मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवार रविवार हवा रविवार दुसरा कुठला वार नको हवा रविवार... हे तर अजुनही पाठ आहे. >> लिहा ना मग. मला कुठेच सापडले नाही.

पाणी: अस्सल भाषा उचलली आहे. कंधार, गंगाखेड वगैरे तालुक्यात चालणारे भजन देवा दत्ता दत्ता सेम. गावातलं राजकारण असंच चालतं, प्रेम प्रकरण त्याकाळी एवढंच होतं. ह्याहून पुढे कुणी जात नव्हतं. मोबाईल आणि फोन, कॉइन बॉक्स वगैरे पण त्याच काळातलं सगळं!

पाण्याचं दुर्भिक्ष्य जेवढं प्रभावी दाखवता आलं असतं तेवढं जमलं नाही. खूप वाईट हाल होतात ह्या भागात पाण्याचे.

अमित आणि अवल, अगदी माझ्या मनातले लिहिलयं !
मला नव्हता आवडला अमलताश आणि +१ ने तर मधे डुलकीच काढली. Proud
अस्मिता, पाणी बद्दल छान लिहिलयं! मला बघायचा आहे पाणी.

अमलताश बद्दल अजून एक - ते म्हणजे तिचे सिंगल पॅरेंट होणे हे दाखवायचेच आहे आणि मम संस्कृतीत ते कसे दाखवणार तेव्हा ती कॅनडाहून आलेली दाखवा असे काहीसे तिच्या कॅनडीयन असण्याबद्दल, शेवट बघून वाटले. मम संस्कृतीला राहूल, त्याचे ते चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेले वाडा प्रकारातले घर - बाकी माणसे, त्याचे बॉरोड टाईमवर असणे या सगळ्याशी 'वी आर प्रेग्नंट' इथे पोहोचणारे 'गो विथ द फ्लो' देखील विसंगत वाटले का दाणे आणि तत्सम बुडीत धंदे वाल्या पार्श्वभूमीशी हे असे बेबी मेकिंग सुसंगत धरायचे?

@ मी,
रच्याकने पठाण न पाहतच त्याचं परीक्षण लिहीलं होतं.
>>>
कारण तो शाहरुखचा होता Happy
लोकं परीक्षण न वाचता त्याचे चित्रपट बघायला जातात.
आणि मराठी चित्रपटांवर फक्त परीक्षणे लिहिली जातात. थिएटरमध्ये बघायला कोणी जात नाही.

@ मी,
रच्याकने पठाण न पाहतच त्याचं परीक्षण लिहीलं होतं.
>>>
कारण तो शाहरुखचा होता Happy
लोकं परीक्षण न वाचता त्याचे चित्रपट बघायला जातात.
आणि मराठी चित्रपटांवर फक्त परीक्षणे लिहिली जातात. थिएटरमध्ये बघायला कोणी जात नाही.

हो हो अवल. मोदकांचं राहिलं लिहायचं. मोदक आणि चकली!!! का त्या दारुड्या नवऱ्याला चखणा म्हणून चकली? मी म्हणतो, इथे दाणे प्लेसमेंट शक्य न्हवते का?
मलाही सिनेमाचा फ्लो चालू असताना अचानक सोऱ्यातून चकल्या पाडणे आणि अचानक मोदक वळणे बघून बहुतेक मी रिमोट वर बसलो का काय शंका येऊन गेली. पण नाही ताई साहेबच राबत होत्या. इतकं सुसज्य दुकान आहे तर बेसेमेंट/ पोट माळ्यावर जॅम करत असतील वाटलं मला. पण हे घरी अंगणात सतरंज्या घालून... पण सतरांज्यांवर कोणी बसत का नाही शंकाच आहे मला. त्या फक्त विविध रंगी क्वील्ट सारखे वस्त्र विणले पांडुरंगे... व्हिज्युअल फ्रेम लूक ते घरातल्या सतरंज्या दाखवणे इतपत युटीलिटीनेच येतात. चकल्या आणि मोदकही क्रू मध्ये कोणाला करता येतात शिवाय काय बरं कारण असेल? ते कोणी खात नाही की त्याबद्दल मग चकार शब्द नाही, कीर्तीला त्यामुळे काही कनेक्ट होतं .. असं पण काही नाही. कशाला ते मिनिट फुकट दवडले?
त्यापेक्षा जर त्यांना गाण्यामुळे ते जवळ आले दाखवायचं असेल तर त्याबद्दल एकमेकांशी संवाद साधताना एकमेकांचे ऐकताना तल्लीन होताना दाखवायचं. का जॅम असला तरी सपे मराठमोळा असल्याने भजनी मंडळ सतरंज्या... बास आणखी लिहीवत नाही.

