मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. संवाद साधणे, स्वतःचे विचार, भावना, संवेदना व्यक्त करणे हा त्याचा स्वभावआहे ; ती त्याची गरजही आहे. भाषा हे एक संवादाचे व व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा ही जशी शब्दांची असते तशीच चित्रांची, संगीताची, नृत्याची, वेगवेगळ्या कलांची सुद्धा असते.
आपल्या सर्वांना जोडणारी भाषा मराठी ! मराठी लेखन व वाचन हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लेखन गोष्ट असो, लेख असो, कविता असो किंवा चारोळी असो.
मभागौदि २०२५ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत एक खास खेळ, ‘चित्रांची भाषांतरे'
तुम्हांला आम्ही काही चित्रे देणार आहोत आणि या चित्रांवरून गोष्ट, लेख, कविता, चारोळी, स्फुट, काकाफॅा (काहींच्या काही फॅारवर्ड), जे तुम्हाला सुचेल ते तुमच्या शब्दांत मराठीतून लिहायचे आहे . चित्र जरी एकच असले, तरी प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या कल्पना वेगळ्या आणि मजेदार असू शकतात. तेच तर हवं आहे आपल्याला!
तर लेखणी सरसावून आणि मन एकाग्र करून तयार व्हा बरं लिहायला!
तुम्हांला लिहिताना मजा येणार आहे आणि आम्हांला वाचताना!
आम्ही दर दिवशी एक नविन चित्र देऊ. चित्र मुख्य धाग्यातच संपादन करून दिले जाईल. प्रत्येक चित्राला क्रमांक दिलेला असेल. तुम्ही लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा.
चला तर मग, सुरुवात करू या.
तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौखूर उधळू द्या.
चित्र क्रमांक १.
चित्र क्रमांक २.
चित्र क्रमांक ३.
चित्र क्रमांक ४.
आयुष्य एक जिना आहे. तो
आयुष्य एक जिना आहे. तो सगळ्यांनाच उतरावा लागतो. आधी आपल्याला उतरता येत नाही. कोणीतरी बोट धरून आपल्याला उतरवायला शिकवतं. मग आपण दुडुदुडू उतरतो, परत मागे वळुन चढुन सोबत उतरतो. पुढे मग आपण गांभीर्याने आणि जोशात झपझप उतरून पुढे निघून येतो. मग आपण कुणाला बोट धरून उतरवायला शिकवतो. तेही आपल्या सारखे उतरून पुढे निघून जातात. आपला वेग मंदावतो. मंदावत जातो. उतरताना जोडीदाराचा, कठड्याचा आधार घ्यावा लागतो. केव्हातरी एक जोडीदार पूर्णच थकुन जातो आणि कायमची बसकण मारतो. आपण तिथे थोडा वेळ बसुन दोन अश्रु ढाळतो, आणि परत उठून कठड्याचा आधार घेत जमेल तसा जिना उतरत रहातो, कायमची बसकण मारे पर्यंत.
जग्गू आणि जना गेले टेकडीवरी
जग्गू आणि जना गेले टेकडीवरी
पाण्यासाठी नव्हे तर पाहण्यासाठी
एकमेकांच्या मदतीने आले उतरुनी
कहाणी यांची वेगळी, नाही जुन्या परि
श्वासाइतके सहज नाते
श्वासाइतके सहज नाते
बाकी नकोच मला काही
सोबतीने चालू वाट
दुसरे मागणे काही नाही
धडधड खाली येताना एक पायरी
धडधड खाली येताना एक पायरी निसटायची
आणि ती धाडकन जागी व्हायची
कित्येक रात्री अशा घालवल्यानंतर..
काल रात्रीही तेच स्वप्न,
धाडधाड उतरताना एक पायरी चुकली
पण मागून एक हाताने तिला अलगद झेलली
आणि या कुशीवरून त्या कुशीवर ती वळली…
त्याचा शांत चेहरा पाहताच जाणवलं अखेर,
ती प्रसन्न सकाळ उगवली
पायऱ्या चढत्या धरायच्या की
पायऱ्या चढत्या धरायच्या की उतरत्या......
हा दृष्टीकोन ठरवितो ...आपले व्यक्तिमत्व आणि मानसिकता!!! ..
मामी, जॅक अँड जिल च मराठी
मामी, जॅक अँड जिल च मराठी वाटतं आहे
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने दगडावर बसण्याच्या उद्देशाने त्याला सांगितले - "हा पूस"
अरे वा. छान उपक्रम. सध्या
अरे वा. छान उपक्रम. सध्या गेले काही दिवस मी आणि माझी मुलगी खेळतो आहोत हा खेळ. तिच्या ट्रे गार्डन्स चे फोटो काढून त्यानुसार गोष्टी तयार करतो.
जॅक अँड जिल च मराठी वाटतं आहे
जॅक अँड जिल च मराठी वाटतं आहे. >>> बरोबर हपा.
