Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
नवीन सिरियल सुरू होईपर्यंत
नवीन सिरियल सुरू होईपर्यंत जमतील तेवढ्या गाठी जुळवणं चालू आहे
पर्व
पर्व
आनचं लग्न झालं का एकदाचं ?
आनचं लग्न झालं का एकदाचं ? आता प्रोमोत दाखवतायत ती नवी मालिका ह्याच्याच जागी का मग?
ही मालिका जवळ जवळ वर्षभर उगीच खेचली !!
कालच्या एपिसोड शेवटची पाच
कालच्या एपिसोड शेवटची पाच मिनिटे पाहिला.
आदुच्या कवितेला आदेने झब्बू दिला आणि मेदेला ऑलमोस्ट टडोपा झालं! अगदी माबोवर आल्यासारखं वाटलं.
ही मालिका संपून ती मांगलेची सुरू होणार का?
टडोपा ??? म्हणजे ?? आदे
टडोपा ??? म्हणजे ??
आदे रॉक्स ! मस्त म्हटली ती कविता
आदुच्या कवितेला आदेने झब्बू
आदुच्या कवितेला आदेने झब्बू दिला आणि मेदेला ऑलमोस्ट टडोपा झालं! >>>> अर्रारा ! संपली का मग आता सिरियल ?
संपली का मग आता सिरियल ? >>>
संपली का मग आता सिरियल ? >>> तेच तर विचारतोय पण कोणी सांगतच नाही.
टडोपा ??? म्हणजे ?? >>>> टचकन डोळ्यात पाणी.
अरेरे! का संपवताय तुम्ही सगळे
अरेरे! का संपवताय तुम्ही सगळे ह्या मालिकेला! आदे, मेदे आणि इतर मालिकेतले इतर सगळे बेरोजगार होतिल ना! किमान त्यांचा तरी विचार करा!
जानू आणि ह्या मालिकेत चढाओढ आहे. कोणती मालिका जास्त ताणली जाते ती. आदे मेदे एकत्र आल्यावर आणि जानूचे लग्न झाल्यावर दोन्ही मालिका संपल्या आहेत. तरीसुध्दा चालू आहेत ना अजून दोन्ही मालिका!
बहुदा, जय मल्हार मालिका बंद होते आहे. त्यावेळी बहुदा नविन मालिका सुरु होईल.
हो, ही सिरियल बहुतेक संपेल
हो, ही सिरियल बहुतेक संपेल आता. आदे ने मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं की ही वर्षानुवर्षं चालणारी मालिका नाही म्हणून स्वीकारली. तरी टीआरपी वर मुळात जेवढी ठेवायची होती त्यापेक्षा बरीच खेचायला लावली असणार त्यांना चॅनलने.
हि मालिका संपेल अस वाटत
हि मालिका संपेल अस वाटत नाही.. जय मल्हारची पावल शेवटाच्या प्रवासाकडे निघालेली स्पष्ट दिसत आहेत.. बानु आणि म्हाळसाला त्यांच्या गतजन्माविषयी समजल की मल्हारी अवताराची कहाणीच संपुष्टात येईल. बर हे सगळ आधी खरखर घडुन गेल्याने लेखक आणि दिग्दर्शक त्यात वाढवण्यासाठी जास्त अॅडीशन्स करु शकत नाहीत
हि मालिका या महिन्यात २६
हि मालिका या महिन्यात २६ तारखेला (एकदाची) संपणार आहे असं ऐकलं आहे. ख. खो. चॅ. जा.
मालिका सम्पन्न होते आहे !!
मालिका सम्पन्न होते आहे !! प्राजक्ता बाईंची फेबुवर लेटेस्ट पोस्ट आहे ! लवकरच मांगले बाई भेटीला येता आहेत !
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/tv/julun-yeti-reshimgathi/article... हे घ्या....
Thannk God.......
Thannk God.......
http://divyamarathi.bhaskar.c
http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-zee-marathi-daily-soap-julun...
तरं जुळून येती रेशिमगाठी बंद होत आहे ...
खरतरं मूळची स्टोरी वर्षभरापूर्वीच संपून गेली होती. मेघनाने आदित्यला मनापासून स्विकारले. पेटी प्रकरणाने देसाई मंडळीना घरात एका खोलीत घडलेला दुखता भूतकाळ समजला मग खरतरं आदित्यच्या मदतीने मेघनाने घेतलेला आत्मशोध, मेघनाची नोकरी स्वावलंबन, आदित्य नगरकरचा दुखावलेल्या कोनाची यथासांग समाप्ती वगैरे रीलेव्हंट ट्रॅक दाखवत मूळ कथा तिथेच वर्षभरात संपायला हरकत नव्हती. तसं झालं असतं तर क्रिस्प मराठी मालिका बघितल्याचं समाधान जास्त मिळालं असतं.
