चालताय की वजन वाढवताय?

Submitted by च्रप्स on 15 December, 2024 - 20:21

चालणं म्हणजे व्यायाम आहे, असा जो काही लोगांचा भ्रम आहे ना, तो एकदम तोडायला हवा. बघ, रोज 10,000 स्टेप्स चाललो म्हणून फिट झालं असतं ना, तर जिम, पळणं, आणि योगा करणारे लोग काय उगाच पैसे खर्च करत असतील का? चालणं म्हणजे फक्त हलकं-फुलकं काम आहे, त्याला व्यायाम कसं म्हणायचं भाई?

आजकाल लोकांच्या हातात स्मार्टवॉच असतं, आणि त्यात स्टेप्स गिनतेय, झालं! मग ते सोचते, “वा रे, मी किती फिट आहे!” अरे पण ह्या चालण्यात घाम तरी गळतो का? शरीराला ताण तरी येतो का? काहीच नाही. फक्त रोडवरून फिरायचं आणि समजायचं की आपण फिटनेस के मास्टर झालो. भाई, असं फिटनेस येत असतं तर सगळे लोक चालतच हिरो झाले असते.

तुम्ही बघ ना, चालण्यानं वजन कमी झालंय का कधी? नाही ना? वजन कमी करायचं असेल तर डाएट करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, किंवा जोरात पळा. चालणं फक्त टाइमपास आहे. रोज सकाळी दोन किलोमीटर चालून लोक खुश होतात, पण खरं सांगायचं तर, ते काहीही उपयोगाचं नसतं.

चालणं म्हणजे व्यायाम आहे असं बोलून स्वतःला फसवू नका. असं सोप्पं काहीच नसतं. खरा व्यायाम करा, बॉडीवर काम करा. चालणं हे फक्त चालणंच आहे, फिटनेस नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'प्रत्येक सोसायटी कॉलनी मध्ये दोन आंटीया अश्या असतात ज्या तुम्हाला वर्षानुवर्षे रोज गार्डन मध्ये चालताना दिसतात पण त्यांचे वजन मात्र कमी झालेले दिसत नाही हे कुणी नोटीस केलंय का! '
>> ROFL

वजन कमी करणं हा एकच उद्देश नसेल तरी, हातभार नक्कीच लागतो चालून. तो कसा तर,

कॉर्टीसल कमी होते, ताण कमी होतो मोकळ्या जागेत चालण्याने.
इन्सुलिन सेसिटिविटी सुधारते. बर्‍यापैकी मधुमेहास फायदा होतो. वजनास अश्या रीतीने हातभार लागतो.
मूड बदलतो.
बरेच फायदे आहेत चालण्याने. जोडीला खाण्यावर नियंत्रण पाहिजे.

उगाच ब्लॅंकेट स्टेटमेंट करुन लेख लिहु नका की काहीच होत नाही असे.
उलट, पळण्याने नुकसानच आहे वयाच्या २५ नंतर. कधीच पळु नये २५ नंतर ज्याला वजन कमी करायचे असेल तर.
बाकी जगाला आता माहितीच असेल, वेट लिफ्टींग, स्ट्रेंग्थ ट्रेनींग हे ओप्शन बेस्ट आहेत.

वजन वाढणे व वजन कमी होणे याचे समिकरण एकदम साधे आहे पण त्या समिकरणावर बर्‍याच गुंतागुंतीच्या गोष्टींचा प्रभाव असतो. तो कसा हे आपण आता पाहु.

कॅलरी इन्टेक मायनस कॅलरी एक्स्पँडिचर हे साधे समिकरण लक्षात ठेवा.

या समिकरणात जर ३५०० अधिक असे कॅलरी उत्तर आले तर तुमचे वजन १ पाउंडाने वाढते व जर उत्तर ३५०० कॅलरी उणे आले तर तुमचे वजन १ पाउंडाने कमी होते.

