टू व्हीलर कोणती घ्यावी?

Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54

मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, गाडी मस्त आहे. मुख्य म्हणजे अ‍ॅक्टिवापेक्षा लाईटवेट आहे. आणि अ‍ॅक्टिवासारखी वजनदार आणि बोजड नाहीये, मस्त स्लिमशेप्ड आहे. एका मैत्रिणीने घेतली आहे, त्यामुळेच ऑन रोड किंमत कळली. तिच्याकडून प्रत्यक्ष अनुभव कळेलच.

मी आजच पाहीली रस्त्यावर... जाणवण्याएवढी स्लिम आहे.
नवीन सिटी पण मस्त... एक ते लोगोला लागून असलेला बोल्ड बार फार नाही पटला. एका कलिग नी टेस्ट्ड्राईव घेतली तर म्हणालाय की जुन्यापेक्षा जास्त स्मूथ अन रिफाईंड आहे. फेसलिफ्टेड डस्टर पण छान दिसते... Happy

मी हा धागा काढला खरा पण नन्तर टू व्हीलर घेण्याचा विचार काही कारणांनी मागे पडला. आता पुन्हा विचार आहे म्हणून हा धागा वर काढतेय. मला आणि इतरांनाही बरीच माहिती मिळतेय इथे.
"रे झेड" बद्दल काही माहिती आहे का? लूक्स चान्गले वाटले.

अ‍ॅक्टिवा आय पण आहे त्या मध्ये! दिसायला खरच मस्त अन लाईट्वेट आहे.
वेगोला माझं मत. एक उत्तम पर्याय ५०के मध्ये.

आम्ही मागील आठवड्यात वेगो घेतली. मस्त पळते, सस्पेंशन मस्त आहे, सीट्स्पण आरामशीर आहेत.
१२ इंच टायर्स, एक्स्टर्नल फ्युएल टँक, मेन स्टँड लावायची नवीन आरामशीर पध्दत हे आवडलेले फीचर्स.
अ‍ॅक्सेसरीज सहित एकून ५८हजारला मिळाली.

माझ्याकडे स्कूटी पेप + आहे 2006 पासून. 30000 रनिंग झाल आहे. अजुन उत्तम स्थितीत साधारण 45 च्या आसपास अॅवरेज देते.
तर माझा प्रश्न असा आहे टू व्हीलर साधारण किती वर्षानी बदलावी.

आपण कश्याला स्वतःहून बदलायची टू-व्हीलर ? टू-व्हीलर स्वतःच सांगते की मला बदला. नाही तर आजूबाजूचे सुचवतात " घ्या आता एक नविन चांगली गाडी" मग बदलायची. ज्योक्स अपार्ट, दुचाकी उत्तम स्थितीतील असेल तर बदलायची गरजच नाही. गाडी ठराविक काळाने बदलणे ही गाडीची झालेली झीज, रफ वापर, सर्व्हिसिंगची/ स्पेअर पार्ट्सची अनुपलब्धता, आपली वैयक्तिक आवड, नविन गाड्यांची क्रेझ, आपली आर्थिक क्षमता या वर अवलंबून असते.

आरटीओ च्या हिशोबाने बघायला गेलोतर पंधरा वर्षांनंतर गाडी सु-स्थितत असेल तर नियमा प्रमाणे पुढील पाच वर्षांसाठी नोंदणी कालावधी वाढवता येतो .

आपली गाडी ऊन, पाऊस या पासून जपली तर जुनी झालेली 'दिसत" नाही. तुमची गाडी चांगली ठेवलेली दिसतेय. अ‍ॅव्हरेज देखील चांगले आहे. स्कुटी-पेप अब भी "इस" जमानेकी गाडी हैं. कश्याला बदलता मग?

महाराष्ट्रात घेतलेली दुचाकी बेंगलोरला न्यायची असेल तर काय काय बघावे लागेल? म्हणजे रोड टॅक्स वगैरे... ???
<<
माझ्या माहितीनुसार खासगी मालकीच्या व वापराच्या सर्व गाड्यांना 'ऑल इंडिया परमिट' असते.
टॅक्स लागणार नाही, फक्त, परिसरातील आजूबाजूच्या नेहेमीच्या सर्व पोलिसांना तुमची दुचाकी व तुम्ही ओळखीचे व लोकल आहात हे समजेपर्यंत सर्व कागदपत्रे सोबत ठेवा. उदा. इन्शुरन्स, पीयुसी इ. प्लस, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
हा नियम सर्व नवख्या ठिकाणी वापरावा. वेगळ्या जिल्ह्याचे पासिंग दिसले की पोलीस जास्त त्रास देतात असा अनुभव आहे.

महाराष्ट्रात घेतलेली दुचाकी बेंगलोरला न्यायची असेल तर काय काय बघावे लागेल? म्हणजे रोड टॅक्स वगैरे... ???
>>>> तिथे आधीची मूळ कागदपत्रे, रिसिट्स, महाराष्ट्राच्या आरटीओ चे एन ओ सी, असे सर्व जवळ बाळगा. टॅक्स लागत नाही. शक्यतो बंगलोरला रजिस्टर करुन तिथलीच नंबरप्लेट बनवा वेळ मिळाल्यावर. माझ्या दुचाकीला पुण्याचा नंबर असून कधी त्रास झाला नाही पोलिसांचा. पण विकताना प्रश्न आला होता.

