खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य>> बरंच काम आहे की. मी करेन की नाही सांगता येत नाही. पण चणे उकडायचे नाहीत हे सांगितले ते चांगले.

अनिंद्य, बेस्ट आयडिया आहे चणे भिजवायची.
थोडे करून पाहीन.
कैऱ्या मात्र करकरीत आंबट हव्यात यासाठी, तर पाणी छान सुटेल.
Happy
मी असे मेथी दाण्यांना लिंबू रसात भिजत घालून, मोड आणून लोणचे केले होते.

हा हा

स्वाद के लिए कुछ भी करेगा अप्पुन तो 😀

… कैऱ्या करकरीत आंबट हव्यात यासाठी…
आणि अगदी तश्श्याच आहेत सध्या बाजारात 👍

जुई , केक मस्तच !!!
कैरी भात आणि कोबीच्या वड्या... सुटसुटीत जेवण .
IMG_20250409_083846.jpg

वाह जुई केक मस्त!

कोबीच्या वड्या आईच्या हातच्या आवडणाऱ्या पदार्थांपैकी एक.
लहानपणी कोबीची भाजी मी बिलकुल खायचो नाही. वड्या मात्र तितक्याच आवडीने खायचो.
त्यामुळे आईला नेहमी म्हणायचो की निसर्गाने कोबी हा वड्या करायला आणि दुधी हा हलवा करायला जन्माला घातला आहे, लोकं भाज्या कशाला बनवतात देव जाणे Happy

केक खरच अप्रतिम दिसतोय घरचा आहे म्हणजे चवही छानच असणार. कैरी भात, कोबीवड्या मस्त
पाकृ टाका ना इथे +1

IMG_20250409_092207.jpg
रंगीत भाज्या + शेजवान &सोया सॉस + भात= वरची डिश
कोबीचं काहीही करा वड्या, भात जसा वरचा पण दुधीचा मात्र हलवाच व्हायला हवा. Happy # Halva fans

इकडे यायलाच नको बुआ सकाळी.
जुई केक अगदी प्रोफेशनल वाटतोय. मस्तच.

कैरी भात आणि कोबीवड्या अगदी तो पा सु आहेत.

कैरी आणली तर मनीम्याऊ यांनी सांगितलेली कढी, अनिंद्य यांनी दाखवलेलं लोणचे आणि हा भात एवढा कराव लागणार....

रंगिबेरंगी भात पण मस्त दिसतोय.

विशेषतः केक आणि इतर सगळेच पदार्थ मस्त!
ऋतुराज, तुम्हांला भरपूर कैर्‍या आणाव्या लागतील.

kairi.jpeg

दोन्ही काल केलेल्यातले उरलेले. मेथांबा आणि आंबा डाळ. डाळीला कैरी कमी पडली.

अजून पन्ह्याचे फोटो येतील

खरं तर आंबा महोत्सवासाठी वेगळा धागा असायला हवा .

मनिमोहोर यांच्या पुरणपोळ्यांचा तलमपणा फोटोतही जाणवतोय.

वर्षातून एकदा पुरणपोळ्या आणि एकदा उकडीचे मोदक करणार्‍या माझ्यासारख्यांना हे पदार्थ न फुटता जमले यावरच समाधान मानावं लागतं. चव जमते मात्र.

धन्यवाद सर्वांना.. केक बेकिंग कोर्स केल्यापासून घरीच बनवते केक... हा डॉल केक बहिणीसाठी बनवलेला..
Screenshot_2025-04-09-12-59-12-61_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
अश्विनी११ वड्या छान दिसतायेत.. माझ्या आवडीच्या..

कोबीच्या वड्या आणि कैरी भात आवडलेल्या सर्वांना धन्यवाद !
कैरी भात - बासमती तांदूळाचा तयार भात , कैरीचा कीस , मीठ , साखर
फोडणीसाठी - तेल, मोहरी , हिंग , हळद , सुकी लाल मिरची , हिरवी मिरची , कडीपत्ता, हरभरा डाळ , दाणे , काजू
कृती - तयार भात परातीत पसरून घ्यायचा . त्यात कैरीचा कीस , मीठ , साखर मिसळायचे. आधी तेलात दाणे , काजू तळून घ्यायचे. भातावर घालायचे. नंतर उरलेल्या साहित्याची फोडणी करून घ्यायची. गार झाल्यावर भातावर पसरायची . सर्व नीट कालवून घ्यायचे . हा भात जेवायच्या थोड्या आधी करून ठेवायचा म्हणजे कैरीचा आंबटपणा भातात मुरतो. कोथिंबीर, काजू , दाणे सजावट करायची .
फोटो काढून खाऊगल्ली ला नैवेद्य दाखवायचा.

