चालणं म्हणजे व्यायाम आहे, असा जो काही लोगांचा भ्रम आहे ना, तो एकदम तोडायला हवा. बघ, रोज 10,000 स्टेप्स चाललो म्हणून फिट झालं असतं ना, तर जिम, पळणं, आणि योगा करणारे लोग काय उगाच पैसे खर्च करत असतील का? चालणं म्हणजे फक्त हलकं-फुलकं काम आहे, त्याला व्यायाम कसं म्हणायचं भाई?
आजकाल लोकांच्या हातात स्मार्टवॉच असतं, आणि त्यात स्टेप्स गिनतेय, झालं! मग ते सोचते, “वा रे, मी किती फिट आहे!” अरे पण ह्या चालण्यात घाम तरी गळतो का? शरीराला ताण तरी येतो का? काहीच नाही. फक्त रोडवरून फिरायचं आणि समजायचं की आपण फिटनेस के मास्टर झालो. भाई, असं फिटनेस येत असतं तर सगळे लोक चालतच हिरो झाले असते.
तुम्ही बघ ना, चालण्यानं वजन कमी झालंय का कधी? नाही ना? वजन कमी करायचं असेल तर डाएट करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, किंवा जोरात पळा. चालणं फक्त टाइमपास आहे. रोज सकाळी दोन किलोमीटर चालून लोक खुश होतात, पण खरं सांगायचं तर, ते काहीही उपयोगाचं नसतं.
चालणं म्हणजे व्यायाम आहे असं बोलून स्वतःला फसवू नका. असं सोप्पं काहीच नसतं. खरा व्यायाम करा, बॉडीवर काम करा. चालणं हे फक्त चालणंच आहे, फिटनेस नाही!
चालण्याबाबत म्हणाल तर साधारण
चालण्याबाबत म्हणाल तर साधारण १० किलोमिटर ९० मिनिटात चाललात तर अबाउट ३०० ते ३५० कॅलरीज बर्न होतात. वर मी दिलेल्या माहीती नुसार रोजच्यापेक्षा जर ३५०० कॅलरीज जास्त बर्न केल्या तर १ पाउंड वजन कमी होते. म्हणजे १० दिवस १० किलोमिटर रोज न चुकता ९० मिनिटात चाललात तर १० दिवसात तुमचे वजन १ पाउंडाने कमी होइल , १०० दिवस तसे नियमित चाललात तर १० पाउंडने तुमचे वजन कमी होइल व ३०० दिवस तसे नियमित चाललात तर ३० पाउंडने तुमचे वजन कमी होउ शकते. >>>>>
कॅलरीजचा जमाखर्च ठेवणाऱ्यांसाठी (Calorie Burned by Distance Calculator) -
https://www.calculator.net/calories-burned-calculator.html
अदनान सामीने वजन किती कमी
अदनान सामीने वजन किती कमी केलय कोणी पाहीले का? त्याने चालण्याचा व्यायाम केला अथवा नाही ते मला माहीत नाही. त्याची प्रगती अक्षरक्षः कौतुकास्पद आहे.
आजकाल ओझेंपिकचा खूप बोलबाला
आजकाल ओझेंपिकचा खूप बोलबाला होत आहे. कुणाला अनुभव आहे का?
मुकुंद, छान फोटो!
मुकुंद, छान फोटो!
मानव, तुमच्या इथेही फिरण्यासाठी छान जागा आहे.
अजिबात व्यायाम करत नसाल चालण्याच्या व्यायामाला सुरुवात करताना २० मिनीटात १ मैल एवढा माफक गोल ठेवून सुरुवातीला आठवड्याचे ४ दिवस तरी २ मैल चालावे. हळू हळू वेग वाढवत ४० मिनीटात ३ मैलपर्यंत न्यावा आणि आठवड्याचे सातही दिवस चालणे होईल हे बघावे. सलग वेळ देणे शक्य नसेल तर १२-१३ मिनीटात १ मैल असे तुकड्यातुकड्यात जमवावे. वजन किती कमी होत आहे वगैरे चिंता न करता सातत्याने चालणे यावर भर ठेवावा. काही काळाने तासाला ४ते ५ मैल अंतर कापणे जमू लागेल. जोडीला फूड डायरी ठेवावी. आपण काय चुकीचे खातो/पितो ते विचारात घेत हळू हळू त्यातही बदल करावा. कालांतराने आपोआप हेल्दी लाईफस्टाईल तयार होते.
