिळाल्या अशी खात्री मनाला पटली आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची असे ठरवले! Happy
धन्यवाद रे खरंच!

आशू धन्स गं

ह्यानिमित्ताने उपस्थित मायबोलीकर आशूडी + हर्षूडी, मयुरेश, देवा, साजिरा आणि शरद ह्यांचे आभार मानतो उपस्थित राहून प्रोत्साहन दिल्याबद्दल Happy

.

Pages