जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघनाला माईंनी दिलेली वैचारिक शिदोरी आहे ती फिदी >>>
मग बरोबर आहे. Proud
त्यांच्यात अगदी आदे आणि मेदे पण बोलू शकतात असे संवाद. Wink

नानामृत देत नाहीत वाटत हल्ली नाना! जबाबदारी माईंवर आलीय का?

कोणामधले आहेत हे संवाद? >> एकूणच सगळेच एकमेकांशी असे बोलत होते .....आदे-नाना , नाना-माई , मेघना-ती पडक्या चेहऱ्याची अंजली ...
अजूनही बरेच काही मोठे मोठे शब्द होते सगळेच आठवत नाहीएय्त आता ....मनातल वादळ ,मंद वाऱ्याची झुळूक,निरभ्र आकाश ,कसला तरी सडा बहुतेक सुखाचाच असेल ....:(

श्रद्धा या सिरियलची भाषा सुरुवातीपासून तशीच आहे. पटत नाही. फारच मोठमोठे अवजड शब्द वापरतात.
बहुतेक अर्चु आणि आदे नाॅर्मल भाषेत बोलतात.

२-३ दिवसांपूर्वी एक सीन अचानक झेन तत्त्वज्ञानावर दाखवला. Uhoh

लेखक/लेखिकेला घराची आवराआवरी करताना पूर्वी कधीतरी विकत घेतलेलं आणि आता धूळ खात पडलेलं झेन तत्त्वज्ञानाचं पुस्तक अचानक सापडलं असावं Proud

rmd > आदेचा विषय आल्यावर माझी बोलती बंद आहे
त्याचं नाव येताच डोळ्यांना बदामी होण्याचा छंद आहे > Lol भारी !

बहुतेक अर्चु आणि आदे नाॅर्मल भाषेत बोलतात >>> अर्चू ,सतीश तेवढे सामान्य माणसांसारखे बोलतात ,वागतात ....बाकी सगळे देसाई असामान्य नाही नाही abnormal वाटतात

Aruna joglekar या याचे सवांद लिहतात अगदी सदाशिव पैठी मराठी उंच माझा झोका मधे पैन ह्याच होत्या तिथे ही तीच जड़ अलंकारिक भाषा

ती विजया फोनवर चॅट करत होती तर किती वेळ मला वाटलं की हातात एखादी पोथी वगैरे आहे की काय .
कसा पकडला होता तो फोन.

आता या सिरीयलमध्ये अजून काय राहिलं आहे?

फा.च. - डन

मेदेने आदे ला सोडून एकटी राहायचा प्रश्न - आदे ने बदली करून घेतली आणि सोडवला....

आता आनंदीआनंद आहे ना ????

हो ना आपल रोजचच आयुष्य फक्त (अतीगोडवा असलेल) टिव्हीवर बघतोय अस वाटत ही मालिका बघताना.. काही ट्वीस्ट नाही आणि बळच आणले तरी चुटकीसरशी सोडवुन मोकळे. बर ट्वीस्ट निर्माण करणारे सुद्धा इतके सरळ की एकदा नानामृत मिळाल की संपल सगळ... का चालु आहे ही शिरेल?

काल की परवा नव्या घरात आदे-मेदे दोघंही चटईवर झोपलेले दाखवले. Uhoh सामानाबरोबर दोन गाद्या नाही आणता आल्या?? आधी मेदेचे आईवडील येणार होते ना तिच्याबरोबर रहायला? मग त्यांनाही चटईवर झोपायला लावणार होते का?
आणि म्हणे अजून दूधवाला-पेपरवाला ठरलेले नाहीत, खाली जाऊन दूध घेऊन ये Uhoh आजकाल एखाद्या प्लॅटमध्ये नवीन सामान येतंय याची नुसती कुणकूण लागली तरी दूधवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला, मोलकरणी, केबलवाला सगळे त्या-च्या-त्या दिवशी येऊन चौकशी करून जातात !!
लेखकाने कधीच शिफ्टिंग केलेलं दिसत नाही.
मेदे तिच्या आई-बाबांच्या सामानाचं पॅकिंग करत होती त्या दृश्यांमधेही भिंतींवरची पोस्टर्स, फ्रेम्स, वॉल-हँगिंग्जच भरताना दाखवली! एक वर्षासाठी तात्पुरतं जायचं तर या वस्तू कुणी घेऊन जातं का? Uhoh

