मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे ना! आजकाल मराठी पिक्चरना पुण्याच्या सदाशिव पेठच्या स्टोरीजमधून बाहेर पडायला पाहिजे. ते कॉफी आणि बरच काही टायप्स टिपिकल संस्कारी टाइपच्या गोष्टी लोकांना आता जमत नाहीत राव. जर खरंच लोकांपर्यंत पोचायचं असेल, तर “पुष्पा”सारख्या दमदार आणि कडक काहीतरी घ्यायला पाहिजे.

लोकांच्या मनाला भिडणारं आणि त्यांच्या लाईफशी कनेक्ट होणारं असलं पाहिजे. फक्त दोन चार लोकांसाठी बनवायचं थांबवा, संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा, रडवणारा, आणि विचार करायला लावणारा सिनेमा आणा.

थोडक्यात, मराठी पिक्चर ‘रिअल’ आणि ‘रिलेटेबल’ असायला हवा. आणि हो, त्यात दम आणि धडाडी तर पाहिजेच राव!

फारेण्डचा मुद्दा पटला. पण मार्केट फोर्सेसद्वारे राग दाखवायला हा मुद्दा मराठी प्रेक्षकाला तेवढा महत्वाचा वाटतो का आणि जगातले सर्व चित्रपट, संगीत आणि इतर अनुभवण्याची संधी उपलब्ध असताना या मुद्द्यासाठी ॲक्शन घेण्याची गरज वाटते का? याबाबतीत अमितवचं म्हणणं पटलं सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट आहे. सुक्याबरोबर ओलंही जळेल.

आपल्याही निर्मात्यांचे मार्केटिंग कमी पडत असेल.>>>
एक्झॅक्टली. सैराट धो धो चाललाच की.

बर्‍याच मराठी लोकांनाही मुळात अमलताश या नावाचा एक पिक्चर आलाय हेच माहीत नाही.
फक्त दोन चार लोकांसाठी बनवायचं थांबवा, संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा, रडवणारा, आणि विचार करायला लावणारा सिनेमा आणा
>>> १०००+++
मराठी प्रेक्षक आहे म्हणजे त्याने नेहमीच अर्थपूर्ण, आशयगर्भ पिक्चर(च) बघितला(च) पाहिजे असं काही नाही. त्यालाही ग्लॅमरस, टाईमपास, उडाणटप्पू, भव्य दिव्य पिक्चर बघायला आवडतात. तुम्ही नाही दिलात तर जो देईल त्याच्याकडे प्रेक्षक वळेल. तुम्ही नक्की कोणत्या सेगमेंटला टार्गेट करताय ते ठरवलं तरी बऱ्यापैकी गल्ला जमतो. बाईपण, झिम्मा वगैरेंनी ते सिद्ध केलंय.

माझे मन
मूळ मुद्दा ओटीटी वाल्यांनी मराठीच नको असे म्हणण्याचा आहे. त्याची कारणे काय ? त्यावरच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असा कुणाचाच आग्रह नाही. असे होईल असा भाबडा आशावाद सुद्धा कुणाचाच नाही. फक्त ज्या भाषेत कट्टरतावाद आहे त्यांना मार्केटचा फायदा होतो, त्यांचे मार्केट (हक्काचा ग्राहक) डायल्युट होत नाही इतकाच मुद्दा आहे जो कुठल्याही व्यापाराचा बेसिक मुद्दा असावा....

साऊथ मधे पण दोन चार सिनेमे गाजतात, बाकीचे असेच टुकार असतात. न चाललेले तिथेही असतात. सेम हॉलीवूडच्या बाबतीतही. एक हिट झाला कि त्याची री ओढणारे शेकड्याने सिनेमे बनणे हे जाfunction at() { [native code] }इक सत्य आहे. ते मराठीत होऊच नये असे शक्य नाही. १००% मराठी सिनेमा बघाच हा ही कुणाचाच मुद्दा नाही.

माझे मन
मूळ मुद्दा ओटीटी वाल्यांनी मराठीच नको असे म्हणण्याचा आहे. त्याची कारणे काय ? त्यावरच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असा कुणाचाच आग्रह नाही. असे होईल असा भाबडा आशावाद सुद्धा कुणाचाच नाही. फक्त ज्या भाषेत कट्टरतावाद आहे त्यांना मार्केटचा फायदा होतो, त्यांचे मार्केट (हक्काचा ग्राहक) डायल्युट होत नाही इतकाच मुद्दा आहे जो कुठल्याही व्यापाराचा बेसिक मुद्दा असावा....

