Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दिल्ली बेली पुन्हा पाहिला.
दिल्ली बेली पुन्हा पाहिला. मजा आली.
जी १ .
जी १ .
अस्मिता, वरची दिवाण मुझसा
अस्मिता, वरची दिवाण मुझसा नहीं वाली मोठी पोस्ट परफेक्ट. मुलीच्या ना में हां है असल्या येडछाप कल्पना कित्येक वर्षं चालू आहेत चित्रपटसृष्टीत.
गुरुदास मान पण..हो हो.. >>
गुरुदास मान पण..हो हो.. >> माझेमान पण
माझेमान पण >>
माझेमान पण >>
यावरूनच "मान ना मान, मै तेरा रेहमान" म्हणायला लागले असतील का ?
अस्मिता, वरची दिवाना मुझसा
अस्मिता, वरची दिवाना मुझसा नहीं वाली मोठी पोस्ट परफेक्ट.>>>. अगदी अगदी. असे ऐकलेय की तेलगू मधे असे स्टोकर्स, पेट्रीआर्की नमुने जाम आहेत. आणि हिंदीत बरी माधुरीच मिळते ह्यांना जुलुम करायला. फक्त सल्लू भुमिका ला चावलाय.
ते फुल और कांटे मधले मुलींच्या हॉस्टेल वर येऊन मधू ला त्रास देणे आठवते का?
जानी दुष्मन मधे रेप होऊ घातला असताना विक्टिम ला इतर लोकांचे कॅजुअली सोडून दे ना माफ कर, तूच इतकी सुंदर आहेस, त्यांचा काय दोष. माफ कर नाहीतर आम्ही समजू तुला सौंदर्याची घमेंड आहे वगैरे पूजनीय डायलॉग्स आहेत.
डोली सजाके पाहिला नाही.. बघणार आता.
त्यांचा काय दोष. माफ कर
त्यांचा काय दोष. माफ कर नाहीतर आम्ही समजू तुला सौंदर्याची घमेंड आहे
>>>>
सिरीअसली ??
जानी दुष्मन मधे रेप होऊ घातला
जानी दुष्मन मधे रेप होऊ घातला असताना विक्टिम ला इतर लोकांचे कॅजुअली सोडून दे ना माफ कर, तूच इतकी सुंदर आहेस, त्यांचा काय दोष. माफ कर नाहीतर आम्ही समजू तुला सौंदर्याची घमेंड आहे वगैरे पूजनीय डायलॉग्स आहेत.
>>> >>>>
रिअली? ???
तसं अंकुश का कोणत्या तरी पिक्चरमध्ये मुलीला बेडवर बांधून घालतात व सांगतात परत येऊ तेव्हा रेप करणार आणि करतात. पण तो डॉयलॉग आणि सिच्युएशन क्रौर्याची परिसीमा म्हणून अंगावर आला होता आणि पुढची स्टोरी जस्टीफाय झाली होती. देअर वॉज नथिंग कॅजुअल अबाऊट इट. व्हिजुअल्स आठवत नाहीत.
असे ऐकलेय की तेलगू मधे असे
असे ऐकलेय की तेलगू मधे असे स्टोकर्स, पेट्रीआर्की नमुने जाम आहेत.
>>>>
तो कांतारा सुद्धा तेलगू होता की कन्नड?
त्यात तो हिरो हिरोइनच्या कंबरेला तिच्या मनाविरुद्ध चिमटा काढतो वगैरे अगदी कूल असल्याच्या थाटात दाखवले होते तेव्हा ते खटकले होते. पुष्पामध्ये सुद्धा जे दाखवले होते ते आपल्याकडे फालतूगिरी समजली जाते. मागेही बटबटीत दाक्षिणात्य चित्रपट धाग्यात यावर लिहिले होते. तिथे वेगळेच कल्चर आहे. तिकडचे चित्रपट इथे चालू लागले तरी त्या नादात अश्या गोष्टींचा इन्फ्ल्युन्स नको.
बाहुबली याबाबतीत सरस होता. म्हणून घरी कित्येक वेळा लावला जातो.
