मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथला रेको वाचून सिनेमा पाहिला आणि आवडला. >>> स्वाती, बरं वाटलं वाचून.‌ Happy
'मोहिमे' नंतर एक बाई बायकोला मारण्यासाठी दगड फेकायच्या बेतात असणाऱ्या त्या दारुड्याला चप्पलने हाणते ते बघून जीव थंड झाला होता. Happy टाईमिंग जमले आहे एकदम.

अगदी मनापासून काढला आहे सिनेमा. हॅट्स ऑफ!>>> +१

फा,
पिक्चरमधे जे दाखवले त्याबद्दल लिहीताना तेथील परिस्थितीचे सुसंगत वर्णन आल्यामुळे तो आख्खा रिव्यू अतिशय वाचनीय झाला आहे. ती नंतरची पोस्टही भारी आहे.>> थॅंक्यू. Happy
एखादा चित्रपट, पुस्तक स्थानिकांना अस्सल वाटणे ही एक सर्वोच्च पावती असावी. >>> अनुमोदन.

धन्यवाद ललिता प्रीती आणि अन्जूताई. Happy

माधव, छान पोस्ट आहे. Happy सकाळी गडबडीत पोच द्यायची विसरले. हनमंतच्या पात्राचे वर्णन अगदी चपखल आहे.

हवी तितकीच नाट्यमयता ठेऊन सिनेमा कंटाळवाणा होउ दिलेला नाही. >>>> +१

धन्यवाद सर्वांना.‌ Happy

बाकी आंघोळ शौकीन पब्लिक साठी आदिनाथ कोठारेची आंघोळ पण आहे >>> Lol

सिरीयस हास्यजत्रा बघितल्यासारखं >>> Lol

कोहरे का धोतर>>>>> Lol

अस्मिता, माधव छान लिहिले आहे.

छान लिहिलं आहेस अस्मिता
बघावा लागेल आता एवढं कौतुक वाचलं तर.
.
शनिवारी आमच्याकडे आवडता असणारा देऊळ बंद पाहिला.
मी काही सीन्स पाहिले होते पूर्ण चित्रपट पाहिला नव्हता
आवडला
.
I take my words back.
गश्मीर खरंच छान दिसतो आणि कमाल कामं करतो.
.
तसे ४ मॉनिटर्स असणारे work desk फार आवडले आहे.
लावून घ्यावे का घरात?
किल्ली frequency तयार करीन म्हणते

.

अमितच्या रेकोवरुन पाणी पाहिला. फार छान चित्रपट आहे. आदिनाथचं आणि त्या मुलीचं काम छान जमून आलं आहे. बाकीची लोकंही फार प्रसिद्ध नसल्यामुळे सगळं ओरिजनल वाटतं.

काल बघितला पाणी.. खरेच छान बनवलाय.. भाषेचे बेअरिंग अजिबात सुटलेले नाही त्यामुळे आदिनाथही तिथलाच वाटतो. चित्रपटात त्याचा लढा अगदीच अंगावर येत नाही पण त्याला बाईकवरुन पाडायचे प्रयत्न, खड्डे बुजवणे इत्यादीतुन मुळ नायकाचा त्रास कळतो.

काल पाहिला पाणी. मस्त आहे. आदिनाथचा अभिनय आवडला. छान लाजला आहे. गावाकडचे वातावरण, कपडेपट, कलाकारांची निवड चपखल आहे.

आदिनाथ कोठारेला तितकेसे हिरोचे रोल मिळाले नाही हे एक कोडच आहे, दिसायला बाहुल्यापेक्षा कितीतरी पटीने स्मार्ट आहे, अभिनयही चान्गला करतो.

त्यांचे स्वताचे प्रॉडक्शन हाऊस आहे त्यामुळे बाहेरुन विचारणा होत नसेल. पाणीचे एक प्रोडुसर कोठारेही आहेत.

