जागतिकीकरणामुळे ज्या अनेक बर्यावाईट गोष्टी झाल्या त्यातली एक म्हणजे पेहरावात आलेले साधर्म्य. आजमितीला Traaditional Day/ Ethnic Day वगळता चार वेगवेगळ्या प्रदेशांतील चार व्यक्ती जवळपास उभ्या असल्यं, तर त्या कोणकोणत्या प्रदेशांतील आहेत ते ओळखताही येणार नाही. प्रत्येक प्रदेशाच्या पोशाखांची काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रात तर नुस्त्या पगड्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत.
पोशाखांचा विषय आला की दागिन्यांचाही त्यासोबत येणारच ना!
महिला वर्गाला अतिप्रिय असणारा विषय म्हणजे कपडे व दागिने, त्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. पण आता पुरुषमंडळीही कमी नाहीत हो. ! पुरुष पण हौसेने छान छान पेहराव करतच असतात.
या धाग्यावर टाका तुमच्याकडील आपल्या पारंपरिक मराठी पेहरावांचे, कपड्यांचे, दागिन्यांचे, किंवा ते सगळे परिधान केलेले असतानाचे तुमचे प्रकाशचित्र /छायाचित्र.
प्रकाशचित्र टाकताना कृपया खालील नियम व अटी पाळाव्यात.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
२. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचा स्वतःचा प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्याकडची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात नसावे.
८. एक सदस्य एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो ; मात्र सलग दोन झब्बू देऊ नयेत.
९. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीचे प्रकाशचित्रांबद्द्लचे धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
मागच्या वर्षी आईकडे गेले
मागच्या वर्षी आईकडे गेले असतानाचा..
मृ, खूप छान.. नथ ही मस्तच.
मृ, खूप छान.. नथ ही मस्तच.
(No subject)
हे माझ्या मूलासाठी नणंद
हे माझ्या मुलासाठी नणंद बाईंनी हाताने शिवलेले दुपटे... मी ते जपून ठेवले होते... अलीकडे त्याच्या मुलाने ही ते वापरले.
संयोजक, हा नियमात बसेल का?
संयोजक,
हा नियमात बसेल का?
नृत्य म्हणजे श्वास आहे माझा..
नृत्य म्हणजे श्वास आहे माझा..
नृत्य म्हणजे श्वास आहे माझा.. आणि रंगभूमी म्हणजे प्राण.
धन्यवाद ममोतै...
धन्यवाद ममोतै...
ममोतै दुपटे फार सुंदर आहे.....माझ्या सासू ने पण असे छोटे छोटे शिवून दिले होते..
ReenaAbhi, भारी फोटो..
अतरंगी, क्या बात..!
क्रिएटिव्ह बेबी फोटोशूटस् चा
क्रिएटिव्ह बेबी फोटोशूटस् चा ट्रेंड यायच्या आधी मी माझ्या बाळाचे घरच्या घरी अनेक वेगवेगळे फोटो घेतले होते. त्यातला हा गुढीपाडव्यानिमित्त केलेला फोटो.
मॉडेलचे नाव विजयालक्ष्मी. फोटोच्या वेळेस वय. ५ महिने
कसला गोड फोटो आहे मनिम्याऊ.
कसला गोड फोटो आहे मनिम्याऊ.
कसले एकेक सुरेख फोटो आहेत,
कसले एकेक सुरेख फोटो आहेत, विजयाल़क्ष्मी फोटो तर फार गोड. दुपटेही गोड.
विजयालक्ष्मी, किती गोड फोटो
विजयालक्ष्मी, किती गोड फोटो आहे हा.
पारंपरिक दागिने
पारंपरिक दागिने
काय गोड गोड फोटो आहे मनिम्याऊ
काय गोड गोड फोटो आहे मनिम्याऊ.
मृ आणि पिलवंडांचा फोटो प्रसन्न.
अतरंगी, भारीच.
रीना, मस्तच.
रमडचे दागिने, जिवंत आला आहे फोटो.
ममो, दुपटं/ गोदडी छान.
वा वा!! सगळेच प्रचि मस्त
वा वा!! सगळेच प्रचि मस्त
सगळ्यांचे फोटो मस्त.
सगळ्यांचे फोटो मस्त. विजयालक्ष्मीचा विशेष गोड आहे फोटो.
सूनबाई!
सूनबाई!
खूप सुंदर photos आलेत
खूप सुंदर photos आलेत सगळ्यांचे.

झब्बू घ्या
(No subject)
कोल्हापुरी साज
हे माझ्या बहिणीने आरोहीसाठी
हे माझ्या बहिणीने आरोहीसाठी शिवलेले दुपटं आणि चिमणाळं!
(No subject)
(No subject)
(No subject)
अरे व्वा!
अरे व्वा!
सगळ्याचे फोटो मस्तच आहेत.
पेहराव, दागिने, दुपटी...अगदी विविधता आहे त्यात.
मस्तच. येऊदे आणखी.....
मस्त फोटो रिना.
मस्त फोटो रिना.
धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद
(No subject)
रिना, छल्ला, किल्ली..सुंदर
रिना, छल्ला, किल्ली..सुंदर फोटो..
मंजूताई दुपटं छान आहे..
मैत्रेयी,रमड दागिने फार सुंदर आहेत.
मनिम्याऊ, खूप छान आहे हा ही फोटो.
येस मृणाली
येस मृणाली
मुंडावळ्या हा खास महाराष्ट्रियन अलंकार आहे ना..
खूप सुंदर photos आलेत
खूप सुंदर photos आलेत सगळ्यांचे.
Pages