मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या गोष्टीला नावच नाही बघितला. कथेचा जीव लहान आणि अडीच तास त्यासाठी म्हणजे खूप मोठा वाटला. बरेचसे सीन रटाळ होतात. आर्टफिल्म आर्टफिल्म म्हटल्यावर लांबच लांब ब्लँक सीन दाखवणे अनिवार्य असते का?
स्पॉयलर सुरू:
कथा काय तर एक गरीब घरचा काहीतरी किडनी issue असलेला पण खूप हुशार म्हणजे टॉपर हुशार, त्याचं होस्टेलवर येणं, पेटी वाजवणं, लायब्ररीत मित्रांनी भरीस घातल्याने एका मुलीसोबतचे छोटेखानी बंध, मग एक वर्ष संपता संपता घरी गेल्यावर dialisis पर्यंत पोहचून, त्यात घर विकून, बहिणीची किडनी घेऊन झालेलं ऑपरेशन. साधारण जास्तीत जास्त 1 ते दीड तासात उरकता आला असता.. चित्रांकन मात्र कमाल आहे.

माझ्या मते उत्तम आर्टफिल्मचं उदाहरण म्हटलं तर सुम्बरान, देऊळ, झालंच तर बनगरवाडी.. हे तिन्ही चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलेत आणि बाकी काही दर्जेदार सापडलं नाही तर यातला एक बघतोच मी. वळू सुद्धा कॉमेडी आर्ट वाटतो.

रादेने घरातल्या, बाहेरच्या गमती जमती मोबाईलवर शुट करुन यु ट्युबवर टाकल्यासारखे वाटते बघताना >>> Lol

सगळ्याही "गमतीजमती" नसाव्यात. कोणाला वाटल्या किंवा वाटल्या नाहीत यावरून त्याचे एक टेबल होईलः

कलाकारांना "गमतीजमती" वाटल्या, व प्रेक्षकांनाही - "ही काळी आई, धनधान्य देई" वाला सीन. तो मस्त जमला आहे.
कलाकारांना वाटल्या नाहीत पण प्रेक्षकांना वाटल्या - दाणे वाले सीन्स. मला ते मजेदार वाटले. किंवा "सपे टॉक"
कलाकारांनाही वाटल्या नाहीत व प्रेक्षकांनाही - दात घासण्याचा सीन
कलाकारांना वाटल्या असाव्यात पण प्रेक्षकांना नाही - दात घासण्याच्या आधीचा ध्वनित प्रसंग.

पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी चांगली असूनही सिनेमा फालतू असतो असंही होतं >>> सहमत. खरे तर आजकाल असेच जास्त असते. पिक्चर पूर्वीसारखा दरिद्री वाटत नाही. चकचकीत असतो. पण खिळवून ठेवणारे काहीच नसते.

वेंटिलेटर पिक्चर बघितला
आधी नावावरून गंभीर असेल असं वाटलं होतं, पण छान हलकाफुलका आहे.
कुठेही कंटाळवाणा नाही झाला
सर्वांची कामे आणि स्क्रीन प्ले, प्रॉडक्शन क्वॉलिटी छान

प्रियांका चोप्रा निर्माती असलेले दोन्ही चित्रपट छान आहेत... पाणी आणि हा ही

अजिंक्य पाटिल, प्राईमवर हा चित्रपट आहे हे बघितल्यावर मी उत्सुकतेने पाहिला आणि सेम मत झाले.

तरीही आवडला. मुक्या शहरात आल्यावर हळुहळु कसा बदलत जातो हे खुप छान दाखवले आहे. शहरात आलेली गावची मुले नेहमीच बिघडत नाहीत तर त्यांना जे नवे अनुभव येतात त्यावरुन त्यांच्या जाणीवा विस्तारत जातात, नवे विचार करण्याची बुद्धी होते हेही दाखवलेय. गावात फक्त दशावतारी नाटके बघितलेली असलेला मुक्या पहिल्यांदा वेगळे नाटक पाहतो तेव्हाची प्रतिक्रिया आवडली.

पोरांनी/ पोरांकडून मस्त काम केले/ करवून घेतले आहे. स्टिरीओटाइप सगळे मोडले आहेत. गावातला मुलगा झापड बंद किडा असतो तर शहरातील मोकळ्या विचारांचा, अनुभव घेण्यास उत्सुक, शारीरिक श्रमाची सवय असलेला, आणि गावातल्या मुलाला सांभाळून घेणारा असा असतो. उगा कोणी काळं पांढरं नाही हे आवडलं.
पण मूळ मुद्दा जो शेवटी उलगडतो तो असेल तर त्याचा आधीच्या सगळ्या प्रवासाशी सांधा जुळत नाही, किंवा जुळवायचा आणखी प्रयत्न हवा होता वाटतं. कॉलेज जीवन छान दाखवलं आहे, पण ते तितकंच अजून कमी वेळात दाखवता आलं असतं तर वेग राहिला असता. शेवटी डॉक्युमेंटरी टाइप झालं, तोच संदेश जरा मनोरंजनातून द्यायला हवा होता वाटलं.
एकूण साधा सरळ फील गुड आहे. छोटा हवा होता.
नाव असं का आहे की नावच नाही? तसं पुस्तकाचं नाव आहे म्हणून का?