साऊथ मधे पण दोन चार सिनेमे गाजतात, बाकीचे असेच टुकार असतात. न चाललेले तिथेही असतात. सेम हॉलीवूडच्या बाबतीतही. एक हिट झाला कि त्याची री ओढणारे शेकड्याने सिनेमे बनणे हे जाfunction at() { [native code] }इक सत्य आहे. ते मराठीत होऊच नये असे शक्य नाही. १००% मराठी सिनेमा बघाच हा ही कुणाचाच मुद्दा नाही.

मी चक्क च्रप्स यांच्याशी सहमत आहे, तेवढं ते पुष्पा वगळून. अमलताशच्या बाबत हेच लिहिले होते. इतका आंग्लाळलेला आणि पुणे स प आहे की फारच मर्यादित प्रेक्षकांनाच त्याने गुदगुल्या होतील. तेही केवळ नॉस्टॅल्जीया म्हणून बाकी तर नीट 'बसवलेला' होम व्हिडिओ आहे.

फा ची पोस्टही आवडलीच, असते ऑनलाइन तर असेच काहीतरी खरडायचा प्रयत्न केला असता. एवढं मुद्देसुद आणि खणखणीत जमलं असतं का नाही माहिती नाही, ते जाऊ द्या.

आचार्य, तुमची कळकळ पोचली.

मराठी चित्रपट चालवण्यासाठी जे लोक/ सामान्य प्रेक्षक हवेत , ज्यांना आर्थिक - सामाजिक गणिताशी घेणंदेणं नाही ते पांढरपेशे आपणच आहोत. मलातरी यात थोडीफार जबाबदारी वाटते, अगदीच ओझे नाही पण जेथे मी जगभरातील सिनेमे बघतच असते तेथे मराठी भाषा व मराठी मातीतील कथा यांच्याशी नाळ तुटणे शक्य नाही. उलट ती जोडण्याची, कुठेतरी तृप्तता शोधण्याचीच धडपड असते. कारण शेवटी आपण विचार मराठीतूनच करत असतो. पण नाही आवडले-पटले तर कुणी पैसे दिले तरी खोटे कौतुक करता येणार नाही. तरीही हपापलेल्या प्रेक्षकाप्रमाणे जे येतील सिनेमे , मिळतील त्या प्लॅटफॉर्मवर बघत राहीन. पैसे भरून / विनामुल्य कसेही असो. सिनेमा आवडो-नावडो बघत राहिले तर इंडस्ट्री चालेलच अशी भाबडी समजूत आहे. कुठल्याही इतर भाषेतील चित्रपटापेक्षा मराठी सिनेमाच जवळचा आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीनेही सगळ्या ओटिटींची स्पर्धा लक्षात घेऊन, मोठ्या प्लॅटफॉर्म्सच्या दृष्टिने सिनेमे काढावेत आणि मराठीच्या 'मानाने' कॅटॅगरीतून बाहेर पडावे हेही सत्य आहे. मराठी इंडस्ट्रीत खूप ताकदीचे कलाकार आहेत, मराठी सारखी दणदणीत संहिताही कुणाकडे नाही. या फार मोठ्या जमेच्या बाजू आहेत. साऊथ बद्दल कसलाही राग/ लोभ नाही पण मला मराठी भाषा व मराठी चित्रपट जितके टिकतील तितके टिकायलाच हवे आहेत. टिकणार असतील तर टिकतील असे म्हणायला या जन्मात तरी जीभ धजावणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीवर अन्याय होत असेल तर त्याला कडाडून विरोधच असेल. माझा परीघ फारच मर्यादित आहे पण मी येथे काही करू शकत असल्यास करत राहीन.
जय हिंद जय महाराष्ट्र. Happy

अस्मिता,
प्रॉब्लेम काय , त्याचा उपाय काय इतकाच मुद्दा होता. सर्वांनी पाहिलाच पाहीजे ही सक्ती नाही. सिनेमे कसे बनवावेत ही पण सक्ती नाही.
मराठी सिनेमे रिलीजच झाले नाहीत तर बघणार कोण ? आजच एका चित्रपटाच्या बाबतीत असे झाले आहे. त्यांना शुक्रवार पासून प्रयत्न केल्यावर आज एक शो मिळाला. महाराष्ट्रात जर मराठी सिनेमाला स्क्रीन मिळाले नाहीत तर कुठे मिळणार ?

