क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“त्यांच्यात हाडामासाच्या माणसाला देवत्व बहाल करुन ध्रूवपद देण्याची चढाओढ लागलेली नसते... आज परफॉर्मन्स द्या उद्या साठी स्थान पक्के करा असा सरळ हिशेब.” - हे बरोबर आहे. पण सेलेब्रिटी, हायरार्की, व्हीआयपी भारतीय कल्चर मधेच ही गोष्ट बसत नाही. (हे क्रिकेटपुरतं मर्यादित नाही). म्हणूनच भारतीय क्रिकेटर्स लवकर रिटायर सुद्धा होत नाहीत. असो, तो वेगळा विषय आहे.

सध्यातरी तो त्याच्या नॅचरल खेळाला मुरड घालताना दिसत नाही>>> याबाबतीत एक मनात उमटून गेलेला विचार असा की, पंतचा फक्त नॅचरल खेळच तसा नसून, एकूणच स्वभाव Risk Taker टाईप असावा, आणि तोच ॲटिट्यूड कदाचीत त्याच्या खेळात उतरला असण्याची शक्यता आहे....त्याचा झालेला अपघात आणि त्याच्या वेगवान ड्रायव्हिंग बद्दल इतर काही खेळाडूंनी त्याला दिलेले सल्ले हे आठवून पहा, हे सर्व लक्षात घेता कदाचीत खेळतानाही त्याची संभाव्य धोके अंडर एस्टिमेट करुन आॉल ऑर नथिंग वाली मूळ मानसिकता उचल खात असल्याची शक्यता नाकारता येत नाही... सुंभ जळला तरी पीळ जात नाही!

*त्यांच्यात हाडामासाच्या माणसाला देवत्व बहाल करुन ध्रूवपद देण्याची चढाओढ लागलेली नसते*.- देवत्व तर दूरचीच गोष्ट , क्रिकेटमध्ये माणसाला माणूस म्हणून पण वागवत नाहीत ही ख्याती आहे ऑसीजची !! आपलं खूप कांहीं चुकातही असेल, पण आपण खेळ खिलाडूवृत्तीने खेळतो, प्रतिस्पर्ध्यांचे योग्य तिथे कौतुक करतो , ही अभिमानास्पद बाब आहे व ऑसीजनी आधी ती आपल्याकडून शिकावी !

सहमत फेफ.

तो वेगळा विषय आहे.>>> मी ते गावसकर ने पंतच्या गेल्या इनिंग बद्दल जो आडवा हात मारला त्याबाबत बोललो होतो. ज्याप्रकारे गावसकर पंतच्या कामगिरीबद्दल बोलला त्याच प्रकारे तो विराटच्या वर्तमान कामगिरी बद्दल बोलण्याचे धारीष्ट्य करेल का? आणि केले तर ज्या लाखो करोडो चाहत्यांनी विराटला देव बनवून पुजले आहे ते त्याच्या गतकामगिरीचा हवाला देऊन गावसकरला काय काय सुनावतील याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यांच्यात हाडामासाच्या माणसाला देवत्व बहाल करुन ध्रूवपद देण्याची चढाओढ लागलेली नसते*.- देवत्व तर दूरचीच गोष्ट , क्रिकेटमध्ये माणसाला माणूस म्हणून पण वागवत नाहीत ही ख्याती आहे ऑसीजची>>>> ते मी त्यांच्याकडे संघनिवडीबाबत असलेल्या धोरणासंदर्भात बोललेलो ( जो विषय आधीच चालू होता त्या संदर्भाला धरुन ), तेव्हा आपण गोलपोस्ट बदलत रहाण्याऐवजी संघातील खेळाडूंची वर्तमानातील कामगिरी आणि त्याअन्वये संघहीताला प्राधान्यक्रम देऊन केलेली संघनिवड या विषयावर आणि त्याच्या अवतीभोवतीच बोलूयात का??

