मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे लाईक आणि सबस्क्राईब.. शेअर करायला हरकत नाही. आवडला मला. सर्वांचे कॅरेक्टर फ्रेश वाटले. जी स्टोरीची गरज सुद्धा होती. अमेय वाघ ने पूर्ण चित्रपटभर मस्त बेरिंग पकडले आहे..

Take Care Good Night >> सचिन खेडेकर ना? खूप आधी (इथे रेको वाचून) पाहिला होता. लक्षात नाही जास्त.
सायबर फ्रॉड, मुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं, बदनामी होते. त्या आधी मुलाच्या कि मुलीच्या चुकीमुळे बॅंक बॅलन्स साफ झालेला असतो. ती घाबरून घरी काही सांगत नाही. नंतर बहुतेक ब्लॅकमेलिंग असं काही तरी आहे.

सचिन खेडेकर मुलांना धीर देऊन बदनामी ला कसं तोंड देतो. मुलांना आत्मविश्वासाने कसं पुन्हा उभं करतो आणि अशा परिस्थितीत कुटुंबाला एकत्र ठेवतो ते छान आहे.

पण ते तपास करतात तो भाग ठीकठाक आहे. म्हणजे शेवट पर्यंत आपण पाहू शकतो. त्या वेळी नवीन विषय होता म्हणून आवडला. अजूनही फ्रॉड होतच असतात. अशा वेळी कसं वागावं यासाठी पहायला हरकत नाही.

यूट्युबवर हल्ली सायबर फ्रॉड च्या विरोधात पेव फुटले असल्याने आता विशेष वाटणार नाही कदाचित. हा त्या वेळी प्राईम ला पाहिला होता. युट्यूबवर लगेच साउथचे या विषयावरचे कितीतरी मूव्हीज फीडमधे येत होते. ते अचाट होते हा साधा सरळ आहे.

आज नाळ २ पाहिला. इतका निरागस चित्रपट आहे की मी परत १ व २ पाहिन.
छोटी चिमी खुपच गोड, चैतुची धडपड पण नैसर्गिक वाटते. चित्रपट सुरु आहे असे वाटत नाही इतका गोड चित्रपट Happy

अंमलताश बद्दल राहुल देशपांडेचा हा व्हिडीओ.

https://www.instagram.com/p/DEB0flrCNcb/?utm_source=ig_embed&utm_campaig...
नेटफ्लिक्स, प्राईम, सोनी लिव्ह कुणीच हा चित्रपट घेतला नाही. नेफ्लि ने कारण दिले कि रीजनल स्पेशली मराठी मधे त्यांना इंटरेस्ट नाही. तर सोनी लिव ने सांगितले कि या वर्षी आम्हाला मराठी चित्रपट घ्यायचाच नाही. वायकॉमने सुरूवातीला करार केला होता पण चित्रपट बनताना कोविड आलं त्यामुळे त्यांनी नकार दिला. म्हणून रादेने युट्यूबवर हा चित्रपट विनाजाहीरात मोफत रीलीज केला.

या सर्व वाहीन्यांवर इतर भाषेतले चांगल्याबरोबर अतिशय टुकार सिनेमे पण आहेत. तसेच हॉलिवूडचे इंग्रजी सिनेमे, मालिका रीजनल भाषेत डब करून रीलीज होतात. मराठी भाषिकांनी या ओटीटी वाल्यांना झटका दिला तरच जागेवर येतील हे. साऊथ वाले तर हॉलिवूडला सुद्धा रीजनल डबिंगसाठी भाग पाडतात. कारण ते त्यांची भाषा सोडून इतर भाषेतल्या चित्रपटांना नगण्य स्थान देतात. आपण मात्र सबटायटल्स वाचून यांचे सिनेमे पाहतो.

सगळी नफ्याची गणितं असतात. एखादा नफा नाकारून कुणी मुद्दाम मराठी सिनेमांना नको म्हणेल असं वाटत नाही. इतर भाषांच्या तुलनेत, अगदी टुकार सिनेमांच्या तुलनेत, मराठी सिनेमांना प्रेक्षक नाही ह्याचाच हा परिणाम असावा.