त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर समिकरणातल्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

कॅलरी इन्टेक कमी करणे म्हणजे तेलकट/ तुपकट कमी खाणे, जंक व प्रॉसेस्ड फुड कमी किंवा वर्ज्य करणे, गोड पदार्थ कमी खाणे, कोक, पेप्सी, थम्ब्स अप सारखे एम्प्टी कॅलरीज असलेली पेये पिणे बंद करणे व जास्त कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ ( भात, बटाटे, पाव वगैरे) कमी खाणे.

कॅलरी एक्स्पेन्डिचर वाढवणे म्हणजे व्यायाम करणे. त्यात स्विमिंग, सायकलिंग, चालणे, धावणे, दंड/ बैठका,दोरीच्या उड्या, डम्बेल्स, इतर वजने वापरुन केलेले व्यायाम हे सगळे आले.

या सगळ्या व्यायाम प्रकारात कॅलरी एक्स्पॅन्डिचर होत असते. पण त्या एक्स्पॅन्डिचरचे प्रमाण २ गोष्टींवर अवलंबुन असते.

१: तुम्ही किती वेळ व कोणता व्यायाम करता व
२: तुमचा मुळचा बेसिक मेटाबोलिक रेट किती आहे( कॅलरीज बर्न करायचा तुमचा मुलतः रेट किती आहे)

तुम्ही जास्त वेळ व्यायाम केला तर जास्त कॅलरी एक्स्पॅन्डिचर होते

तुमच्या शरीराचा बेसिक मेटाबॉलिक रेट जास्त असेल तर जास्त कॅलरी एक्स्पॅन्डिचर होते.

आता आपण या “ बेसिक मेटाबॉलिक रेट“ या महत्वाच्या मुद्द्याला व तो रेट कशावर अवलंबुन असतो ते थोडक्यात समजुन घेउ.

हा बेसिक मेटाबॉलिक रेट तुमचे लिन बॉडी मास, लाइफस्टाइल( सेडेन्टरी ऑर अ‍ॅक्टिव्ह), जेनेटिक्स( हेरीडीटी,)जेंडर, तुमचे स्ट्रेस लेव्हल , थायरॉइड लेव्हल व वय अश्या बर्‍याच गोष्टींवर अवलंबुन असतो.

१: लिन बॉडी मास व बेसिक मेटाबॉलिक रेट या दोघांचा संबधः

तुमच्या शरिरातले स्नायु तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा कॅलरीज बर्न करतातच पण तुम्ही रेस्टींग स्टेज मधे असतानाही ते स्नायु कॅलरीज बर्न करतच राहतात. त्यामुळे ज्यांच्या शरिरात स्नायुंचे प्रमाण जास्त असते त्यांचा बेसिक मेटाबॉलिक रेट जास्त असतो.. म्हणुन शरिरातले स्नायुचे प्रमाण वाढवल्यास किंवा घटु न दिल्यामुळे ( लिन बॉडी मास) कॅलरीज जास्त बर्न होण्यास मदत होते

२: वय व बेसिक मेटाबॉलिक रेट यातला संबंध

जस जसे आपले वय वाढते तसे हा बेसिक मेटाबॉलिक रेट घटत जातो. खासकरुन ४० नंतर हा बेसिक मेटाबॉलिक रेट फारच वेगाने कमी कमी होत जातो. म्हणुन वय वाढते तसे व्यायाम करुन शरिरातले स्नायुंचे प्रमाण कायम ठेवण्याचा व नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न चालु ठेवणे हे खुप महत्वाचे असते. त्याचबरोबर आहारही कमी व आटोक्यात ठेवुन समिकरणाच्या डाव्या बाजुलाही विसरता कामा नये!

पण पुष्कळदा होत काय की जस आपल वय वाढत तसा आपला आहार तेवढाच राहतो पण व्यायाम करणे/ फिजिकल अ‍ॅक्टिव्हीटी़ज मात्र कमी होत जातात व आपला लिन बॉडी मास कमी कमी होत जातो. ( त्या सिडेंटरी लाइफस्टाइलला मिडलाइफमधे असलेल्या मुल बाळांच्या जबाबदार्‍या, स्वतःचे करिअर पिक , नुकतेच वार्धक्याकडे झुकलेले आइ वडिल यांची जबाबदारी अशी अनेक लेजिटीमेट कारणेही असतात! )

परिणाम= एक्सिस कॅलरीज इन बॉडी= वजन वाढ!