पण तरीही गेले वर्षभर अनावश्यक पाणी घातलं गेलंच..
छोट्या पडद्यावर रोज ८.३० वाजता भेटणारे देसाई कुटूंब, आदित्य मेघना हि काल्पनिक पात्रं आहेत हे पण भान विसरून अगदी आतुरतेने त्यांना बघणारे, त्या व्यक्तीरेखांवर आकंठ प्रेम करणारे, त्यांच्यासाठी फेसबुकवर , ईतरत्र तावातावाने वाद घालणारे प्रेक्षक मात्र " ये दिल मांगे मोअर" म्हणत होते, आहेत, राहतीलही

पण तरीही प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवटं असतो. अजून थांबला का नाहीत हे एकमुखी सर्वांनी कंटाळून वैतागून विचारण्या आधी थांबयला हवं. आता तरी हि मालिका संपत आहे, देर से हि सही पर दुरुस्त
झी मराठीने फारशी जाहिरात न करून, प्रोमोज न दाखवून, पुरस्कारांमध्ये डावलून या मालिकेला सावत्र वागणूक दिली गेली वगैरे अशी कितीही नावं ठेवली गेली तरी यातील लाडक्या जोडीला, आदित्य मेघनाला छान प्लॅटफॉर्म या झी मराठी मालिकेनेच मिळवून दिला. या आधी त्या दोघांनीही वेगळ्या चॅनेलवर मालिका केल्यात हे वाचण्यात आले. पण खरी ओळख, लोकप्रियता त्यांना या मालिकेनेच मिळवून दिली हे ही तितकेच खरे
तर शेवटी किती गमावलं या पेक्षा किती सारं मिळालं हे एक सुजाण प्रेक्षक म्हणून बघणं मला जास्त आवडतं
मला हि मालिका आवडली. आदित्य मेघना जोडी देखील आवडली. ललित प्रभाकरने अप्रतिम जिवंत केलेला आदित्य देसाई तर अगदी प्रेमात पडण्याईतका प्रचंड आवडला

संपूर्ण मराठी मालिका अगदी आवडीने बघण्याची हि माझी तशी पहिलीच वेळ. या आधी एका लग्नाची दुसरी गोष्ट अधून मधून बघितली होती. पण या मालिकेतला साधेपणा, सुरवातीच्या मूळ कथेची ईंटेन्स हाताळणी, डिरेक्शन, लीड पेअर मधली केमिस्ट्री मला फार आवडली..आणि अगदी न चुकता हि मालिका नियमीत बघितली गेली.
बर्यापैकी तारतम्य ठेवून, संपूर्ण ब्लॅक किंवा व्हाईट नसलेले, तुमच्या आमच्या सारखेच चूका करणारे, परिपूर्ण नसणारे मालिकेतले हिरो, हिरोईन, ईतर काही व्यक्तीरेखा आवडल्या (स्पेशल मेंशन - आदित्य, बाबाजी, मेघना) त्या निभावणारे काही अभिनेत्यांचं काम प्रचंड आवडले ( स्पेशल मेंशन- ललित प्रभाकर, उदय टिकेकर)
अर्थात मागच्या वर्षभरात घातलेले पाणी लक्षात न घेता मालिकेचा मूळ ढाचा प्रचंड आवडला.
आता ललित, प्राजक्ता या दोघांची पुढे खरी कसोटी आहे. मिळालेली प्रचंड लोकप्रियता आणि आता हातात येणारा वेळ याचा त्यांनी छान सदुपयोग करुन त्यांनी उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स या पुढे कायम करावेत हि त्यांची एक सच्ची फॅन म्हणून मनापासून सदिच्छा आणि त्यासाठी खूप सार्या शुभेच्छा
Wishing entire JYRG Team All the very best for future endeavors !!!
Adieu..
~~ITG
बर हे सगळ आधी खरखर घडुन
बर हे सगळ आधी खरखर घडुन गेल्याने लेखक आणि दिग्दर्शक त्यात वाढवण्यासाठी जास्त अॅडीशन्स करु शकत नाहीत >>>
नाही हो.... पाणी घालत सुटणार्या लेखक/दिग्दर्शकाला खर्याखोठ्याचे सोयेर/सुतक नसते...
कुणालातरी एक वर्ष लांबीचे स्वप्न पडले की वर्षभर मालिका खेचता येईल..
ललित एका नाटकात काम करणार
ललित एका नाटकात काम करणार आहे, श्रेया बुगडे बरोबर. ती गुजराथी, मराठी थियेटर करते बरीच वर्ष. मागे नावपण आलं होतं म. टा. मध्ये नाटकाचं, विसरले मी.