आमच्या इथे सबडिविजनच्या बाहेरच सीटीने चालण्यासाठी ट्रेल/साईडवॉक केला आहे. मी कडाक्याची थंडी/स्नो ऑन ग्राउंड/रेन नसेल तेव्हा चालते. माझी चालण्याची वेळ मात्र ऋतूनुसार बदलते. साधारण ४० मिनीटात ३ मैल होतात. बाहेर चालणे शक्य नसते तेव्हा घरी डिवीडी लावून ४ मैल वॉक अॅट होम. जोडीला इंटमिटंट फास्टिंग. हे पूर्वी १४-१० करत असे आता १२-१२ करते. अन्न घरचेच माय प्लेट गाईडलाईन्स नुसार. बाहेरचे जेवण हे ट्रीट म्हणून किंवा स्पेशल ऑकेजन. अन्न घरचेच हा नियम केल्याने आणि ते आयते मिळणार नसल्याने वेळाचे गणित साधायला मील प्रेप-प्लॅनिंग केले जाते आणि आपोआप साधा पण पोषणमूल्य असलेला आहार घेतला जातो. गावात देशी पदार्थ आयते मिळतच नाहीत त्यामुळे तसेही मोहजाल मुळातच निम्मे! पिझा , वडा, सामोसा, रिब्ज वगैरे जे खावेसे वाटते ते चिट डे मधे फॅमिली टाईम म्हणून प्लॅन करुन करणे होते, एंजॉय करत खाल्ले जाते. बाहेरचे जेवण हे ट्रिट्/स्पेशल ऑकेजनच्या निमित्ताने असल्याने दर वेळी ठरवून वेगवेगळे रेस्टॉरंट निवडले जाते, काहीतरी नवे ट्राय करतो.
>>>>>.सते भरभर ( ब्रिस्क)
>>>>>.सते भरभर ( ब्रिस्क) चालणेच नव्हे तर कुठलाही व्यायाम व शारीरिक हालचाल आरोग्यासाठी चांगले असते. ( वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नुसते लोद्यासारखे पडुन राहण्यापेक्षा!).
होय सक्रियता (अॅक्टिव्ह रहाणे) अत्यंत लाभदायक असते. साधी गोष्ट आहे, रस्तावरुन चालताना, फिरताना आपण मान किती प्रकारे आणि सतत हलवत असतो. मानेचे व्यायाम आपोआप घडतात.
>>>>>आजकाल ओझेंपिकचा खूप
>>>>>आजकाल ओझेंपिकचा खूप बोलबाला होत आहे. कुणाला अनुभव आहे का?
वॅगोव्ही ने वजन कमी होते पण बंद केली की वाढते ( पूर्वीपेक्षा जास्त) असे ऐकलेले आहे. बर्याच इन्श्युरन्स्ने वॅगोव्ही सपोर्ट काढून टाकलेला आहे.
मुकुंद, उत्तम पोस्ट.
मुकुंद, उत्तम पोस्ट.
माझा अनुभव असा आहे की चालण्याने वजन कमी होतं पण स्लो रेटने. चढावर चालल्याने हा रेट जरा वाढतो. त्यामुळे ट्रेडमिलवर चालायचं असेल तर हमखास इन्क्लाइन लावून चालणं पसंत करते मी. त्याने पोटावरची चरबी कमी होते असाही अनुभव आहे.
नुसताच वजन कमी करायचा मुद्दा असेल तर पोर्शन कंट्रोल करण्याला पर्याय नाही.
