मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> खटकूनही ॲक्सेप्टेबलच
आय नीड टाइम टु थिंक अबाऊट धिस. Lol

>>> तिची आई तिला मॉम म्हणू न देता आईच्च म्हण सांगते, टीफिन ला डब्बा वगैरे
हो की नाही?!

तो व्हिड्यू शूट करत असेल तर साधारण कॅमेरा हलताना, ब्लर होताना, व्हिडिओ रेकॉर्ड होतोय हे कलाकार मुद्दाम कॅमेरात बघुन, हसुन, कॅमेराशी बोलून दाखवतात किमान फ्रेम इन फ्रेम/ प्ले बटण दाखवायची पद्धत आहे.
तसं आठवत तरी नाही. बघतो परत मिस झालं असेल तर.

Lol टेक युवर टाईम.

हा पिक्चर पहायचं अजिबातच मनात नव्हतं आणि आता तर अजिबातच पाहणार नाही. डोक्यात - दाणे, लाडू, टक्कल, जिने, संडास, सतरंजी, मोदक - असे अनेक एकमेकांशी संबंध नसलेले ( आणि पिक्चरच्या नावाशी तर मुळीच संबंध नसलेले ) शब्द फिरायला लागलेत. ते टाळून हा पिक्चर पहायला जमेल असं वाटत नाही. सुरूवातीपासून हसायलाच येईल असं वाटतंय Proud

पर्णीका, तुझा रिव्ह्यू खरंच खूप छान आहे. पण माझा पिंड असे पिक्चर पहायचा नसल्याने तुझ्या रिव्ह्यूवरच समाधान मानायचं ठरवलं आहे.

अरे हे सगळं रादे ने वाचलं तर आयुष्यात पुन्हा अभिनय करायला धजणार नाही तो Lol

खतरनाक कमेंट्स.. खतरनाक कविता..

दाणे, लाडू, टक्कल, जिने, संडास, सतरंजी, मोदक Rofl

खरा मरो वा हूल असू दे
बरणी संपो वा न सरू दे, लाडू करत रहाणे >> Lol
>>रादे ने वाचलं तर आयुष्यात पुन्हा अभिनय करायला धजणार नाही तो >> नक्की का? तर बोलवा त्याला इथे. Wink त्याची गाणी छान आहेत. बाकी उंटाच्या शेपटीचा मुका कशाला घ्यायचा? त्याच्या चेहर्‍यावरची माशी हलत नाही इतका ठोकळा दिसतो तो.

मॉडर्न डे - म्युझिक स्टोअर रामुकाका ? 'कबाब में हड्डीचे'व्हेज व्हर्जन? वाईट वाटून घेऊ नकोस, त्याला दोन डबे लाडूंसाठी हाक मारली आहे. >>> Lol आता पुढचे सीन्स पाहताना त्या अमोलच्या खांद्यावर मला एक इमॅजिनरी टॉवेल दिसणार आहे ७०ज मधल्या रामूकाका सारखा.

शोले व कुलीचे शेवट बदलले होते तसे आता राहुलला मूळ पिक्चर मधे मारला नसला तरी मारून शेवट बदलतील अमितच्या पोस्ट्स मुळे Happy
(शोलेचा बदल रिलीज केला नाही पण कुलीचा केला)

दाणे, लाडू, टक्कल, जिने, संडास, सतरंजी, मोदक >>> Lol

रमड पण तुला आवडेल निदान सुरूवात तरी. पुण्याचे व्हिज्युअल्स मस्त आहेत. एक "पेठी माहौल" आहे तो ते वातावरण अनुभवलेल्यांना आवडेल असे वाटते. मी प्रत्येक आउटडोअर सीन "हा पेठेत नक्की कोठे असेल" करत बसलो होतो.

माझे जीवन दाणे
अमोल वा राहूल असू दे
खरा मरो वा हूल असू दे
बरणी संपो वा न सरू दे, लाडू करत रहाणे! >>>> Lol पूर्ण पिक्चर पाहिल्यावर जास्त कळेल पण आत्ता एक लोलरूमाल.

मला डिंपल नाव खटकले नाही. एकतर पाळण्यातले नसावे. टोपण नाव असेल. आणि असले पाळण्यातले तरी असू शकते. सपे चे बरेच quirks इतक्या सहज दिसत नाहीत, तेथे राहिल्याशिवाय. पण अंगाई ऐवजी लोरी खटकेल.