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने दगडावर बसण्याच्या उद्देशाने त्याला सांगितले - "हा पूस" >>>
काळजी घेऊन पुसायला हवा कारण घसरला तर लंगडा होईल.
सय्योनी ( सखी/सोलमेट/ हमसफर)
सय्योनी ( सखी/सोलमेट/ हमसफर)
आयुष्याचा गड चढताना तर खूप लोक साथ देतात. पण असं म्हणतात की माणूस शिखरावर एकटाच असतो. सोबतीची खरी गरज असते ती उतरणीवर. उतारावर जी साथ देते. ती.. सय्योनी...
मस्त लिहित आहात सगळेच...
मस्त लिहित आहात सगळेच...
घसरला तर लंगडा होईल. >>
घसरला तर लंगडा होईल. >>
आयुष्याचा गड चढताना तर खूप
आयुष्याचा गड चढताना तर खूप लोक साथ देतात. पण असं म्हणतात की माणूस शिखरावर एकटाच असतो. सोबतीची खरी गरज असते ती उतरणीवर. उतारावर जी साथ देते. ती.. सय्योनी...>>>
मी असाच अर्थाचे दवणीय अंडे लिहायला घेतले होते…..
- "हा पूस" >>> Lol काळजी घेऊन
- "हा पूस" >>> Lol काळजी घेऊन पुसायला हवा कारण घसरला तर लंगडा होईल. >>> मस्त!
लगेच त्याने "केसर" (ri) रुमालाने तो दगड पुसून घेतला
सगळे आवडले. सय्योनी विशेष!
जग्गू आणि जना - सकारात्मक गाणे केले हे ही आवडले..
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने दगडावर बसण्याच्या उद्देशाने त्याला सांगितले - "हा पूस" >>> Lol काळजी घेऊन पुसायला हवा कारण घसरला तर लंगडा होईल.>>
ती काळजी घेईलच की त्याची !
घसरण्याआधीच सांगेल राया वळ
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने
"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने दगडावर बसण्याच्या उद्देशाने त्याला सांगितले - "हा पूस" >>> Lol काळजी घेऊन पुसायला हवा कारण घसरला तर लंगडा होईल.>>
ती काळजी घेईलच की त्याची !
घसरण्याआधीच सांगेल राया वळ>>>>>
हो, पण हे सगळं वेळेत आवरायला हवं. कारण "दशहरा" सोहळा संपायच्या आता परतलं पाहिजे त्यांना.
सगळेच
सगळेच
पायरी पायरी जिना साचे
पायरी पायरी जिना साचे
एवढं डोंगरावर कोणी बांधायला
एवढं डोंगरावर कोणी बांधायला सांगितलं तुम्हाला आपलं घर..?
आणि आठवड्यातून एकदा तरी घराची चावी खाली गाडीत विसरुन येता..
मस्त..
मस्त..
जॅक अँड जिल च मराठी वाटतं आहे
जॅक अँड जिल च मराठी वाटतं आहे. >>>
आत्ता एकदम आठवलं की याचं हिंदी वर्जन एका हिंदी बिगबॉसमधे ऐकलं होतं
जॅकवा और जिलवा
गये उपर हिलवा
पनीया भरन के वास्ते
जॅकवा गिर गवा, खोपडी फूट गवा
जिलवा आयी लडखडाते पूरे रास्ते
हिरवा हिरवा गालिचा,त्यात साथ
हिरवा हिरवा गालिचा,त्यात साथ तुझी हाती,
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर, तूच माझा सांगाती
वा, वा, ReenaAbhi , मस्त!
वा, वा, ReenaAbhi , मस्त!
वरचेपण सगळे मस्तच.
मस्त सुरुय
मस्त सुरुय
आंब्याची आठवण सगळेच काढत आहेत
पण एप्रिल शिवाय कुठे मिळणार.
तुझा हात जणू श्वासांची साथ
तुझा हात जणु श्वासांची साथ
खडकाळ भुईवरती रोज हिरवी पहाट
तुझा हात जणु श्वासांची साथ
चढ असो की उतार
हीच रेशीमगाठ
तुझा हात जणु श्वासांची साथ
माझ्या तुझ्यात घुटमळणारी
हीच ना ती स्वप्नवाट
तुझा हात जणू श्वासांची साथ
..
सिंदबाद आणि त्या राजकन्येने
सिंदबाद आणि त्या राजकन्येने मिळून मोठ्या प्रयत्नांती त्या पायऱ्या खोदल्या खऱ्या, पण आज त्या उतरताना सगळं कोलमडून पडणार होतं, जेव्हा ते प्रचंड मोठं कासव आपल्या पाठीवर उगवलेल्या हिरव्या शेवाळाच्या सकट पाण्यात बुडी मारणार होतं.
सुंदर, माझेमन!
सुंदर, माझेमन!
