Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो अमिषा चा भाऊ, मर्डर मध्ये
हो अमिषा चा भाऊ, मर्डर मध्ये होता.
तो मर्डर पिक्चर सीन टू सीन अमेरिकन मुवि वरून कॉपी केलेला. मी हिंदी आधी बघितलेला, नंतर सहज स्टार मुविज वर ओरिजनल बघायला मिळाला, रिचर्ड गियर (गियरी) होता त्यात, लाईट्स गेल्याने पूर्ण नाही बघता आला.
मर्डर सीन टू सीन कॉपी हे
मर्डर सीन टू सीन कॉपी हे माहीत होते.
तेव्हा बहुधा साजिद खानचा एक कार्यक्रम यायचा ज्यात कुठला मूवी कसा सीन टू सीन कॉपी आहे हे दाखवायचे. त्यात पाहिलेले.
बाकी मी मर्डर पाहिला नाही. तेव्हा फॅमिली सोबत केबलवर पिक्चर बघणे व्हायचे. आणि मर्डर मधील बोल्ड दृश्यांची हवा झाल्याने तो संकोचाने पाहिला नव्हता.
The Xpose पण पहा. >>> कुठे
The Xpose पण पहा. >>> कुठे आहे ? पाहीन. thanks a lot.
साजिद खानचा एक कार्यक्रम
साजिद खानचा एक कार्यक्रम यायचा ज्यात कुठला मूवी कसा सीन टू सीन कॉपी आहे हे दाखवायचे>>>> व्हॉट अॅन आयर्नी!
साजिद खानचा एक कार्यक्रम
साजिद खानचा एक कार्यक्रम यायचा ज्यात कुठला मूवी कसा सीन टू सीन कॉपी >>> कहने में क्या हर्ज है
सुनिता विल्यम्स यांच्यावर येत
सुनिता विल्यम्स यांच्यावर येत असलेल्या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज झाले.

अक्षय कुमार? सुबोध भावे नाही?
अक्षय कुमार? सुबोध भावे नाही???
अक्षय कुमार? सुबोध भावे नाही?
अक्षय कुमार? सुबोध भावे नाही??? >>>