अमलताश पाहिला जाम संथ आहे बोर वाटला . राहुल देशपांडे ने गाणीच गावीत त्यात तो बेस्ट आहे .हिरोईन काही खास वाटत नाही .स्टोरी पुढे जाता जात नाही एकदम शेवटी पटकन संपतो चित्रपट ,संवाद नाहीत .आर्टीस्टिक व्युने काही दाखवायचे असेल तर माझ्या बुद्धीला समजला नाही इतकंच मी म्हणेन.

संथ वरून आठवलं.
एकदा माझे वडील सिनेमा बघायला घेऊन गेले होते. प्रोजेक्टर अरेंज झाला होता. कुणीतरी ओळखीने सरकारी खात्यातून फुकट मिळणारे रीळ आणले होते. बहुतेक कुटुंब नियोजन.
पिक्चरचे नाव होते "संथ वाहते कृष्णामाई"
धाकट्या भावाने विचारलं कि "वाहते कि पोहते? "
कुणालाही समजले नाही. शेवटी वडील म्हणाले "अरे बाळा कृष्णा माई वाहणार ना? ती पोहणार नाही"
खरं तर मलाही हाच प्रश्न पडला होति. पण वडिलांचं उत्तर आपल्याला समजलेय म्हणून धाकट्या भावावर थोरलेपणाचा रूबाब दाखवायला मी त्याला समजावून सांगितले कि
" हे बघ त्या बाईचं नाव कृष्णा असेल तर ती वाहते असं म्हणायचं. उषा चव्हाण असेल तर पोहते असं म्हणतात. स्लो रनिंग सारखं ती स्लो वाहते ते बघ गुपचूप. कळ्ळं ? "

आणि एकच हंशा झाला.
वडलांना डोळ्यात पाणी येईपर्यंत इतकं हसताना या आधी कधीच पाहिलं नव्हतं.

पाणी पाहिला पैसे भरून अ‍ॅमेझॉनवर. आदिनाथ कोठारे तसाही मला पहिल्यापासूनच आवडतो. त्या सुभाला कशाला घेतले कळत नाही. किशोर कदम ह्या भुमिकांमध्ये शोभतोच.
शॉक बसतो. कारण आपण सोसले नसल्यांने कळत नाही.
मराठवाड्यात काही काही भाग बरे आहेत का?(इथल्या मराठवाड्यातील लोकांना प्रश्ण आहे हा). कारण फार पुर्वी एक ओळखीची सहकारी मराठवाड्याची होति, तिच्याकडून इतकी वाईट परीस्थिती एकली न्हवती कधी. ती तर खुप सुरेख बालपण माझे मराठवाड्यातले असे म्हणायची.
पण कमाल आहे त्या नायकाची(खर्‍या हनुमंताची). पाणी खुपच जपून वापरावे हे परत मनात रुजते. मी नेटाने प्रयत्न करते तसाही रोजच्या जीवनात.

कारण फार पुर्वी एक ओळखीची सहकारी मराठवाड्याची होति, तिच्याकडून इतकी वाईट परीस्थिती एकली न्हवती कधी>>>>

ते फार पुर्वी म्हणजे किती व त्याहुन पुर्वी त्या सहकार्‍याचे बालपण हे पाहा… गेल्या ३०-४० वर्षात स्थिती झपाट्याने बिघडत गेलेली आहे.

मराठवाड्यात काही काही भाग बरे आहेत का? >>> हो बहुतेक. आमच्याकडे कारपेट लावायला आलेला त्याने नाव सांगितलं गावाचे, नदीकाठी आहे आणि सुपीक आहे, त्यांना नाही काही त्रास म्हणाला. साधारणपणे २००६ पासून ओळखते त्याला, तेव्हाच त्याने सांगितलं होतं की आमचा भाग दुष्काळी नाही. मी गावाचे नाव विसरले. फार कमी भाग असेल असा पण आहे.

