जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदित्य नगरकर हॉस्पिटलमधून गायब होतो त्याच्या दुसर्‍या दिवशी आदित्य देसाई त्याला शोधत फिरत असतो. त्यामुळे घरी यायला उशीर होतो. तो अपसेट आहे म्हणून मेघना त्याच्या आवडीचा कढी खिचडी कसली तरी कोशिंबीर आणि तळलेल्या मिरच्या असा बेत करते असं माईंना सांगून कौतुक मिळवते. पण रात्री खूप उशिरा आदित्य परत आल्यावर खोलीत त्याच्यासाठी ताट घेऊन जाते, त्यात पांढर्‍या भाताची मूद आणि वाटीत वरण दिसलं.

शॉटच्या सुरुवातीला मेघना कामात दाखवायची तर कायम तिच्या कपाटात काही तरी ठेवत / काढत असते.

एरवी ज्ञानामृत स्त्री पुरुष समानते च्या बाता, घरातल्या स्त्रियांचा आदर इ. प्रवचन देणार्‍या नानांनी रिडेव्हलपच्या निर्णयात बायको , सुना, लेक यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. बायकोला तर पाय बुलडोझर खाली घातलं. मग इमोशनल ड्रामा. हा भाग जरा खोटा खोटा वाटला.

बाकी आता बघताना लक्षात येतं की ही मालिका छुप्या फॅमिली कौन्सिलरच्या भूमिकेतून लिहिली. कुटुंबात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पडणारे काही ना काही प्रश्न आणि त्यावरचे उपाय कसे शोधायचे याची प्रॅक्टिकल्स दाखवली आहेत.

चित्राला आदित्यबद्दल प्रेम वाटू लागतं या ट्रॅकच्या एपिसोड्समध्ये ललित प्रभाकरचा अभिनय गंडलाय का? की तो गोंधळलाय म्हणून तसा अभिनय केलाय?

संपवली ही मालिका. शेवटी शेवटी कंटाळा आला.
आदित्यच्या केस सावरण्याचा जास्त कंटाळा आला. अदित्यने रस्त्यावरच्या मुलाला घरी आणलं ते भाग पळवत पाहिले.
कलाकारांच्या तारखा मिळणं कठीण झालं म्हणून मालिका गुंडाळली की काय असं वाटलं. मोरांब्याच्या बरणीचे सांधे धरले म्हणून म्हणे ती झोपून असायची. उठता बसताना कण्हायची, पण बिछान्यात मांडी घालून बसायची.
आदित्य अचानक नेसत्या वस्त्रावर मॉरिशसला गेला. सासू आजारी, घरात तिच्याकडे बघायला कोणी नाही आणि विजया वैष्णवदेवीला गेली.
मेघना, अमित आणि सतीश यांनाच काय ते कधी गायब केलं नाही.

इथे कोणी बिझिनेसमन नव्हतं तरी प्रोफेशनल लाइफबद्दल माती खायची झीची परंपरा टिकली.
पोरगेलासा आदित्य रिजनल हेड झाला. पण काम तेच करायचा. जीन्सवर ऑफिसला जायचा. त्यांच्याकडे हैद्राबादचा आणि बंगलोरचा असे जी एम आहेत आणि ते मुंबई पुण्यातल्या आदित्यला ऑर्डरी सोडतात. तो सी ए आहे. कंपनी काय काम करते ते कळलं नाही. कन्सलटसी असावी असं वाटलं. त्याच्या ट्रान्सफर , रिव्हर्स ट्रान्सफर आणि डेप्युटेशनचा प्रकार तर महान.
मेघनाला ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चररची पोस्ट मिळाली. ज्युनियर कॉलेजेस दुपारची असतात. पण आदित्य ऑफिसात जायच्या आधी तिला सोडायला जायचा. तेही तिचं कॉलेज उलट दिशेला असताना. पुण्याला गेल्यावर प्रॉडक्ट प्लेसमेंटसाठी स्कूटरची आणली. ती मुंबईतच घ्यायची होती. देसाईवाडी, मेघनाची कॉलेजेस, आदित्यचं ऑफिस , कुडाळकरांचं घर, मेघनाच्या मावशीचं घर मुंबईतल्या कोणकोणत्या भागांत आहेत याचा अजिबात पत्ता लागू दिला नाही. पण रिक्षा जायची म्हणजे उपनगरांत. आणि तिथून नाना नेव्हीनगरला गाणी ऐकायला जायचे . यांच्यातल्या कोणालाच कधी ट्रेनने प्रवास करावा लागला नाही.