हो, लक्षात आले आचार्य. बघावाच असा आग्रह नाही पण मराठी भाषेतील (कुठल्याही प्रकारातील सिनेमांना) निर्मितीची, प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची समान संधी हवी हाच मुद्दा मलाही पटला आहे. फेअरच आहे. तुम्ही ज्या कळकळीने लिहीत आहात त्याचेही कौतुक आहे. Happy

अ‍ॅक्चुअली, मला जे म्हणायचे आहे ते नीट पोहोचत नसेल तर पुन्हा पुन्हा लिहायची भीती वाटते. Happy
हल्ली पटवून द्यायचा कंटाळा येतो. एके काळी मानगुटीवर बसून "घेतोस कि नाही बर्‍या बोलाने पटवून ?" या थाटात महिना महिना वाद चालत.

आजकाल मराठी पिक्चरना पुण्याच्या सदाशिव पेठच्या स्टोरीजमधून बाहेर पडायला पाहिजे..
>>>

च्रप्स
+७८६
मलाही एखादा चित्रपट तसा आहे हे समजले की मी त्या वाटेला जात नाही. मी हाडाचा मुंबईकर असल्याने जसे मला पुण्यातली लाईफ बोर वाटते, तेच माझे तिथल्या चित्रपटांबाबत सुद्धा होते. आणि असे वाटणारा फार मोठा वर्ग आहे जो अश्या चित्रपटांच्या वाट्याला जात नाही. जर तुम्ही त्यांच्यासाठी चित्रपट बनवणारच नसाल तर चित्र बदलणार नाही.

बाई दवे,
हा धागा मराठी चित्रपट कसा वाटला? आहे.
इथल्या पोस्ट वाचून लोकं काय कुठला चित्रपट बघावे हा निर्णय घेतात. त्यावर ही पानेच्या पाने अवांतर चर्चा करून आपण मराठी चित्रपटांचे नुकसान करत आहोत.
शक्य झाल्यास नवीन धागा काढा कोणीतरी. आणि इथे मराठी चित्रपट कसा वाटला हेच लिहा लोकहो !

शक्यतो ट्रोल्सच्या मुद्द्यांना हवा देत नाही.
पण चित्रपट सपे आहे म्हणून बघत नाही हे लंगडं कारण आहे. आधी तमाशा मुळे बघत नव्हते. नंतर विनोदी लाट म्हणून बघत नव्हते.
पण हिंदीतले सुमार सिनेमे लोक हटकून बघतात. त्यावर चर्चा करतात पण बघतात.

मी सपे नाही. पण हिंदीत पण पंजाबी वर्चस्व असतं. तरी आपले लोक बघतातच. उलट पंजाबी म्हणजे काही तरी खिलाडू वृत्तीचे असा समज असतो. प्रत्यक्षात हे लोक किती खडूस असतात याचा अनुभव घेतलेला आहे. सिनेमे बनवायला जे पुढाकार घेतात ते त्याच्या दृष्टीने बनवतात. इतरांनी बनवावा कि. रौंदळ कुणीच पाहिला नाही. टिंग्या पण खूप लोकांनी पाहिलेला नाही.

सैराटच्या वेळी माझ्या फ्रेण्ड लिस्टीत असलेल्या एका मराठी निर्मात्याने पोस्ट टाकली होती. त्या वेळी साऊथचा कुठलातरी सिनेमा रिलीज होणार होता. त्याचं मार्केटिंग कसं वर्षभरापासून सुरू आहे आणि सैराट महिन्यावर आला तरी टीझर सुद्धा नाही अशी पोस्ट होती. पुढची स्टोरी आपल्याला माहिती आहे. पंधरा दिवसांच्या कल्पक मार्केटिंगवर सैराट चालला. लय भारी आणि माऊली पण अशाच शॉर्ट नोटीस वर रिलीज झाले होते. लय भारी मुळं चहयेद्या सुरू झालं. फक्त वेडचं मार्केटिंग जोरदार केलं होतं.

