Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54
मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा छान माहिती.
अरे वा छान माहिती.
पण क्लच लेस म्हणजे आपण हॅन्ड लिव्हर पिळून गियर आपोआप मागच्या मागे बदलत असतील, तर ते ऑटोमॅटिक सारखेच होईल ना एन्ड युजर ला?
कायनाटिक ची बलेझ इटालियानो नावाची एक फार न चाललेली गाडी आठवतेय.
पुढे मागे थेट हाताने हँडल लिव्हर पिळून ऍक्टिवा सारखी चालवता येणारी ऍव्हेंजर आली तर मी घेईन.ती गाडी मला चालते उंचीला.पल्सर वर बुरुजावर किंवा मचाणावर चढून बसावे असे वाटते.
बाईक सारखी उंच चाक असलेली पण
बाईक सारखी उंच चाक असलेली पण automatic motorcycle बनवायला काही अडचणी आहेत का .
कारण तशी मोटरसायकल नाही बाजारात
>>पण क्लच लेस म्हणजे आपण
>>पण क्लच लेस म्हणजे आपण हॅन्ड लिव्हर पिळून गियर आपोआप मागच्या मागे बदलत असतील, तर ते ऑटोमॅटिक सारखेच होईल ना एन्ड युजर ला?
नाही.... त्याला पायात गिअर्स होते आणि ते टाकावे लागायचे... फक्त ते बदलताना क्लचचे जजमेंट सांभाळायची कटकट नव्हती इतकाच काय तो फायदा!
कायनाटिक ची बलेझ इटालियानो
कायनाटिक ची बलेझ इटालियानो नावाची एक फार न चाललेली गाडी आठवतेय.
ब्लेझचा पुढिल भाग फेअरिंगचा पार छातीच्या बरगड्या असल्यासारखा दिसायचा. गाडीही मॅक्सीस्कूटरसारखी अवाढव्य होती. आता सुझुकीची बर्गमन ही मॅक्सीस्कूटरसारखी स्कूटरेट आलीच आहे, त्याला रिस्पोन्स मिळाला तर इतर कंपन्याही मॅक्सीस्कूटर आणतील भारतात. सुझुकी होंडा आणि बीएमडब्ल्यु च्या मॅक्सीस्कूटर क्रुझरबाईकना तोड देतील अशा आहेत. शिवाय युटिलिटीज भरपूर.
माझा प्रश्न थोडा वेगळा आहे,
माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, परंतु केवळ नवीन धागा काढणे टाळण्यासाठी येथेच विचारतो आहे.
माझ्याकडे २००७ साली घेतलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. घेतल्यापासून ३-४ वर्षांनी एकदा battery सेट बदलला होता. व आताही battery बदलण्याची वेळ झाली आहे. २००७ साली घेतली असल्याने त्यात lead acid प्रकारच्या battery आहेत ज्या अत्यंत जड आणि आकाराने मोठ्या आहेत. आता नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथीअम आयन battery असते.
तर आता battery बदलताना lead acid battery च घ्यावी की थोडे जास्त पैसे घालून लिथीअम आयन किंवा लिथीअम फॉस्फेट प्रकारची battery घ्यावी??? (या battery चे वजन, आकार अत्यंत कमी आहे.)
२००७ साली घेतलेली इलेक्ट्रिक
२००७ साली घेतलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे ना? मग नवीन बॅटरी टिकायची शक्यता जास्त आहे की स्कूटर टिकायची शक्यता जास्त आहे याचा विचार करून ठरवा काय ते.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मूळ मॉडेल ला ज्या गोष्टी
मूळ मॉडेल ला ज्या गोष्टी लागतात त्यात स्वतःहून कोणतेही बदल करू नयेत.
अगदी अटळ असले तर कंपनीला विश्वासात घेऊन लेखी/मेल वर ग्रीन सिग्नल मिळवून करावे.
अन्यथा उद्या लिथियम बॅटरी चा स्फोट झाल्यास कंपनी आणि विमा वाले 'यांनी स्वतःच्या मनाने मूळ गाडीत असुरक्षित बदल केले आणि आम्ही जबाबदार नाही' म्हणून नुकसानभरपाई न देता हात वर करतील.
२००७ साली घेतलेली इलेक्ट्रिक
२००७ साली घेतलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे ना? मग नवीन बॅटरी टिकायची शक्यता जास्त आहे की स्कूटर टिकायची शक्यता जास्त आहे याचा विचार करून ठरवा काय ते.