देसाई मंडळी स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतात . पण घरकाम सगळं बायकांच्या माथ्यावर. पुरुषांनी कधी काही पदार्थ केला की त्याचं महाकौतुक. आदित्य अंघोळ केल्यावर टॉवेल कायम बिछान्यात टाकायचा. ऑफिसला जाताना त्याला पाकिट, इ. हातात दिलं जायचं. पुण्याला गेल्यावर स्वयंपाकघरातला त्यानेच केलेला पसारा आवरायचं टाळून तो चक्क झोपला. ऑफिसला जाताना पाण्याच्या बाटल्या भरणे , पंखे, दिवे , नळ बंद करणे ही त्याची कामं. कदाचित अप्र त्यक्षपणे काही सुचवत असतील तर तेच जाणे, पण ते क्युट आहे असं दाखवायचा प्रयत्न वाटला.
घराच्या रिडेव्हलपमेंटबद्दल नानां फक्त पुरुषांना संबोधून बोलले. बायकोचं मत तर सरळ दुर्लक्षित केलं. पीटीए मीटिंगला अमित, सतीश कधी जात नाहीत. बायको अडली तरच हाय कमांडसारखे मुलांच्या प्रश्नात लक्ष घालतात.

मालिकेने समाज प्रबोधनाचा वसा घेतला होता. पण ते कथानकात सहज गुंफलं आणि वर ज्ञानामृत ज्ञानामृत असं सारखं म्हटल्याने प्रेक्षकांनाही त्याची सवय झाली.
आदित्य, विजया, मेघना यांचे स्वभाव कन्सिस्टंट राहिले. आदित्य त्याला जे बरोबर वाटेल तेच करणार. सगळ्यांना वेळच्या वेळी सांगणार नाही. मग सॉरी सॉरी म्हणणार. मेघना निर्णय घ्यायला वेळ लावणार. त्यासाठी तिला ट्रिगर लागणार. विजया कोणावर तरी रागावून धुमसत बसणार. आणि सगळे तिच्याशी त्यावर बोलायचं टाळणार. देसाईंकडे सगळं स्पष्ट , समोर बोललं जातं हा नियम तिला लागू नाही.

अर्चना मिनी सुपरमार्केट्मध्ये फक्त गल्ल्यावर बसणं एवढंच काम असतं. स्टॉक पाहणं , ग्राहकांना वस्तू शोधून देणं , पॅकिंग इ, कामाला कोणी कामगार ठेवलाय असा उल्लेख नाही. विजयाला मोठ्ठी ऑर्डर मिळते पण ती एकटीच् घरचं सगळं बघत ते पूर्ण करते. तिने कोण्या गरजू मुलीला कामावर ठेवलं आहे, असं दाखवता आलं असतं.

शेवटी मूल दत्तक घेताना एवढा सगळा विचार करायचा असतो, पण स्वतः मुलाला जन्म देताना का ही ही विचार करायची गरज नसते. फार तर कधी , किती एवढंच. लग्न झालं की बाय डिफॉल्ट तुम्ही मुलांना जन्म दिलाच पाहिजे.

तरीही आतापर्यंत पाहिलेल्या मराठी मालिकांत वरचा क्रमांक घेईल. मेघनाच्या पात्राची रडारड थांबल्यावर प्राजक्ताचा अभिनय थोडा सुसह्य झाला. तिच्या पात्राची ग्रोथेही दिसली. तसं आदित्यबाबत वाटलं नाही.

डिटेलवारी post वाचली. पूर्वी ही मालिका tv वर येत असे तेव्हा अधून मधून बघितली जायची. आदित्य छान दिसतो आणि बाबाजी इरिटेट करतात एवढाच बोध. मेघना गुळाची ढेप वाटते. पिटुकली

बघतोय..

Pages