मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४०+ पोस्टी एका रात्रीत! दोन पाने मागे जाउन संदर्भ आणावे लागत आहेत. त्यापेक्षा उरलेला पिक्चर पूर्ण पाहून मगच लिहीतो.

अमित व अस्मिता यांनी त्या अ‍ॅनिमल मधल्या तोफ कम बंदुकीसारखे काहीतरी धडाडले आहे या पिक्चर वर. पर्णीका व अजून एक दोन जण दुसर्‍या बाजूला दिसत आहेत. मी आमची माती आमची माणसं पर्यंतच पाहिलाय पण त्यावरून, आणि पहिल्या १५ मिनिटांत पुणे व सपे जशी दिसली त्यावरून मला या पिक्चरला सपोर्ट करायची तीव्र इच्छा आहे. पण तशी इच्छा या पिक्चरची आहे का अजून कल्पना नाही Happy

स्वाती, स्वाती२ - क्रिकेट व फ्रेण्ड्सच्या संदर्भाबद्दल टोटल रिस्पेक्ट! आदर द्विगुणित वगैरे Happy

अमलताशवर विश्वास किंवा अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा चालू आहे, असं वाटतंय >>> Biggrin

त्यावरून मला या पिक्चरला सपोर्ट करायची तीव्र इच्छा आहे. पण तशी इच्छा या पिक्चरची आहे का अजून कल्पना नाही
>>> इथे पूरी कायनात बसली आहे ना तुला पिक्चरकडे ढकलायला Proud

पुणे दाखवल्यामुळे पुणेकराना आकर्षण वाटतंय अमलताशचे तसं डोंबिवली दाखवलं असतं तर विचार केला असता बघायचा (पुण्यात सगळे का ना राहतात त्यामुळे पुण्याशी थोडाफार संबंध लग्नानंतर आला) . अमितव, पाणी नक्की बघेन त्याआधी मला मुंजा बघायचा आहे, तो राहून गेलाय.

"घ्या" >> Lol

पण तशी इच्छा या पिक्चरची आहे का अजून कल्पना नाही >> करोनावर उद्धव ठाकरे असंच काहीतरी म्हणाले होते ना, तोच रेफ्रन्स आहे का?

एक योगायोग. कधीकधी एखादा सिनेमा, एखादे गाणे किंवा इव्हन एखादा अनेक वर्षांत न वापरलेला शब्द आठवतो किंवा कोठेतरी ऐकला/वाचला जातो आणि नंतर एकदोन दिवसांत तो पुन्हा पुन्हा समोर येतो. तसे काहीतरी झाले.

हपाने रादे गायक म्हणूनही नाही आवडला आणि अभिनेता म्हणूनही नाही असे लिहीले तेव्हा अमितने पियानिस्ट म्हणून आवडतो का असे 'मग हे तरी चालवून घ्या" च्या थाटात विचारले. तेव्हा मला "पियानिस्ट" हा पिक्चर आठवला. मग तो विकीवर शोधायला गेलो. तो पाहिलेला नाही पण नाझी ऑक्युपेशन व होलोकॉस्टशी संबंधित कथा आहे इतके लक्षात होते. त्यावरचे विकीपेज वाचताना त्यात एका ठिकाणी तो चॉपिन/शोपेन या संगीतकाराची एक रचना वाजवतो असे लिहीलेले दिसले. तेव्हा मला अचानक अमलताश मधला सुरूवातीचा एक सीन आठवला. तो एका दुकानात जातो तेव्हा तिथला माणूस एका टॅब वर त्याचीच एक रचना ऐकत असतो. तेथे तो त्याचा उच्चार चॉपिन करतो व हा तो उच्चार "शोपेन" आहे असे सांगतो. मग तीच ट्यून तो नंतर पुढे वाजवताना दाखवला आहे. दोन्ही पिक्चर मधे त्याचा उल्लेख आहे. अर्थात तो नावाजलेला पियानिस्ट आहे असे दिसते आणि दोन्ही पिक्चर्स मधे पियानो चा वापर आहे त्यामुळे ते ही साहजिक आहे.

करोनावर उद्धव ठाकरे असंच काहीतरी म्हणाले होते ना, तोच रेफ्रन्स आहे का? >>> हपा Happy असेल, कधीतरी ऐकलेले/वाचलेले डोक्यात बसले असेल पण आवर्जून त्याबद्दल नव्हते.

फा, या वैचारिक उड्या फारच रोचक आहेत. कुठून काय कसं कनेक्शन लागलंय. जबरी योगायोग.

करोनावर उद्धव ठाकरे असंच काहीतरी म्हणाले होते ना, तोच रेफ्रन्स आहे का? >>> हपा मलाही हे आठवलं.