रादर त्याने फार लाऊड प्रतिक्रिया दिली असती तर ती त्याच्या पूर्णवेळ निभावलेल्या मितभाषी, नॉन एक्स्प्रेसिव्ह कॅरेक्टरशी फार विसंगत वाटली असती. >>> त्याचे कॅरेक्टर तसेच दिसते. आता ते मुळात नॉन-एक्स्प्रेसिव्ह दाखवायचे होते की हा तसाच काम करत असल्याने ते कहानी की माँग तयार केली माहीत नाही. साहिरने त्या गाण्यात "न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" हे शेवटी कंटाळून लिहीले असावे असे मला वाटते, तसेही असू शकेल Happy

बाकी उंटाच्या शेपटीचा मुका कशाला घ्यायचा? >>> अमित तू मुद्दाम त्याच्याकरता "लो एम" सेट करतोयस का? तसा प्रयत्न नाही केला कधी, पण शेपटीचा मुका घेणे अवघड नसावे. ती म्हण का फ्रेज आहे ती let's just say शेपूट जेथून सुरू होते त्या जागेचा मुका घेण्याबद्दल आहे Happy Happy

Lol सगळ्याच पोस्टी.

कवितेवरून असे वाटते आहे की राहुल मरून गेला आहे आणि लाडू अमोलला मिळाले आहेत. फक्त जिना दाखवण्यापुरते नव्हते, त्याला बळेच फोरशॅडोइन्ग समजू. कारण सुंदर मुलगी पुन्हा सिंगल झाली आहे, गमछा नको. अजून धुगधुगी आहे. अमलताश पार्ट टू..... Wink

अरेच्चा ! इतक्या पोस्टी पाहून वाटलं कि ताशच्या अंमलाखाली महाभारत झाले असेल.

भाला बर्ची, गदा नांगर, तलवार धनुष्यबाण नाहीतर लेझीम तरी

अरे हो! बुडाचा मुका घेतात ना. म्हणजे घेत नाहीत ना Lol
बघितला नसलास तरी इथून ३० सेकेंद बघ. किती अभावग्रस्त अ‍ॅक्टिंग आहे.
बाकी हो, पुणं छान दिसतं. तुला लंडन मधले परदेस गोचाज सारखे करायला पण वाव आहे. हे सपेत रहातात. पण पोरीला पार टोकाच्या शाळेत घातलंय. किमान कर्वे पुतळ्याच्या पुढे नक्की. कारण किर्थीताई कर्वे रोडचा देसाई बंधू दुकानाच्या इथल्या स्वामी कृपा हॉलला उलटा बसलेला फोटो काढतात.
आजीचा बंगला एकदा मला जंगली महाराज मंदिरा जवळ असावा वाटतं. पण मग ही एअरपोर्ट वरुन व्हाया कर्वे पुतळ्याला कशाला आजी कडे गेली? त्याच्या आधीचा एक पादचारी पूल सारस बागेच्या इथला वाटला. पण आता आमचा पुण्याचा अमलताश बहरुन बरीच वर्षे झाली. आय मे बी रॉंग.

पण आता आमचा पुण्याचा अमलताश बहरुन बरीच वर्षे झाली >>> Lol हो परदेस गॉट्चा'ज सारखे बघायला पाहिजे.

कवितेवरून असे वाटते आहे की राहुल मरून गेला आहे आणि लाडू अमोलला मिळाले आहेत. फक्त जिना दाखवण्यापुरते नव्हते, त्याला बळेच फोरशॅडोइन्ग समजू. कारण सुंदर मुलगी पुन्हा सिंगल झाली आहे, गमछा नको. अजून धुगधुगी आहे. अमलताश पार्ट टू..... >> त्याचे नाव अमोलताश ठेवा Happy पहिल्यात अमोलला लाडू देतात. दुसर्‍यात तो इतरांना देतो Happy

>>> अमोलताश
Lol

>>> पहिल्यात अमोलला लाडू देतात. दुसर्‍यात तो इतरांना देतो
आणि दोन्ही वेळा प्रेक्षक पस्तावतात. Lol

अमोलताश Lol
पिसं नव्हेत ही लाडवांचा चुराडा आणि दाण्याचं कूट Lol

रमड पण तुला आवडेल निदान सुरूवात तरी. पुण्याचे व्हिज्युअल्स मस्त आहेत. >>> आता पुण्याचा वास्ता दिला आणि तो ही तू दिलास म्ह्टल्यावर पिक्चर बघण्याचा ट्राय देणं आलं Happy

अमोलताश >>> Lol गुड वन!

अन्जु, अस्मिता, अंजली (१२), आणि रमड थॅंक्यु.

अस्मिता मतभेद वगैरे काय खेळणार शेवटी पिक्चर आहे आवडला किंवा नाही दोनच आऊटकम्स. मला अपील झाल ते दोघांचे डेवलप केलेले कॅरेक्टर्स. तो मृत्यु च्या समीप जाऊन परत आलेला म्हणुन स्वतःच्या दृष्टीने नक्की काय मॅटर करतंय ह्याची परफेक्ट जाण असलेला . ती सह्रृदय, सुस्वभावी इ. पण आयुष्यात कधीच संघर्ष करावा न लागलेली त्यामुळे त्याच्या मध्ये आहे तो ग्रावितास टोटल मिसिंग असणारी. मी दोन्ही प्रकारच्या व्यक्ती खुप जवळुन पाहिल्या आहेत त्यामुळे ही दोन कॅरेक्टर्स एकदम अपील झालीत.

