विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लाब योजनेचा लाभ फक्त एकनाथला होत आहे असे दिसत आहे. मराठा आंदोलनाचा फटका देखिल भजप उमेदवारांना बसण्याची शक्यता दिसत आहे. काल फ२० म्हणाले की, की मराठा मधील ८०% हिन्दुत्वाला मानणारे आहेत.

लाल संविधान दाखवून तुम्ही कुणाला इशारा देत आहे ? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सतावत आहे.
https://youtu.be/vS1OtVG1FHw?si=TkpqJcLInbzg_hql&t=41

हे अस्सेच संविधान अमितशहा किंवा आपले लाडके पंतप्रधान मोदीं यांच्या हातात असेल तर ते कुणाला इशारा देत असतील?

constitution_red_book_1.jpegconstitution_red_book_2.png

तुमची आमची भाजप सर्वांची हे गाणं भलतंच फेमस झालंय. आमच्या इथे सगळे लहान मोठे स्पीकरवर हे गाणं लावून फेर धरून नाचत होते. भाजपलाच वोट देणार म्हणत होते. विरोधक टेन्शनमध्ये आले होते ती एकजूट बघून.

भारताचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना निवृत्ती नंतर कुठले पद मिळणार आहे हे अजून कळलेले नाही. पदावर असतांना त्यांनी पण या लाल संविधानाची जाहिरातच केली आहे.
https://x.com/scconline_/status/1735584245308162318

https://www.youtube.com/watch?v=CdKB9uNfYbQ&pp=ygUYZmFkYW52aXMgcmVjb3Jka>>> माझ्या तर्काने तरी मला यात फडणविसांनी कोणताही सेल्फ गोल केला आहे असं वाटतं‌ नाही. जर जागा शिंदे शिवसेनेला सोडली असेल तर, इतर मित्रपक्षांपैकी कुणीही बंडखोरी न‌ करणे ही प्राथमिकता होते. नंतर जरी महायुतीचा उमेदवार पडला तरी मित्रपक्षावर/ भाजपावर त्याचा ठपका पडत नाही, त्यामुळे आपलं आपण पाहू हे ही ठीक वाटतयं. राजकारण आहे ते.
पण या क्लिप मुळे फडणवीस कसा पाताळयंत्री माणूस आहे या नरेटीव ला हातभार लागतोयं हे व्हिडिओखालील कमेंट्स वाचून समजतयं. आता इतर नेते आपल्या बंडखोरांना समजवताना वेगळं काही बोलतं असतील ही शक्यता नाही. पण सामान्य मतदात्यांची हे समजून घ्यायची कुवत नाही आणि त्यातून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असला तर 'विचार करुन समजून घेता येत नसणे' हा मापदंड कार्यकर्ता बनण्याच्या फॉर्मवर सर्वात वर दिलेला आणि अपेक्षित असावा की काय इतपत शंका येण्याला वाव आहे, त्यामुळे फडणवीसांविरुद्ध नरेटीव तर सेट होणार असं दिसतंय.

तुमची आमची भाजप सर्वांची हे गाणं भलतंच फेमस झालंय. आमच्या इथे सगळे लहान मोठे स्पीकरवर हे गाणं लावून फेर धरून नाचत होते. भाजपलाच वोट देणार म्हणत होते. विरोधक टेन्शनमध्ये आले होते ती एकजूट बघून.>>>> गाणं सर्वात भारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बनवलयं, एकदम उडत्या चालीचं...जर महायुतीची सत्ता आली तर गौतमी पाटीलही त्या गाण्यावर स्टेज वर नाचू शकेल. Rofl

<< महाविकास आघाडी जिंकली तरी भाजप त्यांना टिकू देणार नाही . खोके किंवा इतर काही ना काही मार्ग काढून सरकार पडणारच. >>

------ हे अगदी खरे आहे. त्यापेक्षा भाजपाला निवडून द्यायचे आणि विकासाचे सर्व प्रोजेक्टस ( अगदी क्रिकेटचा अंतिम सामना देखिल) गुजरातला पाठविण्यास मदत करणारे फडणवीसांचे अतिसुमार नेतृत्व मान्य करायचे .