त्यात भर म्हणजे जर का वजन वाढतच राहीले तर साधारण चाळीशीच्या आसपास पुष्कळांना टाइप २ डायाबीटीस ही व्याधी सुरु होण्याची दाट शक्यता असते! तो जर डिटेक्ट केला गेला नाही व त्यावरचे उपाय जर चालु केले नाहीत तर मग एक दुष्टचक्र सुरु होते.

डायाबिटीस म्हणजे इन्सुलिनची कमतरता ज्यात जेवणातली शुगर शरीरामधल्या मधल्या सगळ्या पेशीं मधे न जाता( जिकडे त्या शुगरची गरज आहे) ती शुगर रक्तातच राहते . परिणामी शरिरातल्या पेशी भुक भुक करतच राहतात. म्हणुन मग तुमचा मेंदु -पक्षि-सटायटी सेंटर- तुम्हाला जास्त खायला उद्युक्त करतो.. म्हणजे परत जास्त शुगर इनटेक— पण परत ती जास्तीची शुगर रक्तामधेच राहते ! शरिरातल्या पेशी भुकेल्याच राहतात व परत त्या पेशी भुक भुक करतात.. असे हे दुष्टचक्र चालुच राहते…. त्याचा परिणाम? एक्सिस कॅलरीज इन युअर बॉडी—— परिणाम? वजन वाढ!

३: तुमच्या आयुष्यातला चाळीशीपर्यंत आलेला क्रॉनिक स्ट्रेस् व त्यामुळे तुमच्या शरिरात सिक्रिट होणारे अ‍ॅड्रिनलिन व कॉर्टिसॉल हे स्ट्रेस हॉर्मोन्स बर्‍याच जणांची/ जणींची भुक खुप वाढवते व इन्सुलिन रसिस्टन्स वाढवतात. इन्सुलिन रसिस्टन्सचा परिणाम डायबिटीस सारखाच असतो. इन्सुलिन रझिस्टन्स व जास्तीची भुक या दोन गोष्टीमुळे तुम्ही जर क्रॉनिक स्ट्रेसमधे असाल तर मग तो स्ट्रेस तुमचे वजन वाढण्यास कारणीभुत होतो.

४: वयोमानानुसार शरिरातले टेस्टास्टेरॉन हॉर्मोनचे प्रमाण कमी कमी होत जाते. त्याचा परिणाम शरिरात मसल मास कमी होण्यात व एक्सिस फॅट अ‍ॅक्युम्युलेश मधे होतो व मग त्यामुळे तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेटही कमी होतो.

मुद्दा क्रमांक ३ व मुद्दा क्रमांक ४ मधे नमुद केलेल्या २ गोष्टींमुळे शरिरात मग फॅटचे प्रमाण वाढते( पुरुषांचे पोटाच्या घेरावर व स्त्रियांचे मांड्या व पार्श्वभागावर) .त्यामुळे पुरुष व स्त्रिया या दोघांमधे त्यांचे लिन बॉडी मास अधिकच कमी होउन त्यांचा बेसिक मेटाबॉलिक रेट आणखीन कमी होतो व त्यामुळे वजन वाढ होते!

(म्हणुन नीट व्यवस्थित झोप व स्ट्रेस् रिलिफ करणार्‍या गोष्टी याचा वजन नीट कंट्रोल मधे राहण्याशी घनिष्ट संबंध असतो हेही समजुन घेतले पाहीजे.)

५: हायपोथायरॉयडिझम मुळे बेसिक मेटाबॉलिक रेट घटु शकतो व म्हणुन ते जर ट्रिट केले नाही तर त्यामुळेही तुमचे वजन वाढु शकते.