मुकुंद आणि मानव walk ट्रॅक
मुकुंद आणि मानव walk ट्रॅक फार छान आहेत
हा माझा चालायचा रस्ता -
हा माझा चालायचा रस्ता -
रमड वॉव
रमड वॉव
मुकुंद आणि मानव walk ट्रॅक
मुकुंद आणि मानव walk ट्रॅक फार छान आहेत....+१.
रमडचा पण रस्ता छान आहे.
मुकुंद उत्तम पोस्ट.
मुकुंद उत्तम पोस्ट.
बर्यच्च जणांना चालण्याचे फायदे लक्षात येत नसतील तर हि पुरक पोस्ट आहे. म्हणूनच वरचे लेखाचे टायटल चुकीचे आहे. असो.
------------------
दुसरे म्हणजे मेनोपॉज (मराठीत काय म्हणतात?) स्त्रीयांनी कॉर्टीसल वाढवण्याचे व्यायम करुच नये. पळणं हा सुद्धा एक त्यातलाच प्रकार आहे. त्यापेक्षा वेट लिप्टीग योगा ब्रिस्क वॉकींग उत्तम.
माझे ४ दिवस चालणे, २ दिवस वेट लिप्टींग आणि रोज योगा (मेनोपॉज योगा - गोगलून पहा) करून पाळी गेल्यानंतर सुद्धा १२ -१३ किलो वजन कमी झालेय आणि मी मसल मास मोजते दर तीन महिन्यांनी.
ह्यात आहार आहेच. आणि गेले २ वर्षे तेच वजन(५६) आहे. आणि माझ्या उंचीनुसार कमीच आहे असे ट्रेनर म्हणतो. मी उंच असल्याने बारीक दिसते.
कधीही , काहीही व कुठेही खात नाही. साखर बंद करून ५ वर्षे, गुळ वर्षातून दोन-तीनदा कारण मला मोदक, पुपो, लाडू आवडतात व मन मारून जगण्याने सुद्धा कॉर्टीसल वाढतो(हा माझा अनुभव). तळणे सुद्धा वर्षातून तीन एक वेळा(दिवाळी शेव,चकली,लाडू), भजी , वडे पावसाळ्यातच. सर्व घरचेच बहुतेकदा.
मला तळलेले पदार्थ खुपच आवडायचे, भजी, बटाटा-वडे, शेव, फरसाण, चकली, चिवडा, फाफडा वगैरे मी रोज नियमीत चहा बरोबर खायचे पुर्वी(घरीच केलेले अस्सयचे). रोज खायचे बंद केले तेव्हाच फरक जाणवला. तो सुद्धा वायटीमीन्सची कमी असल्याचा भाग होता. आता लक्षात नाही काय कमी होते पण, ते जेव्हा योग्य प्दार्थ खावून बरे केले.
तर बघा, मेनोपॉज स्त्रीयांना ह्याचा काय फायदा होतो. आता प्रत्येक स्त्तिचेव बॉडी हि युनिक असते. पण थोडा फार फायदा होइल जर आपली दिनचर्या काय आहे आणि काय हवेय नकोय पाहिले तर.
कधीही , काहीही व कुठेही खात
कधीही , काहीही व कुठेही खात नाही. साखर बंद करून ५ वर्षे, गुळ वर्षातून दोन-तीनदा कारण मला मोदक, पुपो, लाडू आवडतात व मन मारून जगण्याने सुद्धा कॉर्टीसल वाढतो(हा माझा अनुभव). तळणे सुद्धा वर्षातून तीन एक वेळा(दिवाळी शेव,चकली,लाडू), भजी , वडे पावसाळ्यातच. सर्व घरचेच बहुतेकदा.>>>>
वॅाव झंपी….
जबरदस्त. दंडवत घ्या.
झंपी... खरेच खूपच कंट्रोल आहे
झंपी... खरेच खूपच कंट्रोल आहे मनावर.
दुसरे म्हणजे मेनोपॉज (मराठीत
दुसरे म्हणजे मेनोपॉज (मराठीत काय म्हणतात?)
रजोनिवृत्ती.
झंपी, मानलं तुम्हाला.
झंपी, मानलं तुम्हाला.
