क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहितचा फॉर्म गांडलाय म्हणूनच त्याला सांगितलं जातंय की त्याने डोमेस्टिक मध्ये खेळायला पाहिजे. खर तर त्याला कोणी हे खरंच सांगितलं म्हणून तो खेळतोय का स्वतः निर्णय घेऊन खेळायला गेलाय हे नाही माहिती. पण जर मुंबईच्या टीम कॅप्टन ला वाटले की रोहित मुळे टीम weak झालीय तर खुशाल त्याला बसवावे. रोहित टीम मध्ये पाहिजेच हा हट्टहास त्याच्या फॅन्स साठीस योग्य आहे टीम साठी नाही. त्याचे फॅन्स पांड्याने त्याला boundri वर फिल्डींग साठी पाठवलयावराही भडकले होते. आयुष म्हात्रे ला वाईट वाटतंय का नाही हा प्रश्नच नाही.

शर्माजी का बेटा नेट प्रॅक्टिस करताना बघण्यासाठी तिकिटं लावायची. त्याला संघात कशाला खेळवायला हवं. हाकानाका.
त्याने आणि पँटने दुसर्‍या डाव्यात कामगिरी सुधारली बरं का.

जर मुंबईच्या टीम कॅप्टन ला वाटले की रोहित मुळे टीम weak झालीय तर खुशाल त्याला बसवावे.
>>>>
आणि जर रोहीतलाच कर्णधार म्हणून खेळवले तर?

पंत कशाला चिडेल? तो थोडीच मायबोलीवर आहे. हे तूला चिडवायला आहे. रुणम्याने शांत राहून एव्हड्या कमेंट्स झेलल्यात ते कौतुकास्पद आहे. आपण #statstrongrunmesh हा ट्रेंड सुरू करायला पाहिजे.

तर अशा रीतीने शर्माजी के बेटा आणि पँट यांचे अनुक्रमे मुंबई आणि दिल्ली हे संघ रणजी सामन्यात पराभूत झाले आहेत. मुंबईचा पुढचा सामना मेघालयाशी आहे. दुसर्‍या डावात शर्माजी के बेटेने कर्णधार राहणेपेक्षा जास्त धावा केल्याने पुढच्या सामन्यासाठी त्याला कर्णधार करावा. या सामन्यात सर्वाधिक ३ षटकार मारणार्‍या दोन खेळाडूंपैकी एक शर्माजी के बेटा आहे. केला की नाही काही ना काही रेकॉर्ड?

म्हणजे बघा हं, रोहीत आणि कोहलीला सांगायचे की डोमेस्टिक खेळा आणि फॉर्म परत मिळावा.. आणि खेळायला गेले की म्हणायचे बाबा तुझा फॉर्म नाही तर तुला आम्ही रणजी संघात घेऊ शकत नाही >> अस बघा कि जैस्वाल डाऊन अंडर फेल गेला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरताना त्यानेही रणजी खेळणे जरुरीच आहे अशी दिक्कत लागू करून रोहित नि जैस्वाल ह्या दोघांनाही अट्टाहासाने संघात घेऊन सेट झालेल्या लाईन अप चा बॅलॅन्स घालवण्यापेक्षा रोहित नि म्हात्रे असे काँबिनेशन ठेवून नवोदित खेळाडूलाही शिकवता आले असते असा कॉमन सेन्सचा अ‍ॅप्रोच घेता आला असता का ?

म्हणायचे बाबा तुझा फॉर्म नाही तर तुला आम्ही रणजी संघात घेऊ शकत नाही >> हेच तू पृथ्वी शॉला समजावू शकशील का ? प्रश्न फॉर्म मिळवण्यापेक्षाही जागा गृहित ठेवली जाण्याबाबत आहे. ( शब्दप्रयोग नीट वाच - धरली नसून ठेवली वापरला असेल. फरक कळत असेल अशी अंधूकशी आशा धरतो) " आता दोन इनिंगमधे फेल गेल्यावर रोहित च्या जागी त्याला आणायचे का ? तू काय करशील एक निपक्षपाती सिलेक्टर म्हणून ?" ह्याचे उत्तर टाळलेस हे लक्षात आले Happy

असामी प्लीज नोट करा हे >> सॉरी मला संबंध कळला नाही. मी इथला मॉडरेटर नाही (असतो तर इथले काही आयडी आधीच बंद झाले असते) किंवा पंतचा सेल्फ-प्रोक्लेम्ड डाय हार्ड फॅनही नाही. (मला दर पोस्ट मधे हे नमूद करून सेल्फ व्हॅलिडेशनची गरज भासत नाहिये)

नवोदित खेळाडूला छान कामगिरी होत असतानाही जर बाहेर बसवलं, तर त्याची कारणं काय आहेत हे त्याने समजून घेणं हा शिक्षणाचाच भाग आहे >> भाऊ हे असे शिक्क्षण दुर्दैवाचे आहे असे वाटते . वरशिपचीच मूळे अशानेच रुजवली जातात.