६: मेटाबॉलिक रेट व हेरिडिटी: आपण आपल्या बाजुला नेहमी बघतो की एखादी व्यक्ती( बाई किंवा पुरुष) चाळीशी नंतरही चवळीच्या शेंगेसारखे दिसतात! त्याचे कारण म्हणजे ते नियमित व्यायाम व योग्य आहार तर करत असतातच पण तशी माणसे त्यांच्या पुर्वजांकडुन “ जेनेटिक लॉटरी“ घेउन आलेली असतात! त्यांचा बेसिक मेटाबॉलिक रेट मुलतः जास्त तरी असतो किंवा त्यात वयोमानानुसार फरक( म्हणजे कमी) पडत नाही. मग आपल्याला अश्या बायका पन्नाशीतही बिकिनी घालुन त्यांचे बिकीनीतले फोटो वारंवार जगाच्या तोंडावार फेकुन मारत असताना दिसतात ( उदा: एलिझाबेथ हर्ली!). पण तशी जेनेटिक लॉटरी फार क्वचित कोणाच्या नशीबी येते. बहुतेकांना वजन कमी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी मी वर नमुद केलेल्या बर्‍याच गोष्टींकडे नीट लक्ष ठेवुन मेहनत घ्यावी लागते.

होपफुली हे वजन वाढीबद्दलचे गुंतागुंतीचे स्पष्टिकरण मी थोडक्यात (?) पण सोप्प्या शब्दात व समजेल असे मांडले आहे असे मला वाटते.

या प्रत्येक मुद्द्यावर अजुन खुप खोलात जाता येइल पण तुर्तास इतके बस.

आता इथे चालण्याबाबत विचार मांडले जात आहेत त्या अनुषंगाने….

मी वर म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यायाम प्रकारात व्यायामानुसार कमी अधिक कॅलरीज बर्न होतात.

चालण्याबाबत म्हणाल तर साधारण १० किलोमिटर ९० मिनिटात चाललात तर अबाउट ३०० ते ३५० कॅलरीज बर्न होतात. वर मी दिलेल्या माहीती नुसार रोजच्यापेक्षा जर ३५०० कॅलरीज जास्त बर्न केल्या तर १ पाउंड वजन कमी होते. म्हणजे १० दिवस १० किलोमिटर रोज न चुकता ९० मिनिटात चाललात तर १० दिवसात तुमचे वजन १ पाउंडाने कमी होइल , १०० दिवस तसे नियमित चाललात तर १० पाउंडने तुमचे वजन कमी होइल व ३०० दिवस तसे नियमित चाललात तर ३० पाउंडने तुमचे वजन कमी होउ शकते. ( अर्थात समिकरणाची डावी बाजु म्हणजे कॅलरि इनटेक हा त्या ३०० दिवसात कॉन्स्टंट ठेवला किंवा कमी केला तरच हे वजन कमी होउ शकते हे ध्यानात ठेवा Happy )

नुसते १-२ दिवस किंवा १-२ आठवडे किंवा १-२ महिन्यात फरक जाणवणार नाही पण नित्य नेमाने वर्षभर वेगाने ( ब्रिस्क वॉक) रोज् १० किलोमिटर चाललात तर नक्कीच फळ दिसेल.

इथे चालुन किंवा इतर व्यायाम करुनही वजन कमी करण्यात अपयश आलेल्यांनी बेसिक मेटाबोलिक रेट वर परिणाम करणार्‍या इतर ज्या गोष्टी मी नमुद केल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे का याचा जरुर विचार करावा.

(अर्थात फक्त ५ किलोमिटरच रोज चाललात तर १ पाउंड वजन कमी करायला २० दिवस लागतील व फक्त २.५ किमी रोज चाललात तर १ पाउंड वजन कमी करायला ४० दिवस लागतील.)