मराठी सिनेमा आवर्जून बघायची सवय मोडली आहे.

मराठीबद्दलच्या अनास्थेच्या पार्श्वभूमीवर योगायोगाने ही व्हॉट्स अ‍ॅप पोस्ट आली. शोधाशोध केल्यावर लेखकाचे नाव अनिल गोरे आहे असे समजले. इतरांच्या भाषिक कट्टरपणामुळे आणि आपल्या औदार्यामुळे आपले नुकसान होते असा आशय असल्याने इथे शेअर केली. यात चित्रपट पण आले..
*************************************
अनेक माजुरड्यांशी मी नेहेमी विनम्र बोलतो, कसे ते पहा!
माझ्या भ्रमणध्वनीची घंटी वाजते. कोणीतरी माजुरडा किंवा माजुरडी विनम्रतेचा आव आणून विचारतात
माजुः "क्या मेरी बात अनिलजी से हो रही है?"
मी ः महाराष्ट्र मराठी
माजुः आपको लोन चाहिये क्या?
मी ः मराठी महाराष्ट्र
माजुः. आपको हिंदी नही स्मृती क्या?
मी. महाराष्ट्र मराठी
माजुः आपको हिंदी के बदले इंग्लिश चलेगी?
मीः मराठी महाराष्ट्र
माजुः आपको मराठीमे क्यू बात करनी है?
मीः महाराष्ट्र मराठी
माजुः हिंदी तो सारे देशकी भाषा है!
मीः मराठी महाराष्ट्र
माजुः अभी मराठी बात करनेवाला नही है वो खानेके बाद आपसे बात कराएंगे
मीः महाराष्ट्र मराठी
मी दर आठवड्याला अतिशय विनम्रतेने माजुरड्यांना या वरील दोन शब्दात प्रतिसाद देतो. या विनम्रतेमुळे माजुरड्यांना संभाषण बंद करावे लागते. दर आठवड्याला पाच सहा माजुरड्यांना मी असा विनम्र किंवा अति विनम्र प्रतिसाद देतो.
महाराष्ट्रात संपर्क साधत अ ताना मराठी या प्रगत, आधुनिक संपन्न भाषेत न बोलता उर्दूतून बोलायला सोकावलेल्या सर्व माजुरड्यांना सर्व मराठी भाषकांनी असेच टोलवले तर अनेक उद्योग आपल्या ग्राहक सेवा केंद्रात मराठी मुलामुलींना संपर्कदूत नेमतील. मराठी भाषा वाढेल व मराठी युवकांघ्या रोजगार संधीही वाढतील

पण चित्रपट ### आहे म्हणून बघत नाही हे लंगडं कारण आहे.
>>>
इथे ### जागी हवं ते टाका.. पण बहुधा चित्रपट निर्माते सुद्धा हेच समजतात आणि चुकतात. प्रेक्षकांना काय हवे आहे हे लक्षातच घेत नाहीत. अर्थात ते लक्षात घ्यावेच असा हट्ट नाही.
पण जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल, किंबहुना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर ते लक्षात घ्यायलाच हवे.. आमचा एवढा भारी चित्रपट तुम्हाला आवडत नाही म्हणजे काय या गोड गैरसमजातून बाहेर यायलाच हवे.
डिमांड तसा सप्लाय करणार नाही तर कैसा चलेगा भिडू..
चित्रपट सोडा, इथे मायबोलीवर कोणी नवीन यंग क्राउड आला आणि तुम्ही त्यांच्या शुद्धलेखनाच्या चुका काढत बसला आणि ते मराठीत इंग्लिश शब्द जास्त वापरतात म्हणून नाक मुरडत बसाल तर ते पळून जातील Happy

जे चित्रपट बनवत आहेत आणि ते एक प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आणत आहेत, त्यांनी बदलत्या काळाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. प्रेक्षकांनी आम्ही जे बनवू ते आवडून घ्यावे हा एटीट्यूड कलेबाबत ठेवू शकतो व्यवसायाबाबत नाही.

