मभागौदि २०२५ - गंमतखेळ - चित्रांची भाषांतरे

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 18 February, 2025 - 02:08

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. संवाद साधणे, स्वतःचे विचार, भावना, संवेदना व्यक्त करणे हा त्याचा स्वभावआहे ; ती त्याची गरजही आहे. भाषा हे एक संवादाचे व व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा ही जशी शब्दांची असते तशीच चित्रांची, संगीताची, नृत्याची, वेगवेगळ्या कलांची सुद्धा असते.

आपल्या सर्वांना जोडणारी भाषा मराठी ! मराठी लेखन व वाचन हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लेखन गोष्ट असो, लेख असो, कविता असो किंवा चारोळी असो.

मभागौदि २०२५ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत एक खास खेळ, ‘चित्रांची भाषांतरे'

तुम्हांला आम्ही काही चित्रे देणार आहोत आणि या चित्रांवरून गोष्ट, लेख, कविता, चारोळी, स्फुट, काकाफॅा (काहींच्या काही फॅारवर्ड), जे तुम्हाला सुचेल ते तुमच्या शब्दांत मराठीतून लिहायचे आहे . चित्र जरी एकच असले, तरी प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या कल्पना वेगळ्या आणि मजेदार असू शकतात. तेच तर हवं आहे आपल्याला!

तर लेखणी सरसावून आणि मन एकाग्र करून तयार व्हा बरं लिहायला!

तुम्हांला लिहिताना मजा येणार आहे आणि आम्हांला वाचताना!

आम्ही दर दिवशी एक नविन चित्र देऊ. चित्र मुख्य धाग्यातच संपादन करून दिले जाईल. प्रत्येक चित्राला क्रमांक दिलेला असेल. तुम्ही लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा.

चला तर मग, सुरुवात करू या.

तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौखूर उधळू द्या.

चित्र क्रमांक १.
Screenshot_20250224_084652_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक २.
Screenshot_20250225_090653_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक ३.
Screenshot_20250226_043622_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक ४.
Screenshot_20250227_063111_WhatsApp.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्र क्र २
मामी हे पण पहा.
छन्दिफन्दिच्या पहिल्या चित्रात केळीच्या पानावर. पगडीवाला शेवटच्या बाजूचा तरुण. एका हाताने नमस्कार करतो आहे.
हमको मन की शक्ती दे गाण्याची आठवण झाली,
का त्याला पण तीन हात आहेत?

चित्र क्रमांक २:
...... सुग्रास जेवणाने भरलेलं ताट बाजूला सारून ती त्याजागी अंगावरचा एकेक दागिना काढून ठेवू लागली... आजच्या मेजवानीत तिला नव्हे तर तिच्या श्रीमंती ला आमंत्रण होतं....

चित्र क्रमांक ३ः
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी....

चित्र क्र. १
गिरनारचा धागा आणि त्यातल्या १०,००० पायऱ्या वाचून सुचलेले Proud

उतरते नार पायऱ्या गिरनार
पती सांगे मागून, उतर सावकाश नाहीतर तू गिरनार
मी आहे खंबीर नार, नाही होणार गिर नार
मज कसले भय, सोबत असता साक्षात दत्तगुरूराय

चित्र क्र दोन
भारतीय राजघराण्यात चिनी पाहुणा उपाशी

चित्र क्रमांक ३ :

मी फोनवरील ती पोस्ट वाचुन हसत असतानाच छातीत जोरदार कळ आली. हातातला फोन गादीवर पडला. मी शांत होत मोठ्याने श्वास घ्यायला सुरवात केली. डावा हात खांद्या पासुन मनगटापर्यंत ठणकु लागला. तळहाताला घाम सुटला आणि परत असह्य कळ छातीत, कळा येत राहिल्या. कपाळावर घाम. जीव गुदमरला. मी कसा बसा फोन हातात घेतला. रुग्णवाहिका बोलवली पाहिजे. पण श्वास गुदमरतोय. हवेतला ऑक्सिजन संपला की काय! मी महत्प्रयासाने कळ सहन करत ओठ गच्च दाबुन उठलो आणि मोकळा श्वास घ्यायला खिडकी उघडली.

भराभर श्वास घेत मी खिडकीतून ते बाहेरचे दृश्य पाहिले आणि फोन हातातुन गळुन पडला. कशी येणार रुग्णवाहिका?