अशी नफ्याची गणितं असतील तर मराठी प्रेक्षकांनी यांचा नफा कमी करावा. दक्षिणेचे लोक अन्य भाषेतले सिनेमे बघत नाहीत. त्यामुळं त्यांचा धंदा होतो, मग टुकार सिनेमे पण पाहिले जातात. तेच बंगालीचंही आहे. इथल्या बहुतांश लोकांना इतर भाषा समजत नाहीत. मराठी प्रेक्षक हा अनेक भाषेतल्या कलाकृतींना दाद देतो. त्यामुळं मराठीत सिनेमा नाही पाहिला तरी चालतं. उदार असण्याचा हा तोटा आहे.

रघू आचार्य यांच्याशी सहमत. हिंदी चित्रपटांचा बिझनेस अजूनही 40 टक्के तरी महाराष्ट्रातून होतो. पण आपण अतिशय उदार आहोत

हे पण पटलं नाही. मराठी माणूस औदार्य म्हणून सिनेमे बघत नाही. त्याला जे बघायला आवडेल, तेच तो बघणार. आता मराठी माणसांना काय आवडेल हे मराठी सिनेमावाल्यांपेक्षा इतर भाषकांनाच जास्त कळलं आहे बहुतेक, त्याला ते काय करणार! सिनेमा बनवणाऱ्यांना आत्मपरीक्षण करायची गरज आहे.

आता मराठी माणसांना काय आवडेल हे मराठी सिनेमावाल्यांपेक्षा इतर भाषकांनाच जास्त कळलं आहे बहुतेक, त्याला ते काय करणार! सिनेमा बनवणाऱ्यांना आत्मपरीक्षण करायची गरज आहे. >>> विषय सिनेमा कसा आहे हा नाहीच. तुम्ही इतर सिनेमे बघतच नाही म्हणून ती इंडस्ट्री ग्रो होते. पैसा ओतून भव्य सिनेमे बनवता येतात हा आहे. आणि तुम्ही बघत नाही म्हणून ओटीटी वाले पण दखल घेत नाहीत.

मराठीत अनेक सिनेमे दर्जा असून मागे पडले. नाळ हा सिनेमा चांगला नाही का ?
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. २ कोटी लोकांनी पाहिला तर तो सुपरडुपर हीट होईल. मराठीत हिट होऊ लागले तर बाहेरचे लोक त्यात इंटरेस्ट दाखवतील हा मुद्दा आहे.

दर्जा आणि पिक्चर चालण्याचा काही संबंध नाही. हिंदीत पण नाही. सहसा मासेस साठी बनवलेले पिक्चर चालतात. अमलताश तसा मुळीच नाही.

हपा
बघा लक्षात आलं तर. साऊथची इण्डस्ट्री बाल्यावस्थेत असताना त्यांनी रजनीला घेऊन अमिताभच्या पाच पिक्चर्सची कॉपी मारली. ती सक्सेस झाली. ते पिक्चर वाईट नाहीत तर एकदम वाईट आहेत. पण तिकडे हिंदी बघतच नाहीत. सो हीट झाले.

मराठीत डॉन बनवला असता तर चालला असता का ?
एव्हढे बोलून मी खाली बसतो.

मराठी तामीळ कन्नड हिंदी भाषिक वगैरे भेद केल्याने राष्ट्रीय एकात्मता कमी नाही का होत असा विचार मनात आला Happy

मला मराठी चित्रपट बघायला जास्त आवडतात. याचे कारण म्हणजे मराठी माझी मातृभाषा असल्याने ते मनाला जास्त भिडतात. त्यामुळे चांगले मराठी चित्रपट लोकांनी थेटर मध्ये जाऊन बघावेत, त्यांचा व्यवसाय व्हावा, आणि मराठी चित्रपट सृष्टी भरभराटीला येऊन अजून चांगले मराठी चित्रपट बनावेत असे वाटते.