शेवटी राहुल ऑपरेशन थिएटर मध्ये जातो आणि स्क्रीन पांढरी होते. बघा लाल दिवा नाही लावला. आम्ही स्टिरिओटाईप्स मोडलेत. तर तिथेही संपवला नाही. आम्ही आमच्या कल्पना लढवल्या असत्या. पण नाहीं स्पेल आऊट तर करायचं आहे. बायदवे तो मेलाय ना? बिनाईन गाठ काढताना का मेला? मला त्यातही पुरेसं कारण दिसलं नाही. म्हणजे मरू शकतो वगैरे ठीकच आहे. पण सिनेमा साठी काही ठोस कारण हवं ना मरायला.
दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर शेवट न करता असा करायचा तर अजून ओपन टू इंटर प्रिटेशन तरी ठेवायचा. प्रेक्षकांना अक्कल नाही हे समीकरण सोडायचं.
गरोदर आहे म्हटल्यावर सिंगल मॉम बनायलाच पाहिजे का? कला दाखवायची आहे ना! मग गरोदर आहे म्हटल्यावर त्या राहुल ची इतकी मंद स्मित कोरडी प्रतिक्रिया? आपण जगू का मरू माहीत नाही. आपल्या मागे त्या पोरीवर का बरं हे लादायचे? असे विचार इथे समोर बसून मला येतात तर त्याच्या मख्ख चेहऱ्यावर माशी हलत नाही. गोड काहीतरी बोलतो.
सशक्त कथा पटकथा नसेल तर रानोमाळ रूपके चांगला कॅमेरा... हळुवार प्रकरण किती वेळ तग धरेल? आणि त्या कॅमेराच्गा फर्स्ट फ्लोर बर्ड आय व्ह्यू चा अतिरेक तर समजलाच नाही मला. जॅम ला जमले ते इतका जास्त वेळ लिमिटेड बर्डस व्ह्यू दिसतं की तोंड दाखवा रे होतं. माझा काही टेक्निक चा अभ्यास नाही, पण कमी वेळात जास्त काही कव्हर करणे, प्रेक्षकाला प्रसंगातून त्यातील तपशिलातून थोडं दूर नेणे, एक वेगळा आयाम पकडणे अशा साठी असा व्ह्यू बघितला आहे. ना की वरून कोणाला टक्कल पडलं आहे हे दाखवायला.
बऱ्याच अजून अशाच रानोमाळ गोष्टी आहेत... हो, पाण्याचा बंब. आहे म्हणुन दाखवायचा. वर वास आवडतो, म्हणुन अमलताश करायचा.

