Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54
मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्युपिटर 125 देखील चांगला
ज्युपिटर 125 देखील चांगला पर्याय आहे.
पेट्रोल टॅंक पुढे घेतलाय की काय देव जाणे पण मोठी स्पेस मिळते सिट खाली.2 हेल्मेट आरामात बसतात.
सस्पेशन ऍक्टिवा चे आधी हार्ड होते, tvs चे चांगले वाटते , वैयक्तिक मत. नवीन ऍक्टिव्हा मध्ये कसे आहे त्याचा अनुभव नाही.
TVS ची N torque देखील चांगली आहे.
डॅशिंग लूक गाडी.
बायकोने टिव्हीस स्कूटी, पेप
बायकोने टिव्हीस स्कूटी, पेप, हिरो प्लेजर अशा बर्याच गाड्या बदलल्या. आता अॅक्टिवा खूप वर्षे वापरतेय.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अॅक्टिव्हा मस्तच आहे.
पण पुतणीकडे यामा ची फाशिनो आहे. ती चालवल्यापासून प्रेमातच. बसल्यावर हँडल आणी हेडलाईटमुळे पूर्वीच्या बजाज चेतकचा फिल येतो. बॅलन्सिंग परफेक्ट असल्याने महिलांसाठी एकदम छान आहे. तिचं फायरिंग लता मंगेशकर च्या आवाजासारखं आहे.
आता हायब्रीड आल्याने मुलीला द्यायला छान आहे.
एक तर वेळेत पेट्रोल भरण्याची सवय नसल्याने ढकलायची पाळी येते ते होणार नाही. इलेक्ट्रिक मोडवर साठ किमी जाते शिवाय रनिंग मधे बॅटरी चार्ज होत राहते. त्यामुळं बॅटरी चार्जिंगचं काम जे मुलीकडून कधीच होत नाही त्याचीही गरज नाही. गेल्या महिन्यात हायब्रीड स्कूटर नेहमीच्याच किंमतीत देत होते. आता पहायला पाहीजे.
ओके.. ज्युपिटर, activa आणि
ओके.. ज्युपिटर, activa आणि फाशिनो बघते. धन्यवाद लोकहो! पुण्यात आमच्याकडे हिरोची प्लेझर आहे जुनी. तीही चांगली आहे. अलीकडे कुणी घेतली आहे का?
Fascino साठी अनुमोदन, दिसायला
Fascino साठी अनुमोदन, दिसायला सुंदर, फीचर चांगले, हायब्रीड असल्याने फ्युएल इकॉनॉमी बढिया. यांचीच स्पोर्ट लूक मध्ये RayZ गाडी आहे. सेम इंजिन, लूक वेगळा. टीव्हीएसने jupiterचे हायब्रीड व्हर्जन काढले आहे, त्या बद्दल सुद्धा एकदा चौकशी करा.
Ev मध्ये Hero Vida आणि Ather
Ev मध्ये Hero Vida आणि Ather Ritza चांगल्या वाटल्या. Ola बद्दल काही लिहीत नाही.
ओके.. ज्युपिटर, activa आणि
ओके.. ज्युपिटर, activa आणि फाशिनो बघते~~~ लूक, स्पेस, एव्हरेज, सस्पेंशन सर्व एकत्रीत सुझुकी बर्गमन मध्ये आहेत वरील एकही गाडी जवळपास नाही
हायब्रीड बद्दल मला जी माहिती
हायब्रीड बद्दल मला जी माहिती सहकार्यांकडून मिळाली ती चुकीची आहे किंवा माझे आकलन चुकीचे झाले.
इथे लिहील्यावर मी नेटवर पाहिले. हायब्रीड कारप्रमाणेच आहे. इंजिनचा परफॉर्मन्स सुधारतो. बहुधा पेट्रोल संपल्यावर फक्त पेट्रोल पंपापर्यंत जाईल इतकीच इलेक्ट्रीक मोड मधे स्वतंत्र चालते.
चुकीची माहिती दिल्याबद्दल क्षमा असावी. मी स्वत: अद्याप हायब्रीड स्कूटर पाहिलेली नाही.
वर ए आय यांनी म्हटल्याप्रमाणे फ्युएल इकॉनॉमी सुधारते.
इलेक्ट्रिक स्कूटर विकून
इलेक्ट्रिक स्कूटर विकून टाकणारे.