पण उद्या मराठीत काहीही बनवाल तर केवळ आपल्याच मराठी लोकांनी काढला म्हणून पाठीशी घालण्यात अर्थ नाही. किंवा इतर भाषेत कोणी काही चांगली कलाकृती बनवली तरी ती परप्रांतीय म्हणून टारगेट करण्यात अर्थ नाही.

थोडक्यात मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालून मायबोलीवूड मध्ये पैसा यावा अशी इच्छा आहे ती यासाठी की ते पैसे वापरून चांगले चित्रपट बनतील. पण बंडल चित्रपट बनवून जर ते श्रीमंत होणार असतील तर मला त्याच्याशी सुख दुःख राग लोभ ईर्ष्या काही नाही. कारण व्यवसाय म्हणून हवे ते करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

साऊथ मधला हिंदी द्वेष आपण उचलायची गरज नाही. शिवाय त्यांचा तो द्वेष सिनेमामुळे आलेला नाही. त्याची पार्श्वभूमी राजकीय सामाजिक आहे आणि तिचे पडसाद सर्वच क्षेत्रात आले आहेत. सिनेमा फक्त त्यातील एक पैलू आहे. आपल्याला केवळ सिनेमासाठी तसं करायचं तर तसं प्रॅक्टिकली शक्य नाही. लोकांना आवडत नाहीत असे सिनेमे ते बळजबरी का बघतील?

असो. माझा मुद्दा बहुधा मला नीट सांगता येत नाहीये. मी तरी का फार वेळ उभा राहू? पाय दुखायला लागले. मी पण खाली बसतो.

साऊथ मधला हिंदी द्वेष आपण उचलायची गरज नाही. >> +१

पण हे त्यांच्या यशाचे कारण आहे.
>>>>>

सावधान.. रेड फ्लॅग!

मेहनत आणि अंगीभूत असलेली कला हेच यशाचे कारण असते. द्वेष म्हणण्यापेक्षा कोणावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होणे, जिद्दीने स्पर्धेत उतरणे हे कारण म्हणू शकतो. द्वेष आपल्याजागी असू शकतो पण द्वेष असल्यामुळे हा निष्कर्ष नको. त्यातून चुकीचा संदेश जातो आणि प्रत्यक्षात देखील द्वेष हे कधीच यशाचे कारण असू शकत नाही. त्या केसमध्ये मग तुमचे यश मोजायचे परिमाण चुकलेले असू शकते.

आणखी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे जसे आपण महाराष्ट्रात हिंदी पिक्चर खूप बघतो त्यामुळे आपलेच मराठी पिक्चर बघायचे प्रमाण कमी होते हे लॉजिकली बरोबर वाटत असले तरी.. त्याचप्रमाणे मराठी कलाकार हिंदीत सुद्धा काम करतात. अभिनयच नाही तर संगीत दिग्दर्शन सगळ्यात असतात. आणि तीच हिंदी भाषिक टीम आपण मराठी चित्रपट बनवताना सुद्धा वापरतोच आणि त्यातच सर्वाचा फायदा आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे एका तळ्यात राहून आपसात वैर (किंवा द्वेष म्हणा) करण्यापेक्षा जास्तीत जास्त जुळवून पुढे जाणे हेच कधीही लॉजिकली जास्त करेक्ट आहे आणि असते.

कुल दिसणारे प्रतिसाद देण्याची सवय लागली कि प्रॅक्टीकल गोष्टी दिसेनाशा होतात.
अमलताश वरून चर्चा सुरू झाली. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वाले मराठी नको असे सरळ सांगतात कारण मराठी प्रेक्षक मराठी पिक्चर बघत नाही एव्हढे साधे सिंपल आहे. जर मराठी लोकांनी मराठी चित्रपट पाहिला तर असे होणारच नाही.

यात मराठी माणसाचा द्वेष कुठून आला ?
समोरच्या माणसाच्या मनात द्वेष आहे आणि मी त्याला संतवचने सांगून सुधरवतोय हे बेअरिंग पकडले कि या बेअरिंगचे भक्त द्वेष द्वेष म्हणून भुई आपटू लागतात. द्वेष करू नयेच हे बरोबर. पण वर्गात मास्तरांनी सांगितले कि हापूस आंबा हा कोकणचा अभिमान आहे तर त्यांना काय सांगायचे "ओ गुर्जी तुम्ही इतर आंब्यांचा द्वेष करता ?"