पर्णिका यांची पोस्ट आवडली. Happy

दोन गट पडले की कसे माबोवर आल्यासारखे वाटते. Happy इथे तर पार्टी सुरू आहे पण मी अजून अर्धाच पाहिला आहे. 'झोपणेबल'चे कॉपीराइट द्या. Wink

बघून संपवेन मग 'मतभेद- मतभेद' खेळायला येईन. Happy

एक वेगळा आयाम पकडणे अशा साठी असा व्ह्यू बघितला आहे. ना की वरून कोणाला टक्कल पडलं आहे हे दाखवायला >>> Rofl

आता हा पिक्चर सिरीअसली बघणं कठीण होणारै

हुश्य
मला वाटलं मी फारच लिहिलं की काय Wink
खरं तर ते शेंगदाणे प्रकरण फारच डोक्यात गेलं. इतके शेंगदाणे वास लागेल की. बरं ते केवळ सुकवायचे म्हणून मुद्दाहून तयार केलेली गच्ची. एरवी तिचा शून्य वापर. तिथे खरं तर छान एखादं रोमँटिग गाणं करता आलं असतं, त्या दोघांचा संवाद करता आला असती. पण छे, नुसतेच दाणे Proud
एकदा तर हा डबा अजून छान केलेत हं लाडू म्हणत बहिण देते. आता दाण्याच्या लाडवात अजून काय बरं छान करता येऊ शकतं? मग म्हटलं बहुदा खोबरं, खारिक वगैरेचाही नवा धंदा सुचतोय का रीय Wink
स्वाती, यस तुझा सिंगल पेरेंटिंगचा मुद्दा पटला.
अमित हो रे, बिचाऱ्या कॅनेडियन शेतकरणीला एकटं मूल, तेही इथे वाढवायचय.

केलेली गच्ची. एरवी तिचा शून्य वापर. तिथे खरं तर छान एखादं रोमँटिग गाणं करता आलं असतं, त्या दोघांचा संवाद करता आला असती. पण छे, नुसतेच दाणे Proud>>>>>>>>>>>>> अर्रे नुसते दाणे नाही रे वाळवलेले तिकडे! शेवटी रादे पहुडलेला असतो ना तिच्या मांडीवर .. मस्त आहे तो सीन. मला आवडला.
सगळ्यांना दाणेच दिसले मेले त्या सिनेमातले Lol

पर्णिकाला मम +++ मलाही फार आवडलाय अमलताश. तू काढलेला अर्थही पटला नक्की कोण कोणाच्या जिवनातला अमलताश याचा विचार नव्हता केला. गाणी ऑफबिट छान वाटतात.
तो अमोल एक भारीच. दोघं बोलत असताना टिपीकल उचकवणार्‍या मित्रासारखा टपकतो. तेव्हाचे रादे चे एक्स्प्रेशन्स मस्त. फक्त त्याच्याकडे बघतो (आता जा ना इथून टाईप्स) मस्त रिलेट झाले Wink

हो दोन गट पडणार असे दिसते. मी १५-२० मि. पाहिला आहे. आमची माती आमची माणसं पर्यंत. तो सीन मला आवडला. तोपर्यंत पिक्चर बोअर नाही. पुढे बरेच काय काय गुंतागुंतीचे किंवा गंभीर दिसत आहे अमितच्या पोस्टवरून. पण पहिली १५-२० मिनिटे आवडली. पुण्याची काही व्हिज्युअल्स मस्त आहेत. पहाटेची सदाशिव पेठ ही तेथे राहिलेल्यांना व अनेकदा तेथे गेलेल्यांना नक्कीच आवडेल. मंडईच्या आसपासचे काही एरियल शॉट्सही मस्त आहेत.

तो अमोल एक भारीच. दोघं बोलत असताना टिपीकल उचकवणार्‍या मित्रासारखा टपकतो. तेव्हाचे रादे चे एक्स्प्रेशन्स मस्त. फक्त त्याच्याकडे बघतो (आता जा ना इथून टाईप्स) मस्त रिलेट झाले >>> Happy हो. त्याच्यावर अन्यायच केला आहे. सुंदर मुलगी दुकानात येते तेव्हा त्याला "अरे हिला जिना दाखव" टाइप काम देतात. मी म्हंटलो असतो शोधू दे जिना. इतका अवघड नाही सापडायला.

