कुलूपबंद पेटी - शतशब्दकथा

Submitted by किल्ली on 29 December, 2024 - 10:29

आपल्या कुटुंबासोबत तो त्या प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन बाहेर पडताना, मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना त्याची भिरभिरती नजर सतत काहीतरी शोधत होती. मुळात मंदिरात येऊन दर्शन घेणे हे काही त्याचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. त्याच्या सरावलेल्या दृष्टीने चौफेर शोध घेऊनही हवी असणारी वस्तू कुठेच दृष्टीस पडली नाही. पूर्वी त्याने अनेकवेळा इथे पाहिली होती आणि मिळवली होती. आजही त्याला ती वस्तू हवी होती.
इथे येण्याचा उद्देश असफल झाला की काय असे त्याला वाटू लागले आणि पुढच्याच क्षणी त्याला देवळाच्या दारावर ती वस्तू दिसली, कुलूपबंद पेटी!

"ह्यात आहे का खडीसाखर, आई? मी खाईन म्हणून त्यांनी बंद करून ठेवलीये का?"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol आमची मनू पण हेच करते. नेमका पायऱ्यांच्या समोर डबा ठेवलेला असतो. दर्शन घेऊन येईपर्यंत धीर नसतो तिला.

Happy
फुटाणे आणि खडीसाखरेचा प्रसाद बघितले की मला बोर व्हायचे. काय हे नुसते गोड गोड. काही पोटाला सुद्धा लागत नाही. जास्त खावेसे सुद्धा वाटत नाही. त्यामुळे पैसे वाचवायला कॉस्ट कटिंग लो बजेट प्रसाद वाटायचा..
पण मग नंतर मुलगी झाली.. आणि त्या प्रसादाची खरी किंमत कळली Happy

धन्यवाद मंडळी.
ओमचीच गोष्ट. खडीसाखर खाण्यासाठी देवळात येतो तो Lol

ओम दादा भारी आहेत..
मी पण लहानपणी नवरात्रोत्सवात खोबरं, साखरफुटाणे , शेंगदाण्याचा प्रसाद मिळेल म्हणून आरतीला जायचे.

<<ओमचीच गोष्ट. खडीसाखर खाण्यासाठी देवळात येतो तो>>
आणि तुम्ही काय मागायला देवळात जाता?

वाटलंच होतं, ओमची गोष्ट असणार.

लहान मुलांना प्रसादासाठीच बाप्पा हवा असतो
आम्हाला एरियातील सगळी देवळं आणि प्रसाद कुठे ठेवतात ती जागा माहित आहे.

मस्त आहे गोष्ट ओमची.

मी पण कॉलेजमध्ये असताना शेजारच्या शंकराच्या देवळात खडीसाखर घ्यायला जायचे आणि ऋन्मेष सारखे मनात यायचे अजून वेगळा प्रसाद ठेवला पाहिजे लोकांनी..