एकुणच संवादांची गरज भासणार नाहीत असे भावनांचे प्रकटीकरण दाखवले आहेत प्रत्येक कॅरेक्टर्स चे. एरवी वयाप्रमाणे वागणारी, मामाच्या ऑपरेशन च्या काळजित असलेली पण टीचर ने विचारले तेव्हा नीट सांगता न येणारी त्याची भाची, खरंतर भावाला चिडवायचे आहे पण डायरेक्ट मस्करी न करता लेकीची गंमत आणि मग किर्ती ची नक्कल करणारी त्यांची बहीण, केअर्फ्री आहे असे नेहमी भासवणारा मेव्हणा
सकाळी सकाळी पकवु नकोस असं मित्राला म्हणत असतानाच राहुल आणि त्याचा मित्र एकत्र बाहेर दिसले म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेले होते हे लक्षात आल्याने एकदम अलर्ट मोडतात जातो, ह्यांच जमु शकतय हे लक्षात आल्याने अरे तिला जामिंग ला बोलव असं सुचविणारा मित्र आणि मग त्याच मराठी मध्यमवर्गीय पण अधोरेखित करणारे उशिराने विचारणे. मला मजा आली.

रमड तुला खरंच पुण्याचा वास्ता. पुण्याचे आऊटडोअर शॉट्स खुप मस्त घेतलेत. एकत्र सपेतल वातावरण एकदम अस्सल त्या गल्ल्या, दाटीवाटीने असलेली घरे, अंधार असणारी दुकान, आणि एकदम कर्वे रोड क्रॉस केला की मोठे झालेले रस्ते, कर्वे रोड चे बंगले सगळं एकदम ऑथेंटिक. तो एक उड्डाणपूलाचा लॉंग शॉट आहे आधी रहदारी आणि ती सुरु असतानाच बघताबघता संधी प्रकाश आणि बदलेले लाईटिंग तो‌ फार भारी वाटला मला.

अमलताश चर्चा एकदम भारी. अमित अरे, तुझ्या प्रतीसादांच्या आधी स्पॉयलर ॲलर्ट देत जा. संडास काय, गच्ची काय, सगळं रिव्हील केलं आहेस. शिवाय एवढी नावं ठेऊन परत "बघतो परत मिस झालं असेल तर" हे आहेच! म्हणजे "पुन्हा बघणेबल" रेटिंग आहे तर..

दोन्हीकडचे टोकाचे प्रतिसाद वाचून आता तर बघायलाच हवा असं वाटतं आहे.

सपेतल वातावरण एकदम अस्सल त्या गल्ल्या, दाटीवाटीने असलेली घरे, अंधार असणारी दुकान >>> टेम्प्टिंग Happy अगं, पुणं पहायच्या हव्यासापायी गुलाबजाम पण बघितला यार मी Lol

>>> साहिरने त्या गाण्यात "न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" हे शेवटी कंटाळून लिहीले असावे असे मला वाटते
याच्यावर हसायचं राहिलं होतं! Lol

पर्णिका, ही पोस्टही छान. Happy वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह वाचायला आवडतातच. त्यालाच 'खेळ' म्हणत होते. मीही आज बघून पूर्ण करेन.

<<<अगं, पुणं पहायच्या हव्यासापायी गुलाबजाम पण बघितला यार मी Lol>

फिर तो देखना बनता है:).

वरती काहींनी ॲक्टर राहुल देशपांडे आवडत नाही असं म्हटलंय. मला मुळात गायक राहुल देशपांडेच फारसा आवडत नाही. त्या मानाने ॲक्टर ठीक वाटला. म्हणजे तसा मी एकच पिक्चर पाहिला आहे - मी वसंतराव. त्यात ठीक ॲक्टिंग केली आहे. त्यापेक्षा टीनएज वसंतराव मुलाची ॲक्टिंग जास्त भारी आहे, पण राहुल अगदीच न आवडावा इतकी वाईट नाही वाटली. पहिल्या पिकचरच्या मानाने.

Biggrin

अरे किती पिसं काढताय रे! इतक्या शब्दांची तर पटकथाही नसेल. जरा मेलं एक मराठी सिनेमा आवडून घेतला तर तुम्हाला बघवेना.

सिनेमाचं राजकारणासारखंच आहे.... आपल्याला आवडलेला तो बाब्या!

Pages