सुबोध भावे नाही??? >>
सुबोध भावे नाही??? >>


त्याने बिचाऱ्याने काही नाही कैलं तरी
आता अवधूत गुप्तेची अजून एक पोस्ट येईल.
सुबोध भावे नाही
सुबोध भावे नाही
सुनिता सोबत अजून एक जण पुरुष अंतराळवीर सुद्धा होता ना ज्याचे मलाही भाव द्या रे असे मीम फिरत आहेत.
अक्षय कुमार त्याचा रोल करेल आणि सर्व भाव त्यालाच देईल.
याने सुनिताचे बजेट कमी होईल आणि तिथे गरिबांची लेडी अमिताभ तापसी पन्नू किंवा मध्यमवर्गीयांची लेडी मिथुन चक्रवर्ती कंगना राणावतची वर्णी लागेल.
ती उदिता गोस्वामी नंतर गायबच
ती उदिता गोस्वामी नंतर गायबच झाली
>>
डायरेक्टर मोहित सूरी शी लग्न करून...
कुठे आहे ? पाहीन
कुठे आहे ? पाहीन
>>
हिमेश रेशिममिया ला माहीत...
जिलबी असा एक अचाट व अतर्क्य
जिलबी असा एक अचाट व अतर्क्य गटात मोडणारा मराठी चित्रपट पाहिला.
त्यात तो स्वजो आहे. सतत खून व नको तेवढी पात्रं..
डॉ. अब्दुल कलाम यांच्या
डॉ. अब्दुल कलाम यांच्या बायोपिकचा टीजर पाहिला. यात आमीर खान आहे दिसतोय.
रिलीज कधी आहे हे चेक केलं तर दुसराच मूवी समोर येतो.
यात बोम्मन इराणी आणि परेश रावल आहेत.
तिसरा साऊथचा आहे जो हिंदीत पण येणार आहे.
आता इतका गोंधळ वाडलाय. साऊथचा २९ एप्रिलला , एक कुठला तरी १५ ऑगस्टला आणि एक १५ ऑक्टोबरला.
बोम्मन इराणीच्या मूवीचा दिग्दर्शक ओम राऊत. म्हणजे तो नाहीच पाहणार.
तानाजी प्रमाणे अब्दुल कलाम यांना पण विमानातले स्टंट करायला लावेल राऊत.
फुलेच्या ट्रेलर वरून वाद चालू
फुलेच्या ट्रेलर वरून वाद चालू आहे.
बहुतेक स्क्रीप्टेड असावं.
संत ज्ञानेश्वरांनी मुक्ताई चा
संत ज्ञानेश्वरांनी मुक्ताई चा ट्रेलर बघितला. तेजस बर्वेला अजिबात ओळखता आलं नाही. मुक्ताई झालेली नेहा नावाची मुलगी जाम गोड वाटली, अभिनयही आवडला.
अरे बापरे! दिग्पाल लांजेकर
अरे बापरे! दिग्पाल लांजेकर आता संतांच्या मागे लागणार की काय?
The roses - Benedict
The roses - Benedict Cumberbach and Olivia Colman बस नाम ही काफी है!
बस नाम ही काफी है! >> +१११!
बस नाम ही काफी है! >> +१११! केट मॅकिनन पण दिसली. मस्त आहे ट्रेलर
ट्रेलर पाहिले. त्यात ती खेकडे
ट्रेलर पाहिले. त्यात ती खेकडे सोडते हे पाहून एक मिनिट पॉज करून हसलो.
धमाल!
धमाल!
https://youtu.be/WzJSgij42lQ
https://youtu.be/WzJSgij42lQ?si=wiv4pM0Lz_41pUoC
आता थांबायचे नाय
मराठी चित्रपट
नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी दिसतेय.
जुनेजाणते कलाकार आहेत
द वॉर ऑफ द रोझेस नावाचा एक
द वॉर ऑफ द रोझेस नावाचा एक जुना सिनेमा आहे, तीच स्टोरी आहे का?
भूल चूक माफ https://youtu.be
भूल चूक माफ https://youtu.be/nZEXRZMEd5Y?si=5MzY8jeCNd0ldkF- राजकुमार राव, वामिका गब्बी
आधीही येऊन गेला होता वाटते
आधीही येऊन गेला होता वाटते हा ट्रेलर..
धमाल दिसतोय.. राजकुमार राव आहे हे मस्त
तुझीपण तारीख रिपीट होतेय का..
तुझीपण तारीख रिपीट होतेय का..
ट्रेलर आधी येऊन गेला नाही तो नवीनच आहे . गाणं आधी ऐकलं असशील, ते जुनंच आहे, लव आज कल मधलं.
ट्रेलर दोन वीक जुना आहे..
ट्रेलर दोन वीक जुना आहे.. ट्रेलर किंवा टिझर या धाग्यावर आधीही येऊन गेला असेल म्हणायचे होते. कारण मी पाहिला होता आधीही.. आणि मायबोलीवर कोणी लिंक शेअर केली असेल तरच शक्यतो बघणे होते.
https://youtu.be/iStYZejS0O4
https://youtu.be/iStYZejS0O4?si=dLCO9P7dWOoiWw_E
मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी आणि सिद्धार्थ जाधव. धमाल वाटतो आहे पिक्चर.
https://youtu.be/tmLCoN28Bqo
https://youtu.be/tmLCoN28Bqo?si=Jfln3VzvTZVQQOg8
प्रियदर्शन जाधव चा पिक्चर आहे. हा पण टाईमपास वाटतोय. स्त्री, मुंजा टाईप दिसतोय.
हे तीन कलाकार एकत्र बघूनच छान
हे तीन कलाकार एकत्र बघूनच छान वाटले.. स्क्रिप्ट चांगली असेल तर धमाल उडवतील..
नाव ऐकून लहानपणीचे आटली बाटली फुटली आठवले..
Pages