शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत् वरून बाकी सगळं आठवल, पतीपत्नी बरं आठवलं नाही तुम्हाला.
पति - ज्याचे सतत पतन होत असते तो
Light 1

पत् , पतन, पत्ते पे चर्चा = 👌

पति - ज्याचे सतत पतन होत असते तो….

👊

बुल्स आय

गूज
न. गुप्त गोष्ट; गुह्य. हित, निज या शब्दांशी जोडून उपयोग. पहा : गुज : ‘बरें पाहतां गूज तेथेचि राहे ।’ - राम १५५. [सं. गुज्]
मूळ धातू गुज् १प. अस्पष्ट बोलणे. गुंजारव करणे.
मी हा इथे का देत आहे?
गुह्य संस्कृत, प्राकृत गुज्ज. कन्नड गुजुगुजु, तमिळ कुचुकुचु, तेलगु गुसगुस =कुजबुजणे.
सगळ्या दख्खनी भाषांत किती साम्य आहे ना.
आणि आपले "हितगुज."
‘क्षणोक्षणीं चिखलाशीं चपक्‌चपक् करून हितगुज करणाऱ्या चपला...’ अहाहा.

वा, मस्त !
* चपक्‌चपक् करून हितगुज करणाऱ्या चपला.>>> Happy

साष्टांग प्रणाम ( = स + अष्ट + अंग प्रणाम = आठ अंगों के द्वारा प्रणाम)
ही आठ अंग कुठली?
डोके=कपाळ, हात, पाय = पायाचे अंगठे, हृदय म्हणजे छाती, डोळे, गुढगे, वचन आणि शेवटी मन.
पुढच्या वेळी देवाला साष्टांग नमस्कार करताना हे लक्षात ठेवा.
मुखी असावे नाम आणि मनी असावा भाव.

साष्टाङ्ग नमस्कारम् –
उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा ।
पद्भ्यां कराभ्यां कर्णाभ्यां प्रणामोष्टाङ्गमुच्यते ॥
ओं श्री ______ नमः साष्टाङ्ग नमस्कारां समर्पयामि ।
कर्णाभ्यां?
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यामुरसा शिरस्तथा |
मनसा वचसा दृष्टया प्रणामोऽष्टाङ्ग मुच्यते ||

संस्कृत आठवी नववीच्या पुस्तकात साष्टांग नमस्काराच सुभाषित होतं
त्यात बहुतेक हपा म्हणतात तसाच अर्थ आहे.
शोधून इथे डकवतो

संकेत कोशा प्रमाणे अष्टांग ह्या शाबदाचे विविध अर्थ दिले आहेत. त्यात अष्टांगे (शरीराची ) ह्यात हपा म्हणतात ती अष्टांगे दिली आहेत. तर अष्टांगे (नमनाची ) मध्ये मी जी अष्टांगे म्हणतो आहे ती दिलेली आहेत. थोडे थोडे भेद सगळीकडे आहेतच.
मी दिलीला पहिला संदर्भ हा ॠग्वेदीय नित्यकर्म पूजा मधला आहे. तर दुसरा संकेत कोशामधून घेतला आहे.

उत्तम चर्चा.
आणि अष्टांगयोग म्हणतात ती योगाभ्यासाची यमनियमादी आठ अंगे.

उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा ।
पद्भ्यां कराभ्यां कर्णाभ्यां प्रणामोष्टाङ्गमुच्यते ॥
ओं श्री ______ नमः साष्टाङ्ग नमस्कारां समर्पयामि >>

कुठे साष्टांग नमस्कार करताना तोंड दोन्ही बाजुस करावे (म्हणजे कान टेकेल) अशी प्रथा असावी का?

तुम्ही म्हटल्यावर आठवलं, काही दाक्षिणात्य लोक साष्टांग नमस्कार करून तोंड दोन्ही बाजूला फिरवतात आणि मग कपाळ टेकतात.

पादौ हस्तौ जानुनी द्वे उरश्चाथ ललाटकम् ।
अष्टाङ्गेन स्पृशेद् भूमिं साष्टाङ्‌ङ्गप्रणतिश्च सा ॥८॥

नववीच्या "संख्या दश निबोधत" या पाठात आठ संख्येसाठी वरील श्लोक/ सुभाषित होते.

संस्कृत मधे द्विवचन असते . पादौ = २ पाय.
वरच्या सुभषिताचा अर्थ - २ पाय, २ हात, २ गुडघे, कपाळ आणि छाती असे मिळून ८ अंगे जमिनीस टेकवून/ स्पर्षून नमस्कार करावा - साष्टांग नमस्कार

ऋतुराज, आठवला मला तो श्लोक. छान चर्चा. Happy
जानु म्हणजे गुडघेच, रामाचे हात गुडघ्यापर्यंत पोचायचे म्हणून तो आजानुबाहू. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं.

जानुनी ही द्विरुक्ती झाली, चाय टी सारखी. जानु म्हणजेच नी (knee) Wink

आजानुभुज” तेच पुढे शरचापधर संग्रामजित वगैरे >> श्रीरामचंद्र कृपालु - आवडतं हे भजन. फक्त ह्या आजानुभुज वाक्यात लता मंगेशकरांनी मूळ वृत्त बरोबर असताना चालीत ऑफबीट घेऊन हर्फ गिराना प्रकार का केला आहे ते कळले नाही. बहुतेक श्री - रामचंद्र मधला न्यास कानाला खटकत नाही, पण आ - जानुभुज मधला खटकला असता म्हणून केलं असावं.

जानु म्हणजेच नी knee … 👌

How brilliant!

“हर्फ गिराना” हे कितीतरी वर्षात न ऐकलेलं expression !

नवीन शब्द "लघुदर्शन."
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन (ट्रेलर) सोहळा....

Pages