क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण कमी म्हणजे ३० नाही..
याचा अर्थ क्लास गंडला आहे>>>>>
<<<<( त्याच्या क्लासच्या तुलनेतही तो वाईटच खेळला यात काही वाद नाही)>>> पुर्ण प्रतिसाद निट वाचता का??

त्याच्या क्लास तुलनेत नाही तर एखाद्या राहुलच्या क्लासच्या तुलनेत सुद्धा हे आकडे खराब आहेत..
कारण ज्या खेळीने आकडे सुधारले आहेत ते क्षण सुद्धा मोक्याचे नव्हते.. त्या खेळी गरजेच्या वेळी आलेल्या किंवा महत्त्वाच्या नव्हत्या.. अजाबराव यांची पोस्ट वाचून ते समजेल

जो काही निष्कर्ष काढायचा तो काढा आधी प्रतिसाद तुकड्यांत वाचून त्यावर प्रतिक्रिया देण कमी करा.... प्रतिसाद सलग पुर्णपणे आणि निट वाचा...प्लिज

कारण ज्या खेळीने आकडे सुधारले आहेत ते क्षण सुद्धा मोक्याचे नव्हते.. त्या खेळी गरजेच्या वेळी आलेल्या महत्त्वाच्या नव्हत्या..>>> याला मी नाकारत नाहीच आहे Data without context has no meaning at all
पण माझा आक्षेप फक्त तुम्ही तुलने साठी चुकीच्या रेंज चा डेटा पुरवला ज्याने कोहली इतरांच्या तुलनेत फार वाईट खेळला नाही हे सिद्ध होतेय हा होता....त्यामुळे माझ्या त्या मुद्दयावर बोलायचे सोडून उगाच फाटे फोडून सारखा सारखा गोलपोस्ट बदलू नका.

हो, हे बरोबर आहे..
तीस सरासरी साधारणच असली तरी प्रत्यक्षात कोहली त्यापेक्षा वाईट खेळला आहे.
मी ते आकडे ज्याना आकड्याशिवाय समजत नाही अशांना दाखवायला मागे काढलेले.

मला रहाणेचे कौतुक वाटायचे. कारण त्याच्या परदेशातील बरेच इनिंग मोक्याच्या वेळी आलेल्या असायच्या. पण त्याला बिनमहत्वाच्या वेळी मोठ्या खेळी करणे जमायचे नाही त्यामुळे त्याचा ऐवरेज फार दिसत नाही. मात्र प्लेअर त्यापेक्षा मोठा होता तो..

"चालू द्या तुमचे, थांबवतो विषय"

A few hours (१४ तास आणि १८ प्रतिसाद) later..

"चला सोडा, मी हरलो "

असं गंडवायचं नाही. Proud

फार्स विथ द आले चर्चेला त्यांच्याशी बोलत होतो. आणि माझ्या आनंदासाठी लिहीत होतो.
पण तुम्हाला समजावणे आता थांबवले आहे.
कारण जोपर्यंत कोणी एक्स्पर्ट यावर म्हणजे ब्रँड व्हॅल्यू कशी खेळाडूच्या निवडीला कारणीभूत ठरते आणि कसे हे पैश्याचे गणित असते आणि स्पॉन्सरचा कसा दबाव असतो, यावर आर्टिकल लिहीत नाही तोपर्यंत मी सांगून तुम्हाला हे पटणार नाही Happy

“कारण जोपर्यंत कोणी एक्स्पर्ट यावर … यावर आर्टिकल लिहीत नाही” - काय ही विनम्रता!! स्वतः इतक्या अधिकारवाणीनं ह्या विषयावर भाष्य केल्यावर (भाष्य वगैरे कसं भारदस्त वाटतं - थेट शंकराचार्य) परत इतर कुण्या एक्स्पर्टची ह्या विषयावर लिहिण्याची वाट बघायची - ए साहेब, यह ठीक नहीं

अजूनही कोहली खेळायला उभा असेल तर आपण एक बडा खेळाडू आला म्हणून सरसावून बघायला बसतो. हे जे perception आहे त्या अनुषंगाने मी पुन्हा कोहलीचे २०२० नंतरचे आकडे पहिले. २०२०च्या आधीची त्याची कामगिरी डोळे दिपवणारी होती. मी तर कुठेतरी मीम पहिला होता की प्रत्यक्ष परमेश्वर म्हणतोय, "साला कधी कधी असं वाटतं की कोहली, कोहली म्हणतात तो मीच!" Happy
मला असं वाटत होतं की २०२० पासून त्याच्या कामगिरीत उतार सुरु झाला आणि हळूहळू linearly पाच वर्षांत त्याची (२०२० पासूनची) सरासरी ३० पर्यंत घसरली. पण (rounded) आकडे पुढीलप्रमाणे आहेत. Cumulative सरासरी १ जानेवारी २०२० पासून धरली आहे.