मला फार आवडला अमलताश. फार काही मेलोड्रामा नाहीये. साधा सरळ मुव्ही आहे.
राहुल देशपांडे एकदम मितभाषी खर्‍या जिवनात पण असाच असेल असं वाटून गेलं.
छान दाखवलंय ते सदाशिव पेठेतलं घर त्याच्या बहिणीचं. त्या मित्रांची मैफिल जमते, जॅमिंग, फ्युजन गाणी आवडलं.
असे दोस्त लोक असावे आयुष्यात.

मला काही समजली नाही 'अमलताश'ची गोष्ट. काय सांगायचंय त्यातून? राहुल देशपांडे पिच परफेक्ट आहे याव्यतिरिक्त?
सिनेमाटोग्राफी चांगली आहे, पण सिनेमाचा पॉइंट काय?
ती कनेडियन मुलगी काही विशेष गात वगैरे नाही - जितकं तिचं कौतुक करतात सिनेमात तितकी तर नक्कीच नाही. बाकी अ‍ॅक्टिंग वगैरेही कोणाचंही नावाजण्यासारखं वाटलं नाही.
आणि ते दाण्यांचं काय प्रकरण होतं? काय संबंध त्याचा गोष्टीशी?
अर्थात मला मध्ये थोडावेळ झोप लागून गेली हेही कबूल करायला हवं - त्यात येऊन गेली असतील का ही उत्तरं? Proud

स्वाती, अंजली -
मी अजून बघितला नाही अमलताश, कालच एका मैत्रिणीने सुचवला होता. मी बघून येईन मग मिळून नावे ठेवू नाहीतर 'मतभेद-मतभेद' खेळू. Happy

झोपा कसल्या काढता, कलेची ओढ वगैरे काही नाही का काय. जागे रहा आणि पिव्हळवून सोडा. Proud

Lol
बघ बघ. तुला बेकार चित्रपटांत कला शोधायचं कसब साधलेलं आहे असं केशवकूल म्हणतातच नाहीतरी! Proud
मत लिहिण्याआधी एकदा फिल्म कम्पॅनियन काही म्हणालेत का तेही चेक कर. Proud

वडलांना डोळ्यात पाणी येईपर्यंत इतकं हसताना या आधी कधीच पाहिलं नव्हतं. >>> Happy

या पिक्चरमधले आहे का माहीत नाही पण याच ओळींचे जे गाणे आहे "संथ वाहते कृष्णामाई" - त्याचे विडंबन यशवंत देवांनी केले आहे "संथ गातसे कृष्णाबाई". कॉलेजमधल्या एका कार्यक्रमात माझ्याच वर्गातील एका मुलीने ते गायले होते त्यामुळे लक्षात आहे. आत्ता शोधले तर गाण्याच्या रूपात ते सापडले नाही पण त्याबद्दल या ब्लॉगमधे काही सापडले.

(ते शोधताना तो स्पेसिफिक ब्लॉग वाचला, तर एकदम भारी कार्यक्रम होता असे दिसते. आशा भोसले बरोबर अनौपचारिक गप्पा. मंगेश पाडगावकर, यशवंत देव, अरूण दाते, श्रीधर फडके ई ची उपस्थिती. जुन्या गाण्यांबद्दल व कलाकारांबद्दल चर्चा. अरूण दात्यांची गाणी विशेष आवडत नसली तरी अशा कार्यक्रमांचे वृत्तांत व त्याचे कॅटलॉगिंग अशा विविध ब्लॉग्ज मधून झाले असेल/होत असेल तर चांगले आहे)

'अमलताश' काल इथे लिंकवर क्लिकुन चालू केला पण मग टीव्हीवर बघू म्हणून बंद केला. काल जितका वेळ बघितला तितका मला आधी पण कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय. त्यांनी ट्रेलर म्हणून पहिली १० मिनिटेच सलग दाखवलेला का कल्पना नाही. पण मला ते सगळ आठवतय बघितलेलं.