त्राण न राहुन मी मटकन खाली बसलो आणि लवंडलो. “खुप उशीर केलात. अर्धा तास आधी आणलं असतं तर वाचला असता.” असे म्हणणाऱ्या डॉक्टरांचा चेहरा मनात कल्पिला. पंधरा वीस मिनिटे तरी त्या असह्य कळांनी मी विव्हळत होतो. छातीवरील हात त्राण न राहुन खाली आला. फोनवर बोट कडुन त्या पोस्टमधील टेक्स्ट फोन मधील बया वाचू लागली. “ट्‍ आणि ठ हे जोडाक्षर मोठ्याने उच्चारल्याने हृदयातील.....” तेवढ्यात माझा श्वास आत ओढल्या जाउन अडकला. जीवाच्या आकांताने खरखर करत मी काय पुटपुटत होतो माझे मला ऐकुही येत नव्हते आणि भानही नव्हते. रेड्यावर बसलेला तो दिसला . तो मात्र कळल्या सारखे स्मित करत होता.

मग सगळे काही शांत झाले.

भानावर आलो तेव्हा पहातो तर समोर चित्रगुप्त. मी भानावर आलो पाहुन त्याने अग्रसन्धानी उघडली. मी म्हणालो “राहु दे चित्रगुप्ता. मला माहित आहे माझ्या सारख्या नास्तिकाला कुठे जागा मिळणार.” असे म्हणुन मी नरकाच्या दाराकडे निघालो. तेवढ्यात यमराजाकडे नजर गेली. त्याला विचारले “मी शेवटी काय पुटपुटलो रे, मला भान नव्हते कळत नव्हते मी काय म्हणत होतो.”
यमराज उत्तरला: "तुझे ते शेवटचे शब्द होते “काहीच्या काही फॉर्वर्ड!”"

मानव Lol

मानव! Lol
मरावे परी काकाफॉ रुपे ही उरू नये.

चित्र क्रमांक ३ः
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी.... >>
आवडलं.

छन्दिफन्दिच्या पहिल्या चित्रात केळीच्या पानावर>>> चित्र छंदीफंदी च नाही Happy

त्याची बोटं बघितलेत तर तिथेही काही एडिट केलाय..

असो.
प्रत्येक चित्रा त पाव सदृश्य काही आहे. केळीच्या पानावर या जेवणात मेणबत्त्या..
त्यांच्या हातातील काटे चमचे एडिट करून काढून टाकलेत.

मानव Lol

चित्र २.

"भूक लागलीय कधीची... घमघमाट सुटलाय..आता ताईसाहेबांचे फोटो शूट कधी संपणार.. त्या जेवण कधी संपवणार.. ? त्यानंतर दुसरी पंगत ... मग कधीतरी आमचा नंबर. तोवर यातलं काय काय शिल्लक राहील..?.. " मुलीचं स्वगत.

"या घरासाठी पूर्ण जन्म घातला ... पोरीच्या नशिबात पण तेच जे आपल्या. तिचं जीवन काय सुखाच नाही करू शकलो .." मागचे उजवीकडचे काका.
"ही घरी आली की सगळेजण आपले हिच्याच पाठी. काय करायचं ते कौतुक करा . घे कौतुक करून घे आणि सटक एकदाची.." मागचा भाऊ.

"काहीतरी बाई हजार वेळा सांगून सुद्धा परत तेच.. भाताच्या राशी. माझी आवड निवड कुणाच्या लक्षात नाही. त्या वासानी इतर डोकं उठलय . पण काय करणार? या फोटोसाठी चेहऱ्यावरती हसू ठेवायची कसरत करायला लागत्ये . आई होती तोवर माहेर.... आता आपला नुसताच ताम झाम, सह्या घ्यायच्यात ना.. सगळं कळतं.
दोन घास खाल्ल्यासारखं करून कधी एकदा माझ्या रूमवर जाऊन फ्रेश होतेय अस झालेय?.., " नायिका.

***"

"बहुदा माझी वेळ भरत आली.. आता आपली सद्दी संपली.
इकडे उभं असेल एक दिमाखदार पाचतरांकित रिसॉर्ट..." घरचा तो अस्पष्ट असा आत्मा.

आजचे चित्र मुख्य धाग्यात संपादन करून दिले आहे. कृपया लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा. धन्यवाद.

चित्र क्र 4

पहिला : आरं मर्दा, तुला दुसरा रूळ धुत्या हाताला घे म्हणालो हुतो न्हवं?

दुसरा : आरं लेका, धुत्या हातालाच घेतलाय न्हवं माज्या?

Lol

Pages