डॉ.बंग यांच्या पुस्तकात लिहिलेल्याप्रमाणे 10 मिनिटांत 1 किमी चालायचा मी एकेकाळी प्रयत्न केला.पण एका मिनिटात 1 फेरी मारण्याचे टेन्शन घेऊन डोके आणि पोटऱ्या दुखू लागल्याने तो प्रकार बंद केला. बरं असं फिरण्याने फ्रेश वाटण्याऐवजी जास्त थकायला व्हायचे.
माझ्या डॉक्टरनी आधी सांगितल्याप्रमाणे चालायला सुरुवात केली.ते म्हणाले होते की brisk walk जमत नसेल तर walking चा वेळ वाढवा.त्यावेळी 3 किलो 1.5 महिन्यात कमी झाले होते.
आता चालण्यात continuity राहिली नाही.
स्बट्रेसचा बराच वाटा आहे माझ्या वजनवाढीत.
सुंदर ट्रॅक नव्हे rmd
सुंदर ट्रॅक आहे rmd
झंपी ,
आहार ताबा बाबत दंडवत घ्या
व्यायाम सातत्य राखणे देखील येरागबाळ्याचे काम नव्हे
मध्येच खंड पडला तरी स्वतःला पुश करत परत सुरू करणे आणि गाडी रुळावर आणणे महत्वाचे असते.
फार्स विथ द डिफरंस.. उपयोगी
फार्स विथ द डिफरंस.. उपयोगी तक्ता. मस्तच.
स्वाती, झंपी तुमच्या खाण्याच्या सवयींमधुन/ संयमा पासुन
बाकीच्यांना खुप शिकण्या सारखे आहे. तसच जोडीला तुम्ही स्वतःला जसे फिजिकली अॅक्टिव्ह ठेवत आहात त्यासाठी खरच तुम्ही कौतुकास पात्र आहात!
रमड, रस्त्यावरचे धुके बघुन टेनेसी-नॉर्थ कॅरोलायना मधल्या ब्ल्यु रिज माउंट्न्स /स्मोकी माउंटन्सची आठ्वण आली. मस्तच!
मोरोबा, ओझेम्पिक/ विगोव्ही डायाबीटीस साठी अप्रुव्ह्ड ड्रग्स आहेत. पण सध्या ती औषधे त्यांच्या “ अॅपिटाइट सप्रेशन“ इफेक्टमुळे सर्रास वेट लॉस साठी “ ऑफ लेबल” म्हणुन वापरली जात आहेत. . खर म्हणजे ते ओबिज डायबीटीस पेशंट्साठी प्रिस्क्राइब केले जाते व त्यासाठी ते अप्रुव्ह केले आहे. इन्शुरन्स कंपनीजची आधीच खुप बंधने होती की ती औषधे कोणाला प्रिस्क्राइब करता येइल यावर. पण त्याचा सर्रास “ऑफ लेबल“ वापर होउ लागल्यामुळे २०२५ पासुन इन्शुरन्स कंपनीजकडुनअजुनच जास्त स्ट्रिक्ट प्रिऑथोरायझेशन रिक्वायरमेंट्स व डिनायल लेटर्स जातील. तुम्ही त्यासाठी डायबिटीक किंवा प्रिडायबीटीक प्लस “ ओबिज“ कॅटेगरीत मोजले गेले पाहीजेत( बी एम आय - बॉडी मास इंडेक्स > ३० ) व तुम्हाला इतर को- मॉर्बिड फॅक्टर्सही असले पाहीजेत( उच्च रक्तदाब किंवा हाय कोलेस्टेरॉल). बहुतेक जे २५०-३००-३५०-४००-४५० पौंड व त्यापेक्षा जास्त वजनाची खरच ओबिज व डायबिटिक पेशंट्स असतात त्यांच्यासाठी या औषधांचा विचार केला जातो. ज्यांना १०-२०-३० पाउंड्स पर्यंतच वजन कमी करायचे असेल त्यांच्यासाठी ओझेम्पिक / विगोव्ही योग्य नाही व प्रिस्क्राइबही केले जात नाही.( पण हॉलीवुड मधली बाया/माणसे काहीही करु शकतात ती गोष्ट वेगळी!)
