टू व्हीलर कोणती घ्यावी?

Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54

मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्युपिटर 125 देखील चांगला पर्याय आहे.
पेट्रोल टॅंक पुढे घेतलाय की काय देव जाणे पण मोठी स्पेस मिळते सिट खाली.2 हेल्मेट आरामात बसतात.
सस्पेशन ऍक्टिवा चे आधी हार्ड होते, tvs चे चांगले वाटते , वैयक्तिक मत. नवीन ऍक्टिव्हा मध्ये कसे आहे त्याचा अनुभव नाही.

TVS ची N torque देखील चांगली आहे.
डॅशिंग लूक गाडी.

बायकोने टिव्हीस स्कूटी, पेप, हिरो प्लेजर अशा बर्याच गाड्या बदलल्या. आता अ‍ॅक्टिवा खूप वर्षे वापरतेय.
अ‍ॅक्टिव्हा मस्तच आहे.
पण पुतणीकडे यामा ची फाशिनो आहे. ती चालवल्यापासून प्रेमातच. बसल्यावर हँडल आणी हेडलाईटमुळे पूर्वीच्या बजाज चेतकचा फिल येतो. बॅलन्सिंग परफेक्ट असल्याने महिलांसाठी एकदम छान आहे. तिचं फायरिंग लता मंगेशकर च्या आवाजासारखं आहे. Lol
आता हायब्रीड आल्याने मुलीला द्यायला छान आहे.
एक तर वेळेत पेट्रोल भरण्याची सवय नसल्याने ढकलायची पाळी येते ते होणार नाही. इलेक्ट्रिक मोडवर साठ किमी जाते शिवाय रनिंग मधे बॅटरी चार्ज होत राहते. त्यामुळं बॅटरी चार्जिंगचं काम जे मुलीकडून कधीच होत नाही त्याचीही गरज नाही. गेल्या महिन्यात हायब्रीड स्कूटर नेहमीच्याच किंमतीत देत होते. आता पहायला पाहीजे.

ओके.. ज्युपिटर, activa आणि फाशिनो बघते. धन्यवाद लोकहो! पुण्यात आमच्याकडे हिरोची प्लेझर आहे जुनी. तीही चांगली आहे. अलीकडे कुणी घेतली आहे का?

Fascino साठी अनुमोदन, दिसायला सुंदर, फीचर चांगले, हायब्रीड असल्याने फ्युएल इकॉनॉमी बढिया. यांचीच स्पोर्ट लूक मध्ये RayZ गाडी आहे. सेम इंजिन, लूक वेगळा. टीव्हीएसने jupiterचे हायब्रीड व्हर्जन काढले आहे, त्या बद्दल सुद्धा एकदा चौकशी करा.

ओके.. ज्युपिटर, activa आणि फाशिनो बघते~~~ लूक, स्पेस, एव्हरेज, सस्पेंशन सर्व एकत्रीत सुझुकी बर्गमन मध्ये आहेत वरील एकही गाडी जवळपास नाही

हायब्रीड बद्दल मला जी माहिती सहकार्‍यांकडून मिळाली ती चुकीची आहे किंवा माझे आकलन चुकीचे झाले.
इथे लिहील्यावर मी नेटवर पाहिले. हायब्रीड कारप्रमाणेच आहे. इंजिनचा परफॉर्मन्स सुधारतो. बहुधा पेट्रोल संपल्यावर फक्त पेट्रोल पंपापर्यंत जाईल इतकीच इलेक्ट्रीक मोड मधे स्वतंत्र चालते.
चुकीची माहिती दिल्याबद्दल क्षमा असावी. मी स्वत: अद्याप हायब्रीड स्कूटर पाहिलेली नाही.
वर ए आय यांनी म्हटल्याप्रमाणे फ्युएल इकॉनॉमी सुधारते.

इलेक्ट्रिक स्कूटर विकून टाकणारे.
Submitted by रघू आचार्य on 26 October, 2024 - 19:20

With registation वाली आहे की without registration वाली???

सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ ची नवीन हायब्रीड स्कूटर सुद्धा चांगली वाटली.
अ‍ॅक्टिव्हा ची हायब्रीड इतक्यात लाँच झाली आहे.
स्कूटर मधे पहिल्या तीन लोकप्रियतेप्रमाणे अशा आहेत.

१. अ‍ॅक्टिव्हा
२. ज्युपिटर
३. अ‍ॅक्सेस

या तीनही स्कूटर्स लेडीज साठी चांगल्या वाटतात. पुरूषांना सुद्धा सोयीच्या आहेत. फॅमिली स्कूटर म्हणता येईल. यामाह ची रेक्स कि काय ती कॉलेजच्या मुलांसाठी ठीक आहे. स्कूटर वाटत नाही. तशाच प्रकारची सुझुकी आणि टिव्हीएस ची पण मोटोस्कुटी आहे. ज्यांना ते डिझाईन आवडलं ते घेऊ शकतात. त्यात स्कूटरचा फील नाही येत.

सुझुकी अ‍ॅक्सेसला वाढता प्रतिसाद आहे. यामाह ही कंपनी खराब मार्केटिंग साठी कुप्रसिद्ध आहे. तसेच अनाकलनीय निर्णय घेण्यातही. चांगली चाललेली यामाह आर एक्स १०० आणि यामाह एंटायसर या मोटरसायकली अचानक बंद केल्या. फोर स्ट्रोक मधे सुद्धा यामाह आर एक्स घ्यायला लोक तयार असताना. अचानक मॉडेल बंद केल्यास पुढे स्पेअर्स मिळायला त्रास होऊ शकतो.

कदाचित मी सुझुकी १२५ हायब्रीड / पेट्रोल यापैकी एक घेईन. ब्ल्युटूथ वगैरेची मला गरज वाटत नाही. मुलीलाही नाही वाटत. चार्जिंग वगैरे फीचर्स अनावश्यक आहेत. युटिलिटी बॉक्स आवडले. सुझुकीला पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडायला सीट उघडावं लागत नाही. यामाह ने सीटखाली झाकण दिलं आहे. दोन्हीचे फायदे तोटे आहेत.

अ‍ॅक्टिव्हा दोन्ही पेक्षा थोड्डीशी उंच आहे. मुलीला त्यामुळेइ फाशिनो (इथे फसिनो म्हणतात) घ्यायचा विचार होता. या धाग्यामुळे बरं झालं. वेगळे ब्रॅण्डस सुद्धा विचारात घेतले गेले.

बाईकवाले नावाच्या साईटवरचे ज्युपिटर आणि फसिनोचे रिव्ह्यू करणारे व्हिडिओज बघितले. ज्युपिटर चांगली वाटली जास्त. अर्थात चालवून बघणार दोन तीन गाड्या आणि मग ठरवणार. डिकी बरीच मोठी आहे आणि पेट्रोल भरण्यासाठी सीटवरून उतरावं लागत नाही हे दोन मुख्य फायदे जाणवले. मायलेज वगैरे मुद्दे माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाहीत. कारण तेच, रोजचं रनिंग कमी आणि त्यातही निम्मा वेळ गिअरची गाडी असेल तर सेकंड गिअरच्या पुढचा गिअर टाकायची वेळ येत नाही अशा सावकाश चालणाऱ्या ट्रॅफिकमधे जातो.

मी मागच्या शनिवारी ज्युपिटर १२५ घेतली. दुसरी कुठलीच गाडी जाऊन बघितली नाही. ही बघितली, आवडली, चालवून बघितली आणि घेतली! सीटखाली भरपूर जागा आहे आणि पेट्रोल भरण्यासाठीचं इनलेट समोर आहे (गाडीवरून उतरावं लागत नाही पेट्रोल भरताना) या दोन गोष्टी माझ्या मनात भरल्या Happy आठवडाभर चालवली आहे. छान वाटते आहे.
इथे सल्ला देणाऱ्या सर्वांचे आभार.

अभिनंदन वावे
चांगला निर्णय
हल्ली दुचाकी कैच्या कै महाग झाल्यात

Pages