एवढे लिहुन मी माझे वजन पुराण थांबवतो! Happy

तळटिपः स्त्रियांसाठी: जस पुरुषांमधे चाळीशी नंतर टेस्टास्टेरोन लेव्हल कमी होउन त्याचा परिणाम त्यांचे लिन बॉडी मास कमी होण्यात, बेसिक मेटाबॉलिक रेट कमी होण्यात व एक्सिस फॅट अ‍ॅक्युम्युलेशन होण्यात होतो तसच स्त्रियांमधेही पेरी मेनोपॉज/ मेनोपॉज दरम्यान इस्ट्रोजन( व टेस्टास्टिरोनही!) लेव्हल कमी कमी होत गेल्यामुळे त्यांचे लिन बॉडी मास कमी होणे, बेसिक मेटाबॉलिक रेट कमी कमी होत जाणे, इन्सुलिन रसिस्टंस वाढणे, भुक वाढणे, मुड स्विन्ग्स होणे, हॉट फ्लॅशेस होणे अश्या गोष्टी सुरु होउ शकतात. त्यांच्या इटींग हॅबीट वर व व्यायाम करण्याच्या/ फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहण्याच्या मोटिव्हेशनवर मग त्याचा परिणाम होउ शकतो. परिणामी स्त्रियांचे वजन त्या काळात भर भर वाढण्याची दाट शक्यता असते.

(स्त्रियांचे त्या काळात वजन वाढायची ती कारणे असु शकतात हे मी वरच्या मुळ आर्टिकल मधे लिहायचे विसरलो ते मुळ आर्टिकल मधे अ‍ॅड केले आहे)

>>> शिस्तीत फास्ट चालणे हा व्यायाम आहे.

अचूक!

जवळपास पळण्यापेक्षा किंचित कमी वेगात चालणे

तळटिपः स्त्रियांसाठी: जस पुरुषांमधे चाळीशी नंतर टेस्टास्टेरोन लेव्हल कमी होउन त्याचा परिणाम त्यांचे लिन बॉडी मास कमी होण्यात, बेसिक मेटाबॉलिक रेट कमी होण्यात व एक्सिस फॅट अ‍ॅक्युम्युलेशन होण्यात होतो तसच स्त्रियांमधेही पेरी मेनोपॉज/ मेनोपॉज दरम्यान इस्ट्रोजन( व टेस्टास्टिरोनही!) लेव्हल कमी कमी होत गेल्यामुळे त्यांचे लिन बॉडी मास कमी होणे, बेसिक मेटाबॉलिक रेट कमी कमी होत जाणे, इन्सुलिन रसिस्टंस वाढणे, भुक वाढणे, मुड स्विन्ग्स होणे, हॉट फ्लॅशेस होणे अश्या गोष्टी सुरु होउ शकतात. त्यांच्या इटींग हॅबीट वर व व्यायाम करण्याच्या/ फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहण्याच्या मोटिव्हेशनवर मग त्याचा परिणाम होउ शकतो. परिणामी स्त्रियांचे वजन त्या काळात भर भर वाढण्याची दाट शक्यता असते.

(स्त्रियांचे त्या काळात वजन वाढायची ती कारणे असु शकतात हे मी वरच्या मुळ आर्टिकल मधे लिहायचे विसरलो ते मुळ आर्टिकल मधे अ‍ॅड केले आहे)

>>> बेफिकीर तुम्ही जरा मनावर घ्या की… जुन्या कादंबऱ्याची किती आवर्तने करावी आम्ही

पहिले वाक्य वाचून वाटले की आपले वजन भयंकर वाढले की काय! या तुमच्या प्रतिसादाचा आणि धाग्याच्या विषयाचा काही फारसा संबंध नसला तरी "घेतो बरे मनावर" (गौरव मोरे)!

अभिप्रायासाठी मनःपूर्वक आभार सीमा२७६

मुकुंद, मस्त सर्वांगाने विचार करून लिहिलेली पोस्ट.
फक्त उदाहरणात ३५०० कॅलरी का घेतलंस प्रश्न पडला. साधारण वेष्टनांवर २००० कॅलरीचं उदाहरण असतं म्हणून प्रश्न पडला.

मुकुंद, उत्तम पोस्ट!
अमित,
वेष्टनावर २००० कॅलरीच्या हिशोबाने लिहितात कारण अमेरीकन स्री-पुरुषांच्या एकंदरीत दिवसाला किती कॅलरीज जातात त्याचा जो सेल्फ रिपोर्टेड डेटा होता त्यावरुन एक अ‍ॅवरेज आकडा घेतला. प्रत्यक्षात गरज त्यापेक्षा कमी /जास्त असते. मात्र ३५०० कॅलरी म्हणजे १ पौंड हे सगळ्यांसाठी सारखे. तूट आली की वजन कमी होणार भर पडली की वाढणार.