२०२० सरासरी/सामने: १९/३ ; १ वर्षाची Cumulative सरासरी/सामने: १९/३
२०२१ सरासरी/सामने: २८/११ ; २ वर्षाची Cumulative सरासरी/सामने: २६/१४
२०२२ सरासरी/सामने: २७/६ ; ३ वर्षाची Cumulative सरासरी/सामने: २६/२०
२०२३ सरासरी/सामने: ५६/८ ; ४ वर्षाची Cumulative सरासरी/सामने: ३४/२८
२०२४ (३ जानेवारी २०२५ पर्य्न्त): सरासरी/सामने: २३/११ ; ५ वर्षाची Cumulative सरासरी/सामने: ३१/३९

२०२०, २१, २२ त्याच्यासाठी खूपच वाईट वर्षे होती. २०२२ अखेरीस ३ वर्षांत २० सामन्यांत जवळपास फ्लॅट २६ ची सरासरी होती. अशा परफॉर्मन्सवर इतर खेळाडूला बसवले असते. पण त्याची पूर्वपुण्याई म्हणा, ब्रँड व्हॅल्यू म्हणा की ODI /T २० performance म्हणा (त्यात मला पडायचं नाही), त्याला २०२३ मध्ये संधी मिळाली.
२०२३ मध्ये त्याने ५६ च्या सरासरीने आठ सामन्यांत [ऑस्ट्रेलिया (होम) आणि विंडीज, द आफ्रिका (अवे)] ६७१ धावा केल्या. त्यात दोन शतके आणि दोन अर्धशतके होती. जरी कुठली special खेळी नसली तरी ही चांगली कामगिरी होती. त्याचा दर्जा वादातीत आहे. त्याला फॉर्म सुद्धा गवसत आहे असा दिलासा २०२३ ने दिला. सचिनच्या खेळालासुद्धा सुद्धा पस्तिशीनंतर second wind मिळाली. तसं कोहलीच्या बाबतीत सुद्धा व्हायची आशा होती. फिटनेस हा कोहलीचा प्लस पॉईंट होताच.
बहुतेक म्हणून त्याला २०२४ मध्ये खेळवलं, पण ढेपाळला. एक वर्ष, ११ सामन्यांत २३ ची सरासरी. ज्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खेळायची अपेक्षा होती तो दौराही आता झाला आहे. वय ३६+, आणि तो ज्या पद्धतीने बाद होत आहे ते पाहून आता revival ची आशा नाही दिसत.

कोहलीचे याच काळात व्हाईट बॉल क्रिकेट आकडे जबरदस्त होते. २०-२० मधील सातत्य कायम होते. एकदिवसीयमध्ये शतक येत नव्हते पण अर्धशतके येत होती. आणि एकदा शतकाला लागलेले ग्रहण निघताच त्याने पुन्हा लाईन लावली. विश्वविक्रमी २०२३ वन डे वर्ल्डकप पाहता त्याच्या फॉर्म फिटनेस आणि रिफ्लेक्सेसवर कोण शंका घेणार होते.
पण तंत्रावर शंका घ्यायला वाव कायम होता. कारण कसोटीत पाच वर्षात एकही अशी स्पेशल खेळी नाही जिथे प्रतिकूल परिस्थितीत तो दटून खेळला..

पण आधीच जिथे कसोटीची लोकप्रियता वाचवायचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली आहे. तिथे कोहलीसारखा खेळाडू या फॉरमॅट मधून बाहेर पडला आणि व्हाईट बॉलच खेळत राहिला तर ते कसोटीला आणखी मारक ठरेल.

U-19 T20 Women's World Cup Final

भा.प्र.वे. दुपारी १२ वाजता.
हॉटस्टारवर.

केसांचं एक बरं असतं, गेले की गेलेच !
नसती जीवघेणी हुरहूर नाहीं परत येतील की नाही याची, क्रिकेटच्या फॉर्म सारखे !!
IMG_20250202_083919.jpg

शर्माजींनी मुंबईच्या मणिपूरविरुद्धच्या सामन्यात खेळायला हवे होते. मुंबईने ६७१ धावा करून एक डाव आणि ४५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. जम्मू काश्मीर बडोद्याला हरवत असल्याने मुंबई बाद फेरीत पोचेल. तेव्हा संघाला मार्गदर्शन करायला शर्माजींना बोलवावे.

कोहलीच्या उपस्थितीमुळे ळे दिल्लीच्या गोलंदाजांना स्फुरण चढले आणि त्यांनी १०० पेक्षा कमी षटकांत रेल्वेचे दोन्ही डाव गुंडाळून एका डावाने विजत मिळवला.