अमलताश जाऊ द्या. पण द पियानिस्ट चांगला चित्रपट आहे. नाझी ऑक्युपेशनच्या काळात जीवाची शाश्वती नसताना पियानीस्ट कला जगत असतो तो शॉट अंगावर येतो. हवं तर हा रेको समझा.

AVKMIA ???

अजिबात रादेमुळे अमलताश पहाणार नव्हते.पण वाड्यावर कुजबुज झाली.मग पहावा लागला.
ठार कळला नाही.
अवल,अमित अस्मिता आणि पर्णिका यांचे प्रतिसाद आवडले.

पाहिला शेवटी. पूर्ण पाहिला. शेवट मला झेपला नाही. पण बाकी पिक्चर बोअर नाही झाला. एक साइड घ्यायचीच असेल तर मला "आवडला" मधेच धरा.

अरे मला ते दाणे, दाण्याचे लाडू वगैरे प्रकार मजेदार वाटले. जनरल गप्पांमधले सदाशिव पेठी संवाद मस्त आहेत. "दहा पोती शिल्लक आहेत ना? ८ आमच्याच दुकानात आहेत. नक्की नंबर कोणालाच माहीत नाही", "अ‍ॅलर्जी? अरे चांगली आयडिया आहे. आपल्याला नाही सुचली. आपण आपले खात बसलो" Happy त्यांच्यातल्या एकाचा "तो आपला अ‍ॅडमिन" म्हणून उल्लेख. "याला म्हणतात व्यवस्थितपणा", ती डिंपल गाडीवर मागे उलट्या बाजूला तोंड करून बसल्याचा शेवटी येणारा संदर्भ ते सगळे छान आहे. जॅमिंगच्या मैफिलीही ठीकठाक आहेत. मला गाण्यातले काहीही कळत नाही. पण तरीही बोअर नाही झाले.

मला इव्हन "लोरी" शब्द खटकला नाही. कारण ते एक स्पेसिफिक हिंदी गाणे आहे. मुलांना त्याबद्दल सांगताना ती "लोरी" आहे हे आईने सांगणे खटकत नाही. गाणे असलेल्या घरात वाढताना तो एक गायनप्रकार म्हणून सांगितला जात असेलही.

तो दात घासण्याचा सिक्वेन्स मला काही खास वाटला नाही. शेवट जसा दाखवला आहे तसा नसता दाखवला तरी काही फरक पडला नसता. एकूण शेवटचा भाग जरा रेंगाळला आहे. तो प्रेग्नंसीवाला प्रकारही बळंच आहे. इथे मला ते अनप्रोटेक्टेड सेक्स बद्दल अस्मिता व इतरांनी लिहीलेले पटले.

आजीचा गिटारवाला एक ढोबळ इंग्रजी "जॉर्ज" आहे. उगाच ओर्हे, दिमित्री वगैरे करून स्पेलिंगवरून उच्चार करताना तुमची दांडी उडवणारे फ्रेंच स्पॅनिश किंवा पूर्व युरोपियन नाव नाही. याबद्दल पिक्चरला आणखी पाच मार्क्स Happy

मी आधीही म्हटलं होतं - तुझ्या (सलीम जावेद लिहितात तशा) दोन हैसियती आहेत. एक ममव फा आणि एक इतर भाषांतले टीव्ही/सिनेमे बघणारा रसवंतीगृहाचा प्रोप्रा फा. Proud

फारेण्डची सूक्ष्म निरीक्षणे आणि नर्म विनोद मला आवडतं. हल्ली अशी कबुली द्यायची भीती वाटू लागली आहे.
अलिकडेच मराठी पुस्तक प्रदर्शनात खरी खरी आवड सांगितली तर लोक नाक मुरडत निघून गेले. खर्‍याचा जामानिमाच राहिला नाही. Sad

धन्यवाद तीपुगा!

हैसियती >> स्वाती Lol जन्मजात ममवपणा असेलच पण सगळे ममव पिक्चर मला आवडतात असे नाही. काही काही मात्र मी भारावून किंवा नॉस्टॅल्जिक होउन पाहिले आहेत. मग त्या चित्रपटांची क्वालिटी कशी का असेना. सुधीर फडके व हा, ही दोन उदाहरणे (पुलंवरचे दोन्ही सुद्धा). त्याशिवाय मला इतर आवडलेले म्हणजे वाळवी हा एक आठवतो. बाईपण भारी देवा मी टीव्हीवर कमी फोकसने पाहिला असता तर कदाचित आवडला नसता. पण थिएटरमधे फुल माहौल मधे मी एन्जॉय केला. झिम्मा माझ्या स्वतःच्या आवडीचा नाही. पण तो अनेक स्त्रियांनी का डोक्यावर घेतला असे मला वाटते तितकेच लिहीले आहे.