मध्यंतरी विद्या बालनच्या एका व्हिडिओमध्ये तिने पुन्हा पुन्हा वजन कमी न होण्याचे कारण इनफ्लेमेशन हे सांगितले होते. तरी यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?

अमित, स्वातीने खुलासा केलाच आहे. आय केम फ्रॉम ओल्ड स्कुल..

गेल्या १०-१२ वर्षात या क्षेत्रात बरेच नविन रिसर्च व स्टडीज आले आहेत. ते सगळे इथे मांडायचा माझा उद्देश नव्हता. माझ्या पोस्टीमागचा माझा उद्देश वजन वाढीचे/ कमी होण्याची गुंतागुंतीची कारणे एकदम साध्या व समजायला सोप्प्या भाषेत समजावीत हा होता.

वजन वाढ/कमी हे कधीच तंतोतंत कॅलरीज मोजमापा प्रमाणे होत नसते. माझ्या पोस्टीत मी नुसता त्या विषयाचा “ सरफेस स्क्रॅच” केला आहे. पण आशा आहे की इच्छुकांना त्याचा थोडा तरी उपयोग झाला असेल.

हे पोस्ट लिहीण्याचा प्रपंच एवढ्यासाठी केला की “ नुसते चालण्याने” काही फरक पडत नाही असा विवाद इथे काही जण करत होते ते वाचुन चालण्यासकट या विषयावर थोडे खोलात जाउन लिहायची इच्छा झाली. त्यातुन एका जरी व्यक्तीला फायदा झाला तरी ते लिहीण्यामागचा माझा हेतु सफल झाला अस मी समजीन.

नुसते भरभर ( ब्रिस्क) चालणेच नव्हे तर कुठलाही व्यायाम व शारीरिक हालचाल आरोग्यासाठी चांगले असते. ( वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नुसते लोद्यासारखे पडुन राहण्यापेक्षा!).

सगळ्यांनाच हेवी कार्डिओ, “HIT” वर्क आउट, धावणे , हेवी वेट लिफ्टींग व वेट ट्रेनींग असे व्यायाम जमतीलच असे नाही. पुष्कळांचे वजन जास्त झाल्यावर गुढगेही दुखत असतात. त्यांच्यासाठी मग चालणे एवढेच शक्य होते( तेही कसे बसे) . पण कासव- ससा शर्यतीच्या गोष्टीप्रमाणे जर ब्रिस्क चालण्यातही चिकाटी दाखवली व कॅलरी इनटेक कडे पण नीट लक्ष दिले तर हळु हळु का होइना पण चालण्याचाही फायदा होतोच खासकरुन ह्रुदयासाठी! आणी वर बर्‍याच जणांनी नमुद केलेच आहे की चालण्याने मनाला प्रसन्न वाटते, मुड चांगला होतो, निसर्गात किंवा लेक भोवती चाललात तर पक्षी, त्यांचे आवाज ऐकुन, झाडे बघुन स्ट्रेसही कमी होउ शकतो. तेही नसे थोडके! माझ्या पोस्टमधे मी स्ट्रेस व वजन वाढ याबद्दल लिहीलेच आहे. असो.

ज्यांना माझे पोस्ट आवडले त्यांना धन्यवाद.

मुकुंद पोस्ट छान आणि माहितीपूर्ण आहे. अनेकांना मार्गदर्शक ठरेल.
लेख हा खास करून तरुण ते मध्यमवय गटातील आणि धडधाकट (ज्यांना खास मेटॅबॉलिझमबद्दल समस्या नाहीत) लोकांसाठी आहे असे मला वाटले/वाटते.
दोन तीन किलोमीटर चालणे, त्यात मध्ये देऊळ, भाजी/किराणा करणे, कामाच्या ठिकाणीही इकडून तिकडे चालणे होते ते धरून स्टेप्स मोजणे आणि कमी भरल्या असतील तर रात्री टेरेसवर किंवा आजूबाजूला एखादी चक्कर मारणे अशी कितीतरी उदाहरणे पहाण्यात आहेत.. त्याबद्दल हे असावे असे वाटले. (पायाच्या त्रासामुळे माझेही जवळपास असेच चालणे होते, स्टेप्स मोजून फायदा नाही म्हणुन मोजत नाही.)

