Submitted by किल्ली on 29 December, 2024 - 10:29

आपल्या कुटुंबासोबत तो त्या प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन बाहेर पडताना, मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना त्याची भिरभिरती नजर सतत काहीतरी शोधत होती. मुळात मंदिरात येऊन दर्शन घेणे हे काही त्याचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. त्याच्या सरावलेल्या दृष्टीने चौफेर शोध घेऊनही हवी असणारी वस्तू कुठेच दृष्टीस पडली नाही. पूर्वी त्याने अनेकवेळा इथे पाहिली होती आणि मिळवली होती. आजही त्याला ती वस्तू हवी होती.
इथे येण्याचा उद्देश असफल झाला की काय असे त्याला वाटू लागले आणि पुढच्याच क्षणी त्याला देवळाच्या दारावर ती वस्तू दिसली, कुलूपबंद पेटी!
"ह्यात आहे का खडीसाखर, आई? मी खाईन म्हणून त्यांनी बंद करून ठेवलीये का?"
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हाहा … ओमचा प्रश्न आहे काय??
हाहा … ओमचा प्रश्न आहे काय??
मुंगळा की काय?
मुंगळा की काय?
आमची मनू पण हेच करते. नेमका
फुटाणे आणि खडीसाखरेचा प्रसाद
फुटाणे आणि खडीसाखरेचा प्रसाद बघितले की मला बोर व्हायचे. काय हे नुसते गोड गोड. काही पोटाला सुद्धा लागत नाही. जास्त खावेसे सुद्धा वाटत नाही. त्यामुळे पैसे वाचवायला कॉस्ट कटिंग लो बजेट प्रसाद वाटायचा..
पण मग नंतर मुलगी झाली.. आणि त्या प्रसादाची खरी किंमत कळली
ओमची गोष्ट ना..
ओमची गोष्ट ना..
गोड गोष्ट आहे .
गोड गोष्ट आहे .
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
ओमचीच गोष्ट. खडीसाखर खाण्यासाठी देवळात येतो तो
मस्तच... ओम सर भारी
मस्तच... ओम सर भारी
ओम दादा भारी आहेत..
ओम दादा भारी आहेत..
मी पण लहानपणी नवरात्रोत्सवात खोबरं, साखरफुटाणे , शेंगदाण्याचा प्रसाद मिळेल म्हणून आरतीला जायचे.
गोड गोष्ट.
गोड गोष्ट.
<<ओमचीच गोष्ट. खडीसाखर
<<ओमचीच गोष्ट. खडीसाखर खाण्यासाठी देवळात येतो तो>>
आणि तुम्ही काय मागायला देवळात जाता?
तिकडे गेल्यावर काहीच मनात
तिकडे गेल्यावर काहीच मनात नाही येत
फक्त तो आणि त्याचं दर्शन
त्याला डोळे भरून पाहते बस.
धन्यवाद आबा, रुपाली,शर्मिला,
धन्यवाद आबा, रुपाली,शर्मिला, नंद्या
गोड ओमची गोड गोष्ट.
गोड ओमची गोड गोष्ट.
लहान मुलांना प्रसादासाठीच
वाटलंच होतं, ओमची गोष्ट असणार.
लहान मुलांना प्रसादासाठीच बाप्पा हवा असतो
आम्हाला एरियातील सगळी देवळं आणि प्रसाद कुठे ठेवतात ती जागा माहित आहे.
छान गोड गोष्ट
छान गोड गोष्ट
मस्त. ओम सरांची गोष्ट
मस्त. ओम सरांची गोष्ट
मस्त आहे गोष्ट ओमची.
मस्त आहे गोष्ट ओमची.
मी पण कॉलेजमध्ये असताना शेजारच्या शंकराच्या देवळात खडीसाखर घ्यायला जायचे आणि ऋन्मेष सारखे मनात यायचे अजून वेगळा प्रसाद ठेवला पाहिजे लोकांनी..