चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण रणधीर कपूर स्वत:ही मान्य करेल की तो काही खजिना शोधणारा पार्टी शोभत नाही. Lol तो फक्त पगाराच्या दिवशी पाकीट मारली गेलेली पार्टी म्हणून शोभेल.

आईस स्टेशन झेब्रा विसरलेच होते. तशीच फ्रेडरिक फोर्सिथची पुस्तके द डे ऑफ जॅकल, द ओडेसा फाईल, फोर्थ प्रोटोकॉल आणि आयकॉन. जॉन ल कारसुद्धा. नुकतीच त्याच्या पुस्तकावर आधारित नाईट मॅनेजर पाहिली. अनिल कपूर नेहमीप्रमाणे झक्कास. आदित्य रॉय कपूर अभिनयात ठीकठाक पण त्याच्या पर्सनॅलिटीला साजेसा रोल त्यामुळे इम्प्रेसिव्ह, तिलोत्तमा शोम, शाश्वत चॅटर्जी छान काम. प्रशांत नारायणन आणि अरिस्टा मेहता यांचे छोटेसे रोलपण उल्लेखनीय. शोभिता धूलिपाला उगीचच.

Pages