*शर्माजी का बेटा * -
आधी ' आमचा मुंबईकर पठ्या ', आता अचानक झाला
' शर्माजीका बेटा ' !!!
'
पण तुम्हाला रिटायरमेंटच्या आधीच नोकरीवरून काढतील हे कशावरून ? केवळ, हल्ली ऑफिसात तुम्हाला सरळ ' सुरेश ' न म्हणता, ' सुर्वेजीका बेटा ' म्हणतात म्हणून !!!! 20190305_102939.jpg

रोहित नि जैस्वाल ह्या दोघांनाही अट्टाहासाने संघात घेऊन
>>>>
एक्झॅक्टली डूड..
जयस्वाल का खेळवला हे समजले नाही. त्याने जागा खाल्ली नवोदीताची. त्याला गरज नव्हती खेळायची.

आणि पंत सुद्धा का खेळतोय हे सुद्धा अनाकलनीय.. भारतात कसोटीत तो जबरदस्तच खेळतो. आणि आता तर वन डे आहेत. तसेच तू सातत्याने खेळतोय तर त्याने चॅम्पियन ट्रॉफीसाठी फिट राहायला नको का..

दोन इनिंगमधे फेल गेल्यावर रोहित च्या जागी त्याला आणायचे का ? तू काय करशील एक निपक्षपाती सिलेक्टर म्हणून ?"
>>>>>

कम ऑन.. हा काय प्रश्न आहे का?
तो जाईल आता इंग्लंड वन डे आणि चॅम्पियन ट्रॉफी खेळायला.. मी सिलेक्टर असतो तर तेच केले असते. त्याला रणजी मधून बसवून इंटरनॅशनल एकदिवसीय खेळायला पाठवले असते Happy

भाऊ Lol
भारी जमले आहे Happy

सॉरी मला संबंध कळला नाही. मी इथला मॉडरेटर नाही
>>>

नोट करा यासाठी म्हटले की मला तुम्ही ऑनलाईन आल्यावर तुम्हाला प्रश्न विचारायचा होता..
की असे एखाद्या खेळाडूचा उल्लेख पंत ऐवजी पँट (लाडाने नाही तर त्याच्यावर टीका करताना) करने हे त्या खेळाडूच्या डिग्निटीला धक्का पोहोचवते का?
तुम्ही त्यावर कारवाई करावे अशी अपेक्षा नाही.
हो किंवा नाही उत्तर पुरेसे.
उत्तर न देण्याचा पर्याय आहे तुमच्याकडे. मला फक्त सेकंड ओपिनियन हवे होते.

त्या खेळाडूच्या डिग्निटीला धक्का पोहोचवते का? >> मुद्दामहून खेळाडूची अवहेलना करण्यासाठी केले तर पोहोचते. इथे खेळआडूपेक्षा त्याचा रोख तुझ्यावर आहे असे मला वाटतेय. परत देवनागरीमधे टाईप करताना विशेषतः त नि ट मधे गडबड ह ओऊ शकते. परत "चुम्मा" असे सेक्शूअल रेफरन्स वापरल्यानेही मला धक्का बसतो. त्याबद्दल काही करण्याचा पर्याय आहे का ? कसलेही काडिचेही पुरावे नसताना फक्त फुकट लिहायला मिळते म्हणून आयपीलच्या मॅचेस फिक्स्ड असतात असे वारंवार बरळले जाते. त्याबद्दल काही करण्याचा पर्याय आहे का ? गुणी खेळाडू ब्रँड व्हॅल्यूवर सिलेक्ट केले जातात अशी मुक्ताफळे उधळली जातात त्याबद्दल काही करण्याचा पर्याय आहे का ? एव्हढे प्रश्न विचारून वेताळ परत झाडाला जाऊन लटकला.

*Most runs by Indians in 4 consecutive T20I innings*

318 - TILAK VARMA
258 - Virat Kohli
257 - Sanju Samson
253 - Rohit Sharma
252 - Shikhar Dhawan

_And Tilak remained not-out in each of them

_Tilak now has most runs by an Indian in 2, 3, 4, 5 and 6 consecutive innings

Extra पेस संजूला त्रास देतोय?
आता stats दाखवत होते आणि तसाच तो बाद झाला.
Submitted by ऋन्मेऽऽष on 25 January, 2025 - 21:03
>>>>>>>

आज पुन्हा पेस आणि शॉर्ट बॉल वर लॉक झाला..

घ्या! मुंबईच्या पुढच्या रणजी सामन्यासाठी (गटातला शेवटचा सामना) शर्मा आणि यशस्वी जयस्वाल संघात नाहीत. एका सामन्यासाठी त्यांना घेऊन काय साधलं? - गतविजेत्या मुंबईची बाद फेरीत जायची संधी नसल्यात जमा झाली. आता हे हिरोज एकदिवसीय क्रिकेटची - म्हणजे तिथेही आपल्या संघाला कसं हरवायचं, याची तयारी करणार आहेत.

