चालताय की वजन वाढवताय?

Submitted by च्रप्स on 15 December, 2024 - 20:21

चालणं म्हणजे व्यायाम आहे, असा जो काही लोगांचा भ्रम आहे ना, तो एकदम तोडायला हवा. बघ, रोज 10,000 स्टेप्स चाललो म्हणून फिट झालं असतं ना, तर जिम, पळणं, आणि योगा करणारे लोग काय उगाच पैसे खर्च करत असतील का? चालणं म्हणजे फक्त हलकं-फुलकं काम आहे, त्याला व्यायाम कसं म्हणायचं भाई?

आजकाल लोकांच्या हातात स्मार्टवॉच असतं, आणि त्यात स्टेप्स गिनतेय, झालं! मग ते सोचते, “वा रे, मी किती फिट आहे!” अरे पण ह्या चालण्यात घाम तरी गळतो का? शरीराला ताण तरी येतो का? काहीच नाही. फक्त रोडवरून फिरायचं आणि समजायचं की आपण फिटनेस के मास्टर झालो. भाई, असं फिटनेस येत असतं तर सगळे लोक चालतच हिरो झाले असते.

तुम्ही बघ ना, चालण्यानं वजन कमी झालंय का कधी? नाही ना? वजन कमी करायचं असेल तर डाएट करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, किंवा जोरात पळा. चालणं फक्त टाइमपास आहे. रोज सकाळी दोन किलोमीटर चालून लोक खुश होतात, पण खरं सांगायचं तर, ते काहीही उपयोगाचं नसतं.

चालणं म्हणजे व्यायाम आहे असं बोलून स्वतःला फसवू नका. असं सोप्पं काहीच नसतं. खरा व्यायाम करा, बॉडीवर काम करा. चालणं हे फक्त चालणंच आहे, फिटनेस नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर लिहिले आहे.
सारखं बसून बसून पाय, खांदे, पाठ यांचे स्नायु कमजोर होतात, दुखतात मणक्यावर ताण येतो आणि मग चालले, पाच सहा योगासने केली की जरा बरे वाटते याला व्यायाम म्हणता येणार नाही. तेवढ्याने वजन कमी होणेही शक्य नाही.

सहमत. चालण्याने व्यायाम होत असता तर पोस्ट्मन सडसडीत असते. असो.

४५ मिनिटात ४.५ किमी चाला, याचा फायदा होतो असे सल्ले आहेत. लोकांना फायदा झालाय.

स्मार्ट वॉचवर पैसे घालवुन दिवसाला १०,००० काऊंट करणार्‍या लोकांचे हसु येते पण आपण कशाला बोला??

खरं आहे च्रप्स तुमचं..
मी पण वर्षभर चालले चालले चालले काही फायदा नाही झाला आणि टाचदुखी मागे लागली होती गेली आता..
पण वजन कमी करायचं असेल तर ८०% डाएट आणि २०% व्यायाम असावा लागतो... त्या २०% मधे पळा,फास्ट चाला घामाघूम होईपर्यंत.. जीम करा , सूर्यनमस्कार करा..काहीही व्यायाम करा.....

<< चालण्याने व्यायाम होत असता तर पोस्ट्मन सडसडीत असते. असो. >>

----- ते सडसडीत नसतील पण त्यांच्या समवयस्कांच्या तुलनेत फिट असतात. मला ढेरपोटे, गलेलट्ठ पोट असणारे पोस्टमन दिसले नाहीत.

पायी चालण्याच्या व्यायामाबद्दल -
निवांत वेळ असतांना, जमेल तसे ३० (४५- ६०) मिनिटे पायी चालणे मला आवडते. नेहेमी जमेलच असे नाही. हा वेळ विचार करण्यासाठी , आत्मपरिक्षण करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. Happy

सर्वांसाठी एकच व्यायामप्रकार योग्य असेलच असे नाही. चालण्या मुळे घाम गळालेला दिसत नसला तरी शरिरांतली पाण्याची मात्रा कमी झालेली असते.