भ्रष्टाचाराबद्दल भाजपा उदासिन आहे का त्यांना सत्तेचा मोह आवरता येत नाही नक्की कुठले एक कारण आहे असे म्हणता येत नाही. ७०००० कोटी रुपयांचा गैरव्यावहार केला म्हणून अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार होते... शेवटी त्यांनाच सोबत घेऊन दोन वेळा शपथविधी झाला. अगदी क्लिन चिट पण देऊन झाली.

फ२० पाताळयंत्री आहे हा माझा मुद्दा नाही. फ२० उद्धव ठाकरेंना मदत करत आहेत. ती कशासाठी ?
दुसरे म्हणजे ही क्लिप व्हायरल होणे. असा फोन साधारणपणे विश्वासू व्यक्तीला केला जातो.
अशाच पद्धतीने ठाकरेंच्या उमेदवाराविरूद्ध काँग्रेस अन्य उमेदवाराला मदत करतेय.

अजित पवार करताहेत. त्यांची तर हयात गेली यात. त्यामुळे अनेक मतदारसंघ भाजपकडे गेले आहेत.
रमेश वांजळे पूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यांना आणि काका चव्हाण यांना सिंहगड रस्ता मधून मनपाचे तिकीट हवे होते.
अजितदादांनी ते दोन कोटी रूपये घेऊन एका बिल्डरला दिले. त्यानंतर वांजळे मनसेत गेले. वांजळेंनतर त्यांचे सर्व कार्यकर्ते भाजपत गेले.

मुद्दा इतकाच कि उद्धव ठाकरेंना मेसेज आहे का ? असेल तर ही पद्धत फार बालीश आहे.
कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे, त्यामुळे प्रश्न तर उपस्थित होतातच.

महाराष्ट्रात केंद्र सरकार द्वारे एक आशिया खंडातील सर्वात मोठा ऑईल रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता >>>
हा कुणाच्या करंटेपणामुळे गेला हे सर्वज्ञात आहे कारण तिथल्या जमिनी राजकीय चिल्ल्यापिल्ल्यांनी विकत घेण्यापूर्वी सरकारने अधिग्रहित केल्या होत्या .

आणि अलंग पोर्ट शिपब्रेकिंग साठी किमान २५ वर्षांपासून कार्यरत आहे. नवऱ्याचे एक नातेवाईक तिथे ८०च्या दशकात नोकरीला होते.

व्हेअर ऍज महाराष्ट्रातल्या चांगल्या चालणाऱ्या शिपयार्डमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात कामगार संघटनांनीं मुजोरी केल्यामुळे तो प्रकल्प कोकणातून अर्धा घोडबंदरला व अर्धा गुजरातेत हलवावा लागला, मावळ मतदारसंघात येणाऱ्या कोकणातील कोरियन स्टील कंपनीत मनासारखी कंत्राटे न मिळाल्यामुळे कामगार संघटनांकरवी इतके इश्यू केले गेले की मॅनेजमेंटने कंपनी ओरिसाला नेली.
याविषयी महाराष्ट्रातला उद्योग या माबोवरील चर्चेत सविस्तर लिहिले होते.

फ२० पाताळयंत्री आहे हा माझा मुद्दा नाही. फ२० उद्धव ठाकरेंना मदत करत आहेत. ती कशासाठी ?>>>> निट विचार केला तर या क्लिपवरुन असे काहीही स्पष्ट होत नाही असे वाटते. अगदी तसे काहीही ध्वनीतही होत नाही आहे. कारण त्या उमेदवारा सोबत फडणवीस कोणत्या भुमीकेतून बोलत आहेत हा संदर्भ जास्त महत्व ठेवतो.

दुसरे म्हणजे ही क्लिप व्हायरल होणे. असा फोन साधारणपणे विश्वासू व्यक्तीला केला जातो.>>>> कॉलवर असलेला पक्षनेता हा बंडखोर आहे त्यामुळे एवीतेवी पक्ष त्याच्यावर ६ वर्षांची पक्षबंदीची कारवाई करेलच मग तो तरी का हात आखडता घेईल ऑडियो व्हायरल करायला, अर्थात त्या मागे त्याचे काही लॉंगटर्म प्लान असतीलच.

मुद्दा इतकाच कि उद्धव ठाकरेंना मेसेज आहे का ? असेल तर ही पद्धत फार बालीश आहे.>>> व्यक्तिश: मला तसे वाटत नाही.

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे, त्यामुळे प्रश्न तर उपस्थित होतातच.>>>>किंबहुना फक्त आणि फक्त ते तसे व्हावेत म्हणूनच ती व्हायरल केली गेली आहे, असे वाटत आहे.

आणि अलंग पोर्ट शिपब्रेकिंग साठी किमान २५ वर्षांपासून कार्यरत आहे. नवऱ्याचे एक नातेवाईक तिथे ८०च्या दशकात नोकरीला होते.>>>
यावर एक फार सुंदर डॉक्यूमेंट्री युट्युब वर उपलब्ध आहे. बहूतेक एनएफबी ची आहे... रिफायनरी आणि अशा प्रोजेक्ट्स बद्दल फक्त एकचं म्हणेन,चकाकतं ते सगळचं सोनं नसतं.

https://youtu.be/5jdEG_ACXLw?feature=shared

रिफायनरी आणि अशा प्रोजेक्ट्स बद्दल फक्त एकचं म्हणेन,चकाकतं ते सगळचं सोनं नसतं.
>>>
रिफायनरीचे पर्यावरणावर परिणाम हा विषय मी नाकारत नाही. पण कोकणात झालेला विरोध पर्यावरण प्रेमातून कमी व वैयक्तिक फायद्यासाठी जास्त होता हे माझे मत आहे. एन्रॉनलाही तसाच विरोध झाला होता आणि एरिकाबाईंनी भेट दिल्यावर तो विरोध समुद्रात बुडाला. काही काळ तो प्रकल्प चालला आणि अमेरिकेतील एन्रॉन स्कँडलमुळे बुडाला.

अशीच लिथार्जी आयटी उद्योगाच्या बाबतीत चंद्राबाबू पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना झाली होती. त्यांनी व्यवस्थित सायबर सिटी उभारून नामी कंपन्या आंध्रात नेल्या. पण चंद्राबाबूंविरुद्ध राळ उठवली गेली नाही. आपल्याकडच्या हिंजवडी आयटी पार्कमधल्या रस्त्यांची स्थिती बघा. आणि तरीही मेट्रोला विरोध आहेच.

पण कोकणात झालेला विरोध पर्यावरण प्रेमातून कमी व वैयक्तिक फायद्यासाठी जास्त होता हे माझे मत आहे>>>> हे मत तुम्ही न्यूज वाचून बनवलं आहे की प्रत्यक्ष ग्राउंडवर जाउन माहीती मिळवून किंवा त्या आंदोलनात सहभाग घेऊन??

रिफारनरी प्रोजेक्ट मधे राजकीय कारणांनी हस्तक्षेप झाला पण तो कोणत्या टप्प्यावर वर झाला हे फार महत्वाचे आहे....त्या आधीही खूप काही सुरु होते.

माझी पाळंमुळं, नातेवाईक, मित्रमंडळी, जाणं येणं कोकणातच आहेत. कोकणाविषयी व कोकणच्या भविष्याविषयी आस्था आहे. आणि कोकणी माणसाचा प्रकल्पाला विरोध आणि राजकीय नेत्यांचा प्रकल्पाला विरोध या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. कोकणी माणसांचे कन्सर्न्स मी नाकारले नाहीत. मी राजकीय नेत्यांविषयी बोलते आहे कारण चर्चा राजकारण आणि प्रकल्प कुणामुळे जातोय याविषयी आहे.

काल खूप दिवसांनी मराठी चॅनेल टीव्हीवर पाहिलं. झी मराठी. कोणत्याही मालिकेत रस्त्याचा शॉट आला ( सीन चेंज करताना तो टाकतातच) , की तिथे भाजपचं होर्डिंग असे. कमर्शियल ब्रेकमध्ये फक्त भाजप आणि शिंदेसेनेच्या जाहिराती. ब्रेक आला मी माझे हात प्ररिक्षिप्त क्रियेने टीव्ही म्यूट करतात. त्यामुळे जिंगल्स ऐकली नाहीत. पण शिंदेसेनेच्या जाहिरातीत आदर्णीय मोदीजींचं मुखकमल दिसलं तरी निशाणी फक्त धनुष्यबाण हीच दाखवली. तसंच भाजपच्या जाहिराती कमळ. पेपरातल्या जाहिरातीतं तिन्ही पक्षांच्या निशाण्या आहेत. हे त्या त्या पक्षाच्या खर्चात मोजलं जाईल म्हणून केलं का ते कळलं नाही. पण समजा , मी भाजपचा मतदार आहे, पण माझ्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही, युतीतील अन्य पक्षाचा आहे, तर ती जाहिरात पाहून मी कोणाला मत द्यायचं ते कसं कळणार?

मी राजकीय नेत्यांविषयी बोलते आहे कारण चर्चा राजकारण आणि प्रकल्प कुणामुळे जातोय याविषयी आहे.>>> या संदर्भात फक्त निष्पत्ती चा विचार करता, कदाचीत तुम्ही बरोबर आहात. कारण जर आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले नसते तर भाजपाने प्रोजेक्ट तसाच रेटला असता. पण तरीही प्रोजेक्ट जाण्याचे बीज राजकीय हेतू प्रेरीत हस्तक्षेपामधे होते हे म्हणणे पुर्णपणे चुकीचे ठरेल.

आमच्याकडे प्रचार जोर कमीच दिसतोय, कोणी कोणी पत्रक असंच टाकून जातंय. कोणी बेल वाजवतंय. आतल्या भागात रिक्षा वगैरे कोणाची ऐकू आली नाही. शनी रवी जोर असेल. आहेत आधीचे इथले ते निवडून येण्याची शक्यता जास्त वाटतेय (त्यांच्या घरातच कमळही आहे) . त्याआधीचे इथले आमदार मशालीवर उभे आहेत. ध बा नवीन चेहेरा आहे, इथल्या एका भागातला नगरसेवक.

हल्ली एकाच घरातले वेगवेगळ्या पक्षात जाम दिसायला लागलेत, पूर्वी इतकं नव्हतं. त्यामुळे सत्ता कोणाचीही आली तरी फायदा सर्वांना.

कल्याण ग्रामीण बद्दल बातमी

दुसरीकडे कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपने भर पोलिस चौकीत गोळीबार - तोही मित्रपक्षाच्या नेत्यावर - करणार्‍या विद्यमान आमदाराच्या पत्नीला उभे केले आहे. इथे शिंदेसेना नाराज आहे.

हल्ली एकाच घरातले वेगवेगळ्या पक्षात जाम दिसायला लागलेत, पूर्वी इतकं नव्हतं>> देवा भाऊंची कमाल अजून काय. ते छाती ठोकून सांगतात दोन दोन पक्ष फोडले मी. मग हे असे होणारच ना?

हिंदुत्वावर व्हॉट्सअप समुहात लेक्चर देणाऱ्या काही गोबर भक्ताना फडणवीसांचा गोल टोपी घातलेला ईदचा फोटो पाठवला नी असा फोटो उद्धव ठाकरेंचा पाठवा मी भाजपला मत देतो अस सांगितलं. दोन दिवस झाले ते गोबरभक्त अजून परतले नाहियेत. Happy

दुसरीकडे कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपने भर पोलिस चौकीत गोळीबार - तोही मित्रपक्षाच्या नेत्यावर - करणार्‍या विद्यमान आमदाराच्या पत्नीला उभे केले आहे. इथे शिंदेसेना नाराज आहे. >>> भरत बरोबर ते प्रकरण गाजलेलं जाम.

ते छाती ठोकून सांगतात दोन दोन पक्ष फोडले मी. मग हे असे होणारच ना? >>> मी वर एक उदाहरण लिहीलेलं ते पक्ष न फुटलेल्यातले आहे (दे फ नी न फोडलेल्याचे) . आत्ताचे आमदार आहेत त्यांचे भाऊ पुर्वी इंजिनावर निवडून आलेले (त्या आधी ते हातवाले होते) आणि नंतर ते कमळात गेले. मग त्यांचा भाऊ उभा राहिला इंजिन निशाणीवर. हे फार पूर्वीचे दे फ आणि उ ठा एकत्र असण्याच्या दहा वर्ष आधीपासूनचे. ते दे फ भाषण मला बघायचं आहे, लोकसभा निवडणुकीआधी या वल्गना केल्या असतील तर नंतर स्वत:चा पचका करून घेतला त्यांनी.

बाकी तुम्ही म्हणता ते ही बरोबर पण मला एक प्रश्न आहे दे फ एकटे वरच्या आदेशाशिवाय हे करू शकतात का. ज्या माणसाने सेना फोडायला पैसा पुरवला तेव्हा तो आनंदात होता आणि लोकसभेला असा रिझल्ट आल्यावर बोंबाबोंब करत होता की एका माणसाची रेषा कमी करण्यासाठी पक्षाचे नुकसान केलं दे फ यांनी. मग तू त्यावेळी पैसे का पुरवलेस, तूही सामील होतास ना. केंद्र सामील असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नसतील ना.

केंद्रीय पक्ष जे आहेत त्याबाबतीत एकंदरीत बघितलं आहे की यश मिळालं की क्रेडिट घ्यायला येणार, अपयश आलं की राज्य नेत्यांवर फोडणार.

यावेळीही होईल असं मोस्टली दोन केंद्रीय पक्ष आहेत बाकी राज्यस्तरीय आहेत.

यावेळी उद्धव यांच्याकडून चिन्ह आणि मुळ पक्ष काढून घेणं अजिबात न पटलेली गोष्ट आहे, बंड होत राहतात यापूर्वीही झाली आहेत. हे झालं तेव्हा उद्धवविरोधी बऱ्याच लोकाना पटलं नव्हतं. आमच्या फॅमिली grp वरही सर्व भाजपवाले असूनही वाईट वाटलेलं.

मविआ ला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्रीपदावरून भांडण होणार. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन सत्तेत बसणार.
नाहीतर राष्ट्रपती राजवट. पुन्हा फोडाफोडी.
पुन्हा गुवाहाटी. पुन्हा नवा मुख्यमंत्री.

जर महायुती आणि मविआ या दोन्हींना पुरेशा जागा मिळाल्या नाहीत आणि भलतेच पक्ष (दोन्ही आघाडय़ांतून फुटलेले नाही) एकत्र येऊन जर सरकार बनले (शक्यता.0.0001%) तर मी आख्ख्या मायबोलीला ओबेराय शेरेटन (कुठेही शाखा नाही) मध्ये पार्टी देईन.
ही पांढऱ्या रःगावरची काळी अक्षरे आहेत.

हल्ली जागोजागी थडगी बनलेली दिसतात.
ही थडगी कशी बनतात ह्याचा विचार केलाय का कधी?
नव्व्यांणव टक्के थडगी खोटी असतात. तुम्ही राहता त्या सनातन्यांच्या भागात थडगी कशी उभी राहू शकतात?

थडगं तयार करायची पध्दत फार सिस्टीमॅटिक असते.
समजा तुम्ही एखाद्या सनातनी बहुल वस्तीत रहात आहात. आजूबाजूला इतर कोणाचं काही नामोनिशाण नाही.

एखाद्या दिवशी अचानक तुम्हाला रस्त्याच्या कडेला एक दरिद्री, फाटके कपडे घातलेला एक भिकारी सर्वांकडे भीक मागताना दिसून येतो.
तो फक्त दिवसा भीक मागतो आणि सायंकाळी निघून जातो.
सगळे लोक त्याच्याकडे पाहून गरीब बापडा भीक मागतोय असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.
नंतर तो रात्री पण कुठे जायचं सोडून तिथेच रस्त्याच्या कडेला एक प्लॅस्टिक किंवा फाटकी चादर अंथरून झोपतो.
नंतर तो नेहमीच तिथं झोपू लागतो.

काही दिवसांनी तो तिथं एक झेंडा गाडतो.
तुम्ही अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करता कारण जेव्हा त्याला कोणी टोकतं तेव्हा तो आपली गरिबी आणि तुमची माणुसकी ह्यांचं रडगाणं गातो.
तुम्हाला असं वाटतं की ह्याला काय, आपण मनात आणलं तर कधीही लाथ घालून हाकलून देऊ शकतो.
म्हणून तुम्ही निश्चिंत राहता.
पण तो तिथं काही दिवसातच दोनचार विटा रचून हिरवी चादर पांघरेल. तुम्ही अजूनही ह्याच समजुतीत असता की त्यानं त्याच्या पूजा पाठासाठी असं काही केलं आहे.