स्वतःच्या खेळाला कुठे व कधी मुरड घालायची हे उमजून तसा खेळ करणं ही एक त्या मार्गातली महत्त्वाची सुधारणा आहे, असं माझं मत. >> अगदी बरोबर भाऊ. नि ह्याच कारणासाठी गंभीरच्या हॉनेस्ट टॉकबद्दल कुतूहल होते नि आक्षेपही होता. सर्व प्रथम पंतचे मागच्या मॅचेस्मधले दोन्ही शॉट्स हे मॅच सिच्युएशनला बघता योग्य नव्हते ह्याबद्दल कोणाचेच दुमत नसावे. पहिल्या इनिंगमधे आधीच्या बॉल वर तोच शॉट जमला नव्हता नि दुसर्‍या इनिंगमधे पर ओव्हर सहाची गरज असताना, दोन फिल्ड्र्स पोस्ट केलेले असताना तो शॉट खेळणे जरुरी होते असे बाहेरून तरी वाटत नाही. पण त्याच्या परीपाक म्हणून झालेली ओरड नि गंभीरने दिलेले हॉनेस्ट टॉक ह्याचा परीणाम पंतच्या बॅटींङ वर पहिल्या इनिंगमधे सहज दिसत होता. एव्हढा अल्ट्रा डीफेन्सीव्ह द्रविड सुद्धा नसावा. साधे सरळ बॉल्स सुद्धा नुसते तटवले जात होते. परत इथे मॅच सिच्यूएशनचा भाग येतो. बॉलिंग ला धार्जिणॅ पिच नि अतिशय कमाल डीसिप्लिड बॉलिंग (बॉलिंङ क्वालिटी मी विचारातही घेत नाहिये) हे बघता पिचवर नुसते उभे राहणे म्हणजे कुठल्या तरी बॉल वर विकेट जाण्याची शक्यता वाढवणे आहे हे उघड दिसत होते. माझे पोस्ट ह्या प्रकारामूळे आले होते.

आपलं खूप कांहीं चुकातही असेल, पण आपण खेळ खिलाडूवृत्तीने खेळतो, प्रतिस्पर्ध्यांचे योग्य तिथे कौतुक करतो , ही अभिमानास्पद बाब आहे व ऑसीजनी आधी ती आपल्याकडून शिकावी ! >> हे पोस्ट मी दोनदा वाचले. ऑसीजहे करत नाहीत असे खरच वाटते का भाऊ ? ते खडूसपणे वागतात , रूल्स स्ट्रेच करतात हे मान्य आहे पण प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक न करण्याबाबत ठपका ठेवणॅ धाडसाचे वाटते.

स्मिथ गेला.. ५८-३
कृष्णा ३ विकेट...
बूम बूम हवा होता यार.. गेम असता आता

104-4
विकेट जात आहेत पण पुरेश्या नाही..
चटका लावणारा पराभव होईल..
: आपल्या शेवटच्या ६ विकेट ३३ धावात गेल्या.
खावजा गिऱ्हाईक होता बूम चा .. तो ही आता उशीरा गेला
दोघेच टाकत आहेत.. थकले आता

अत्यावश्यक असलेल्या बुमराहची अनुपस्थिती निर्णायक ठरणार ? भारताच्या संघात चांगला, प्रभावी स्पिनर नसणे ही आणखी एक शोकांतिका !!

निकाल.. 3-1
मालिकावीर बुमराहलाच देतील.
ही त्याची मालिका आहे.

कारणं कांहीही असोत, पण ऑसीज या दौऱ्यात निर्विवाद आपल्यापेक्षा सरस होते व ठरले हे सत्य आहे ! त्यांचं अभिनंदन !!!!

आजोबा, तुम्ही टिव्हीवर मॅच बघणार आहात की धार्मिक चॅनेल लावू, असं आजी विचारतेय !!
adoctor.JPG

<<<इतर ८ ( बुम्हरा आणि जयस्वाल वगळून) खेळाडूंना संघाच्या बाहेरचा रस्ता दाखविण्याच्या मागणीबद्दल ही आपण तितकेच आक्रमकपणे, वारंवार, आणि अधिक प्राधान्याने बोलले पाहिजे असे माझे मत आहे,>>>
अनुमोदन. पण पंतला पण ठेवा.
आहेत आपल्याकडे अनेSक खेळाडू - सूर्यकुमार यादव, विहारी, अक्षर पटेल, पंड्या, सॅमसन. कुलदीप यादव, नि आणखी अनेक.