45 मिनिटात साडेचार ते पाच किमी चाललो की छान व्यायाम होतो की.
वजन कमी व्हायला कॅलरी डेफिशियेट डाएट पाहिजे.
ते नसेल तर जगातला कोणताही व्यायाम केला तरी काय उपयोग.
झोप, व्यायाम आणि डाएट ह्या त्रिसूत्री ने वजन कमी होईल.
वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग ने फक्त कार्डिओ पेक्षा फायदा जास्त होउ शकतो ह्या दुमत नाही.

थोडके आणि रमतगमत चालून मी लै व्यायाम केला असा आविर्भाव असणाऱ्या लोकांना टोचण्यासाठी हा लेख असावा.

तुम्ही कितीही व्यायाम करा, डाएटिंग करा पण जर का तुमची रास "कुंभ" असेल तर निव्वळ वायू भक्षण करूनच तुमचे वजन वाढणार!
असे कोण म्हणाले बरं?

उपास
शाळेतला धडा
नाव नाही सांगणार
इथे प्रत्येकाला ते आणि साने गुरुजी आदर्श वाटतात

तुमच्या विचारात तथ्य आहे. पण याची दुसरी बाजू पण विचारात घ्यायला हवी. ज्या व्यक्तींना विविध कारणांमुळे तुम्ही सांगितलेल्या पैकी कुठलाही व्यायाम करणे शक्य नसेल, तर निदान चालणे हे तरी ते निश्चित करू शकतात . कदाचित दहा मिनिट पळण्या इतका व्यायाम घडण्यासाठी पाच तास चालायला लागेल हे मान्य आहेच पण म्हणजे चालण्यात व्यायामच नाही असं म्हणण्यात तथ्य नाही .
आणखीन एक ! चालल्यामुळे हृदयाला थोडा आराम मिळतो हे वैद्यकीय सत्यही समजावून घ्या! शिवाय वयोवृद्ध लोकांसाठीही चालणे हा खूप महत्त्वाचा व्यायाम ठरतो!

आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः।
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः॥ चरैवेति चरैवेति...
ऐतरेय ब्राह्मण ७.१५.
म्हणून सतत "चरत" रहा.
किल्ली Happy

45 मिनिटात साडेचार ते पाच किमी चाललो की छान व्यायाम होतो की.>>> बरोब्बर....चालताना फक्त पायच चालतायत आणि बाकी शरीर ढिम्म हलत नाही अशाने चालणं हा व्यायाम ठरू शकत नाही....चालताना तुमचा अख्ख शरीर तुमच्या मेंदूसकट चालायला हवं, मी स्वतः दर दिवशी ( वीकडेज) ७.५ किमी चालतो, सुटीच्या दिवशी ट्रॅक वर चालायला गेलो तर ३.८ किमी २५ मिनिटात चालतो, नाकाने श्वास कंटिन्यू करता येईल इतपत धाप लागू देतो. ( रस्त्यावर चालताना थोडं स्लो ). बसून काम करायचं वर्क प्रोफाइल असलं म्हणून काही माझं वजन वाढलं नाही, गेली २५ वर्ष फक्त १-२  kg रेंज मध्ये वर खाली होत राहतं. हवं ते हवं तेंव्हा, हवं तेवढ खातो ( सरासरी लोकांपेक्षा जास्तच ), ऑफिस मध्ये टिफिन नेत नाही बाहेरून हॉटेल्स अथवा कॅन्टीन मधून मागवून खातो....जे घरून डबे आणतात ते माझ्यातलं ( बाहेरून मागवलेलं ) थोडं खाऊन गुबगुबीत फुगतात आणि मी बाहेरचं शिवाय वर त्यांचे डबे ही खाऊन तसाच राहतो. डायटच्या आयचा घोव...  Biggrin

डाएट म्हणजे इथे संतुलित आहार अपेक्षित असावा...
नेहमी जंक फुड, बाहेरचे जेवण, गोड, बेकरी प्रॉडक्ट खाऊन फिट आणि हेल्दी लोक मी तरी नाही बघितले कधी..