बिसाइड्स , योग्य आहार व जोडीला सातत्याने केलेला स्विमिंग,सायकलींग,ब्रिस्क वॉकींग, वेट्स, योगा सारखा व्यायाम ओझेम्पिक पेक्षा केव्हाही चांगला!
मुकुंद यांची पोस्ट आवडली आणि
मुकुंद यांची पोस्ट आवडली आणि पटली.
मुकुंद, मानव आणि rmd - चालायच्या रस्त्यांचे फोटो बघून लगेचच चालायला जवसं वाटलं. इतका छान शांत निवांत रस्ता माझ्यासारख्या पुणेकराला स्वप्नवत वाटतो!
झंपिंची पोस्ट खूपच इंस्पायरिंग आहे. विशिष्ट पदार्थ खायचे किंवा खायचे नाहीत, ह्याचाही ताण येतो हा स्वानुभव आहे.
साधारण तंदुरुस्त व्यक्तीला जर वजन कमी करायचे असेल तर नुसता चालण्याचा व्यायाम करून भागत नाही, वेट्स, कार्डियो आणि योग (मुख्यत्वे शारिरीक लवचिकतेसाठी) ह्या तिन्ही प्रकारांना पूरक म्हणून चालणे हे कॉम्बिनेशन चांगले काम करते.
सामो, देवकी, झकासराव, मुकुंद
सामो, देवकी, झकासराव, मुकुंद, अनघा : थँक्यू! इतका रमणीय रस्ता आहे हे चालण्याचं अजून एक मोटिव्हेशन.
रस्त्यावरचे धुके बघुन टेनेसी-नॉर्थ कॅरोलायना मधल्या ब्ल्यु रिज माउंट्न्स /स्मोकी माउंटन्सची आठ्वण आली >>> हे अजून पाहिले नाहीत. पण आता पहावेसे वाटायला लागले.
झंपी, एकदम माहितीपूर्ण पोस्ट. आहारात केलेले बदल फ्युचर रेफ साठी नोट करून ठेवले आहेत. चहातली साखर १३ वर्षांपूर्वीच सोडली ते बरंच केलं असं वाटलं. आणि योगा सुरू केलंय हे ही.
मुकुंद यांची पोस्ट आवडली. खूप
मुकुंद यांची पोस्ट आवडली. खूप श्रम घेऊन , विचार करून , सविस्तर लिहिली आहे. वेगळा धागा काढून लिहिले तर चांगले होईल.
एवढ्या वेळात एवढे चालले तरच.... हे काल वाचल्यापासून डोक्यात जो प्रश्न घोळत होता, त्याचे उत्तर फार्स विथ द डिफरन्स यांनी दिले. लठ्ठ व्यक्तीने हे वेगाचे गणित न पाळता चालले तरी त्याच्या कॅलरीज बर्न होतच असणार.
आता मूळ लेख आणि प्रतिसादातल्या फक्त चालणार्यांची , चालूनही वजन कमी न होणार्यांची खिल्ली , टर उडवणार्यांसाठी.
अशा ( लठ्ठ, फक्त चालणारे, इ. - टर उडवणारे नव्हे ) व्यक्तींच्या काही समस्या असू शकतील हे तुम्ही समजून घ्यायची गरज आहे. मुकुंद यांनी याबद्दल लिहिलंच आहे.
माझ्या मॉर्निंग वॉकच्या रस्त्याने साठीतल्या एक जरा लठ्ठ बाई आपल्याला ओढत ओढत चालत असतात. त्यांचे गुढघे दुखत असावेत, हे पाहून कळतं. अशा लोकांना त्यांना प्रोत्साहन द्यायची गरज आहे. त्यांची टर उडवायची नाही.