#तदैव लग्नम बघितला दोन चार दिवसापूर्वी कोथरुड सिटीप्राईडला.... बऱ्यापैकी भरले होते थिएटर!!
घिसीपिटी आणि प्रेडिक्टेबल स्टोरी आहे पण बोअर नाही झाला .... बरेच लाईट मोमेंट आहेत तसेच काही चांगले सेंटी सीन पण आहेत!!
तेजश्री आणि सुबोध भावेला त्यांच्या हातखंडा भुमिका मिळाल्या आहेत..... तेजश्रीचा अभिनय जास्त आवडला!!
वन टाईम वॉच नक्की आहे!!

"पाणी" पाहिला. फील गुड सिनेमा आहे. त्रुटी आहेत, पण नक्कीच एक चांगला प्रयत्न.
खरीच कथा आहे असे वाचले. मराठवाड्यातली भाषा आदिनाथ आणि सुबोध च्या शुद्ध शहरी जिभेला झेपलेली नाही. तरी पण काम चांगले केलेय आदिनाथ ने. त्यांची लव स्टोरी क्यूट आहे. पाणी आणि इतर फाउंडेशन्स च्या कामाबद्दल ऐकून माहित होते. पण मला काही प्रश्न पडले, कदाचित घोर अज्ञान असू शकेल - हे पाण्यासाठी अनेक, शेकडो खड्डे खणणे, विहिरी खणणे या कामाला एन्जिओ किंवा सरकारी मदतीने जेसीबी, किंवा काही इक्विपमेन्ट नाही मिळू शकत का? माणसांनी हाताने कुदळ फावड्याने खणण्याला इतर काही पर्याय नाही का असे वाटले.

विहिरीला पैसे मंजूर नसतात म्हणून हाताने खणली. खड्डे खणताना जेसीबी ने फक्त एका व्यक्तीला रोजगार मिळाला असता. दुष्काळी भागात फक्त काम करून घेणे हे एकच उद्दीष्ट नसावे, बरोबर तेथील लोकांना रोजगार देणे हे ही उद्दीष्ट असावे. त्याच बरोबर भावनिक जवळीक ही घाम गाळल्याने होईल असा विचार असेल. आणि अगदी प्रॅक्टिकल कारण, ही कथा कधी घडते कल्पना नाही पण तेव्हा गावकुसात जेसीबी नसेल इतका उपलब्ध. मी भारतात होतो तेव्हाही मुंबईत एमटीएनएल, एमेसीबी इ. लोक रस्ते खोदणे कामात कुदळ फावडीच वापरात आठवतं.

हां असेल तसेच.
सिनेमात पाण्याचे दुर्भिक्श्य मनावर ठसत जाते. सुरुवातीचा सीन तर आहेच, पण एका सीन मधे सुभा एका म्हातारीला प्यायला पाणी देतो अन ती पिताना जरासे पाणी सांडत पिते ते बघून आपल्यालाच एकदम धस्स होते , की अरे अरे पाणी सांडतंय ना!! लोकांची पाणी वाचवून वापरायची धडपड पण लक्षात राहते. आंघोळिचे पाणी, भांडी धुतलेले पाणी रीसायकल करणे वगैरे. ओवरॉल इम्पॅक्ट चांगला आहे.

रजत कपुर हिरोचे गाव प्रकल्पात घेतो, किमान ४ वर्षे तरी काम असणार असे सुरवातीला दाखवले. पण नंतर पहिल्या वर्षानंतर पैसे मिळणे बंद होते व त्यामुळे लोक सोडुन जातात असे दाखवले. पहिल्या वर्षातच विहिरिंना पाणी लागण्याइfunction at() {
[native code]
}अके पाणी कसे मुरेल? एका संवादात ‘आधी नोवेम्बरात विहिरी कोरड्या होत, यंदा मार्चपर्यंत पाणी राहिले‘ असे म्हटलेय ते जास्त योग्य वाटते.. चित्रपट प्रकल्पावर नसुन हिरोच्या प्रयत्नांवर आहे त्यामुळे मधले काही वगळले असावे असे समजुन घेतले.

>>> ष्काळी भागात फक्त काम करून घेणे हे एकच उद्दीष्ट नसावे, बरोबर तेथील लोकांना रोजगार देणे हे ही उद्दीष्ट असावे.
तोच प्रोजेक्ट असतो ना रजत कपूर/ सुभाचा? गावकर्‍यांच्या श्रमदानातूनच काम करून घ्यायचं असतं - आणि आपल्याच गावात पाणी आणायसाठी आपल्यालाच पैसे मिळणार म्हणून तर तयार होतात लोक सुरुवातीला. पण त्याला टाइम लिमिट असतं - ते संपल्यावर पंचाईत होते.