तो मधे आलेला एक अंधारातील किस वाला बंडल होता. अलीबाबा आणि चाळीशीतले चोर.

इतक्यात आलेल्या मराठी पिक्चर्स पैकी मला हेच लक्षात आहेत.

AVKMIA ??? >>> असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे - या वाक्याची आद्याक्षरं

अमलताश चित्रपट पाहून नोंदवलेल्या प्रामाणिक अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सूचनांचा विचार पुढच्या वेळी (!) नक्की करू.

AVKMIA ??? >>> असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे >>>>> अरे देवा!!! मी कळलं नाही, कळेल कधीतरी म्हणून सोडून दिलं होतं. जन्मात नसतं कळलं हे.

अमलताश वरच्या चर्चा जबरी आहेत...
"अमोलताश" वर काल खुप वेळ हसत बसले होते ...

अमलताश आला तेव्हा स्पॉटीफाय वर याची गाणी खुप खुप खुप वेळा लुप मधे ऐकली..
सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची..
तुझे श्वास की गंध हा मोगर्‍याचा...
खुप दिवसांनी इतकी गोड गाणी ऐकली होती... त्यामुळे तसाच गोड चित्रपट असेल असं वाटलं होतं..
पण अजिबात नाही आवडला.. आजकाल मराठी चित्रपटात नायकांना टर्मिनल आजार होउन मारायची फॅशन का आलिये ?
"एकदा काय झालं" मधे पण तसंच...साधी सुधी सरळ गोष्ट असुच शकत नाही का ?
स्ट्रगल दाखवा की आयुष्यातले पण आशावाद पण दिसुदेत... ( पाणी बघुन जी शांतता मनात कुठेतरी वाटली तसं चित्रपट बघुन वाटायला पाहिजे )

सदाशिवपेठी घरातली मुलं आणि जॅमिंग सेशन मधे एकपण मराठी गाणं का नसावं ? उगिच कॅनडाची नायिका आहे म्हणुन आम्ही का नुसती ईंग्लिश गाणी ऐकायची ? ... डीजे क्रेटेक्स आजकाल पब मधे पण मराठी वाजवतो.. सदाशिव पेठेतल्या वाड्यात गेला बाजार "तु तेव्हा तशी" तरी वाजवा... लहानपणापासुन दरवर्षी सवाई ला जाणारी पोरं वाटतात सगळी तरी पियानो गिटार कुठुन आले ? मग त्यांना सदाशिव पेठ पेक्षा डेक्कन वरच्या बंगल्यात तरी दाखवायचं...

चित्रपट खुप तुटक तुटक आहे... त्यामुळे पुढचा सीन सुरु झाला की आपलं मागच्या सीन मधलं काही बघायचं किंवा एखादं वाक्य ऐकायचं राहिलं की काय असं वाटत रहातं...

दात घासताना घरभर फिरलं की आज्जी लहान्पणी जी काही ओरडायची.. त्यामुळे खिडकीत उभं राहुन दात घासताना बघुन यक्क झालं...
दाण्याच्या लाडुंचे उल्लेख विनोदनिर्मिती साठी केले असतील कदाचित पण शेवटच्या ऑपरेशन सीन मधे लाडु चा उल्लेख डोक्यात गेला...

WhatsApp Image 2024-12-23 at 12.49.56 PM.jpeg

बाईंना आसमान दाखवा Lol

त्या 'शॉप'मध्ये रिसेप्शनलाच कॅशियर असा बोर्ड पाहून तमाम पुणेकर रसिक आपापले पियानो आणि गिटारी दुरुस्ती आणि सर्विसिंगसाठी रांगा लावताहेत आणि 'कॅशियर'ची पैसे मोजता मोजता दमछाक होतेय- असं चित्र डोळ्यांसमोर आलं.

आणि ओळख ना देख, बाई आल्याआल्याच कॅशियरच्या दाढीचं कौतुक करून मोकळ्या झाल्या- हा आणि एक तपशील. कॅशियर मग खुष होऊन 'यांना जिना दाखवा!' जिनांचं चित्र भारताच्या बाजूला लावलेली वाघा बॉर्डर उगाच आठवून गेली. आम्हाला का दाखवता जिना? तुमचा तुम्ही पाहून घ्या. (काही संबंध नाही. पण व्हाय दोज फिल्मी गाईज शुड अल्वेज हॅव द फन?)