यापासून काहीतरी बोध घेऊन
यापासून काहीतरी बोध घेऊन होसूमीयाघ सुद्धा लवकरात लवकर संपवावी!
शिरेल संपता संपता आता हे
शिरेल संपता संपता आता हे मंग्याचं नविन काय काढलय
हो ना. अर्धवटच बंद करणार असं
हो ना. अर्धवटच बंद करणार असं वाटतय ही शिरेल.
नवीन सिरियल इंटरेस्टींग
नवीन सिरियल इंटरेस्टींग दिसतेय. अॅटलीस्ट कोणी सासूसुना नाही आहेत आणि वैभव मांगले असल्यामुळे थोड्या अपेक्षा आहेत.
देसायांच्या घरात
देसायांच्या घरात शेन्डेफळांच्या बाळाची स्वप्न पडतायत सगळ्याना .
.
आता काय हो व्हायच आमच
थेट मेघना-आदित्यचं बाळ दाखवून
थेट मेघना-आदित्यचं बाळ दाखवून शिरेल संपवणार वाटतंय.
काल रात्री उशिरा मी रिपीट
काल रात्री उशिरा मी रिपीट पहिली ५ मी. तर मंग्या म्हणून कोणी अनाथ मुलगा अशी स्टोरी चालू आहे का? इथे बऱ्याचदा कॉपी करतात 'माझे मन तुझे झाले' ची तिथे अनाथ मुलाची स्टोरी मागच्या महिन्यात होती तो track रक्षाबंधनाच्या आसपास संपला.
हो अन्जु ताई, तो मंग्या
हो अन्जु ताई, तो मंग्या पहिल्यान्दा मेघनाची बॅग घेउन पळत होता , मग आदेच्या बाईक खाली येता येता वाचला , मग आदे-मेदे त्याला घरात घेउन आले . आदे त्याला दत्तक घ्यायच्या विचारात असल्यामुळे कायदेशीरबाबींसाठी त्याच्या मूळ आश्रमात घेउन जाताना, मंग्या आदेचा हात सोडून पळून गेल्याने आदे दुखी: झाल्यामुळे सगळॅ त्याला आणि मेदे ला समजावतायेत की स्वत: च्या बाळ्याची चाहूल लागल्यावर मन तिकडे रमवता येईल म्हणून मग आता मेदेला बाळाची स्वप्न पडतायेत आणि ती आदेला बाळाचे स्पेसिफिकेशन विचारत होती ( माझ्यासारख नकट्या नाकाच हवं की तुझ्यासारखं धारदार नाकाचं , तुझ्यासारखं उंच ताड माड की माझ्यासारखं ठेंगणं , बुटकं ई. ई )
हुश्श्श्श!!
रच्याकने , मेघना आणि विजयामधलं शीतयुद्ध संपलं .
तो सीन मस्त होता हां त्या दोघी आदित्यला उल्लु बनवतात तो .
धन्स स्वस्ति.
धन्स स्वस्ति.
रच्याकने , मेघना आणि
रच्याकने , मेघना आणि विजयामधलं शीतयुद्ध संपलं .
तो सीन मस्त होता हां त्या दोघी आदित्यला उल्लु बनवतात तो . >>> हे मी मिसल.. काय झाल?
सध्या नक्की काय चाललय ? काल
सध्या नक्की काय चाललय ?
काल शेवटचा थोडा भाग पाहिला तर मेदे झोपाळ्यावर रडकं तोंड करून बसली होती विथ ते सॅड सिनवालं बॅकग्राऊंड म्युझिक आणि परत काहितरी निर्णय निर्णय चालू होतं.
आता कसला निर्णय ? दत्तक प्लॉट अजून सुरू आहे का?
आता मंग्याच्या दुख्खा:तून आदे
आता मंग्याच्या दुख्खा:तून आदे बाहेर आला .
पण आता त्याला एक गोंडस बाळ दत्तक घ्यायच आहे .
त्याने सगळ्यान्च मत विचारल आहे .
सगळ्यान्च्या मते , पहिल्यान्दा त्यानी आपल बाळ होउ द्याव आणि मग दत्तक घ्याव , पहिलं बाळ दत्तक का?
म्हणून आता सगळे जरा हादरले आहेत .
हि सिरिअल संपू नये असे वाटत
हि सिरिअल संपू नये असे वाटत होते आधी .

मधेच गुड नाईट ची जाहिरात आणि काल परवा मेघना सुंदर त्वचेसाठी गोदरेज साबण लावते असे सांगत होती
जाहिरातीसाठी ब्रेक ची गरजच नाही
Pages