चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल दोस्ती डॉग्ज चा टीजर पाहिला. स्व. अमांची आठवण व्हावी असा विषय आहे.
त्या असत्या तर भरभरून लिहीले असते.

शाहरुखचं बरचसं करिअर दुसर्‍यांच्या बायकांवर डोळा ठेवण्यातच/कधी पटकवण्यात गेलय >>> Happy

मोहब्बतें मधे तो जरी स्वतः हे करत नसला, तरी पोरांना गायडन्स देतो Wink त्या मुलीचे फक्त दुसर्‍यावर प्रेम आहे, साखरपुडा झाला आहे, की लग्नही झाले आहे याप्रमाणे प्रत्येक सिच्युएशनचे प्लेबूक शाखाकडे तयार आहे Happy

त्यातील याचा संदर्भ Happy

अशाच एका सामुदायिक प्रेमभंग सोहळ्यानंतर शाहरूख त्यांना भेटतो. त्याचे काउन्सेलिंग सेशन साधारण असे झाले असावे:

उदयः "तिला माझ्यात इंटरेस्ट नाही",
शाहरूखः "मग काय झाले. डर बघितला का?"
अलंकारः "तिला एक बॉयफ्रेण्ड आहे",
शाहरूखः "कभी हाँ कभी ना पाहा"
जिमी: "तिचे लग्न झालेले आहे",
शाहरूखः (गूढ हसतो)...
तिघे: "ओह! डर, अंजाम, यू नेम इट..",
येथे शाहरूख च्या चेहर्‍यावर मुले परीक्षा पास झाल्याचे भाव.

त्या मुलीचे फक्त दुसर्‍यावर प्रेम आहे, साखरपुडा झाला आहे, की लग्नही झाले आहे याप्रमाणे प्रत्येक सिच्युएशनचे प्लेबूक शाखाकडे तयार आहे
>>>> ही मोहब्बते मधली 'इष्काची शिडी' बघून 'प्लेटोज् लॅडर ऑफ लव्ह' आठवली. हा पॉईंट आधी लक्षात आला नव्हता. त्या पिकनिक मधे शाहरुख आणि ऐश्वर्या या तिघा जोडप्यांच्या 'प्रेम सुळसुळाटा'कडे नातवंडांचे बोबडे बोल ज्या कृतार्थ भावाने आजीआजोबा बघतील अगदी तसेच बघतात. त्यात आजी भूत आहे तरी पिकनिक करतेय. वेड्यांचा बाजार आहे अगदी. Proud एरवी नीट दिसत असतानाही बारक्या फ्रेमचा चष्मा घालून खांद्यावर स्वेटर शालीसारखे घेऊन गिटार का युकुलेली फुंकणी वाजवली की आलं भूत.

वेड्यांचा बाजार आहे अगदी ??

सगळं लॉजिकल हवं असा आग्रह भारतीय लोकांनी हजारो वर्षाम्पूर्वीच सोडून दिलेला आहे. शेवटी व्यंजना नेहमीच श्रेष्ठ शक्ती मानलेली आहे त्यामुळे अशा चमत्कृतीचा भावार्थच पाहायला हवा. बॉलीवूडपट असेच असण्यामागे भारतीयांची खास सौंदर्यदृष्टी आहे ज्यात चमत्कृती, लार्जर दॅन लाईफ गोष्टी, मेटाफिजिकल गोष्टी हे कोणालाही खटकत नाही. अतर्क्य असणे हे मनाचे स्वयंभू लक्षण आहे हे भारतीय लोकांना आधीच कळले आहे त्यामुळे हा विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसेबिलिफ भारतीय लोक अतिशय सहज करून जातात. छावाचेच उदाहरण घ्या. डॉक्युमेंटेड इतिहासाचे फिक्शन करण्यात भारतीय अतिशय नैसर्गिकरित्या पटाईत आहेत. त्यामुळे वेशभूषा, साहसदृश्ये, संगीत, खाणे अशा सगळ्या गोष्टी एखाद्या ऐतिहासिक चित्रपटासाठी डीलब्रेकर ठरल्या असत्या त्या आपल्याला नोटीस सुद्धा होत नाहीत.

एरवी नीट दिसत असतानाही बारक्या फ्रेमचा चष्मा घालून खांद्यावर स्वेटर शालीसारखे घेऊन गिटार का युकुलेली फुंकणी वाजवली की आलं भूत.
>>> व्हायलिन गं व्हायलिन

प्रेम सुळसुळाटा'कडे Rofl
व्हायलिन गं व्हायलिन>>> जर्रा मेली रसिकता नाही ह्या अस्मिता कडे Wink

प्रेम सुळसुळाट >>> Rofl

या सिनेमात सगळ्यात राग आणणारं काय असेल तर कुठल्याही गोष्टीसाठी उदय-जिमी-जुगल यांनीच पुढाकार घेणं. शाहरूख स्टुडन्ट्स गोळा करायला व्हायोलिन वाजवायला बसला की हे तिघे धावत धावत पुढे. प्रेम करत असाल तर गुरूकुलचं गेट तोडा असं शाहरूख म्हणाला - झालं! हे तिघं पळाले लगेच. बाकीची खोगीरभरती कशाला केली आहे मग? आख्ख्या गुरूकुलात यांनाच ठेवायचं ना मग!

प्रेम करत असाल तर गुरूकुलचं गेट तोडा असं शाहरूख म्हणाला - झालं! हे तिघं पळाले लगेच.
>>>> Lol मग काय अभ्यास करावा वगैरे म्हणतेयस की काय, आदिमानवांना समजून घे जरा.

आशु आणि माझेमन, Proud व्हायलिन- व्हायलिन नोटलं. यशराज तुणंतुणं दिल्याशिवाय हिरोंना कुठेही पाठवत नाहीत. स्वित्झर्लंडच्या विमानात चढतानाही हातात पासपोर्ट दिसत नाही पण तुणंतुणं हमखास दिसतं. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला (उदयलाही) 'तुणंतुणं तेवढं टाक ब्यागेत पोरा, टॅलेन्टच काय होईल कसंही ' म्हणायला विसरले नाहीत.

रॉय, एवढे 'खटकवून' घेत नाही मी पण तुमचा मुद्दा लक्षात आला Happy

मोहोब्बते एक परिकथा आहे. तिचा आनंद तसाच घ्यावा जसे सिंड्रेलाच्या किंवा हिमगौरीच्या कथांचा घेतो Happy

मी तो पिक्चर एकदा थिएटर मध्ये आणि मग घरी टीव्हीवर पाचसहा वेळा बघितला आहे. फक्त आणि फक्त शाहरूखसाठी तो नसलेल्या सीन मध्ये बाकीच्यांना सहन करतो.

त्यातले शाहरुखचे व्हायोलीन आणि स्वेटर आयकॉनिक आहे. त्याचा तो बारीक फ्रेमचा चष्मेवाला लूक आजही पापण्या मिटल्या की डोळ्यासमोर येतो.

शाहरूख आणि ऐश्वर्या जोडी सुद्धा त्यात छान दिसते. त्यांचे अजून एक दोन चित्रपट यायला हवे होते. देवदास मध्ये होते पण तो रडका होता. एकदाच पाहिला आयुष्यात. आणि जोश मध्ये भाऊ बहिण झालेले. पण त्यातही अपून बोला गाण्यात केमिस्ट्री मस्त होती.

मग काय अभ्यास करावा वगैरे म्हणतेयस की काय >>> नाही यार! पण हेच तिघं काय दर वेळी? Lol ( 'सारखं सारखं त्याच झाडावर काय?' या चालीत वाच Proud )

Pages