Submitted by उपाशी बोका on 25 May, 2019 - 00:48
स्कूटर टिकण्याची शक्यता जास्त आहे, कारण काही वर्षांपूर्वी मी पूर्ण स्कूटर खोलून आतील लोखंडी फ्रेमला (chassis) गंजविरोधी red oxide लावून मग रंग दिला आहे.
मूळ मॉडेल ला ज्या गोष्टी लागतात त्यात स्वतःहून कोणतेही बदल करू नयेत.
अगदी अटळ असले तर कंपनीला विश्वासात घेऊन लेखी/मेल वर ग्रीन सिग्नल मिळवून करावे.
अन्यथा उद्या लिथियम बॅटरी चा स्फोट झाल्यास कंपनी आणि विमा वाले 'यांनी स्वतःच्या मनाने मूळ गाडीत असुरक्षित बदल केले आणि आम्ही जबाबदार नाही' म्हणून नुकसानभरपाई न देता हात वर करतील.
नवीन Submitted by mi_anu on 25 May, 2019 - 01:18
मुळात या इलेक्ट्रिक स्कूटरची मोटर 250 Watts ची असल्याने त्याला registration नाही, परिणामी विमाही mandatory नाही.
शेवटी अॅक्टीव्हा १२५ घेतली
शेवटी अॅक्टीव्हा १२५ घेतली गेल्या जून मधे. मोटर्सायकलवरुन स्थित्यंतर होताना थोडा त्रास झाला. पण आता ठीक आहे
माझ्या कामवाल्या बाईंना
माझ्या कामवाल्या बाईंना दुचाकी घ्यायची आहे. त्यांचा मुलगा, मुलगी हे दोघे चालवू शकतील अशी. त्यांनी मलाच निवडायला आणि घेऊन द्यायला (अर्थात पैसे त्यांचे) सांगितलं आहे. बजेट ६०-७० हजार. रोजचं रनिंग खूप नसेल. कुठली घ्यावी? मेंटेनन्स जास्त नको, वजनाला जड नको. शक्यतो दिवाळीत त्यांना गाडी घरी आणायची आहे.
स्कुटी स्ट्रिक/स्कुटी टिन्झ
स्कुटी स्ट्रिक/स्कुटी टिन्झ
सुरुवातीला सर्वच वापर होणार नाही म्हणतात आणि सोय जाणवली की दणकून वापरतात
वजन मुद्दा नसेल तर सरळ माइस्रो किंवा ऍक्टिवा किंवा ज्युपिटर घ्यावी
6 महिन्यात छोट्या गाड्यांचा होतो तसा खुळखुळा तरी होणार नाही
माझ्याकडे ज्युपिटर, आणि झेस्ट
माझ्याकडे ज्युपिटर, आणि झेस्ट आहेत. (कुणीही आलटून पालटून वापरत घरात.)
परफॉर्मन्स आणि मायलेज बेस्ट.
स्कूटी चिखलात वगैरे पटकन
स्कूटी चिखलात वगैरे पटकन स्लिप होते असं कॉलेजला असतानाचं निरीक्षण होतं.
अर्थात आताची मॉडेल्स तशी असतील असं नाही. तेव्हा स्कूटी पेपच्या आधीची मॉडेल्स होती. धन्यवाद अनु, जाऊन बघते शोरूममधे.
अज्ञातवासी, धन्यवाद! याही गाड्या बघते.
https://www.zigwheels.com
https://www.zigwheels.com/newbikes/Honda/Dio
आता तर e scooters मोठ्या
आता तर e scooters मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. यांमुळे प्रदूषण कमी होईल असे वाटते का?
सायकल घ्या, थोड्याच दिवसात
सायकल घ्या, थोड्याच दिवसात त्यांना अच्छे दिन येणार आहेत.
E स्कुटर तेव्हाच घ्यावी
E स्कुटर तेव्हाच घ्यावी जेव्हा सगळीकडे चार्जिंग स्टेशन्स असतील,तेही सुस्थितीत... अर्थात हे आपल्याकडे इतक्यात तरी.......
मला हिरोची ऑप्टिमा घेऊन
मला हिरोची ऑप्टिमा घेऊन दिलीय चार महिन्यांपूर्वी. ११० किमी जाते दोन बॅट-यांवर. चढ, वजन प्रमाणे कमीजास्त.