अमलताश बद्दलच्या सर्व प्रतिसादकांना पुन्हा एकदा धन्यवाद.
खूप शिकायला मिळाले मायबोलीकरांकडून. इथे चालू असलेल्या चर्चेबद्दल समजले म्हणून आवर्जून चर्चा पाहिली. सार्थकी लागला वेळ.

मघाशी घाई गडबडीत प्रतिसाद दिला होता.
मायबोलीवर चोखंदळ मायबाप प्रेक्षक आहेत आणि असे प्रेक्षक लाभणे हे त्या भाषेतील कलाकारांसाठी शुभ असते असे मला वाटते. कारण त्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या अभिरुचीचा सन्मान होईल असेच चित्रपट बनवणे बंधनकारक होते. मराठी चित्रपटसृष्टी त्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवते. विविध भाषिक चित्रकर्मी मराठी चित्रपटसृष्टीतील विषय वैविध्याबद्दल कौतुक करत असतात.
मात्र इथल्या प्रतिक्रियांमुळे अशा कौतुकाने हुरळून न जाता काम करत राहणे गरजेचे आहे याची जाणीव झाली.

त्याच वेळी एक खंत व्यक्त करावीशी वाटते.
इथेच मघाशी सहज चाळत असताना एका ठिकाणी जिस्म नामक चित्रपटाचे कौतुक पहायला मिळाले. कुणी जॉन अब्राहम नावाचा नट आहे. हा चित्रपट इंग्रजी आहे कि उर्दू याची माहिती नसल्याने विचारणा केली तर हा एक तद्दन बाजारू, गल्लाभरू चित्रपट असल्याचे समजले. ज्यांच्या कडे विचारणा केली ते प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.

मराठी चित्रपटासाठी चिकित्सक असणारा आपला हक्काचा मराठी प्रेक्षक हिंदी चित्रपटाला वेगळा न्याय का लावत असेल या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही.

आपल्या मराठी प्रेक्षकाने आपल्याच चित्रपटांना उचलून धरले नाही तर या इंडस्ट्रीची वाटचाल भविष्यात कठीण असेल ही खंत आहे.

रादे .. तुमच्या मताचा अत्यंत आदर आहे.. !

तुम्ही जिस्म चित्रपटाच्या संदर्भात ज्या धाग्यावर वाचलं तो प्रतिसाद मी लिहिला होता.. खरंतर मी कौतुक चित्रपटाच नाही केलं .. त्यातल्या गीतांचं केले होतं.. आणि एखादया देखण्या हिरोचं कौतुक करणं गुन्हा आहे का..?

तुम्हांला खंत वाटण्यासारखं माझ्या प्रतिसादात काहीही नाही.

तसंही चित्रपट व्यवसाय हा इतर व्यवसायासारखा व्यवसायचं आहे निदान मी तरी हे मानते.. . कुठेतरी त्यातल्या संबधित कलाकारांना कौतुक, प्रसिद्धी, पैसा , पुरस्कार हा हवाच असतो...

तुम्ही त्या धाग्यावर प्रतिसाद दिला असता तर मला आवडलं असतं..

मी सुद्धा अमलताश चित्रपटाची चर्चा वाचतेयं.. चित्रपट माझ्या पाहण्याच्या लिस्ट मध्ये आहे..

मला वाटते मायबोली वर चित्रपटाच्या, कलाकारांच्या इतरही बऱ्याच चर्चा चालतात.

मात्र तुम्ही इतर चित्रपटांच्या धाग्यावर प्रतिसाद दिलेला मी तरी निदान वाचला नाही.. मग तेवढा माझा एकच प्रतिसाद तुम्ही वाचलात का.. आणि इथे प्रतिसाद लिहिलात ? दुजेभाव केलात का..? बाकी इतर भाषेतल्या चित्रपटांच्या चर्चेवर तुम्ही कधी आक्षेप घेतलात का..?

मराठी चित्रपट म्हणा किंवा मराठी भाषा म्हणा .. मराठी हे माझं पहिलं प्रेम आहेच.. पण म्हणून इतर भाषेतला चित्रपट पाहू नये असं थोडं आहे..

तुम्ही चित्रपटासारखी उत्तम कलाकृती बनवताहेत हे वाचून खूप कौतुक वाटलं . .. मात्र मी लिहिलेल्या प्रतिसादावरचा तुमचा मुद्दा मला खटकला.

मी अमलताश पाहीलेला नाही. पण तुम्ही इथे स्वतः येउन काही मुद्दे मांडलेत, ते आवडले. तुमची गाणी आवडतात. विशेषतः भक्तीमय. आणि त्यानंतर केलेले भाष्यही ऐकते.

Pages