माझ्या मॉर्निंग वॉकच्या
माझ्या मॉर्निंग वॉकच्या रस्त्याने साठीतल्या एक जरा लठ्ठ बाई आपल्याला ओढत ओढत चालत असतात. त्यांचे गुढघे दुखत असावेत, हे पाहून कळतं. अशा लोकांना त्यांना प्रोत्साहन द्यायची गरज आहे. त्यांची टर उडवायची नाही.+1
भरत ,माझ्याबद्दल बोलत असाल ,कोणाला वाईट वाटले असेल भावना दुखावल्या असतील तर माफ करा .माझा कुणाचीही टर उडवायचा हेतू नव्हता तर केवळ स्वानुभवातून आलेली गोष्ट सांगण्याकरिता होता high density workout केल्याने जो फरक वजनात पडतो तो केवळ चालण्याने पडला नव्हता. जे लोकं सतत वजन कमी करायचा प्रयत्न करतात परंतु यशस्वी होत नाहीत त्यांना एक योग्य दिशा सुचवण्याचा प्रयत्न होता.बस ,बाकी तुम्हाला कायम अनुमोदन आहे.
खरंय भरत!
खरंय भरत!
Jumping jack ६०-७० nantar karave ki karu naye?
मुकुंद, मानव, रमड कसले सुंदर
मुकुंद, मानव, रमड कसले सुंदर ट्रॅक्स आहेत.
झम्पी तुमचा कंट्रोल जबरदस्त आहे. फरसाण आणि तळकट खाण्याची इच्छा व्हायटॅमीन डेफिशिअन्सीमुळे होते माहित नव्हते. कसे चेक करणार नेमकी कसली डेफिशिअन्सी आहे? आता मल्टिव्हीटॅमिन घ्यावे का?
फरसाण आणि तळकट खाण्याची इच्छा
फरसाण आणि तळकट खाण्याची इच्छा व्हायटॅमीन डेफिशिअन्सीमुळे होते माहित नव्हते. कसे चेक करणार नेमकी कसली डेफिशिअन्सी आहे? +१२३
Omega 3 fatty acids
Omega 3 fatty acids deficiency का?
कल्की, माझ्या पोस्टमध्ये पर्सनल काही नव्हतं. त्यामुळे माफी मागायची गरज नाही.
लठ्ठ माणसांना हसणे. ही सहजप्रवृत्ती आहे. त्यामागे काही समस्या असू शकेल हे आपल्याला माहीतच नसतं.
मलाही हे रीडर्स डाइजेस्ट म़धली एक प्रश्नावली सोडवताना लक्षात आलं. खूप वर्षे झाली त्याला.
मुकुंद, मानव, rmd, वॉकिंग
मुकुंद, मानव, rmd, वॉकिंग ट्रॅक्स इतके सुंदरही असू नयेत की ज्यांना डिस्ट्रॅकशन्स थोपवता येत नसेल असे लोक योग्य वेगात वॉक घ्यायच्या ऐवजी त्याच्या सुंदरतेतच रममाण होतील, आणि अशा ट्रॅक्सवर थोडा वेळ मनोकाळेपणे रेंगाळलं नाही तर जी स्वतःच्या अरसिकपणाची भावना मनात उठणार त्याने ही कॉर्टिसॉल ची पातळी वाढली तर कुणाला सांगणार??
माझे बदल हे एका रात्रीत नाही
माझे बदल हे एका रात्रीत नाही झालेत.
साखर जरी ५ वर्षापुर्वी पुर्ण बंद केली तरी त्याची सुरुवात मी खुप वर्षापासून केली. त्यावेळी माझा एक ट्रेनर हा उत्तम शिक्षक होता. त्याची वा माझी नुसती व्य्यायम नाहितर बॉडी नीड्स, मेटबॉलिजंम वगैरे खोल चर्चा व्हायची. बरेच ट्रेनर हे आता बर्यापैकी शिकले आहेत ह्या बाबतीत पण फार पुर्वी ठोकळे असत व नुसते व्यायाम करून घेत.
तर प्रथम मी चहातली साखर बंद केली. मग चटण्या, सॉस बाहेरचा खाणं बंद केलं. हॉटेलात जेवताना विचारून खायचे की साखर आहे का?
हॉटेलमध्ये टॉमॅटो बेस असलेल्या प्रकारात साखर असतेच असते.