हा माझ्याकरताचा प्रश्न -
हा माझ्याकरताचा प्रश्न - सध्या माझ्याकडे २०१२-१३ पासूनची होंडा युनिकॉर्न बाईक आहे. कोव्हिड्पासून शक्यतो ती म्हणावी अशी चाललीच नाहीय आणि अजूनही चालवायची गरज पडत नाही (थँक्स टू वफ्रॉहो). मी तिला इतक्या काळात ३-४ दा सर्वीस अणि दोन वेळा बॅटरी बदलली आहे. पण नियमीत वापर शक्यतो नाहीच कारण यावर काहीही सामान आणता येत नाही.
तर - ही गाडी विकायचा अन मग दुसरी घ्यायचा विचार आहे.
- ओला चा इकडल्या लोकांचा काय अनुभव आहे? इतर कुठल्या कंपन्या चांगल्या आहेत... एथर आणि?
- मी जर ही गाडी ओला ला एक्सचेंज केली तर ओला मला मार्केट प्राईस च्या वर २५% अॅडिशनल बोनस देते जुन्या गाडीवर, हा मुद्दा मलातरी साईडलाईन करता येत नाहीय सध्या. पण हे ही तितकच खरं की मला या क्षणीतरी नव्या दुचाकीची गरज नाही - एक दुसरी स्कूटर आहे आणि कारही. आणि हा पर्याय घेतला तर मला ओलात आज पैसे गुंतवावे लागतील... काय क्रू?
- ही ऑफर कीती राहील हे माहीती नाही...
- जुनी दुचाकी ऑलरेडी बारा + वर्षे जुनीय तर तिला ठेवण्यात तसा काही पॉइंट नाही असं माझं मत.
दुचाकी नीट मेन्टेन्ड असेल आणि
दुचाकी नीट मेन्टेन्ड असेल आणि रनिंग कमी असेल तर OLA काय किंवा अजून कुठल्या सेकंड हँड दुचाकी डीलरला विकली की २० ते ३० टक्के कमी किंमत मिळेल.
OLX वर व्यवस्थित फोटो काढून आणि गाडी कशी छान मेन्टेन्ड आहे, किती कमी रनिंग झालंय वगैरे नमूद करून, डीलर्स प्लिज डोन्ट कॉन्टॅक्ट असे लिहून छानशी जाहिरात दिली तर चांगले गिऱ्हाईक मिळते.
माझ्या १२ वर्षे जुन्या जेटाची (टकाटक मेन्टेन्ड, 53000 किमी रंगीन) आणि तेवढ्याच जुन्या दिड लाख किमी रनिंग, इन्शुरन्स एक्सपायर्ड, नो सर्व्हीर्स ट्रॅक दोनेक फिचर्स नॉट वर्किंग जेटाची मार्केट व्हॅल्यू OLX Auto, Cars 24, VW dealer या लोकांनी ३ लाखाच्या आत लावली होती, माझ्या गाडीला ७-८ हजार जास्त. त्यात मी एक्सचेंज केली त्यांच्या कडून दुसरी सेकंड हँड कार घेतली तर २०% डिस्काउंट देणार होते.
मी OLX वर नीट जाहिरात देऊन, डीलर्स लोकांना माफ करायला सांगून ती ४.८ लाखाला विकली, दर्दी गिऱ्हाईकाला.
चार जण बघायला आले होते, त्यातल्या चौथ्याने घेतली.
जरा दम धरावा लागतो, मला एक महिना लागला जाहिरात नीट दिल्यापासून विकायला.
मी माझी shine sp 125 सप्टेंबर
मी माझी shine sp 125 सप्टेंबर 2017ची आज सकाळी olx वरून 46000 हजारला विकली. फक्त 23000 रनिंग झाले होते. शो रूम ने फक्त 35000 किंमत केली होती
उद्या टॉप एंड 125 cc ॲक्टिवा ची डिलिवरी घेतोय दुपारी.
मानव तुम्ही किंमत कोट करताना
मानव तुम्ही किंमत कोट करताना ती ठरवलीत कशी? ओलेक्स वर गाडी विकायची सुरक्षित पद्धत काय आहे?
मी CARS24, SPINNY, तसेच शोरूम
मी CARS24, SPINNY, तसेच शोरूम वाले याच एवढ्या जुन्या गाडीची किंमत काय ठेवतात यावरून माझ्या गाडीची किंमत ठरवली. त्यांच्या पेक्षा थोडी (म्हणजे या केस मध्ये ५० हजार कमी) कमी आणि त्यावर बार्गेन करताना अजून थोडी कमी करावी यानुसार ५.२ लाख जाहीरातीत ठेवली. किमान ५ लाख मिळतील असा अंदाज होता. मिळलेही असते पण आहे गिऱ्हाईक म्हणुन मी विकली ४.८ ला फार घासाघीस न करता.