यामाहा रे आणि रे-झेड एकच आहेत. स्टिकर वर्क बदलले आहे केवळ. 'रे' ची जाहिरात 'फक्त मुलींसाठी' अशी केली होती. ती फसली. आता स्टिकर बदलून 'फक्त मुलांसाठी' झाली आहे ती. Happy
यामहा आहे, इंजिन विश्वासार्ह असणार. पण एकंदर लहानखुरी वाटते ती मला. तुम्हाला लुक्स आवडत असतील तर घ्या.

रोड टॅक्स हा राज्यानुसार बदलतो, त्यामुळे बेंगलोरला परत रोड टॅक्स भरावा लागेल.

आणि तुम्ही गाडी MH रजिस्टर्डच ठेवणार असाल तर कर्नाटक RTO ने एक नियम पास केलाय ज्यानुसार बिगर कर्नाटकी वाहनांना एक महिन्याहून आधिक कर्नाटकात राहता येणार नाही (ते एक महिना कसं चेक करणार ते त्यांनाच ठाऊक). पण हे फक्त कार साठी असावं

कर्नाटकात येणार्‍या वाहनांच्या नोंदणीसाठी
कर्नाटका RTO च्या वेबसाइट वर ही माहिती मिळाली.

वेगो, वेगो, वेगो, वेगो. - ७० च्या स्पीडलासुद्धा काय स्टेडी जाते. सही आहे गाडी, फक्त माझ्यासारख्यांना थोडी उंच पडते ट्रॅफिकमध्ये. .
मला आईसाठी टू व्हिलर घ्यायची आहे. माझ्या मुलाला क्लास मध्ये ने आण करणे, भाजी आणणे इत्यादे कामासाठी ३ किमी परिघात वापरली जाईल. दिवसाचे रनिंग १० किमी जास्तीत जास्त. (बजाजची सनी अव्हेलेबल असती तर तीच घेतली असती. )

कोणती स्कूटर सुटेबल होईल. आईसुद्धा फार उंच नाही. इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल काय मत आहे.

TVS Jupiter / TVS Wego / Honda Activa

या तिघांपैकी कोणती गाडी घ्यावी. कल जास्त ज्युपिटरकडे झुकतो आहे त्यानंतर होंडा अ‍ॅक्टिवा...
TVS Jupiter बददल काय मत आहे. सध्या कोणी वापरत आहे का?

TVS Jupiter / TVS Wego / Honda Activa

या तिघांपैकी कोणती गाडी घ्यावी. कल जास्त ज्युपिटरकडे झुकतो आहे त्यानंतर होंडा अ‍ॅक्टिवा...
TVS Jupiter बददल काय मत आहे. सध्या कोणी वापरत आहे का? >>>>>> मला पण अगदी हाच प्रश्न विचारायचाय...

TVS Jupiter च घ्या तुम्हि
कारण सद्याच्या Honda Activa ह्या जुन्या Honda Activa पेक्शा अत्यंत सुमार दर्जाच्या आहेत(स्वानुभव)

वेगो मस्त आहे. प्रश्नच नाही. ७० स्पीडला सुद्धा हादरे देत नाही मस्त स्मूथ जाते. i love wego

ज्युपिटर कशी आहे चेक करा. मस्तच असणार. (टीव्हीएस ची स्कूटी सुधा मस्त अहे म्हणून अंदाज)

माझं ज्युपिटर, वीगो आणि रे झी मध्ये तळ्यात-मळ्यात चालू होतं.

रे झी: स्टोरेज स्पेस मध्ये मध्ये हाफ-हेल्मेटच मावतं, फुल नाही मावत. म्हणून कटाप! आणि एवढा रीविव्ह सुद्धा कुठुन मिळाला नाही.

विगो आणि ज्युपिटरः दोन्ही गाड्या स्पेक्स वाईज सारख्याच आहेत. आणि किमतीचा फरकही १००० रू. चाच आहे. वीगो स्लीक आहे आणि ज्युपिटर ब्रॉड आहे. लूक्स चा फरक सोडला तर मशीन सेम आहे.

मी या तीन ऑप्शन्समधुन काल ज्युपिटर बूक केली आहे.
टीवीएस निवडायची २ महत्वाची कारणे:
१) स्टँड वर गाडी टाकणे सोप्पे आहे खूपच
२) बॉडी बॅलन्स टेक

ज्युपिटर (वीगो ऐवजी) निवडली कारण वीगो ला पुढे स्पेस कमी वाटली. उन्च व्यक्तिना जास्त अन्तरासाठी कितपत सोईस्कर वाटेल माहित नाही. वापरणारे सांगू शकतील. मला ज्युपिटर कंफर्टेबल वाटली. ज्युपिटरला समोर हुक्सही आहेत सामान अडकवायला. वापरायच्या दॄष्टीने मला ज्युपिटर जास्त सोयीची वाटली. आता वापरल्यावर कळेल.

Pages