चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अभिमन्यू सिंगचे यातले काम आवडले होते व त्याला बरीच संधी मिळेल असे तेव्हा वाटले होते. पण नंतर फारसा दिसला नाही (काही वर्षांनी रामलीला मधे दिसला होता). त्याचा "राजपूत ताठा" अगदी अस्सल वाटतो.>>
अभिमन्यू सिंगला तेलगु सिनेमांत भरपुर कामं (चांगल्या भुमिका) मिळत आहेत त्यामुळे हिंदी चित्रपट करण्यासाठी त्याला वेळ देता येत नसावा बहुतेक.

बादवे काल 'द डिप्लोमॅट' बघितला. एका सत्यघटनेचे चित्रपटीय रुपांतर बरेचसे संथ आणि थोडे जास्तीच 'फिल्मी' झाले असले आणि तारिफ/शिफारस करावी असे चित्रपटात काही आढळले नसले तरी एकदा बघायला म्हणुन ठिक आहे. जॉन अब्राहम सारख्या ठोकळ्या अभिनेत्याला अशाच भुमिका शोभतात 😀
थोडक्यात सांगायचे तर शुन्य मनोरंजनमुल्य आणि भव्य-दिव्य असे काहीही नसल्याने चित्रपटगृहात जाउन आवर्जुन मोठ्या पडद्यावरच बघावा असा हा चित्रपट नसल्यामुळे पुढे OTT वर आल्यावर (प्लेबॅक स्पीड वाढवुन आणि बोरिंग प्रसंग पळवत पळवत) बघणे नक्कीच सोयीस्कर ठरेल!

श्री. जुवेकर यांना ट्रोल करणे अज्ञानातून होत आहे. ते जे बोलले ते एका विलक्षण भावातीत अवस्थेत बोलले. कुणाला पटो किंवा न पटो, पण मानवी जीवनात अशा काही अवस्था असतात की ज्यामध्ये मनुष्यावर 'सवारी' उतरते.

या 'सवार' अवस्थेत अंतर्दृष्टीपुढे काही व्हिजन्स फ्लॅश होतात, आणि त्या मुखावाटे भसकन बाहेर पडतात. एकदा बाहेर पडल्या की मग त्यांचं समर्थन करण्याशिवाय दुसरा रस्ता उरत नाही. पण ते जे काही असायचं ते असो.

आपण त्याकडे सहानुभूतीपूर्वक बघितलं पाहिजे. त्याकडे निव्वळ तर्काच्या कसोटीवर पाहणं चूक ठरेल. तसे पाहिल्यास फसगत होण्याची शक्यता आहे. ते समजून घ्यायचं झाल्यास त्या तरल अवस्थेत जाऊनच समजून घ्यावं लागेल.

परंतु प्रॉब्लेम असाय की सर्वसामान्य लोक काळाच्या चौकटीत अडकलेले आहेत. तसे ते नेहमीच अडकलेले असतात. त्यामुळे जुवेकरांकडे आजच्या चष्म्यातून बघण्याची मोठी चूक करत आहेत. परंतु जुवेकरांची झेप काळाच्या पुढे आहे. ते सगळ्या टाईमफ्रेम्स उद्ध्वस्त करत पुढे निघून गेले आहेत.

(तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याच्या घाईने), भविष्यातील ॲक्टर मंडळींचा मेंदू कसा हळूहळू गुळगुळीत किंवा तत्सम भुईसपाट होत जाणार आहे, याची एक प्रातिनिधिक झलक जुवेकर यानिमित्ताने आपणास दाखवत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे राह्यले बाजूला, लोक उलट त्यांनाच ट्रोल करून राह्यले.! हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे.!!

अर्थात, जुवेकर या सगळ्यातून अधिक टणक होऊन बाहेर पडतील आणि आगामी काळातही सर्वांना असेच एनलाईटन् करत राहतील, असा विश्वास वाटतो.

<<या 'सवार' अवस्थेत अंतर्दृष्टीपुढे काही व्हिजन्स फ्लॅश होतात, आणि त्या मुखावाटे भसकन बाहेर पडतात.
भविष्यातील ॲक्टर मंडळींचा मेंदू कसा हळूहळू गुळगुळीत किंवा तत्सम भुईसपाट होत जाणार आहे>>> Lol Lol भारी लिहिता तुम्ही

त्या खुशी कपूरला तीन मूवीस एका मागोमाग मिळाले कसे?

चेहर्‍यावर माशी हाल्त नाही. ती तिच्या पहिल्या चित्रपटात खपून गेली आर्चीजमधले एक पात्र म्हणून.
पण बाकी दोन म्हणजे अशक्य त्रास आहेत. बहिण तरी बरी आहे अभिनयात (तिच्यापेक्षा).
हि खुशी आधी म्हणे दिग्दर्शक होणार होती. मध्येच का अशी दुर्बुद्धी झाली?

बघा काय म्हणतात जुवेकर त्या व्हिडीओवर
>>
त्या विजू माने ची कमेंट काहीही आहे
त्याला कृतिसाईज (criticise ऑटोकरेक्ट झालं, जुवेकर ला सनोन ठुमकेश्वरी सारखं इम्याजिणू नका) करायला तुम्ही त्याच्या इतकं अचीव्ह करा
म्हणजे काय, कसाब बद्दल बोलण्या आधी हा जाऊन गोळीबार करून येणार की शर्मा बद्दल बोलण्या आधी इंटरनॅशनल क्रिकेट मधे तेवढा परफॉर्मन्स देऊन येणार...
कायच्या काय चालू आहे....

