मभागौदि २०२५ - गंमतखेळ - चित्रांची भाषांतरे

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 18 February, 2025 - 02:08

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. संवाद साधणे, स्वतःचे विचार, भावना, संवेदना व्यक्त करणे हा त्याचा स्वभावआहे ; ती त्याची गरजही आहे. भाषा हे एक संवादाचे व व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा ही जशी शब्दांची असते तशीच चित्रांची, संगीताची, नृत्याची, वेगवेगळ्या कलांची सुद्धा असते.

आपल्या सर्वांना जोडणारी भाषा मराठी ! मराठी लेखन व वाचन हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लेखन गोष्ट असो, लेख असो, कविता असो किंवा चारोळी असो.

मभागौदि २०२५ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत एक खास खेळ, ‘चित्रांची भाषांतरे'

तुम्हांला आम्ही काही चित्रे देणार आहोत आणि या चित्रांवरून गोष्ट, लेख, कविता, चारोळी, स्फुट, काकाफॅा (काहींच्या काही फॅारवर्ड), जे तुम्हाला सुचेल ते तुमच्या शब्दांत मराठीतून लिहायचे आहे . चित्र जरी एकच असले, तरी प्रत्येकाच्या मनात येणाऱ्या कल्पना वेगळ्या आणि मजेदार असू शकतात. तेच तर हवं आहे आपल्याला!

तर लेखणी सरसावून आणि मन एकाग्र करून तयार व्हा बरं लिहायला!

तुम्हांला लिहिताना मजा येणार आहे आणि आम्हांला वाचताना!

आम्ही दर दिवशी एक नविन चित्र देऊ. चित्र मुख्य धाग्यातच संपादन करून दिले जाईल. प्रत्येक चित्राला क्रमांक दिलेला असेल. तुम्ही लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा.

चला तर मग, सुरुवात करू या.

तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौखूर उधळू द्या.

चित्र क्रमांक १.
Screenshot_20250224_084652_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक २.
Screenshot_20250225_090653_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक ३.
Screenshot_20250226_043622_WhatsApp.jpg

चित्र क्रमांक ४.
Screenshot_20250227_063111_WhatsApp.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी Lol

>>> पण आता तेच तंत्रज्ञान आपल्या अधोगतीचे कारण ठरत आहे.
जिला 'लिफ्ट' म्हणायचं ती अधोगतीला कारण ठरणं हा केवढा विरोधाभास! Proud

थँक यू छल्ला

छंदीफंदी, कवीन, ReenaAbhi यांचे भाषांतर आवडले.

या वर्षीचे बेस्ट का का फॉ अवॉर्ड अतरंगी यांना देण्यात येत आहे.

.. लिफ्ट' म्हणायचं ती अधोगतीला कार…..

जे वर जाते ते ख़ाली येते- जीवनाचे उतार चढाव असा अजून एक waf पाडता येईल “लिफ्ट” चा क्लू घेऊन.
जस्ट म्हणिंग मी Lol

लिफ्ट, उद्वाहक, एलिव्हेटर! नावातच बघा ना, काही प्रगती काही उद्दिष्ट काही आपलं ते हे साध्य करण्याची आकांक्षा मोनिषा ध्वनित होते. तेच पायर्‍या! छ्या! म्हणजे उतरण, अधोगती. पायरी वरुन घरंगळत आला हा आपल्या मराठीतला वाक्प्रचारच बघा. कोणी कधी पायरीवरुन घरंगळत वर चढत गेला असं म्हटलंय का? नाही.
त्याच पायर्‍या वर चढायला वापरत असलो तरी धप्पकन पडला, कडमडला, पायरी ओळखा, पायरी लक्षात ठेवा. सगळं सगळं नकारार्थी. पायरी सारख्या नक्राश्रू ढाळणार्‍या गोष्टी जीवनातून हद्दपारच करा. लिफ्ट, उद्वाहक हे तुमचे प्रगती पथावरील साथी आहेत.
आता हवंच असेल तर जीवनोन्न्तीचे सार सोपान चढा. पण पायरी! नाय नो नेव्हर!