कारणं कांहीही असोत, पण ऑसीज या दौऱ्यात निर्विवाद आपल्यापेक्षा सरस होते व ठरले हे सत्य आहे >> +१. दोन्हीकडची बॅटींग युनिट्स अडखळली आहेत पण ते कमी अडखळले नि मोक्याच्या वेळी कोणी तरी खेळी केली आहे. बॉलिंग मधे आपण बुमराच्या जीवावर त्यांना तोडीस तोड ठरत होतो. (ते अधिक उजवे होते असेही म्हणू शकतो).

*मोक्याच्या वेळी कोणी तरी खेळी केली * - चांगल्या फिरकी गोलंदाजाचा ( शक्यतो लेग स्पीनरचा ) अभाव हे त्यामागे प्रमुख कारण असावे. त्यामुळे, आपल्या गोलंदाजीतलं वैविध्य कमी झालं व आपली खासियत असलेलं प्रभावी अस्त्र कमी पडलं. विशेषत: ऑसीज फलंदाजीच शेपूट गुंडाळायलाही चांगला लेगस्पिनर खूप उपयुक्त ठरेल असता, असं वाटतं .
( गावसकर मैदानात हजर असूनही, दौऱ्यात वर्तमानपत्रातून सतत गाजत असूनही, त्याला त्याच्या नावाच्या ट्रॉफी प्रदान समारंभाला न बोलावणं , हा ऑसीजच्या क्रीडासंस्कृतीचा आणखी एक मासला ! )

गावसकर मैदानात हजर असूनही, दौऱ्यात वर्तमानपत्रातून सतत गाजत असूनही, त्याला त्याच्या नावाच्या ट्रॉफी प्रदान समारंभाला न बोलावणं , हा ऑसीजच्या क्रीडासंस्कृतीचा आणखी एक मासला !
>>
माझ्यामते जर आपण ट्रॉफी जिंकली / रीटेन केली तर गावस्कर कडून मिळते अन् जर त्यांनी जिंकली / रिटेन केली तर बॉर्डर कडून

माझ्यामते जर आपण ट्रॉफी जिंकली / रीटेन केली तर गावस्कर कडून मिळते अन् जर त्यांनी जिंकली / रिटेन केली तर बॉर्डर कडून>>> असं काही फिक्स नाही आहे, होस्ट नेशन चे क्रिकेट बोर्ड याचा निर्णय घेते. ॲव्हेलिबलीटी नुसार गावसकर, बॉर्डर यांपैकी एका कडून किंवा दोघांकडून ही दिली जाते, किवा कोणत्यातरी त्रयस्थ डिग्निटरी कडून देखील दिली जाते.

माझ्या मते जर गावसकर तिथे ॲव्हेलेबल होता तर त्याला ट्रॉफी प्रेझेन्टेशनला बोलवायला हवे होते....आता याबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आधीच कोणता तसा निर्णय घेऊन ठेवला होता अथवा गावसकर मॅच ॲनलिस्ट्सच्या चमूत असल्याने तसा काही निर्णय झाला हे आजूनही गुलदस्त्यात आहे.

* जर आपण ट्रॉफी जिंकली / रीटेन केली तर गावस्कर कडून मिळते अन् जर त्यांनी जिंकली / रिटेन केली तर बॉर्डर कडून* - माझ्या माहितीनुसार, तें गावसकरला माहित होतं व सांगण्यातही आलं होतं. पण तो मैदानात हजर आहे हे माहीत असूनही त्याच्या नांवाचीही असलेली ट्रॉफी प्रदान समारंभालाच त्याला न बोलावणं हे विचित्र आहे. ( ह्याला गावसकरने perplexing हा शब्द वापरला आहे)

चांगल्या फिरकी गोलंदाजाचा ( शक्यतो लेग स्पीनरचा ) अभाव हे त्यामागे प्रमुख कारण असावे. >> स्पिनरचा अभाव होता हे मान्य. पण वैविध्य वगळता अजून काही उपयोग झाला असता का खरच हे एकंदर पिचेस नि लॉयनचे फिगर्स बघून हे ठामपणे सांगणे मला अशक्य वाटतेय. तसही चहल, चहर नि बिष्नोई ह्यांच्याकडे बघून टेस्ट साठी ते चालले असते का हाही खरच प्रश्न आहे.