त्या कॅरेक्टरचे नाव दुसरे काहीतरी असते तर इतका राग नसता आला.

पुण्याची काही व्हिज्युअल्स मस्त आहेत. पहाटेची सदाशिव पेठ ही तेथे राहिलेल्यांना व अनेकदा तेथे गेलेल्यांना नक्कीच आवडेल. मंडईच्या आसपासचे काही एरियल शॉट्सही मस्त आहेत.>>>>>>>>>>>>> येस्स नक्कीच. पेठांबद्दल एक वेगळंच प्रेम वाटतं. वाड्यात राहिल्यामुळे तिथलं वातावरण, अगदी त्या खिट्ट्या दारं फार परिचयाची आहेत.

इतकी मंद स्मित कोरडी प्रतिक्रिया>>>>>>> चालतंय. तो काही कसलेला कलाकार नाही ( आणि तसंही ममव फार वेगळी प्रतिक्रिया देईल असंही
वाटत नाही:फिदी:
रादर त्याने फार लाऊड प्रतिक्रिया दिली असती तर ती त्याच्या पूर्णवेळ निभावलेल्या मितभाषी, नॉन एक्स्प्रेसिव्ह कॅरेक्टरशी फार विसंगत वाटली असती.

मी म्हंटलो असतो शोधू दे जिना. इतका अवघड नाही सापडायला.>>>>>>>>> Lol
खरंय अशा मित्रांना काहीही फालतू कामं करावी लागतात त्यात ती क्रश वाटली असेल तर काय केवळ मित्रासाठी त्याग ? Wink
तो लाडू खात सी यू सुन म्हणतो त्यालाही फार हसले मी Lol

मी म्हंटलो असतो शोधू दे जिना. इतका अवघड नाही सापडायला.>>> 'जिने' हे लाजिरवाणे??. Lol
कॅरेक्टरचे नाव दुसरे काहीतरी असते तर इतका राग नसता आला.
>>> Lol Lol मॉडर्न डे - म्युझिक स्टोअर रामुकाका ? 'कबाब में हड्डीचे'व्हेज व्हर्जन? वाईट वाटून घेऊ नकोस, त्याला दोन डबे लाडूंसाठी हाक मारली आहे.

मलाही पुण्याची व्हिज्युअल्स आवडली, निवांत आहेत एकदम. राहिलेली नाही पण वाड्यांचे वातावरण वगैरे सगळेच ओळखीचे वाटते. Happy

पण राहुल मरतो असं कुठे दाखवलंय किंवा सूचित केलंय?
दाण्यांची हाइट म्हणजे ऑपरेशनला नेण्याआधीसुद्धा लाडू खायचा आग्रह करून बघते ती बहीण!
सिनेमाचं नाव ‘दाणे आणि गाणे’ असं चाललं असतं.
बरं, पुण्यात राहून ही भावंडं ‘अंगाई’ला ‘लोरी’ का म्हणतात?

>>चालतंय. तो काही कसलेला कलाकार नाही ( आणि तसंही ममव फार वेगळी प्रतिक्रिया देईल असंही वाटत नाही >>
Lol कसलेला अभिनेता नाही हे कारण??? कमॉन!!! Lol
ममव ताराबलं चंद्रबलं व्हायच्या आधी बातमी समजल्यावर आणि स्वतः डेथबेडवर असताना स्मित हास्त करेल? नक्की का? Lol

चित्रपट इतका आंग्लाळलेला+ पुणेरी होता की मेनस्ट्रीम साठी फार काही ऑफर करत नाही असे वाटले. हे मला चालतेच, इन जनरल लिहीतेय. त्यामुळे डिंपल व लोरी काही खटकले नाही.

