कुलूपबंद पेटी - शतशब्दकथा
Submitted by किल्ली on 29 December, 2024 - 10:29
आपल्या कुटुंबासोबत तो त्या प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन बाहेर पडताना, मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना त्याची भिरभिरती नजर सतत काहीतरी शोधत होती. मुळात मंदिरात येऊन दर्शन घेणे हे काही त्याचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. त्याच्या सरावलेल्या दृष्टीने चौफेर शोध घेऊनही हवी असणारी वस्तू कुठेच दृष्टीस पडली नाही. पूर्वी त्याने अनेकवेळा इथे पाहिली होती आणि मिळवली होती. आजही त्याला ती वस्तू हवी होती.
इथे येण्याचा उद्देश असफल झाला की काय असे त्याला वाटू लागले आणि पुढच्याच क्षणी त्याला देवळाच्या दारावर ती वस्तू दिसली, कुलूपबंद पेटी!
शब्दखुणा: