चालताय की वजन वाढवताय?

Submitted by च्रप्स on 15 December, 2024 - 20:21

चालणं म्हणजे व्यायाम आहे, असा जो काही लोगांचा भ्रम आहे ना, तो एकदम तोडायला हवा. बघ, रोज 10,000 स्टेप्स चाललो म्हणून फिट झालं असतं ना, तर जिम, पळणं, आणि योगा करणारे लोग काय उगाच पैसे खर्च करत असतील का? चालणं म्हणजे फक्त हलकं-फुलकं काम आहे, त्याला व्यायाम कसं म्हणायचं भाई?

आजकाल लोकांच्या हातात स्मार्टवॉच असतं, आणि त्यात स्टेप्स गिनतेय, झालं! मग ते सोचते, “वा रे, मी किती फिट आहे!” अरे पण ह्या चालण्यात घाम तरी गळतो का? शरीराला ताण तरी येतो का? काहीच नाही. फक्त रोडवरून फिरायचं आणि समजायचं की आपण फिटनेस के मास्टर झालो. भाई, असं फिटनेस येत असतं तर सगळे लोक चालतच हिरो झाले असते.

तुम्ही बघ ना, चालण्यानं वजन कमी झालंय का कधी? नाही ना? वजन कमी करायचं असेल तर डाएट करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, किंवा जोरात पळा. चालणं फक्त टाइमपास आहे. रोज सकाळी दोन किलोमीटर चालून लोक खुश होतात, पण खरं सांगायचं तर, ते काहीही उपयोगाचं नसतं.

चालणं म्हणजे व्यायाम आहे असं बोलून स्वतःला फसवू नका. असं सोप्पं काहीच नसतं. खरा व्यायाम करा, बॉडीवर काम करा. चालणं हे फक्त चालणंच आहे, फिटनेस नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेव्यु
अगदी अर्थ वाही कविता आहे.

थँक्यू माझेमन, फाविदडि, स्वाती२ आणि बेफि Happy

@फाविदडि, कॉमेंट वाचून 'चिंगारी कोई भडके' गाण्याची आठवण झाली Happy

झंपी, लाखमोलाची पोस्ट!

रेव्यु, छान आहे कविता.

अर्धा तास सायकल चालवणे व अर्धा तास वेगात चालणे यापैकी काय फायदेशीर ठरू शकते,वजन आटोक्यात ठेवण्यासाठी

>>सगळ्यांचे चालण्यासाठीचे रस्ते आवडले<<
इथले ट्रेल्स्/ग्रीन्वेज म्हणजे एकप्रकारची चंगळ आहे. तलाव, नद्यांना स्पर्शुन झाडितुन काढलेली पाउलवाट असणं हा प्रिविलेज म्हणायला हरकत नाहि. आमच्या गावात एक-दोन वर्षांपुर्वि रबराय्ज्ड ट्रेल्स बांधलेत (कल्चर शॉक म्हणु शकता). घरातली कार्पेट्स कुशन्ड असतात पण आता टेल्ससुद्धा आरामदायी व्हायला लागली आहेत...

मुकुंद, मस्त सविस्तर पोस्ट. मी एक अ‍ॅड करीन कि आता नविन वर्षात नविन संकल्प येतील, उत्साहि मंडळींनी सोशल मिडियावर वाचुन धाडसी व्यायाम करु नये. प्रत्येकाचं रेंज ऑफ मोशन, एंड्युरंस लेवल वेगळं असतं. त्याचं प्रॉपर इवॅल्युएशन केल्याशिवाय व्यायामाचा कुठलाहि प्रकार करु नये. एरोबिक, अ‍ॅनेरोबिक व्यायाम करताना तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट, विओ२ मॅक्स इ. मेट्रिक्स ध्यानात घेणं जरुरी आहे. हल्ली वेरेबल्स (अ‍ॅपल वॉच, फिट्बिट, गार्मिन्स इ.) च्या मदतीने हे इंडिकेटर्स ट्रॅक करता येतात..