इथे साऊथचे लोक हिंदीचा द्वेष करत नसून त्यांची तमिळ प्राचीन असल्याची भूमिका आहे. यात द्वेष नाही. पण ते मराठी माणसाशी सुद्धा मराठी बोलत नाहीत. कस्टमर केअरला कॉल गेला तर "ओन्ली तमिल ऑर इंग्लीश" असे तो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगतो. यातही तो मराठी भाषेचा द्वेष करत नाही तर त्याच्या दुराभिमानामुळे तो अडाणचोट झालेला आहे .

पण त्याच्या या अडाणचोटपणाने त्यांच्याकडे भाषिक मार्केट एकसंध राहिले आहे हा मुद्दा आहे.
आपल्याकडे असा कट्टरवाद नाही. त्यामुळे हिंदी, इंग्रजी पासून ते इराणी, कोरियन, चायनीज, तमिळ, बांग्ला, तेलगू, कन्नड, मल्यालम, उडिया असे सगळे आपण पाहतो..

बॉलीवूड इथेच असल्याने हिंदी चित्रपट इथे बहरले पण ते मराठीचा घास घेऊन.
दर्जाचा मुद्दा इथे आला. दर्जाचा आणि भाषिक एकसंध मार्केटचा काहीही संबंध नाही. सगळे बिंदू जोडून बघा आता.

मधेच दर्जा, मध्येच द्वेष मधेच असे काही तरी स्टेशन लागले तर समजून घेणं अशक्य आहे.
ओके आता मात्र जमिनीवर लोळण घेतो. ज्याला द्वेषाचा झिम्मा घालायचा त्याला संपूर्ण सहकार्य !

संतऋन्मेष जी, च्रप्स आयडीचा पासवर्ड मला पण द्या कि.
एखादा आयडी अ‍ॅप्रूव्ह करून घेईन Happy

जोक आहे बरं का, नाहीतर खरंच वाटेल.

ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी चित्रपट घेत नाहीत किंवा फार कमी पैसे देतात कारण त्यांना प्रेक्षक नाही.
प्रेक्षक नाहीत म्हणून निर्माता पैसे गुंतवायला तयार नसतो. त्यामुळे बजेट कमी. कमी बजेट असल्यामुळे कथाही त्या बजेटला साजेश्या निवडाव्या लागतात.
मराठी प्रेक्षक म्हणजे नक्की कोण, असाही प्रश्न आहे. त्याची उकल नक्की न जमल्याने सिटीप्राईड कोथरुड इथे चालतील असे सिनेमे तयार होतात, नाहीतर सैराटची नक्कल तयार होते.
मलयाळम चित्रपट मराठी प्रेक्षक पाहतात, पण तसे चित्रपट मराठीत आल्यास बघतील का, ही शंका आहे.

हपा, वावे धन्यवाद

@आचार्य, चित्रपट राजकारण समाजकारण एकूणच चालू घडामोडी याबाबत माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला समजते.
"द्वेष हेच यशाचे कारण" अशी आपली पोस्ट दिसली म्हणून ते द्वेषभावनेचे उदात्तीकरण होतेय की काय असे वाटले म्हणून चटकन प्रतिसाद दिला. आधीच आसपास फार द्वेष बघतोय आपण ज्यात कित्येक लोकं आपापले अभिमान अहंकार कुरवाळत बसले आहेत. त्याचा फायदाच होतो असा चुकीचा संदेश जायला नको म्हणून ती पोस्ट लिहीली. अन्यथा वर म्हटले तसे तुम्हाला या विषयातले माझ्यापेक्षा जास्त समजते हे मान्य आहेच Happy