अगदीच रच्याकने:
यशवंत देवांच्या विडंबनची आठवण काढलीस म्हणून... त्यांच्या कार्यक्रमाची आजोबांनी रेकॉर्ड केलेली एक कॅसेट होती घरी, आणि एकदा त्यांचा डोंबिवलीला कार्यक्रमही पाहिलेला लहानपणी. तेव्हापासून त्यांच्या बोलण्याच्या आणि गाण्यांच्या प्रेमातच पडलेलो.

रविवार रविवार हवा रविवार दुसरा कुठला वार नको हवा रविवार... हे तर अजुनही पाठ आहे. मग पुढे प्रत्येक वार का नको याचं मिश्किल वर्णन होतं. गणिताचा अवघड तास मंगळवारी, सदा चुकते बेरिज हातचा घेतला तरी, एवढा वार वजा करा उपकार होतील फार... मस्त होतं.
राधाधर मधु मिलिंद जयजय ... चे, आता जपतप करायचे वय, मुखात श्रीहरी करि हरिविजय (करि/री वर श्लेष होता का क्ल्पना नाही. असावा Proud )
पुढे/.. रात्रंदिन ये उबळ दम्याची, निष्कामी रत असायचे वय. .. इथे ते 'उबळ' वर अ‍ॅक्चुअल उ ब ळ आणून कार्यक्रमात धमाल उडवुन देत.
ते म्हणायचे कार्यक्रमात मला ही थोर लोकांनी गायलेली गाणी गायची विनंती व्हायची. इतकी प्रसिद्ध गाणी मी माझ्या आवाजात कसा गाऊ प्रश्न पडायचा आणि त्यावर उपाय म्हणून त्यांनी विडंबन चालू केलं. हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं.
स्वर आले दुरुनी... प्रभाकर जोगांनी नागपूर हुन चाल पत्रातून पाठवली होती. त्यावर देवांनीच शब्द लिहिले. स्वर आले दुरुनी. ते बोलायचे तर एकदम मिश्किल.
त्यांनी (कवी म्हणून) लिहिलेली गीतं ही सुंदर आहेत... प्रिया आज माझी नसे साथ द्याया. फार आवडतं मला.
बहिणाबाईच्या कवितांच्या गाण्याची उत्तर केळकरच्या आवाजातली कॅसेट तर बालपणात घेऊन जाते. Happy असो.

बाकी अ‍ॅक्टिंग वगैरेही कोणाचंही नावाजण्यासारखं वाटलं नाही.>>>>>>> तेच तर.. अ‍ॅक्टींग अ‍ॅच सज कोणीच केली नाहीये असं वाटलं. जसं आपण रोज मित्र मैत्रिणींशी बोलत असतो तसंच दिसलं.
आणि ते दाण्यांचं काय प्रकरण होतं? काय संबंध त्याचा गोष्टीशी?>>>> बहिण-भाऊ / मेव्हणे सतत वेगवेगळे साईड बिझनेस करत असतात असं राहुलच्या मित्राच्या बोलण्यात येतं एकदा... तसा सध्या दाणे विकणे असावा.

अ‍ॅक्टींग अ‍ॅच सज कोणीच केली नाहीये असं वाटलं. जसं आपण रोज मित्र मैत्रिणींशी बोलत असतो तसंच दिसलं. >> हे कॉम्प्लिमेंटच्या टोन मध्ये वाचू ना? Wink Proud

फारएंड आणि अमितव यशवंत देवांबद्दलची चर्चा, आठवणी फार सुरेख. विडंबन गीते मजेशीर आहेत.

होय Happy
त्या लहान मुलीचं डिंपल नाव मिसमॅच आहे मात्र सगळ्यात....

सिनेमाटोग्राफी चांगली आहे, पण सिनेमाचा पॉइंट काय?>>>>>>>>>> हळूवार फुलणारी प्रेमकथा (अगदीच मराठी पेपरची हेडलाईन झाली ही Proud

हळूवार फुलणारी प्रेमकथा >>> अगं, झोप लागली स्वातीला. जास्तच हळुवार फुलली वाटते. Happy 'झोपणेबल' हे नवीन रेटिंग सुरू करता येईल आता.

Pages