आलतु फालतु मित्र लोकांबरोबर फिरणे, खाणे टाळले.( आलतु फालतु लोकं म्हणजे = जे कुसके आहेत, फक्त चेष्टाच करतात, जळतात दुसर्याची प्रगती बघून असे. माबोवर सुद्धा आहे अश्या लोकांचा भरणा.). बाकी जे लोकं समोरून वा मागून बरळतात त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या. असो.
ह्याने बराच स्ट्रेस कमी होतो व आपला फोकस आपल्यावरच रहातो. :).
मी जेव्हा वेट लिफ्टींग करायचे तर काही टवाळ मित्र मैत्रीण परीवार होता ज्यांना ओ की ठो माहिती न्हवती व्यायाम वगैरेची तरी चेष्टा करत ( अनेक एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे). साखर नको म्हटले की चेष्टा करायची, आग्रह करायचीत उगाच.
तर पहिल्यांदा अश्या लोकांना हकलून टाका आयुष्यातून.,मग ते कोणीही असो. नातेवाईक, मित्र , सोमावरची ओळख. आता तर ब्लॉक करायची सोय आहे. बरेच सुसह्य होते आपले जीवन.
मग जे काही आवडते ते घरीच बनवायचे. मग बाहेरच्या मिठाया बंद वगैरे वगैरे. भजी वडे घरीच करायचे तेव्हा तेल कुठलं वापरायचा ह्यावर आपला ताबा रहातो. झोप सुद्धा खुप गरजेची असते वजन कमी करायला. माझा जॉब हा रात्रीपाळी वगैरे असायची. तेव्हा माझी तब्येत खुपच खराब झाली. मी जॉब सोडला. आणि दुसरा घेतला.
तर सर्व स्वतःवर आहे अवलंबून. मला सतत एक कॉम्प्लिमेंट मिळते चांगल्या लोकांकडून, मी ३२-३४ वाटते. :).
मी घेते आवडीने व धन्यवाद म्हणते त्यांना.
हो, आणि स्त्रीयांना मेनोपॉज जवळ आला की, आधी घरच्यांना समज द्या, बर्याच घरातील पुरुष हे ठोकळे असतात ह्या ज्ञानाच्या बाबतीत. तो एक काळ असतो जो आपणच नाही तर घरातील लोकं सुद्धा तयार पाहिजे सोसायला व मदतीला.
कारण इतकं सारं करूनही जेव्हा मी पुर्णपणे मेनोपॉजमध्ये आले तेव्हा माझे वजन १० किलोने भरकन वाढलेच. मला निद्रानाश सुरु झालेला होता पेरीमेनोपोजमध्ये. आणि तेच कारण होतं वजन वाढण्याचे. तर प्रत्येक शरीर वेगळं तसा तो अनुभव आहे.
बघा तुम्हाला काय जमतय ते.
अशाच एका मॉर्निंग वॉक हून परत
अशाच एका मॉर्निंग वॉक हून परत येताना, हे सुचले......
मॉर्निंग वॉकचा असा देखील फायदा होतो बरे
Angels!
Walking back home,
I find these ,
Strewn all over,
In dust, sludge and grime,
I bend and pick them up,
They hustle together in my handkerchief,
Some fresh, some dirty,
Their mild fragrance,
Hard to ignore,
I gently wash them,
Wipe with a soft caress,
Put them together,
Floating in a pan of water,
Lo and behold!
They beam together like angels,
In a marvellous display,
Of divine togetherness!
Good morning!
Simple joys making my life so rich!
Ravi...
आई ग्ग! किती सुंदर कविता आहे.
आई ग्ग! किती सुंदर कविता आहे. एंजल्स इन्डीड.
मी खारुताया, रॉबिन्स, स्टार्लिग्ज आणि मोउर्निंग डव्ज असेच अनिमिष पहात रहाते. चिमण्याही. दे आर एंजल्स इन माय लाईफ. दे आर गोइन्ग अबाऊट देअर लाईफ. त्यांना माहीतही नसतं किती गोंडस आहोत आपण ते
Pages