भाषिक कट्टरपणामुळे तमिळ चित्रपटांना फायदा झाला. त्याचा आणि दर्जाचा संबंध नाही.
जर महाराष्ट्रात उद्या मनसे किंवा अन्य कुणी इतर भाषिक सिनेमे येऊ दिले नाहीत तर लोकांना पर्याय नसेल. मग बघतील कि मराठी सिनेमे.
डॉन वरून रजनीकांतचा बनवलेला सिनेमा जर पाहिला तर तमिळ प्रेक्षकांच्या आवडीबद्दल शंका निर्माण होते. त्या मानाने मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे. त्यामुळं इथे सिनेमे बनवणे कठीण आहे. जर निर्मात्याला मी कसाही सिनेमा बनवला तरी लोक पाहतील हा विश्वास असेल तर काही वर्षे तसेच सिनेमे बनवून मराठी किंवा कुठलीही चित्रपट सृष्टी बहरेल. नंतर पैसा आला कि भव्य सिनेमे सुद्धा बनू लागतील.

पैसा मिळणारच नाही ही खात्री असेल तर हातचं राखूनच निर्माता खर्च करणार. मराठीत प्रत्येक कामाला हिंदीच्या पाव पट किंवा त्या पेक्षा कमी बिदागी मिळते.

शिवसेनेची प्रांतीय किंवा भाषिक कट्टरतावादाची भूमिका कधीही पटलेली नाही. पण मद्रासला रेल्वे भरतीसाठी गेलो असताना हिंदीत बोलल्यावर खूप विचित्र अनुभव आले. आम्हाला तिथल्या लोकांनी लगेच परत जा म्हणून सांगितले. माझ्या मामेभावाने तर मार खाल्ला होता.

या भाषिक कट्टरपणाला सुधरवायचे तर संतवचनांनी ते सुधारू शकत नाहीत. त्यांना पण आपण तशीच अडाणचोट भूमिका घेतली तरच ते सुधारतात. नाहीतर मुंबईत बसून तमिळ माणूस आपल्याला कस्टरमर केअर मधे बसून तमिळ ऑर इंग्लीश असे थाटात सांगतो आणि आपण मान डोलावतो. आपण त्याला महाराष्ट्रात मराठीत बोल असे म्हटले तर आणि तरच ती नोकरी मराठी मा णसाला जाते.

हे भाषिक मार्केट असते. मराठी माणूस आपले नुकसान असे करत असतो.
महाराष्ट्राबाहेर सर्वांनी मराठी बोलावी ही भूमिका मराठी माणूस घेत नाही. हिंदी भाषिक लोक इथे हिंदी येत नसेल तर तो देशद्रोह आहे असे सांगतात. तशी हिंमत त्यांची तमिळनाडूत होत नाही.

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा गैरसमज मराठी माणसात आहे आणि त्याला हिंदी राजभाषा सप्ताह कारणीभूत आहेत. ते कधीही चौदा भाषा राजभाषा आहेत असे सांगत नाहीत. नारायण पेठेतल्या त्यांच्या ऑफीस मधे मी त्यांना हे सांगितलेले आहे.

राजभाषा आणि राष्ट्रभाषा यात फरक आहे. हिंदी राष्ट्रभाषा बनण्याच्या वेळी संसदेत घमासान झाले होते. त्यामुळे ती एकच एक राष्ट्रभाषा बनू शकली नाही. राज्य (स्टेट) म्हणजे केंद्राच्या कामकाजाची भाषा ती राज भाषा. त्यात चौदा प्रमुख भाषा येत होत्या. आता बहुधा वाढ झालेली आहे.

या परिस्थितीत फक्त मराठी माणूस प्रॅक्टीकल आहे.
राजस्थानने त्यांची पहिली भाषा हिंदी ठेवली. यामागे त्यांचे आर्थिक कारण होते. पण त्यामुळे ते हिंदी भाषिक गणले जाऊ लागले. तिथे आजही मुख्य भाषा राजस्थानी आणि अन्य काही आहेत. हिंदी ही मातृभाषा असलेले फार थोडे आहेत. हिंदी ही पहिली भाषा झाल्याने शाळेत राजस्थानी अनिवार्य नाही. आता तिकडे राजस्थानी, मारवाडी आणि अन्य मूळच्या भाषेत सिनेमे बनतच नाहीत.

Pages