माझे मन, तो अंकुशच.. बरोबर
माझे मन, तो अंकुशच.. बरोबर म्हटले आहे तुम्ही. क्रौर्याची आणि आपली सिस्टीम किती असुरक्षित आहे याची परिसीमा. तो सीन मनावर कोरला गेला आहे.
https://youtu.be/3ZBGrKUaCu0
https://youtu.be/3ZBGrKUaCu0?si=GPzPPiCg5igwhCbz
ह्यावर १७ व्या मिनिटा पुढील भाग बघा. त्यात कसं विक्टिम शेमींग करत आहेत बाकी सर्व, ईव्हन अक्षय कुमार पण
कांतारा मधे तो तीच्या मर्जीविरुद्ध (अजून ती गफ्रे नसते) न्हाणीकक्षात येतो/चोरून बघतो, चिमटा वगैरे आहेच, ती नंतर गफ्रे बनल्यावर त्याला काही सांगू बघते तर डायरेक्ट कानशिलात लगावतो. अ & अ प्रकार आहेत त्यात बरेच.
स्त्री 2 पाहिला
स्त्री 2 पाहिला
पहिल्या भागात जास्त मजा वाटलेली
हा ठीकठाक वाटला.
काही काही संवाद मात्र खंग्री.
कलाकार सगळे छान अभिनय.
हनुमान, शक्तीमान, बॅटमान,
हनुमान, शक्तीमान, बॅटमान, सुप्रमान >>
मानलं
मानलं
बाहुबली याबाबतीत सरस होता.
बाहुबली याबाबतीत सरस होता. म्हणून घरी कित्येक वेळा लावला जातो. > +१ बाहुबली मध्ये मुख्य बायका शूर आणि खमक्या दाखवल्या आहेत
बाहुबली याबाबतीत सरस होता.
बाहुबली याबाबतीत सरस होता. म्हणून घरी कित्येक वेळा लावला जातो. > +१ बाहुबली मध्ये मुख्य बायका शूर आणि खमक्या दाखवल्या आहेत
विजया मेहतांनी एकदा चित्रपटात न यायचे कारण "बायकांना चांगले दाखवत नाहीत' असे सांगितले होते
पण आता परत आलो आणि बघतो तर
पण आता परत आलो आणि बघतो तर आजही फार काही बदलले नाहीये. आजही तोच सुपरस्टा
डन्की नन्तेर एक तरी चित्रपट आला ?
फुलवंती कुणी पाहिला का?
फुलवंती कुणी पाहिला का? उत्सुकता आहे कसा आहे.
नेटफ्लिक्सवर
नेटफ्लिक्सवर
Unhinged बघितला. बाब्बौ कॅटेगरी आहे फुल्ल. रसेल क्रो तर ओळखूच नाही आला.
एक कॅज्युअल रोड रेज टर्न्ड इन्टू थ्रिलिंग क्राईम एवढंच म्हणेन. फास्ट पेस आहे. मी तर बर्याच ठिकाणी श्वास रोखून धरला.
डॉक्युमेंटरी
Sweet Bobby my catfish nightmare
एका लंडन बेस्ड रेडीओ जॉकी असलेल्या बाईच्या आयुष्यातला जवळजवळ १० वर्षांचा काळ निव्वळ एका ऑनलाईन कोर्टशिपमुळे व्यापला जातो. जे कपल प्रत्यक्षात कधीच भेटले नाहीत पण तरी या काळात बरेच ट्विस्ट, टर्न्स आणि शेवटी एक शॉकिंग डार्क सिक्रेट वळणावर येऊन हा प्रवास थांबतो.
असं खरं घडलंय त्यामुळे हसावं का रडावं असं वाटत राहिलं. थोडे लुप होल्स आहेत पण तरी शॉकिंगच.
स्त्री २ मधला 'आप तो अटल हो'
स्त्री २ मधला 'आप तो अटल हो' संवाद हा ऐन वेळची ॲडिशन होता. ज्यासाठी मेकर्स नी नंतर राईट्स घेतले. तब्बल ₹२५ लाख देऊन. असं अभिषेक बॅनर्जी च्या मुलाखतीत पाहिलं
'आप तो अटल हो' संवाद हा ऐन
'आप तो अटल हो' संवाद हा ऐन वेळची ॲडिशन होता. ज्यासाठी मेकर्स नी नंतर राईट्स घेतले >>> हे नव्हतं माहिती. मला सगळ्यात जास्त आवडलेला पंच होता हा.