ह्म्म.
या परिस्थितीमधे स्वतःचे आणि गावातल्या पब्लिक चे मोटिवेशन टिकवणे खरंच किती अवघड असेल हे समजते. त्यात पाऊस केव्हा किती येईल आणि विहिरीला पाणी केव्हा लागेल यातली अनिश्चितता! या माणसाच्या लव्स्टोरीने त्याला ती एक होप , ते मोटिवेशन दिले असावे.

>>> ते टाईम लिमिट मला ४ वर्षांचं वाटलं
हो - किती ते मला नक्की आठवत नव्हतं, पण >>> ‘आधी नोवेम्बरात विहिरी कोरड्या होत, यंदा मार्चपर्यंत पाणी राहिले‘ असे म्हटलेय <<< हे आठवतंय. Happy

तुमी लोकं त्रैराशिक मांडून कुडं (जास) पाणी मुरतंय काडून रायले. तिच्या बापान याले महिना दिला तर महिन्यात हिरीला पाणी लागाय नको?
ते काय चार वर्षे बिन लग्नाचे रहातील का? जरा तरुणांचा विचार करा की! Wink
कठिणे राव! Lol

कोठे पाहिलात लोकहो? आयपीटीव्ही व्यतिरिक्त कोठे आलेला आहे का? मागच्या आठवड्यात शोधला होता तेव्हा नव्हता.

ललन, नक्की बघ. स्टेरिओ टाईप्स मोडलेत. आपल्याला वाटते आता हा अशी प्रतिक्रिया देईल, तर तो बर्रोब्बर उलट वागतो Happy

'लाईक आणि सबस्क्राईब' प्राईमवर चार डॉलर रेन्ट देऊन बघितला.
जुई भागवत, राजसी भावे, अमेय वाघ, अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. सस्पेन्स थ्रिलर, मर्डर मिस्ट्री वगैरे आहे. खूप दिवसांनी मराठी चित्रपटात चांगला जमलेला थरार बघायला मिळाला आहे. जुई आणि राजसी अतिशय गोड ममव मुली दिसतात. त्यापैकी जुई ही व्लॉगर व त्या मार्गाने अभिनय क्षेत्रात काम शोधणारी स्ट्रगलर आहे. अमेय ह्याची टोपी त्याला व त्याची टोपी याला घालणारा, इन्शुरन्स फ्रॉड करणारा ठग आहे. त्याची व या दोघींची कथा गुंफत जाऊन मग उलगडत जाते. कथा वेगवान व एंगेजिंग वाटली. अमृताचे कामही चांगले आहे. शेवटही आवडला. रहस्य शेवटपर्यंत टिकून राहते व शेवट अनपेक्षित आहे. सर्वांची कामे उत्तम झाली आहेत. विनोदही आवडले. जरूर बघा.

भारतीय प्राईमवर दादा कोंडकेचे आठ चित्रपट हल्लीच आलेत.

एकटा जीव सदाशिव
राम राम गंगाराम
पांडु हवालदार
बोट लाविन तिथे गुदगुल्या
आली अंगावर
तुमचं आमचं जमलं
ह्योच नवरा पाहिले.
सोन्गाड्या

मस्त करकरीत नव्या कोर्‍या रंगीत प्रती आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा. मी ए जी स बघितला. सोंगाड्या बघेन आज. मळ्याच्या मळ्यामंदी…. मधले संपन्न शेत बघुन जीव सुखावला.

Like n subscribe च्या रेको बद्दल आभार सर्वांचे.
चांगला आहे.
शेवटी तिने l n s करायच्या ऐवजी कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं.

प्राईम वर.
काही काही डाऊट्स आहेत. पण स्पॉयलर्स होतील. वेगळा धागा काढला तर विचारेन तिकडे.

सगळ्यांचं बघून झाल्यावर प्राईमवर ' पाणी ' बघितला.
मस्त आहे. खिळवून ठेवतो. कुटुंबासमवेत पाहिला. आवडला.
मी एकीकडे कामं उरकत होते (स्त्री जन्मा ही तुझी कहाणी) त्यामुळे काही शॉट्स (including आ को चे अंघोळ शॉट्स) मिस झालेत असे आता जुनी परीक्षणे वाचून जाणवते आहे. पण तेवढ्यासाठी लगेच पुन्हा बघणार नाही.

आदिनाथ कोठारे ने खूप transform केलेले जाणवले स्वतः ला सिनेमासाठी. नाहीतर एरवी त्याची बॉडी वगैरे चांगली आहे. सिनेमातल्या बारीक बॉडीचे अंघोळ शॉट्स बघणे मिस झाले याचे दुःख कमी झाले एकदम.

लाईक अ‍ॅण्ड सबस्क्राईब वर धागा आलाच नाही Happy
इथेच विचारू का ?

पुढच्या पोस्टमधे स्पॉयलर्स आहेत. ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी पुढची पोस्ट डोळे मिटून स्किप करावी.
एखादा शब्द दिसला तरी क्ल्यू मिळू शकतो. Sad

Pages