Submitted by रघू आचार्य on 26 October, 2024 - 19:20
With registation वाली आहे की without registration वाली???
With registation
With registation
सुझुकी अॅक्सेस १२५ ची नवीन
सुझुकी अॅक्सेस १२५ ची नवीन हायब्रीड स्कूटर सुद्धा चांगली वाटली.
अॅक्टिव्हा ची हायब्रीड इतक्यात लाँच झाली आहे.
स्कूटर मधे पहिल्या तीन लोकप्रियतेप्रमाणे अशा आहेत.
१. अॅक्टिव्हा
२. ज्युपिटर
३. अॅक्सेस
या तीनही स्कूटर्स लेडीज साठी चांगल्या वाटतात. पुरूषांना सुद्धा सोयीच्या आहेत. फॅमिली स्कूटर म्हणता येईल. यामाह ची रेक्स कि काय ती कॉलेजच्या मुलांसाठी ठीक आहे. स्कूटर वाटत नाही. तशाच प्रकारची सुझुकी आणि टिव्हीएस ची पण मोटोस्कुटी आहे. ज्यांना ते डिझाईन आवडलं ते घेऊ शकतात. त्यात स्कूटरचा फील नाही येत.
सुझुकी अॅक्सेसला वाढता प्रतिसाद आहे. यामाह ही कंपनी खराब मार्केटिंग साठी कुप्रसिद्ध आहे. तसेच अनाकलनीय निर्णय घेण्यातही. चांगली चाललेली यामाह आर एक्स १०० आणि यामाह एंटायसर या मोटरसायकली अचानक बंद केल्या. फोर स्ट्रोक मधे सुद्धा यामाह आर एक्स घ्यायला लोक तयार असताना. अचानक मॉडेल बंद केल्यास पुढे स्पेअर्स मिळायला त्रास होऊ शकतो.
कदाचित मी सुझुकी १२५ हायब्रीड / पेट्रोल यापैकी एक घेईन. ब्ल्युटूथ वगैरेची मला गरज वाटत नाही. मुलीलाही नाही वाटत. चार्जिंग वगैरे फीचर्स अनावश्यक आहेत. युटिलिटी बॉक्स आवडले. सुझुकीला पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडायला सीट उघडावं लागत नाही. यामाह ने सीटखाली झाकण दिलं आहे. दोन्हीचे फायदे तोटे आहेत.
अॅक्टिव्हा दोन्ही पेक्षा थोड्डीशी उंच आहे. मुलीला त्यामुळेइ फाशिनो (इथे फसिनो म्हणतात) घ्यायचा विचार होता. या धाग्यामुळे बरं झालं. वेगळे ब्रॅण्डस सुद्धा विचारात घेतले गेले.
बाईकवाले नावाच्या साईटवरचे
बाईकवाले नावाच्या साईटवरचे ज्युपिटर आणि फसिनोचे रिव्ह्यू करणारे व्हिडिओज बघितले. ज्युपिटर चांगली वाटली जास्त. अर्थात चालवून बघणार दोन तीन गाड्या आणि मग ठरवणार. डिकी बरीच मोठी आहे आणि पेट्रोल भरण्यासाठी सीटवरून उतरावं लागत नाही हे दोन मुख्य फायदे जाणवले. मायलेज वगैरे मुद्दे माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाहीत. कारण तेच, रोजचं रनिंग कमी आणि त्यातही निम्मा वेळ गिअरची गाडी असेल तर सेकंड गिअरच्या पुढचा गिअर टाकायची वेळ येत नाही अशा सावकाश चालणाऱ्या ट्रॅफिकमधे जातो.
मी मागच्या शनिवारी ज्युपिटर
मी मागच्या शनिवारी ज्युपिटर १२५ घेतली. दुसरी कुठलीच गाडी जाऊन बघितली नाही. ही बघितली, आवडली, चालवून बघितली आणि घेतली! सीटखाली भरपूर जागा आहे आणि पेट्रोल भरण्यासाठीचं इनलेट समोर आहे (गाडीवरून उतरावं लागत नाही पेट्रोल भरताना) या दोन गोष्टी माझ्या मनात भरल्या
आठवडाभर चालवली आहे. छान वाटते आहे.
इथे सल्ला देणाऱ्या सर्वांचे आभार.
