Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 02:39
“अगं तू सुयश ला घ्यायला लवकरच येशील का, अगं काही नाही कुणाशी बोलतच नाहीये तो?” असा फोन आला आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मित्राच्या वाढदिवसासाठी दोन तास तरी लागतील म्हणून त्यानंतर घ्यायला जायचे ठरले होते.
आपल्याला बाबा नाही याबद्दल तो कधीही उघड बोललेला नव्हता. तिनेही कधी बाबाची उणीव भासू नये म्हणून कोणतीच कसर राहू दिली नव्हती. पाचवीतच होता कोवळेच वय त्याचे.
मत्सर मैत्रीतही काय घडवेल सांगता येत नाही. बाबा नसण्यावरून तर चिडवले नसेल?
त्याचे डबडबलेले डोळे पाहून तिच्या मनात अनुकंपा झरू लागली.
कुशीत शिरून त्याने विचारले,
“आई मी तुला कधी कधी बाबा अशी हाक मारली तर चालेल का?”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शेवटची ओळ फारच भिडली
शेवटची ओळ फारच भिडली
छान भिडली मनाला
छान
भिडली मनाला
सुंदर लिहिली आहे
सुंदर लिहिली आहे
हृदयद्रावक आहे. आवडली.
हृदयद्रावक आहे. आवडली.
त्याला सांगा मला रोज "बाबाई "
त्याला सांगा मला रोज "बाबाई " म्हणत जा म्हणून
@कविन, @झकासराव, @मृणाली,
@कविन, @झकासराव, @मृणाली, @मामी, @अज्ञान,
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार
.
मुलाबरोबर नक्की काय झाले हे न उलगडण्याचा संयम मला शशक मुळे पाळावा लागला त्यामुळे, त्याच्या एका वाक्यातून नक्की काय घडले असावे आणि ज्यामुळे त्याच्या मनात किती विचारांचे थैमान झाले असावे, आणि त्याने एक बालसुलभ सोल्यूशन काढायचा प्रयत्न करणे हे त्याला या वयात करावे लागणे या सगळ्याचाच वाचतांना मला ताण देते.
.
शशक लिहिण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे, कवितांच्या अनुभवामुळे माझ्यासाठी या कथा म्हणजे कवितांसारख्याच खिप फाईल्स ठरताहेत
सुंदर लिहिली शशक.
सुंदर लिहिली शशक.