>>>>>पण खरं सांगायचं तर, ते काहीही उपयोगाचं नसतं.
अहो मूडवर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. १२ तास रहातो. अनुभव.

पण जर का तुमची रास "कुंभ" असेल तर निव्वळ वायू भक्षण करूनच तुमचे वजन वाढणार! >>> का घाबरवताय केकु?

Just a Joking.
लठ्ठ लोकांचे एक चांगले असते, They can not stoop down to low level!
सामो, हे खरे आहे का? कुंभ राशीचे?

चराति चरतो भग:
म्हणजे जो चालतो त्याचं भाग्य चालत (त्याला सोडून) जातं.
म्हणून फार चालू नये.

>>>>>> सामो, हे खरे आहे का? कुंभ राशीचे?
नका घबरवु हो, आधीच . कुंभेची साडेसाती चालू आहे. Lol

तुम्ही कधी चालता याला पण महत्व आहे.
जेवल्यावर २०-३० मि. नंतर मी ३० मि. चालते. तसेच २ ऐवजी १ चपाती खाते, भाजी जास्त. भात कधीतरी.
दुसरा कोणताही व्यायाम मी करत नाही. नठरवताही ३ महिन्यात माझे वजन कमी झाले आहे.

मला हे सायन्स वायंस कळत नाही. त्यामुळे वजन आणि चालणे याचा संबंध तर सांगू शकत नाही. पण मला स्वताला चालायला आवडते आणि माझे वजन सुद्धा कमी आहे यामुळे दोन्हीवर सुटे सुटे बोलू शकतो.

1) वजन - तसेही आम्ही कोकणी माणसे भात खाऊन सुद्धा जाड होत नाहीत. पण माझे म्हणाल तर मी दुपारी जेवणात फक्त आणि फक्त भातच खातो.
सकाळी नाश्ता ऑफिसला, संध्याकाळी नाश्ता ऑफिसला, रात्री घरी जेवलो तर जेवलो, नाही तर जंक फूड, पिझ्झा बर्गर चीज वगैरे, जास्तीत जास्त नॉनव्हेज खातो, ते सुद्धा वेळी अवेळी खातो, आवडीचे असेल तर पोट फुटेपर्यंत खातो..
ज्या दिवशी सकस चौरस सात्विक आहार पोटात जातो तो दिवस मला एखाद्या सणासारखा वाटतो. तरीही मी जाड होत नाही कारण खाल्लेले माझ्या अंगाला लागत नाही.
थोडक्यात देवाने (निसर्गाने) तुमच्या शरीराची जडणघडण जशी केली आहे त्यानुसारच तुमच्या वजनाचे काय होणार हे ठरते.

2) चालणे - याचा वजनाला काय फायदा होतो माहित नाही. पण पचनाला नक्की फायदा होतो. त्यामुळे मी दुपारी जेवल्यावर जरूर चालतो. जास्तीत जास्त चालतो. त्यामुळे ऑफिस कामापासून सुद्धा सुटका मिळते.
रात्री जेवल्यावर सुद्धा चालतो. पोरांना घेऊन चालतो. त्याने वेळ चांगला जातो. चालता चालता पुन्हा काहीतरी खादाडी होते.
सकाळी लवकर उठलो तरी चालतो. त्याने शुद्ध हवा पोटात जाते आणि फ्रेश वाटते.
बाहेर चालल्याने चार लोकं दिसतात, चार छान चेहरे दिसतात, मनाला बरे वाटते.
चालायची सवय असल्यास पंधरा मिनिटे ते अर्धा तास अंतर आपण सहज चालत जातो ज्याने बस रिक्षाचे पैसे वाचतात. इंधनाची बचत होते. ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला आपला हातभार लागतो.