सुरक्षित पद्धत म्हणजे OLX वर
सुरक्षित पद्धत म्हणजे OLX वर जाहिरात द्यायची, त्यातच आपला फोन नंबर मात्र नाही द्यायचा.
OLX ऍप मध्येच chat ची सोय असते.
तिथे लगेच आपण दिलेल्या किमतीत घ्यायला तयार असल्याचे मेसेज येतात त्याकडे दुर्लक्ष करायचे.
काहीही चौकशी न करता कमी किंमतीच्या ऑफर्स येतात त्या बहुत करून जुन्या कार डीलर्सच्या किंवा खडा टाकून पहाणाऱ्या लोकांच्या असतात त्याकडेही दुर्लक्ष करायचे.
आपल्या कार, दुचाकी बद्दल अजून माहिती विचारणारे किंवा न विचारताही मला घ्यायची आहे तुमचा नंबर कळवा असे मेसेजेस येतात. काही त्यांचाही नंबर देतात. त्यांची प्रोफाइल चेक करायची. त्यात त्या प्रोफाईलने किती जाहिराती दिल्या आहेत हे दिसते त्यावरून हा डीलर आहे की नाही कळते.
सर्व ठीक वाटल्यास आपण त्या व्यक्तीला नंबर द्यायचा.
मग फोन वर बोलण्यावरून आपण काय करता वगैरे विचारून अंदाज घ्यायचा. पूर्ण व्यवहात बँक ट्रान्सफरने करायचा, सौदा पक्का झाला की ओळखपत्र एकमेकांना दाखवायचे आणि प्रत घ्यायाची आणि पूर्ण किंमत अकाउंट मध्ये जमा झाल्यावरच पेपर्स साइन करून गाडीचा ताबा देण्यात येईल हे आधी ठरवून घ्यावे.
Vehicle sale deed चा नमुना ऑनलाईन मिळतो त्यावरून साध्या पेपर sale deed बनवून घ्यायचे. आधी टोकन ऍडव्हान्स देऊन काही लोक सौदा ठरवतात. तो घ्यावा तरी सुद्धा आपल्या प्रोसिजरवर आपण ठाम असावे. कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांचा QR code स्कॅन करून किंवा त्यांनी पाठवलेली रिक्वेस्ट स्वीकारून transaction करायचे नाही. पैसे ते देणार आहेत त्यांनी आपल्या बँक अकाउंट, upi id ला पैसे पाठवावे. UPI ला प्रॉब्लेम असेल तर बँक अकाउंटला पाठवायला सांगायचे.
चेक देणार असेल तर तो वठल्यावरच गाडीचे ट्रान्सफर पेपर्स साइन करून गाडीचा ताबा द्यावा.
आता यात बरेचदा माणसांचा अंदाज येतो त्यावरून कुठे काय शिथिल करायचे केवढी रिस्क घायची वगैरे आपण ठरवायचे.
ओ एल एक्स च्या विरोधात मी
ओ एल एक्स च्या विरोधात मी सायबर सेल ला तक्रार दिली होती.
अनेकदा रिपोर्ट करून सुद्धा संशयास्पद युजर्सच्या विरोधात काहीही कारवाई करत नव्हते. आमच्या इमारतीतच तीन जणांना गंडा घालायचा प्रयत्न झाला. सुदैवाने सगळेच अॅलर्ट होते.
मला दुचाकी घ्यायची आहे. सध्या
मला दुचाकी घ्यायची आहे. सध्या दहा वर्षे जुनी access 125 चालवते. तिने फार वैताग आणला आहे. रोजचं पंधरा ते वीस किलोमीटर रनिंग आहे. कुठली घ्यावी?
Yamah Fascino Hybrid मी
Yamah Fascino Hybrid मी मुलीसाठी बघतोय.
इलेक्ट्रिक स्कूटर विकून टाकणारे.
Activa
Activa
Yamaha Aerox 155
Yamaha Aerox 155
Yamaha Aerox 155 बरीच पॉवरफुल
Yamaha Aerox 155 बरीच पॉवरफुल आणि महाग दिसतेय अँकी
मी चालवणार रोज पंधरा ते वीस किलोमीटर. तेही बंगलोरच्या ट्रॅफिकमधे. त्यासाठी पावणेदोन लाखाची गाडी मला तरी वर्थ वाटत नाही.
Activa आहेच डोक्यात केया. वर्षानुवर्षे टिकलेली गाडी आहे त्यामुळे चांगलीच असणार. याशिवाय अजून कुठले पर्याय आहेत का तेही बघत आहे.
Pages