अभिनंदन वावे
अभिनंदन वावे
चांगला निर्णय
हल्ली दुचाकी कैच्या कै महाग झाल्यात
अभिनंदन
अभिनंदन
दुचाकी महाग झालेल्या आहेत
दुचाकी महाग झालेल्या आहेत खरंच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद झकासराव आणि AI!
मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र
मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. मात्र इतका महत्वाचा निर्णय असूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या निर्णयाची कोठेही जाहिरात केली जात नाही. मुंबई, पुणे, नाशिक व इतरही शहरातील वाहतूक पोलीस हा निर्णय जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत.
मुदत संपल्यावर मात्र म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हेच इ-चलान मशीन घेऊन फौज रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड चलान मारतील! त्यांना HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP बसवून घ्या आणि ही माहिती आपले मित्र, नातेवाईक, ओळखीचे यांच्यापर्यंत पोहोचवा.
शासन आदेश पाहण्यासाठी:- https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdf
HSRP बुक करण्यासाठी भेट द्या :- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html
अधिक माहितीसाठी video :
https://www.youtube.com/watch?v=mna7XdZCoQc
https://www.youtube.com/watch?v=M5J5OC_owr4
https://www.youtube.com/watch?v=N5H5fFUCigs
महाराष्ट्रातील जुन्या/नव्या
महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे>> मी गेला महिनाभर अधिकृत साईट वर नोंदणी करायचा प्रयत्न करतेय. साईट ला प्रॉब्लेम आहे. बाहेर HSRP करून देणारे बरेच vendors आहेत, ते एका दिवसात पाट्या करून देतात, पण ते अधिकृत नाहीत.
बाहेर HSRP करून देणारे बरेच
बाहेर HSRP करून देणारे बरेच vendors आहेत, ते एका दिवसात पाट्या करून देतात, पण ते अधिकृत नाहीत.>>> +१११११
त्यांच्याकडून कोणीही HSRP सदृश पाट्या घेऊ नयेत. अशा पाट्या असल्या तरीही १ एप्रिल २०२५ नंतर चलान कापले जाणार आहे. अधिकृत HSRP मध्ये गाडीच्या मागे-पुढे HSRP आणि गाडीच्या पुढच्या काचेवर (दुचाकी / ट्रॅक्टर सोडून) एक स्टीकर लावला जातो, ज्याला third numberplate म्हणतात. ज्या खऱ्या HSRP असतात त्यांच्यावर गाडीच्या नंबरसह अजून एक numberplate चा क्रमांक असतो जो अतिशय बारीक अक्षरात laser च्या साहाय्य्याने नोंदवलेला असतो आणि हा क्रमांक पुढच्या व मागच्या प्लेटसाठी वेगवेगळा असतो. आणि हे दोन्ही प्लेटवरील laser ने नोंदवलेले क्रमांक third numberplate च्या स्टीकरवर लिहिलेले असतात.
अतिशय धन्यवाद , बरं झालं धागा
अतिशय धन्यवाद , बरं झालं धागा पाहिला. साईट आता तरी सुरु आहे. प्लेट बुक करून टाकली. GST सकट ८७९.१० रु लागतात. ५ वर्षे गॅरंटी आहे , स्टिकर कार वॉश करताना फाटले तर बहुतेक परत बनवावे लागेल , अश्या अर्थाची एक ओळ वाचली.
वि मु धन्यवाद
वि मु धन्यवाद
कार आणि दुचाकी दोन्हीचे स्लॉट बुक करून घेतले
घरापासून फार लांब नाही असे पाहिले.
दुसरं म्हणजे चारचाकी साठी नामांकित sales सर्व्हिस वाला बुक केला.
दुचाकी साठी एका e bike च्या sales ऑफिसचा घराजवळाचा vendor सापडला तोच बुक केला.
मी आधीच टू व्हीलर घेतली
मी आधीच टू व्हीलर घेतली तेव्हां एच एस आर पी डीलर कडून आली आहे. आता स्टीकर साठी अप्लाय करू का ?
तिथे माझा नंबर अॅक्सेप्ट होत नाही. मला अॅक्सेस नाही असा काहीतरी मेसेज येतो. स्टीकर ची गरज नाही असं डीलर म्हणतात. काय खरं ?