एका शुभ प्रात: काळी तिथं दोनचारच्या जागी दोन चारशे विटा दिसतील आणि त्या जागेवर थडगं तयार झालेलं असते.
आता तो कालपरवाचा भिकारी तिथला मौलवी बनला असतो. आणि तुमचेच शेजारी तिथं दिवा, उदबत्ती लावणं सुरू करतात.
मग तुम्ही कितीही मनात आणलं तरी ते थडगं तिथून हटवू शकत नाही. चुकून तुम्ही असं करायला गेलात तर तुमचेच शेजारी तुमचा विरोध करू लागतील.

कदाचित तुम्हाला कम्युनल हार्मनी अस्थिर करण्याच्या आरोपाखाली मोफत लॉजिंग बोर्डिंगलाही जावं लागेल.
आता ते थडगं तिथं कायमस्वरुपी झालेलं आहे.
अर्थ सरळ आहे. तुम्हाला अक्कल असो किंवा नसो. समोरचा अक्कलवान आहे.
तो स्टेप बाय स्टेप समोर जात असतो.

तुमच्या हातून सगळं निसटून गेलं असते.

थडग्यांच्या रूपानं फक्त तुमच्या जमीनीवर अतिक्रमण होत नाहीय तर तुमचा धर्म, तुमचे उत्सव हेही त्यात ओढले जात आहेत.
लहानसं उदाहरण घ्या. दिवाळी आणि फटाक्यांचं.
कोणी एकानं दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाने रात्री झोपणं मुश्किल होते म्हणून त्याच्यावर बंदी घालावी अशी याचिका दाखल केली.
त्याच्यावर निर्णय असा झालं की संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच फटाके फोडावे.
त्याच्या जागरूकतेसाठी शाळेत मुलांना शिकविलं जावं.
लक्षात घ्या की हा सुचनात्मक निर्णय होता. फटाके फोडणे हा अपराध मानलेला नव्हता.
ह्यातला महत्त्वाचा भाग हा होता की ही सूचना फक्त दिवाळीच्या फटाक्यांसाठी होती. न्यू इयर आणि क्रिसमस साठी नाही.
(म्हणजे तुमच्या भागात एक दरिद्री, कंगाल भिकारी आणून बसवला.)
अर्थात ही सूचना कोणीच मनावर घेतली नाही. पण कोणी त्याचा विरोधही केला नाही.
आता त्यांचं मनोबल वाढलं आणि दोन वर्षांनी पुन्हा याचिका सादर झाल्या.

ह्यावेळी फटाक्यांचा ध्वनी प्रदूषणाशी संबंध जोडून अपराध मानल्या गेला.
(म्हणजे तो भिकारी प्लॅस्टिक आंथरून झोपायला लागला.)
पण कोणीही कडाडून विरोध केला नाही. ह्या उलट दहा वाजता छान झोपायला मिळेल म्हणून जनता खूष झाली.
शाळांमधून मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम शिकवू लागले.
मग ध्वनी आणि वायू प्रदूषणाला फटाके कारण आहेत म्हणून त्यांच्यावर तात्काळ प्रभावानं बंदी घालण्यात यावी अशी मागणी काही एनजीओनी केली.

पहिल्यांदा दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला.
(म्हणजे त्या भिकाऱ्यानं दहा वीस विटा रचून त्याच्यावर चादर अंथरली.)
ह्याचा कोणीही विरोध केलं नाही. प्रदूषणाच्या नावावर समर्थन केलं.
शाळकरी मुलं शाळेत शिकवलेलं फटाक्यांनी वायू आणि ध्वनी प्रदूषण होते असं बाहेर बोलू लागली.