इथे पॅकिंगचे आणि पॅकिंगचे सीन्स कसे लिहावेत याचे धडे मिळतील Proud

मेदे सोबत लगेच बदली करून घेणारा आदे
विजयाचा प्रत्येक बाबतीत सल्ला घेणारा अमित
अर्चू कशीही असली तरी तिच्या कलाने घेणारा सतिश
घरात माईंचा एकछत्री अंमल चालू देणारे नाना
बायकोला मस्त चहा करून देणारे बाबाजी..
अशा प्रकारे नवर्यांनी कसं चांगलं वागावं हे दाखवणारी ही सिरीयल आदर्श मुलगी, बायको,सासवा, सुनांच्या पंगतीत वेगळी ठरते. त्यामुळे ती अखंड चालू राहावी याच गुणविशेषांचं दर्शन घडवत हीच माझी झीचरणी प्रार्थना! Proud
मला आवडतोय सध्याचा बदल. पुण्याला राजाराणीचा संसार, मग समजणार्या जबाबदार्या, इकडे मिनी मार्केटची तयारी, बाबाजींना मिळालेलं आवडीचं काम.. मस्त चालू आहे.

आशूडी, तुझ्या पोस्टला भरघोस अनुमोदन. Happy सिरीअसली! मला तर ही सिरिअल खरोखरच जाम आवडते. कारण ही मालिका अजिबातच डोक्याला कल्हई लावत नाही. नो कॉम्प्लिकेशन्स.

अखंड चालू राहावी >>> Sad

काल 'मिनी मार्केट'बद्दलचे संवाद नुसते ऐकले, पाहिले नाहीत. "असं वाटतंय की आपलं मार्केट खूप चालणार..." हे खूपच बाळबोध आहे...

मला आवडतोय सध्याचा बदल. पुण्याला राजाराणीचा संसार, मग समजणार्या जबाबदार्या, इकडे मिनी मार्केटची तयारी, बाबाजींना मिळालेलं आवडीचं काम.. मस्त चालू आहे. >>> + १००००

आता कळेल की सगळ ईतक गुडीगुडी नसतं Happy

Lol काल महिंद्रा गस्टोची जाहीरात करुन झाली.. मेदेला गाडी येते अस याआधी कुठे दाखवल्याच आठवत नाही... नस्ल दाखवल तर बरच झाल त्या जानुच चारचाकी शिकण्याच प्रकरण अतिरेकी प्रकार होता.. इथे यांना तसेही विषय मिळत नाहीयेत दाखवायला यांनी तर लै एपिसोड्स खाल्ले असते.

हो केवढी ती जाहिरातबाजी ! आता काय दाखवणारेत पुढे? मेदे ची गुड न्यूज? दुकानातले नफे-तोटे, त्याबद्दल होणार्या पार्ट्या, की अजुन काय?

काल आदेला हापिसातुन यायला उशीर झालेला दाखवलाय वर मेदे त्याला गाडी हळु चालव म्हणुन सांगतेय असही दाखवलय.. आता काय याचा अ‍ॅस्कीडेंट आणि स्मृतीभ्रंश ट्रॅक दळणार की कै?

बहुतेक अपघात........ कारण लाईन फीरत होती आदे-मेदे परत येणार का ? - असचं काहीतरी होतं मी नीट वाचलं नाही.

कारण लाईन फीरत होती आदे-मेदे परत येणार का ? >>> अय्यो, खर की काय? मी तर अनेक दिवस स्क्रोलमध्ये आदे-मेदेचा पुण्याच्या घरात गृहप्रवेश हेच वाचत होते.. हे कधीपासुन यायला लागल?

कारण लाईन फीरत होती आदे-मेदे परत येणार का ? - >>>>>परत येणार का म्हणजे देसाईवाडीत धुमाकुळ घालायला परत येणार का असा प्रश्न ते प्रेक्षकाना विचारत असतील. आता याच्यावर कौल घ्या म्हणाव. तिकडे श्रीबाळाने दाढी कमी केली. इकडे सिरीयल चालू झाल्यापासुन अदित्यची खुरट आणी झिपर्‍या जशाच्या तशाच.

Pages