मोराल - वजनाचे 'लोड' घेऊ नये. पण मूड आला की चालू पडावे Happy

एके काळी मी व्यायाम करत नसे का तर सवय लागेल मग क्वचित केला नाही तर डिप्रेसड वाटेल. काय उफराटं लॉजिक होतं. तसे डोके मला देवाने कमीच दिलेले आहे.
तर मला वाटायचे चांगल्या सवञीचे अ‍ॅडिक्शन होइल आणि ती नाही फॉलो अप केली तर वैमनस्य येइल.

पण आता मी न चुकता ४० मिनिटे सकाळी व्यायाम करते अथवा वॉक घेतेच. ओहोहो काय पॉझिटिव्ह, करेजस आणि प्रसन्न वाटतं. लिटरली युअर बॉडी हॅज अ वे ऑफ टॉकिंग टु यु. युअर बॉडी थँक्स यु. फक्त ऐकायला आले पाहीजे, स्वतःच्या शरीराशी बोलले पाहीजे.

>>> तसे डोके मला देवाने कमीच दिलेले आहे.

उगीच इथल्या काहींचे दुर्दैव स्वतःच्या नावे स्वीकारू नका

(ही वरील दोन वाक्ये कोणत्याही धाग्यावर चालतील, हा भाग वेगळा) Lol

च्रप्स यांचा लेखातला मुद्दा वॅलिड आहे आहे वजन कमी करण्यासाठी फक्त चालण्यापेक्षा हाई डेन्सिंटी एक्सरसाईज करणे आवश्यक आहे स्पेशली त्यांच्यासाठी ज्यांचे वजन सहजासहजी कमी होत नाही यात मेटाबॉलिजम चाही हात आहे सगळ्यांचा मेटाबॉलिजम रून्मेश सारखा नसावा जो काहीही पचवू शकतो व वजन वाढत नाही.आहार आणि व्यायाम दोन्ही महत्त्वाचे नुसता व्यायाम करून आहार जास्त कॅलरीचा असेल तर काहीच उपयोग नाही. मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये एक मजेशीर फॅक्ट एकीने सांगितला होता की 'प्रत्येक सोसायटी कॉलनी मध्ये दोन आंटीया अश्या असतात ज्या तुम्हाला वर्षानुवर्षे रोज गार्डन मध्ये चालताना दिसतात पण त्यांचे वजन मात्र कमी झालेले दिसत नाही हे कुणी नोटीस केलंय का! 'त्यामुळे पोटात जाणारी प्रत्येक गोष्ट काउन्ट होते हे लक्षात घेऊन आहार घ्यावा.
बाकी लोद्या सारखे पडून राहणाऱ्यासाठी चालणे ही चांगली सुरुवात आहे.

भरतीच्या वेळी चालले तरच च्रप्स लेखानुसार कोणाचेही वजन कमी होऊ शकत नाही उलट वजन वाढते / वाढू शकते त्यामुळे नेहमी समुद्राच्या ओहोटीच्या वेळेनुसार चालण्याचा व्यायाम केला तर नको असलेले वजन झरझर उतरायला मदत होते. आयुष्याचं तरी अजून काय असतें.. Light 1
(टीप - वजन जास्तच उतरले तर आठवड्यातले काही दिवस भरतीच्या वेळी चालणे आणि समतोल राखायला सम विषम दिनांक वाला नियम पाळणे ... Wink आता २ Light 1 )

------------- आता सत्यकथा -----------
फार फार वर्षा पूर्वी आट पाट नगरात एक अज्ञानी राहत होता त्याने निव्वळ सकाळी नियमित एक तास चालण्याचा व्यायाम करून आणि फा वी डी ह्यांच्या शेवटच्या वाक्याला शंभरदा मम करून सहा महिन्यात १५ किलो वजन घटवले होते. तात्पर्य - हलत डुलत गाणी ऐकत गप्पा मारत ग्रुप करून चालणे हा व्यायाम नसून शिस्तीत फास्ट चालणे हा व्यायाम आहे.

च्रप्स यांचा लेखातला मुद्दा वॅलिड आहे आहे वजन कमी करण्यासाठी फक्त चालण्यापेक्षा हाई डेन्सिंटी एक्सरसाईज करणे आवश्यक आहे
>>> thank you

Pages