चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अमिषा चा भाऊ, मर्डर मध्ये होता.

तो मर्डर पिक्चर सीन टू सीन अमेरिकन मुवि वरून कॉपी केलेला. मी हिंदी आधी बघितलेला, नंतर सहज स्टार मुविज वर ओरिजनल बघायला मिळाला, रिचर्ड गियर (गियरी) होता त्यात, लाईट्स गेल्याने पूर्ण नाही बघता आला.

मर्डर सीन टू सीन कॉपी हे माहीत होते.
तेव्हा बहुधा साजिद खानचा एक कार्यक्रम यायचा ज्यात कुठला मूवी कसा सीन टू सीन कॉपी आहे हे दाखवायचे. त्यात पाहिलेले.

बाकी मी मर्डर पाहिला नाही. तेव्हा फॅमिली सोबत केबलवर पिक्चर बघणे व्हायचे. आणि मर्डर मधील बोल्ड दृश्यांची हवा झाल्याने तो संकोचाने पाहिला नव्हता.

साजिद खानचा एक कार्यक्रम यायचा ज्यात कुठला मूवी कसा सीन टू सीन कॉपी आहे हे दाखवायचे>>>> व्हॉट अ‍ॅन आयर्नी! Lol

सुबोध भावे नाही??? >> Lol
त्याने बिचाऱ्याने काही नाही कैलं तरी Lol
आता अवधूत गुप्तेची अजून एक पोस्ट येईल. Proud

सुबोध भावे नाही Lol

सुनिता सोबत अजून एक जण पुरुष अंतराळवीर सुद्धा होता ना ज्याचे मलाही भाव द्या रे असे मीम फिरत आहेत.
अक्षय कुमार त्याचा रोल करेल आणि सर्व भाव त्यालाच देईल.
याने सुनिताचे बजेट कमी होईल आणि तिथे गरिबांची लेडी अमिताभ तापसी पन्नू किंवा मध्यमवर्गीयांची लेडी मिथुन चक्रवर्ती कंगना राणावतची वर्णी लागेल.

जिलबी असा एक अचाट व अतर्क्य गटात मोडणारा मराठी चित्रपट पाहिला.
त्यात तो स्वजो आहे. सतत खून व नको तेवढी पात्रं..

डॉ. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकचा टीजर पाहिला. यात आमीर खान आहे दिसतोय.
रिलीज कधी आहे हे चेक केलं तर दुसराच मूवी समोर येतो.
यात बोम्मन इराणी आणि परेश रावल आहेत.
तिसरा साऊथचा आहे जो हिंदीत पण येणार आहे.

आता इतका गोंधळ वाडलाय. साऊथचा २९ एप्रिलला , एक कुठला तरी १५ ऑगस्टला आणि एक १५ ऑक्टोबरला.
बोम्मन इराणीच्या मूवीचा दिग्दर्शक ओम राऊत. म्हणजे तो नाहीच पाहणार.
तानाजी प्रमाणे अब्दुल कलाम यांना पण विमानातले स्टंट करायला लावेल राऊत.

संत ज्ञानेश्वरांनी मुक्ताई चा ट्रेलर बघितला. तेजस बर्वेला अजिबात ओळखता आलं नाही. मुक्ताई झालेली नेहा नावाची मुलगी जाम गोड वाटली, अभिनयही आवडला.

The roses - Benedict Cumberbach and Olivia Colman बस नाम ही काफी है!

तुझीपण तारीख रिपीट होतेय का.. Lol ट्रेलर आधी येऊन गेला नाही तो नवीनच आहे . गाणं आधी ऐकलं असशील, ते जुनंच आहे, लव आज कल मधलं.

Lol
ट्रेलर दोन वीक जुना आहे.. ट्रेलर किंवा टिझर या धाग्यावर आधीही येऊन गेला असेल म्हणायचे होते. कारण मी पाहिला होता आधीही.. आणि मायबोलीवर कोणी लिंक शेअर केली असेल तरच शक्यतो बघणे होते.

हे तीन कलाकार एकत्र बघूनच छान वाटले.. स्क्रिप्ट चांगली असेल तर धमाल उडवतील..
नाव ऐकून लहानपणीचे आटली बाटली फुटली आठवले..

Pages