Happy फक्त स पे आहे म्हणून आवडला नाही असे नाही, चित्रपट एक रटाळ होम व्हिडिओ आहे. येथे मागे लिहिलेय. पण चित्रपट चांगला असता तर स पे असूनही आवडला असताच, तरीही हा स पेंचा अतिआंग्लाळलेला + मधूनच पिकनिकेबल गाणी +सुरवातीला मॉडर्न शेवटाला 'आ गले लग जा' अशी काही तरी विचित्र भट्टी होती. स पे नसूनही मला स पे वातावरण प्रचंड रिलेटेबल आहे पण माझ्यासारखे किती प्रेक्षक असणार आहेत. तोही मुद्दा एक विकू घातलेले प्रॉडक्ट/ क्राफ्ट म्हणून महत्त्वाचा नाही का..!

तुमचं काहीकाही पटतं आहेच. सध्या वरवर वाचून लिहितेय, पुन्हा एकदा शांत चित्ताने वाचेन. ही पोस्ट फक्त अमलताश as a product समजून वाचा. Happy

>>>>>मराठी प्रेक्षक आहे म्हणजे त्याने नेहमीच अर्थपूर्ण, आशयगर्भ पिक्चर(च) बघितला(च) पाहिजे असं काही नाही. त्यालाही ग्लॅमरस, टाईमपास, उडाणटप्पू, भव्य दिव्य पिक्चर बघायला आवडतात.
स्पॉट ऑन!
आयुष्यात जे चाललय तेच पहायला थेट्रात कोण जाईल.
लार्जर दॅन लाइफ दाखवा ना काहीतरी.

अरेच्या माझेमन यांचा हा प्रतिसाद मी कुठेतरी वाचला Sad मे बी वाड्यावर असेल. बघते.
----
आता नाही सापडत Sad

त्याची कारणे काय ?
>>>
कारणे - कमर्शिअल. तुम्ही किती प्रेक्षक तुमच्या नावावर आणू शकता.
आता मैय्याळगनचं उदाहरण घेऊ. माबोवरच काहींना तो आवडला, काहींना बोअर झाला. सगळ्याच तमिळ प्रेक्षकांनाही तो अपिल नाही होणार. पण सुरीयाने त्यावर पैसे लावले. कार्ती नावाच्या चलनी नाण्याचा वापर केला. ४०जमधल्या प्रेक्षकांसाठी अरविंदस्वामीचा तडका होता. त्यामुळे अमुक एक प्रेक्षक येतील हे काहीतरी गृहीतक असेल ना? राहुल देशपांडे - द ॲक्टरच्या नावाने इतरभाषिक सोडा , किती मराठी प्रेक्षक जातील?
तेच उद्या नागराज मंजुळे अजय अतुलला घेऊन गेला तर नेटफ्लिक्स मराठी नको सांगताना १० वेळा विचार करेल.

प्रेक्षकांनी आम्ही जे बनवू ते आवडून घ्यावे हा एटीट्यूड कलेबाबत ठेवू शकतो व्यवसायाबाबत नाही.
>>> १००++

राहुल देशपांडे आणि अमलताश बाजूला ठेवा. त्याची मुलाखत पूर्ण ऐका.
इट्स नॉट अबाऊट अमलताश ऑर रादे.

आपण इथे पिसं काढण्यासाठी जे हिंदी सिनेमे पाहतो, त्यासाठी तरी मराठी सिनेमे पाहतो का ?
आणि पहा हे कंपल्शन करावं म्हणून ही चर्चा चाललेली नाही हा पुन्हा एकदा रिमाईंडर.

फॅक्ट्स काय आहेत इतकंच आहे.

प्रत्येक धाग्याची वाट लावतोय हा ट्रोल आयडी …

Submitted by च्रप्स on 29 December, 2024 - 23:02 >>> लिस्ट हिअर प्लीज. वेमा शुड टेक अ‍ॅक्शन.

चोर की दाढी मे तिनका… इथे सरप्राइझिंगली इमेज जपून आहे हा आयडो..
करायचा का परदा फार्श Happy
चल माफ किया…

जे चित्रपट बनवत आहेत आणि ते एक प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आणत आहेत, त्यांनी बदलत्या काळाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. प्रेक्षकांनी आम्ही जे बनवू ते आवडून घ्यावे हा एटीट्यूड कलेबाबत ठेवू शकतो व्यवसायाबाबत नाही.
>>> अगदी बरोबर मुद्दा ऋणमेश… माझाच मुद्दा हा…

Pages