टी २० वर्ल्ड कप मधे चालले म्हणून बिट्स अँड पीसेस ऑल राऊंडरचा प्रयोग आता थांबेल अशी आशा धरूया. (बिट्स अँड पीसेस हे जाडेजा टाईप उल्लेख नसून बॅटींग बॉलिंग स्किल्सेट मधे कमाल तफावत असण्याबद्दल आहे. )

"टी २० वर्ल्ड कप मधे चालले म्हणून बिट्स अँड पीसेस ऑल राऊंडरचा प्रयोग आता थांबेल अशी आशा धरूया. " - मुळात टेस्ट-११ मधे एखाद्या खर्या-खुर्या ऑल-राऊंडरला स्थान आहे असं मला वाटतं. (बाकी बॅट्समन ज्याला कधीतरी बॉलिंग करता येईल, किंवा बॉलर जो वेळ आली तर उभा राहू शकेल अश्या प्लेयर्स ना मी ह्यात धरत नाही). बाकी टेस्ट क्रिकेट हा स्पेशलिस्ट प्लेयर्सचा खेळ आहे. एखाद्या मॅचमधे दिल्लीच्या पीचवर नयन मोंगिया ओपनर म्हणून चालून गेला, म्हणून त्याला पुढच्या मॅचला लॉर्ड्सवर ओपनर म्हणून खेळवण्यात अर्थ नाही. (ही खरी उदाहरणं आहेत).

ऑस्ट्रेलियात स्पिनरने फरक पडला असता कि नाही माहित नाही, कारण मुख्य अपयश बॅटिंगचं आहे.

क्रिकेट ८ च्या धाग्यावरील
<<<. असलाच तर मुख्य दोष मर्यादित षटकांच्या सामन्यांमुळे संयमी व दीर्घ खेळी खेळण्याच्या मानसिकतेचा अभाव, हाच असावा. ( अर्थात, ह्या दौऱ्यातलं ऑसीजच्या सातत्यपूर्ण नेमक्या, अचूक गोलंदाजीचं श्रेयही कमी लेखत नाही )>>

ला १०० टक्के अनुमोदन.

*चहल, चहर नि बिष्नोई ह्यांच्याकडे बघून टेस्ट साठी ते चालले असते का हाही खरच प्रश्न आहे.* - मला वाटतं , ऑसीज फलंदाजीच्या शेपटासाठी त्यांचा नक्कीच उपयोग झाला असता. शिवाय, आपल्याकडे आता अतिशय प्रभावी स्पिनर्सचाच अभाव आहे, हा मुद्दा आहेच. खेळामध्ये प्रयोग करताना आपलं पारंपरिक कसबही जपणं हे फायदेशीरच ठरतं असं माझं मत . ( हॉकीतही आपण 'शॉर्ट पासिंग ' ची कास सोडली व तिथेच आपल्या यशाला उतरती कळा लागली )

AB de Villiers did not play his "natural game" when the situation demanded him to play otherwise

That draw in Adelaide enabled SA to win the series in Perth in 2012

The destructor turned into protector mode making 33 off 220 balls at a SR of just 15 without hitting a single boundary!!

His effort along, with Du Plessis's epic 4th innings 100 and an injured Kallis's gritty resistance, saved the match for South Africa who were once put down at 45/4 and still had to bat 120 overs to salvage the match

That is what test cricket is about
That is what great batsmen do

Every other justification is a lame excuse

हे जेव्हा असे खेळत होते तेव्हा ते शेल मध्ये न जाता कसे खेळत होते हे चेक करायला हवे. बॉडी लँग्वेज चा फरक..

Pages