प्रकरण इथेच न थांबता पुन्हा कोर्टात गेलं.
ह्यावेळी हरित फटाके नावाचा खुळखुळा हातात आला.
तथाकथित जागरूक लोक फटक्यांवरील बंदीच्या समर्थनात उतरले. आणि फटाके फोडणारे कट्टर, अशिक्षित, अडाणी, असंस्कृत ठरले.
हा रोग मीडियापासून सेलिब्रिटीपर्यंत पसरला.
क्रिकेटर आणि बॉलीवूडवाले दिवाळीच्या पहाटे प्रकट होऊन प्रदूषणावर भाषणं देऊ लागले. ज्यांच्या नाकात फटाक्यांचा वास कधीच पोचला नसेल अशा अर्धवट मंडळींच्या पार्श्वभागातून धूर निघू लागला.
मीडियावर मोठमोठ्या डिबेटमध्ये ब्रेन वॉश व्हायला लागला. दिल्ली कशी गॅस चेंबर बनलीय आणि फटाके बॅन केले नाहीत तर दिवाळीच्या पहिल्या दिवशीच सगळे श्वास कोंडून गुदमरून मरतील असं चित्र रंगवल्या गेलं.
नंतर सगळ्या देशात फटाके बॅन व्हायची वेळ आली.
फक्त दोन तास वाजवा असा दम मिळाला.
तर्क काय तर प्रभू श्रीरामांच्या काळी फटाके फोडल्या जात होते का!
परंपरा मुळातूनच निघाव्या असं आवश्यक नाही.
परंपरा नंतर जोडल्या जातात आणि उत्सवांचा भाग होतात. ख्रिसमसमध्ये ख्रिसमस ट्री आणि अजानमध्ये लाउडस्पीकर नंतर जोडले गेले.
पण तिथं कोणीही कुतर्क करत नाहीत.
हा भयंकर रोग आमच्यातच आहे.
ही तुमच्या वस्तीत थडगं उभारण्याची सुरुवात आहे.
जर तुम्ही आताच सजग नसाल तर नंतर तुम्हाला करण्यासारखं काहीही उरणार नाही.
प्रदूषणाच्या मुख्य कारणांमध्ये फटाके पहिल्या दहांमध्येही मोडत नाहीत.
राजस्थान, दिल्लीसारखी राज्ये कोर्टाच्या आदेशाशिवाय फटाक्यांवर बंदी आणत आहेत.
आणि ही राज्ये ख्रिसमस, न्यू इयर वर मूग गिळून असतात.
तुम्ही ऐंशी टक्के असताना ही अवस्था आहे.
आता ह्यात तुम्ही होळीचे रंग, दिवाळीचे फटाके, दसरा ते रामलीला, जन्माष्टमी ते दहीहांडी हे सारं जोडा.
हे केवळ फटाक्यांवर बंदी आणि होळीत पाणी वाचवा ह्यावर थांबणार नाहीय. तुमच्या प्रत्येक सण, उत्सवावर ही संक्रात येतेय. एकतर त्यावर बंदी घालण्यात येईल किंवा ते त्यांच्या स्टाईलनं साजरे करायची वेळ येईल.
लक्षात घ्या मित्रहो, ही विषवल्ली तुम्हाला काहीही कळण्याच्या अगोदरच रुजलेली आहे. ती फोफावण्याआधीच तुम्ही उखडून फेकली नाहीत तर तुमचं घर, तुमच्या वस्त्या तिनं बळकावल्या असतील!
देशभक्ती आणि धर्मभक्ती ह्यात फरक करू नका. हिंदुस्थान सुरक्षित राहील तोवरच हिंदू सुरक्षित आहेत.
आणि हिंदू सुरक्षित राहतील जोवर त्यांचे सण, उत्सव, परंपरा सुरक्षित राहतील!

म्हणून वीस तारीख चुकवू नका!
नंतर वेळ निघून गेलेली असेल.
✍️ अनंत रावळे

महाराष्ट्र विधानसभेसाठी
२० नोव्हेंबरला मतदान करू, महाराष्ट्र घडवू,
Voter Helpline App वर मतदान केंद्र पहा.

उगाच वेळेवर धावपळ करू नका. लिस्ट मध्ये नाव आहे की नाही हे आधी चेक करा. गेल्या लोकसभा निवडणूक वेळी निर्भय बनोच्या विश्वंभर चौधरी यांचे नाव लिस्ट मध्ये नव्हते. हे कोणाचाही सोबत घडू शकते.

गेल्या वेळी नाव होते, ते आता असेलच असे नाही. लिस्ट प्रत्येक वेळी दुरुस्त केली जाते, सुधारली जाते. त्यामुळे यावेळीही नावं चेक करा. पोलिंग बूथ, पार्ट नंबर, BLO अधिकारी यांची आधीच माहिती घ्या. मतदान करा.

Pages

Back to top