रिना, माझे मन, हरपा एकदम भारी...
अतरंगी, काकाफॉ टीमचे ॲडमिन दिसताय तुम्ही...भारीच
सोपानमार्गेण करोति शब्द ठंठंठठंठंठठठं.......
अमितव, सहीच
आयुष्याचे चार सोपान....यावर लिहा कुणीतरी आता

रोजच्या आयुष्यातील चढउतारांकडे निवृत्त वृत्तीने बघता यायला लागलं की मन मुक्त होतं. मग जीवनाच्या पायर्‍या उतरण्याची वेळ आली असली तरी चित्त मात्र सोपान चढत ज्ञानाकडे धाव घेतं.

मनाने निवृत झाल्यावर ज्ञान मिळतं मग त्या जिवनोन्नतीच्या सहा(हजार) सोपानांची चढउतार होते आणि मग मनाची मुक्ताई होते असं फॉरवर्ड आहे ना? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई! तुम्ही आधीच मनाला मुक्त करुन मोकळे झालात तर कसं व्हायचं!

दोघे एकमेकांच्या संगतीने एवढ्या हजारेक पायर्या महत्प्रयासाने उतरून शेवटच्या पायरीवर पोचतात..
गाठला तळ एकदाचा..
जमिनीवर पोहोचलो एकदाचे.असा विचार दोघांच्या मनात येताच ते पुन्हा डोंगरमाथ्यावरच्या पायरीवर पोहोचलेले असतात..
माहित नाही त्यांनाही, हे किती दिवस, महिने, वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे..

वरती बसली होती लपून
मी काढलं शोधून |
हात ठेवतो पकडून
बघतो आता जाते कशी पळून||

"पायरी"वरती बसण्यापेक्षा तिने दगडावर बसण्याच्या उद्देशाने त्याला सांगितले - "हा पूस" >>> Lol काळजी घेऊन पुसायला हवा कारण घसरला तर लंगडा होईल.>>

ती काळजी घेईलच की त्याची !
घसरण्याआधीच सांगेल राया वळ
<<<<<
या प्रेमभावनेला एक बदाम(i) तर बनतोच!

जॅकवा गिर गवा, खोपडी फूट गवा
<<<<< त्यांनी डिस्क्लेमर द्यायला हवाय.
No गवा is harmed....

अतरंगी यांचे 'पायऱ्या' काकाफॉ अशक्य आहे! Lol

आजचे चित्र मुख्य धाग्यात संपादन करून दिले आहे. कृपया लिखाण करताना संदर्भासाठी चित्र क्रमांक लिहावा. धन्यवाद.

चित्र क्र. २

जेवते मी आनंदाने माझ्या कुटुंबासोबत
लेक, पती आणि तात, अन्न दिसे रुचकर
जेव्हा फोटो मी पाहिला, एक घोटाळा कळेना
आम्हांसवे कोण होता तो विचित्र जोकर

चित्र क्रमांक २

मनोहर वस्त्रे, सुहासी चेहरे
भोजन त्याहुनी सुग्रास
परी त्या कोन्यात
कुणीतरी एकटा
गमतो का मज उदास

लोकांचा प्रत्येक घटनेचा फोटो काढवण्याचा, प्रत्येक फोटोत आपण दिसण्याचा नाद एवढा बळावला की

रेस्टॉरंट्स मध्ये एकाच दिशेने तोंड करून बसता येईल अशा प्रकारे टेबल खुर्च्या मांडु लागले.

तुम्हाला जर आपल्या पुर्वजांसारखेच सारखेच म्हातारपणा पर्यंत ॲक्टिव्ह रहायचे असेल, निरोगी रहायचे असेल तर लिफ्ट, रोप वे वगैरे वापरणे बंद करा. पायऱ्या चढा व उतरा…..
Submitted by अतरंगी on 24 February, 2025 - 18:20

मित्राला हे सांगून माझ्या घरी जाण्यासाठी मी लिफ्ट मध्ये घुसलो

ते चित्रं AI नं काढलंय , AAI नं नाही त्यामुळे कुटुंब एकत्र जेवतं म्हणजे कसं ते त्याला कळत नाही.

Pages