ब्रँड व्हॅल्यूवर निवड होणे शर्माजींच्या बाबत गुण आणि कोहलीच्या बाबत अवगुण आहे, असे कोणाला वाटले का?

गतविजेत्या मुंबईची बाद फेरीत जायची संधी नसल्यात जमा झाली.
Submitted by भरत. on 28 January, 2025 - 21:33
>>>>>

पोहोचली मुंबई बाद फेरीत.
संधी नसल्यातच जमा वगैरे काही नव्हते.
कारण मुंबईचा शेवटचा सामना दुबळ्या मेघालयशी होता जे सर्वच्या सर्व सामने हरले होते.

च् च्
जम्मू काश्मीरने बडोद्याला हरवल्याचाही मुंबईला फायदा झाला आहे. या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, तर मुंबईचे भवितव्य जर तर वर हेलकावत राहिले असते.

जम्मू काश्मीरने बडोद्याला हरवल्याचाही मुंबईला फायदा झाला आहे.
>>>>>

बरे..
आता सांगा उलट झाले असते म्हणजे बडोद्याने जम्मू-काश्मीरला हरवले असते तर काय झाले असते?

मुंबई आणि जम्मू दोघांचे पॉइंट सेम झाले असते आणि धावगतीवर मुंबईच आली असती Happy

RSAWU19 v INDWU19, Final
RSAWU19 84-1 (11.2) & 82 (20)
India Women U19 won by 9 wkts

Click here to view more : http://www.cricbuzz.com/live-cricket-scores/105540/rsawu19-vs-indwu19-fi...

रोहित शर्मा आणि भारतीय पुरुष संघाकडून प्रेरणा घेऊन महिलांचा अंडर १९ संघ अंतिम फेरीत आफ्रिकेला हरवून २०-२० वर्ल्डकप जिंकला Happy

अभिषेक शर्मा ! टेक अ बो ! मॅच इज स्टील ऑन. स्पिनर्स विरुद्ध धमाल येणार आहे. बटलर राहिला तर .......

वा वा! हा सामना म्हणजे अभिषेक शर्माचा सामना, १३५ धावा नि ३ धावात २ बळी.

इंग्लंडचा पाSर धुव्वा उडवला.
षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद होणे हे सहा वेळा झाले - हाहि एक भारतीय संघाचा विक्रम का?

जबरदस्त खेळला अभिषेक!! दोन्ही टीम्स चा अ‍ॅप्रोच सारखाच होता, पण अभिषेक differentiator ठरला. स्मॉग, कंकशन सब वगैरे सगळ्या सबबी सांगून संपल्या असतील तर इंग्लंडने आजचा तगडा पराभव मान्य करावा. Happy

मुलींच्या टीमचं सुद्धा जोरदार अभिनंदन!! काल थोडा वेळ बघितली मॅच. मुलींचा बॉलिंगवर कंट्रोल आणि फिल्डिंग छान होते.

मुंबई रणजी संघ
भारतीय ट्वेंटी संघ
महिला अंडर उन्नीस संघ
तुम्हा सर्वांचे अभिनंदन !

संजू पाच मध्ये पाच सेम प्रकारे बाद
तो आज पहिली ओवर जसा खेळला ते पाहून समजले की हा काही फटके मारणार आणि नेहमीसारखाच बाद होणार.
श्रेयस अय्यरचा सुद्धा शॉर्ट बॉल प्रॉब्लेम झालेला तेव्हा तो सुद्धा त्यावर उपाय म्हणून कवर सोडून मारा वगैरे प्रकार करत होता. अश्या प्रकारे काही शॉट बसून स्वताला खोटा दिलासा मिळतो, पण ते परमनंट सोल्युशन नसते. त्यासाठी आता पुन्हा नेट मध्ये घाम गाळावा लागणार.. खरे तर त्याला आजचा सामना खेळवला नसता तरी चालले असते. किंबहुना नव्हतेच खेळवायचे. त्याच्या भल्यासाठी ब्रेक झाला असता.

अभिषेक शर्मा तुफान !
अभिषेक आणि शर्मा ही दोन्ही नावे एकत्र आली की काय कमाल करतात हे आज बघायला मिळाले Happy

वरुण चक्रवर्ती सिक्रेट वेपन
मागे एका वर्ल्डकपला त्याने धोका दिला होता. पण आता त्याने आपली शैली जी बदलली आहे त्याने त्याचा घातकपणा वाढला आणि भरवश्याचा झाला आहे. पुढच्या 20-20 वर्ल्डकपला तो आणि बूम बूम एकत्र मजा येईल.

सूर्याचा फॉर्म मात्र गंडला आहे..त्याचे अपयश झाकले गेले या मालिकेत. पण लवकरच त्याला सूर गवसावा. कप्तानी छान करत आहे. त्याच्या अंडर चांगले युनिट तयार होत आहे. त्याची संघाला गरज आहे.

Pages