पण राहुल मरतो असं कुठे दाखवलंय किंवा सूचित केलंय?>>>>>>>> शेवटी त्यांच्या फेवरेट जागेवर ती एकटीच बाळाला घेऊन दाखवलीये ना? त्यावरून वाटलं मला आणि त्याची बहिण बाळाला कडेवर घेऊन बसलीये ती त्याची आठवण येऊन इकडेतिकडे बघतेय त्याही सीनमधे वाटलं तसं.

सिनेमाचं नाव ‘दाणे आणि गाणे’ असं चाललं असतं. >>>>>> Lol लाडवांना कुठे बसवता मग?
बरं, पुण्यात राहून ही भावंडं ‘अंगाई’ला ‘लोरी’ का म्हणतात? >>> हो ते खटकतंच.

ममव ताराबलं चंद्रबलं व्हायच्या आधी बातमी समजल्यावर आणि स्वतः डेथबेडवर असताना स्मित हास्त करेल? नक्की का? Lol>>>>>> स्थितप्रज्ञाची लक्षणॅ Lol

डिंपल ला काय प्रॉब्लेम आहे आता? श्रुती आणि पर्ण आंणि रेवा अशी एकदम नाजुक नावं अजुन पेठी स्टिरिओटाईप मध्ये ठेवतात असं वाटतं का?

लोरी लोरी पान फुला सारखी छान दादा मला आता एक वहिनी आण मध्ये ते लोरी झालं.
ह्याचा बाप तबलजी होता आणि घरात बंब जपून ठेवलाय रोज पेटवायला तर एखाद तबला तरी ठेवायचा राजा. गाताना व्यवस्थित तालवाद्य असलं की बरं वाटतं. मसाल्याचे डबे ठोकावे लागत नाहीत.

>>> डिंपल व लोरी काही खटकले नाही
वा रे वा! मराठवाड्यातली भाषा ऑथेंटिक हवी तुम्हाला, आणि स.पे. पुण्यातली नको? Proud

बहिणीची फॅमिली कुठल्याही ॲन्गलने आंग्लाळलेली वाटत नाही, चप्प पुणेरीच दिसते.
नाहीतर पीनट बटर करायचं सुचलं नसतं तिला?! Proud

वर लिहिलंय ना कुणी की डिंपल नाव खटकलं. अरे खटकायला इतक्या गोष्टी असताना डिंपल नावात काय नेमकं खटकलं?

राहुल सर्जरीत जातो आणि पाच सेकंद पांढरी स्क्रीन. मग बाळ, आई, आजी, ताई. आणि बाबा कोणाचा पियानो ट्युनिंग करायला गेलाय समजू का आम्ही?
किर्तीबाई एआरएआयच्या टेकडीवर बाळाला घेऊन गेल्या तरी नवर्‍याचं ट्युनिंग संपेना का? Lol तो मेला आता. तुम्ही आशा ठेवू नका.

डिंपल ला काय प्रॉब्लेम आहे आता? >>>>>>>>> तिची आई तिला मॉम म्हणू न देता आईच्च म्हण सांगते, टीफिन ला डब्बा वगैरे मग ती डिंपल असं
आंग्लाळलेलं नाव ठेवेल असं काही वाटलं नाही.

मराठवाड्यातली भाषा ऑथेंटिक हवी तुम्हाला, आणि स.पे. पुण्यातली नको?
>>>> Happy कधी नव्हे ते रेकगनाईज झालो आहोत, दृष्ट लावू नका.
तेच म्हटलं आहे स्वाती, आंग्लाळलेला+ पुणेरी आहे. ऑथेन्टिक टोन सेट केलेलाच नाहीये. त्यामुळे खटकूनही ॲक्सेप्टेबलच वाटले.‌

अमित+१ दुसऱ्या गोष्टींपुढे तितके खटकले नाही.

>>> बाबा कोणाचा पियानो ट्युनिंग करायला गेलाय समजू का आम्ही?
अरे तोच या सगळ्यांचं व्हीडिओ शूटिंग करतोय!
का त्याच्या जिवावर उठलायस तू?! Proud

Pages