इथे लोकांच्या 'नादानियाँ' १५ मिनिटं पाहून बंद केल्याच्या पोस्ट्स वाचून मला अतिशय आश्चर्य वाटलं. मी त्यांच्या जेमतेम एक तृतियांशच पाहू शकलो Happy

आराधना आज पाहिला. गाणी इतक्यांदा ऐकली आहेत. पूर्ण सलग पिक्चर नव्हता पाहिला.
कसली मॅजिकल पेयर आहे , मॅजिकल पिक्चर आहे...
दोघंही कसले दिसतात !

गाणी परत पुन्हा पुन्हा पाहिली.
रूप तेरा मस्ताना गाणं बघताना वाटलं कि त्या वेळी किती प्रगती होती, नुसतं फायर प्लेसच्या भोवती सात फेरे घेतले कि डायरेक्ट गोSSड बातमी !

इथे लोकांच्या 'नादानियाँ' १५ मिनिटं पाहून बंद केल्याच्या पोस्ट्स वाचून मला अतिशय आश्चर्य वाटलं. मी त्यांच्या जेमतेम एक तृतियांशच पाहू शकलो >> मी आख्खा पाहिला. भयंकर कंटाळा आला होता आणि अजिबात बिनडोक सिनेमा बघायचा होता. ती खुषी खुपशी मान थरथरवत बोलत होती हे मनावर वाईटरित्या कोरलं गेलंय फक्त. बाकी सिनेमा बघताक्षणी विसरून टाकला.

मामींचा सत्कार करा, आणि असा सत्कार करा की असा सत्कार कुनाचा बी झाला नसन Lol

मामी _/\_ कसा पाहिलात पूर्ण नादानियाँ?

मला क्लिफ क्लायंबर्स, माऊंटन सायकलिंग , घोडेस्वारी असे अनेक व्हिडीओज येतात. या सर्वांबद्दल खूप आदर आहे.
यात एक कॅटेगरी अ‍ॅड करावी असं वाटतंय.
नादानियां ( केजो चे सध्याचे कुठलेही मूवीज) पूर्ण पाहणार्‍यांची Happy

फिर इतना शर्मा क्यों रहें हो ?

हा 'करमरकर म्हणजे डू डाय डू' च्या पातळी वरचा देहांत प्रायश्चिताच्या लायकीचा संवाद आहे, पहिल्याच १५ मिनिटात >>>> विकु Rofl तुफान हसलेय.

नुसरत भरुचा चा अकेली कुणी पाहिला का? या धाग्यावर (मागच्या भागात चर्चा झाली होती का?)
एक तास सलग पाहिला. खिळवून ठेवणारी पटकथा आहे. टेक ऑफ सारखा विषय आहे. फर्स्ट हाफ तरी अकेली चा सफाईदार आहे. टेक ऑफ सुरुवात थोडी संथ होती पण एकदा कथेने पकड घेतल्यावर जबरदस्त होता.
सेकंड हाफ असाच असेल तर चांगला थ्रिलर पहायला मिळेल.

डिस्नीला स्नो व्हाईट ह्या सिनेमाचा रिमेक करायची दुर्बुद्धी झाली. त्याकरता रेशेल झेगलर नामक तोंडाळ कुरूप अभिनेत्री घ्यायची दुर्बुद्धी झाली. ज्या पात्राचे नावच हिमश्वेता आहे तिचे पात्र एक कमालीची कुरूप, शामल वर्णी मुलगी करणार हे लोकांना पचणे अवघड आहे.
शोले चा रिमेक रामगड के शोले ह्या नावाने केला गेला आणि अत्यंत हास्यास्पद सिनेमा बनला तसा हा आहे. १९३७ मधे बनलेला, अमेरिकेतच नव्हे तर सर्व जगाचा लाडका बनलेला, डिस्नी पिक्चर हे नाव घरोघरी पोचवणारा, हा मूळचा सिनेमा एक हास्यास्पद रिमेक करून प्रचंड पैशाचा चुराडा केला आहे. ह्या स्नो व्हाईट च्या बरोबरीने गाजलेली पात्रे म्हणजे सात बुटके. नव्या आवृत्तीत वोकनेस च्या हव्यासापायी हे सर्व बुटके सी जी आय ने बनवावेत असा अतर्क्य निर्णय घेऊन सिनेमाची आणखी वाट लावली आहे.
जी काही दृश्ये पहिली त्यावरून हा सिनेमा बघायची हिंमत होत नाही. बहुतेक समीक्षक ह्याला शिव्या घालताना दिसत आहेत..एकंदरीत ही रामगड के शोले जातकुळीतील आहे असे वाटते.
पण बाकी कुणी बघितला आहे का?

शेंडे - तुम्ही म्हणताय तो "आग" किंवा "राम गोपाल वर्मा की आग". रामगढ के शोले हा स्पूफ होता, डुप्लिकेट कलाकाराना घेउन काढलेला Happy त्यात रिमेकचा उद्देशच नव्हता. अमेरिकेत "स्केअरी मूव्ही" सिरीज मधले चित्रपट आहेत तसा.

हा पिक्चर कसा आहे माहीत नाही. मला कोणत्याच त्या जुन्या डिस्ने चित्रपटांचे रिमेक्स आधीपेक्षा आवडलेले नाहीत. जंगल बुक सकट. त्यात आधीची मजा नाही.

अकेली पाहिला संपूर्ण.
क्लायमॅक्स फिका वाटला, पण जर सत्य घटना असेल तर त्यात नाट्य कितीसं आणणार ? आणि जे काही घडलेय त्याच्या एक दशांश सत्य असेल तरी ते किती थरारक असेल !

Pages