परवाच एक जुना मित्र अचानक
परवाच एक जुना मित्र अचानक पार्क मधे भेटला होता. हा खरेतर माझा कॅालेजमधला फार जवळचा मित्र पण गेल्या कित्येक वर्षात आमची भेटच झाली नव्हती. तो असा अचानक भेटल्यावर आमच्या बऱ्याच वेळ गप्पा रंगल्या. बोलता बोलता चर्चा आरोग्याकडे वळाली. एवढा वेळ हसतखेळत चाललेली चर्चा आता गंभीर झाली. मित्राला एकंदरीतच अनेक त्रास होते, गुडघेदुखी, पाठदुखी, युरिक ॲसिड, अपचन प्रत्येक आजाराने व त्यावरील उपचारांनी झालेला त्रास तो अगदी कासावीस होऊन सांगत होता. मी सगळे शांतपणे ऐकत होतो. बऱ्याच वेळ बोलल्यावर त्याला लक्षात आले की मी त्याच्या कोणत्याच गोष्टीशी रिलेट करू शकत नव्हतो. मग त्यानेच विचारले “ आपण दोघेही एकाच वयाचे, तरी तू या वयातही एवढा फिट कसा काय दिसतोस?” मी शांतपणे हसलो व त्याला सांगितले “कारण मला आरोग्याचे गुपित कळले आहे.” मी एवढेच बोलून शांत बसलो होतो, त्याला काही जास्त सांगायचे गेलो तर त्याने माझीच चेष्टा करायची शक्यता जास्त होती. पण तरी त्याने फार आग्रह केल्यावर मी त्याला सांगितलेच….
पण तसेच तुम्हाला पण कधीतरी उपयोगी पडेल म्हणून सांगतो.
माझ्या आरोग्याचे सिक्रेट आहे “पायऱ्या”
काही गोष्टी जन्मभर आपल्या समोर असतात तरी आपल्याला त्यांचे महत्व कळत नाही त्यातलीच एक म्हणजे पायऱ्या. पायऱ्यांचे आपले आरोग्य राखण्यात अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही कधी विचार केला का की जी सगळी महत्वाची मंदिरे आहेत ती डोंगरांवरच का आहेत? पुर्वीच्या काळी गडांवर जायला पायऱ्याच का होत्या?
एवढ्या उंच डोंगरावर किल्ला, मंदिर बांधून पण तिथे घोड्याने वा रथाने जायला रस्ता न करता आपल्या पुर्वजांनी पायऱ्याच का केल्या? ज्या देशात स्थापत्यशास्र एवढे प्रगत होते, ज्या देशात पुष्पक विमाने होती, उंच उंच डोंगरावर पाणी पोचवायचे तंत्रज्ञान होते त्यांना एक रोप वे बनवणे आजिबातच अवघड नव्हते ना?
मग त्यांनी ते का नाही बनवले?
कारण पायऱ्या चढणे व उतरणे यांच्या सारखा सोपा व परिणामकारक उपाय या जगात खचितच असेल.
आपण जेव्हा पायऱ्या चढतो तेव्हा आपले मज्जातंतूंची एक विशिष्ट हालचाल होत असते. मज्जातंतूच्या या हालचाली मुळे आपल्या मेंदूला जास्त रक्त पुरवठा होतो. तसेच आपल्या तळपायांमधे acupuncture ची १६८ केंद्र असतात. आपण जेव्हा चालतो किंवा पळतो तेव्हा त्यातली फक्त ४० टक्केच केंद्रे काम करतात. पायऱ्या चढणे व उतरणे यात आपण ज्या प्रकारे एका पायावर एकावेळी भार देतो तेंव्हा सर्वच्या सर्व १६८ केंद्रे कार्यान्वित होतात. आपण आता गावातून आपली नैसर्गिक जीवनशैली सोडून शहरात आलो. प्रत्येक कष्टाची गोष्ट मशिन्स च्या सहाय्याने सोपी करून टाकली. आता साधे पहिल्या मजल्यावर जायला पण आपल्याला लिफ्टची गरज पडते. मी तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. मनुष्याच्या प्रगतीत त्याचा सिंहाचा वाटा आहे. पण आता तेच तंत्रज्ञान आपल्या अधोगतीचे कारण ठरत आहे.
मी असेही म्हणत नाही की आता शहरे सोडून गावाकडे पळा. पण जर काही साध्या साध्या गोष्टी करून आपल्याला आरोग्यदायी जीवन जगणे शक्य असेल तर का नाही?
तुम्हाला जर आपल्या पुर्वजांसारखेच सारखेच म्हातारपणा पर्यंत ॲक्टिव्ह रहायचे असेल, निरोगी रहायचे असेल तर लिफ्ट, रोप वे वगैरे वापरणे बंद करा. पायऱ्या चढा व उतरा…..
वॉव अतरंगी!!
वॉव अतरंगी!!
एकदम बेस्ट काकाफॉ!
Pages