ऑनलाईन पेमेंट झाल्यावर ऑर्डर
ऑनलाईन पेमेंट झाल्यावर ऑर्डर नंबर आणि रिसिट नंबर मिळाला नाही, त्यापूर्वी पत्ता लिहिला तर त्यात स्पेशल कॅरेक्टर आहे म्हणून घेत नव्हता. दुसरे पेज उघडले तर नीट झाले, पण बहुतेक त्यामुळेच घोळ झाला. आता कस्टमर सपोर्ट ला मेल लिहिला आहे. बघू कधी उत्तर मिळते.
कस्टमर सपोर्टला फोन केला,
कस्टमर सपोर्टला फोन केला, मराठी पर्याय होता तो वापरून बोललो, काही डिटेल्स (जसे कि गाडी नंबर, नाव, फोन नंबर आणि ई-मेल) पडताळल्यावर ऑर्डर नंबर दिला. २-३ मिनिटात काम झाले. एकंदरीत सपोर्ट चांगला वाटला, आता HSRP लावून घेताना पाहू काय अनुभव येतो ते.
मी आधीच टू व्हीलर घेतली
मी आधीच टू व्हीलर घेतली तेव्हां एच एस आर पी डीलर कडून आली आहे. आता स्टीकर साठी अप्लाय करू का?.
![Third-Registration-Sticker-image-details.png](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23454/Third-Registration-Sticker-image-details.png)
.
.
.
दुचाकीसाठी स्टीकर (third numberplate) नसते.
Third numberplate (sticker) म्हणजे काय हे नेमकेपणाने लक्षात यावे यासाठी खालील फोटो पहा:
२०१९ पूर्वि रजिस्टर केलेल्या
...
Third numberplate (sticker)
Third numberplate (sticker) म्हणजे काय हे नेमकेपणाने लक्षात यावे यासाठी खालील फोटो पहा >> कधीपासून चार चाकीकरता हा स्टिकर देऊ लागले?
विमु धन्यवाद
विमु धन्यवाद
कधीपासून चार चाकीकरता हा
कधीपासून चार चाकीकरता हा स्टिकर देऊ लागले?....
ज्या गाड्या (दुचाकी /तीनचाकी /चारचाकी) 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना डीलर कडूनच HSRP बसवून येते. त्यापैकी रिक्षा / चारचाकीना डीलर कडूनच हा स्टीकर (third numbar plate) लावून येते.
ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना आत्तापर्यंत HSRP बंधनकारक नव्हती (किंबहुना हवी असेल तरी मिळत नव्हती), पण आता या नवीन आदेशानुसार आता जुन्या गाड्यांना देखील HSRP बंधनकारक झाली आहे. त्यामुळे जुन्या गाड्या आता जेव्हा HSRP लावून घेतील तेव्हा रिक्षा /चारचाकी गाड्या / बस / ट्रक आदी वाहनांना हा स्टीकर (थर्ड numbar plate) लावली जाईल.
अजून एक माहिती - या स्टीकर (third numbar plate) चा रंग हा गाडीच्या fuel वर अवलंबून असतो. डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना केशरी रंगाचा स्टीकर असतो. (पेट्रोल /CNG / EV चे color code नक्की माहीत नाही म्हणून देत नाही)
हा एक डबल उपद्व्याप झालाय खरा
हा एक डबल उपद्व्याप झालाय खरा.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ह्याचा मला फायदा काय होणार आहे हे कळालं नाही.
फी जास्त आहे आणि ह्या फी वर देखील 18 टक्के gst आहे.
Disgusting प्रकार.
सरकारी नियम कळत नाहीत.
सरकारी नियम कळत नाहीत....
सरकारी नियम कळत नाहीत....
अहो, मी माझी टुरिस्ट गाडी मे 2023 मध्ये private मध्ये रुपांतरीत केली. तेव्हा गाडीच्या पिवळ्या numbar plate बदलून पांढर्या number plate लावायच्या होत्या. तेव्हा मी विचार केला की, तशाही number plate बदलायच्याच आहेत तर HSRP लावून घेऊ (कारण आज ना उद्या कधीतरी HSRP बंधनकारक होणार हे माहीत होते), पण तेव्हाच्या नियमांप्रमाणे HSRP केवळ नवीन गाड्यांनाच उपलब्ध होत्या! त्यामुळे मला NON-HSRP plates लावून घ्याव्या लागल्या आणि आता अवघ्या दीड वर्षात त्या तोडून टाकल्या जाणार (नियमाप्रमाणे)!!!
Pages