थोडक्यात, तुमचा जो काहि हेल्थ रेजमन असेल, तो डोळसपणे एक्झिक्युट करा हे आवर्जुन सांगतो...

राज, योग्य सल्ला दिला आहेस. म्हणुन मी सार्वजनिक संकेतस्थळावर वैयक्तिक सल्ला देण्याचे आवर्जुन टाळतो. माझे सबंध पोस्ट बघशील तर ते “ जेनेरिक“ टाइपचे आहे.

अमेरिकेत खरच असे चालण्यासाठी/ जॉगींग साठी/ बायसिकलींग साठी ऑल्मोस्ट प्रत्येक नेबरहुडमधे खास असे नेचर मधुन ट्रेल्स केलेले असतात. नेबरबुडमधे नसेल तर बहुतेक सीटी किंवा काऊंटीचे पार्क अँड रिक्रिएशन डिपार्टमेंट असते जे नागरिकांसाठी असे ट्रेल्स गावातल्या ओढ्यांच्या बाजुने, नदिच्या बाजुने, तलावांच्या बाजुने किंवा गर्द झाडींच्या मधुन गावातल्या नागरिकांसाठी चालायला/जॉगींगला/ बायसिकलींगला खास प्लानींग करुन तयार करतात. आमच्या सिटीमधे तर एक जुन्या व आता न वापरात असणार्‍या २० माइल्स रेल ट्रॅकचे अश्या ट्रेल मधे रुपांतर केले आहे. त्यात एक बोगदाही आहे! त्या ट्रेलच्या आजु बाजुला गर्द झाडी व ओढाही आहे. त्यावरुन चालताना / बायसिकलींग करताना तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही एका मोठ्या मेट्रोपॉलिटन सीटीमधे आहात म्हणुन!

अवांतरः (मी तर गेली कित्येक वर्षे माझ्या सुट्ट्यासाठीही अश्या नॅशनल पार्क्स मधे जातो की तिथे भरपुर हाइक्स करता येतात. या वर्षी माउंट रेनिअर/ माउंट ऑलिम्पिक मधे व लागोपाठ दुसर्‍या वर्षी कॅनडाच्या बॅन्फ नॅशनल पार्कला गेलो होतो. गेल्या वर्षी ग्लेशिअर नॅशनल पार्कला गेलो होतो. हायकिंग आवडत असेल( किंवा नसेलही तरी!) तर या ३ पार्क्सची मी आवर्जुन शिफारस करीन!जणु काही पृथ्विवरचा स्वर्ग! अहाहा! काय वर्णावे तिथले सौन्दर्य! टोटल स्ट्रेसबस्टर! कोणाला तिथे जायचे असेल असेल तर मी त्यांना तिथले कुठले ट्रेक्स जबरदस्त आहेत याबाबत फुकटचा सल्ला देउ शकतो Happy माझ्या आवडीची अजुन ५ नॅशनल पार्क्स म्हणजे योसेमटी, झायॉन, ग्रँड टिटॉन, यलोस्टोन व रॉकी माउंटन नॅशनल पार्क! मी या सगळ्या अमेरिकन व कॅनेडिअन नॅशनल पार्क्सवर अक्षरशः वेड्यासारखे प्रेम करतो!)

IMG_5419.jpegIMG_1434.jpeg
पहिला फोटो मर्टल फॉल्स, माउंट रेनिअर नॅशल पार्क, वॉशिंग्टन स्टेट , यु.एस.ए.

दुसरा फोटो लेक लुइस, बॅन्फ नॅशनल पार्क, कॅनडा

उदाहरणार्थ म्हणुन २ फोटो टाकावेसे वाटले( सॉरी! या बीबीवर योग्य नसतील तर नेमस्तकांनी हे फोटो उडवले तरी चालतील! )

रेव्यु, कविता सुंदर आहे.

Pages