अरे तुम्ही पाककृती इथेच टाकली ,इथेही असुद्या ,पण इथे पानांमध्ये हरवून जाईल .शक्य असेल तर स्वतंत्र धागा काढून प्रमाणासहित पाककृती लिहाल का .म्हणजे शोधायला सोपे.

हो कैरी आणि आंबा महोत्सवासाठी वेगळा धागा असायलाच हवा . मी कालच कैऱ्या आणल्यात . आता त्यांचं जे करेन ते फोटो दिसतीलच.

ममोच्या पुरणपोळ्या एकदम तोंपासु!
जुई, दोन्ही केक एकदम प्रो झालेत!
कोबी वड्या पण मस्त! आणि इथला कैरी महोत्सव बघून जेलस!

ऋतुराज, तुम्हांला भरपूर कैर्‍या आणाव्या लागतील.>>>>>
भरत, खरच
आता चार पाच किलो कैऱ्या आणायला पाहिजे.
त्यात तुमचा मेथांबा जबरी दिसतोय तो करायला हवा.
चैत्रात डाळ पन्ह हवंच.
अश्विनी, रेसिपीसाठी धन्यवाद
आंबा महोत्सवाचा धागा काढा कुणीतरी....

Wow!

…आंबा महोत्सवाचा धागा काढा कुणीतरी....

…इथला कैरी महोत्सव बघून जेलस!..

… कैरी आणि आंबा महोत्सवासाठी वेगळा धागा असायलाच हवा ….

.. खरं तर आंबा महोत्सवासाठी वेगळा धागा असायला हवा .…

हौस पुरवीन आवडी वो माये . काढलाय धागा. लाभ घ्यावा, लोभ शेयरावा !

https://www.maayboli.com/node/86605

👆 👆 👆

सिमरन, कैरी भाता साठी प्रमाण असे मला लिहिता येत नाही . अंदाजे घरी सगळ्यांना जेवढा भात लागेल तेवढा मी लावला होता . कैरीच्या आंबटपणा वर किस किती घालायचा ते ठरेल . मी तोतापुरी कैरी वापरली त्यामुळे चव घेत कीस घातला भातात.
धनि , भात केल्यावर फोटो नक्की टाका. तुमचे पदार्थांचे प्लेटिंग छान असते.

ऋन्मेऽऽष, अनिंध्य, धनि धन्यवाद
कोथिंबीर वड्यांची रेसिपी प्लीज.... माझ्या वड्या एवढ्या छान खुटखूटीत कधीच होत नाहीत.

Submitted by SharmilaR on 10 April, 2025 - 16:19>>>>
१इंच आले ४-५ मोठ्या लसूण पाकळ्या, ५ ६ हिरव्या मिरच्या छोटा चमचा जिरं वाटून घ्यायचं, एक छोटी जुडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, आता हे सगळं एकत्र करून यात बेसन मीठ किंचित हळद, चिमूटभर ओवा टाकायचं, असल्यास थोडीशी मेथी बारीक चिरून किंवा मग कसुरी मेथी टाकायची, याने वड्यांना छान फ्लेवर येतो.. हे पीठ कांदा भजी इतके किंवा त्याहून थोडेसेच घट्ट ठेवायचे आणि एका ताटात थापून वरून सफेद तिळ पेरायचे.. १० min वाफवून घ्यायचे पूर्ण थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या नाहीतर चुरा होतो नंतर डीप फ्राय करायच्या..

@ jui.k

टिप्ससह रेसिपीबद्दल थँक्यू. करून बघीन.

मी पुण्यातल्या दोन वेगवेगळ्या रेस्तरांमधे (पैकी एक आता बंद पडले आहे) कुरकुरीत खुसखुशीत बोटा-ओठांना अजिबात तेल न लागणारी कोथिंबिर वडी खाल्ली. दोन्हीकडे त्यांनी ती भाजणीच्या पिठात केल्याचे सांगितले.

एकदा आता तशीही करून पहावीच लागेल.

मस्त फोटो रेसीपी जुई
कोथिंबीर वडी आवडीची.
आम्ही कधी कधी हरबऱ्याची डाळ भिजत घालून वाटतो आणि ती बेसनाऐवजी घालतो.

Pages