कुणी दहा किलोमीटर गंभीर ब्रिस्क वॉक करत असेल, तर अर्थात त्याला व्यायाम म्हणता येईल आणि (कॅलरी रेस्ट्रिक्शन सोबत) वजनही कमी करता येईल.

अधिक वयोमान, इतर समस्या यांचा विचार केला तर त्यानुसार आहे त्या परिस्थितीपेक्षा दोन तीन किलोमीटर चालणे किंवा दिवसभरात एकंदरीत हालचाल करत राहणे हलके फुलके स्ट्रेचिंग करणे यालाही व्यायाम म्हणता येईल.
जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये लोक व्यायाम, खेळ याला जेवढे महत्व देतात आणि ज्याप्रमाणे सामान्य माणसे ते करतात (निदान १५ दहा वर्षांपूर्वीतरी) त्यातुलनेत मला आपल्याकडील सामान्य माणसे फार कमी करतात असे नेहमी वाटत असे.

IMG_2988_1.jpegIMG_2988.jpeg

हा माझा रोजचा ६माइल्स ब्रिस्क चालण्याचा आमच्या नेबरहुडच्या लेक भोवतीचा रस्ता!

मानव, मलाही ते जाणवले. पण माझ्या अनुभवात बहुतेक मिडल एज व पुढचीच स्त्रिया/ पुरुष त्यांची पावले चालण्यालडे उचलतात. त्यांनी नाउमेद होउ नये म्हणुन माझे पोस्ट!

मला फोटो दिसला नाही, नंतर क्रोमवरून बघेन.
आमच्याघराजवळ तलाव आहे आणि त्याभोवती ११ किमी ट्रॅक आहे. (पण त्यावरुन गाई म्हशीही फिरतात काही भागात. )

माझी वरची पोस्ट खरंतर आता उंटावरून शेळ्या हाकण्यासारखी आहे कारण गेली काही वर्षे छोट्या अपघातात एका पावलाला झालेल्या समस्येमुळे तीन किलोमीटरच्यावर चालणे होत नाही, आणि व्यायामालाही मर्यादा आहेत. एक दीड किमी चे तीन किमी व्हायलाच दोन वर्षे लागली. पण पूर्ण फेरी करण्याची (रोज) उमेद बाळगून आहे, त्यात वयोमान हे ही लौकरच एक चॅलेंज ठरेल. बघु कसे जमतेय ते.

हा आमचा ट्रॅक.
Screenshot_2024-12-18-12-37-44-26_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

<<<<धाग्याच्या विषयाचा काही फारसा संबंध नसला तरी "घेतो बरे मनावर" (गौरव मोरे)!

अरे तुम्ही सापडतच नाय होते मग मी ठरवला होता जिकडे तुम्ही दिसल तिकडेच बोलायच ….तुम्ही लिहितेच नाही आजकाल.

मानव, मस्तच रस्ता व परिसर!

तुम्ही बिलकुल नाउमेद होउ नका! मस्त परिसर एंजॉय करा, कधी हेडफोन लाउन आवडीचे संगीत ,गाणी ऐका, पॉडकास्ट ऐका, ऑडिओ बुक्स ऐका.. तुमचे हार्ट तुम्हाला ३ किलोमिटर चालण्यानेही धन्यवाद देइल!

( मला दिसतो फोटो, पण परत टाकला आहे)

>>> अरे तुम्ही सापडतच नाय होते मग मी ठरवला होता जिकडे तुम्ही दिसल तिकडेच बोलायच ….तुम्ही लिहितेच नाही आजकाल.

Lol

मुकुंद सर, फोटो सॉलिड

मुकुंद , छान आणि सोप्या शब्दांत लिहिलयं.. आवडला आणि पटला तुमचा प्रतिसाद..!

Pages