गंभीरच्या रूपात भारताला भारतीय ग्रेग चॅपेल मिळालेला दिसतो.

घ्या! मुंबईच्या पुढच्या रणजी सामन्यासाठी (गटातला शेवटचा सामना) शर्मा आणि यशस्वी जयस्वाल संघात नाहीत.
>>>>>>>>

अर्थात !
हे तर उघड होते. बेसिक कॉमन सेन्स आहे हा!
त्यादिवशीच आता पुढच्या सामन्यात काय असा प्रश्न असामी यांनी मला विचारला तेव्हाच मी हे म्हटले होते. घ्या पुन्हा कोट करतो -

>>>>>
कम ऑन.. हा काय प्रश्न आहे का?
तो जाईल आता इंग्लंड वन डे आणि चॅम्पियन ट्रॉफी खेळायला.. मी सिलेक्टर असतो तर तेच केले असते. त्याला रणजी मधून बसवून इंटरनॅशनल एकदिवसीय खेळायला पाठवले असते Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 25 January, 2025 - 21:20

आता हे हिरोज एकदिवसीय क्रिकेटची - म्हणजे तिथेही आपल्या संघाला कसं हरवायचं, याची तयारी करणार आहेत
>>>>>

२०-२० वर्ल्डकप आधी देखील आमच्याकडे काही जण असेच बोलत होते.
पण ज्या दिवशी या हिरोज लोकांनी आपल्याला २०-२० विश्वचषक जिंकवून दिला त्या दिवशी आम्ही फटाके फोडले... तर त्या लोकांनी टीव्ही Happy

तिलक वर्मा ३३६ धावांचा विश्वविक्रम करून बाद झाला...
आज कोण जिंकवून देणार?

बाई दवे, हल्ली कुठल्या वर्मा शर्माचे कौतुक करायला भीती वाटते.
उगाच मी कौतुक केले म्हणून कोणाचा नावडता नको व्हायला Happy

फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना संघात जबरदस्ती घुसवून त्या संघाची लय बिघडवणे याला कॉमन सेन्स म्हणतात . बरोबर. Happy

इथे कुणाच काही कराल का. सतत
स्वतःची टिमकी. क्रिकेट बाबत बोला ना.
पण काही म्हणा. नवीन टी20 टीम बाबत अजून भरवसा वाटत नाही.

आता २४ चेंडूत ६४!!
आता तर हर्दिक नि अक्षर दोघेहि गेले.
त्यांच्या शेवटच्या जोडीला २४ धावा देऊन आणखीनच कठिण काम केले. नाहीतर आता ६ चेंडूत ८ अशी वेळ आली असती. मग मजा आली असती. पुनः दुसर्‍या सामन्यासरखा अटीतटीचा झाला असता हा पण सामना.
मला वाटते आपले गोलंदाज नि क्षेत्ररक्षक फार लवकर थकतात, म्हणूनच प्रतिपक्ष्क्षाचे शेवटचे खेळाडू सुद्धा धावा काढून जातात.

भारतीय क्रिकेटला दृष्ट लागली आहे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड दोघांकडून मार खाताहेत.

फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना संघात जबरदस्ती घुसवून
>>>>
कोण फॉर्मात नाहीत त्यांची नावे आणि त्यांच्या शेवटच्या
आठ दहा वन डे सामन्यांची कामगिरी मिळेल का? Happy

आपण सातत्याने २०-२० सामने जिंकत आहोत.
आफ्रिकेला आफ्रिकेत हरवून आलो.
घरात खेळताना सलग दहा सामन्यानंतर आज एक सामना हरलो.
तर लगेच अश्या नकारात्मक पोस्ट का?
उलट संघ नवीन बांधला असताना अशी उत्तम कामगिरी हे कौतुकास्पद आहे

हे तर उघड होते. बेसिक कॉमन सेन्स आहे हा! >> त्याला कॉमन सेन्स म्हणत नाहीत. आधीच्या सामन्यात जबरदस्ती न खेळवणे ह्याला म्हणता आले असते. मूळात पुढची टेस्ट मॅच आहे मे मधे. त्या आधी इंग्लंड विरुद्ध वन डे, मग चँपियन्स ट्रॉफी नि आय पील आहे. तेंव्हा एव्हढे सगळॅ मधे असताना टेस्ट मॅच मधे फेल गेलेल्याला टेस्ट मॅच चे तंत्र गिरवायला सांगाण्यासाठी रणजीमधे खेळायला सांगणे (तेही एकच सामना खेळता येईल स्केड्ञुलमूळे) ह्याला मूर्खपणा म्हणता येईल फार तर.

Pages