असं खरं घडलंय त्यामुळे हसावं
असं खरं घडलंय त्यामुळे हसावं का रडावं असं वाटत राहिलं. >>> +1000.
काल बघून संपवली. 10 वर्षे ??? इतके red flags दिसत असतानाही . आणि ती एकदाही कोणाकडे चौकशी करत नाही. सगळं संभाषण केवळ online !
घाबरत घाबरतच खेल खेल में
घाबरत घाबरतच खेल खेल में बघायला घेतला आणि चक्क बरा निघाला. सध्याच्या त्या कार्तिक आर्यन स्टाईल कॉमेडीच्या जमान्यात हा चक्क संयत कॉमेडी आणि थोडी गंभीर चर्चा असा चांगला वाटला. विनोदाच्या साहाय्याने बऱ्याच गंभीर विषयांना स्पर्श केलेला आहे. सध्याच्या जीवनात असलेले प्रश्न आणि ते लपवताना निर्माण झालेले अजून प्रॉब्लेम्स यांचे चांगले चित्रीकरण आहे. इटालियन चित्रपटाचा रिमेक असला तरी देशिकरण जमलेले आहे. अक्षय कुमार बऱ्याच दिवसांनी चांगला दिसतो. त्याचा तसा हातखंडा प्रयोग आहे. तापसी पण मस्तच. वाणी कपूर पण चक्क बरी वाटते. फरदीन ची एक वेगळीच भूमिका आहे. त्यात पण तो मध्येच अक्षय कुमार बरोबर कॉमेडी करून थोडी आपल्या पूर्वीच्या कॉमेडी ची आठवण करून देतो.
एक वेळ बघण्यासारखा नक्की आहे.
खेखेमे लावला कि चितळेंचा
खेखेमे लावला कि चितळेंचा ओटीपी येतो का ?
कार्तिक कॉलिंग कार्तिक पाहिला
कार्तिक कॉलिंग कार्तिक पाहिला.
फरहान अख्तर अभिनेता म्हणून आवडतो तरी पाहिला नव्हता कारण मला त्याची स्टोरी समजली होती.
स्टोरी म्हणजे कार्तिक कॉलिंग कार्तिक म्हणजे नेमके काय आणि कसे होते हे समजले होते. त्यामुळे आता काय उगाच बघून बोर व्हायचे म्हणून बघितला नव्हता.
पण वीकेंडला घरी एकटा असल्याने आणि वेळ जात नसल्याने पाहिला आणि आवडला. छान बनवला आहे.
रणबीर कपूरचा पॉकेट मे रॉकेट सिंग सुद्धा अध्येमध्ये आठवत होता. तो सुद्धा आवडीचा पिक्चर आहे.
रॉकेट सिंग फार मस्त आहे. फार
रॉकेट सिंग फार मस्त आहे. फार आवडला होता.
कार्तिक कॉलिंग कार्तिक जमला नाही असे वाटले होते. उत्कंठावर्धक न वाटता संथ वाटला. 'उफ तेरी अदा' गाणे मात्र आवडते आहे त्यातले.
खेल खेल में मला फार कंटाळवाणा
'खेल खेल में' मला फार कंटाळवाणा वाटला. एका लग्नाची गोष्ट आहे पण विचित्र. एका लग्न घरी रात्रभर थांबलेली तीन जोडपी आणि एक सिंगल गे तरुण यांच्या नात्यांचे 'वाजलेले बारा' बघितले. अक्षय कुमार एक नंबर थापाड्या आणि फ्लर्ट आहे. बायको हुशार असताना सुद्धा पकडला जात नाही. वाणी पुढे फार वयस्क वाटतो. एका मुलीचा बाप असतो आणि टीनेज मुलीला पहिल्या समागमा विषयी जे बोलतो ते उत्कृष्ट वाटले. कुठेही ऑकवर्ड किंवा प्रिची झाले नाही. तेवढेच बघण्यासारखे आहे सिनेमात. बाकी एकमेकांचे फोनवरचे मेसेज व कॉल बघून खेळायची गंमत वाटली नाही. अक्षयचा ह्यात हातखंडा आहे पण नाविन्यपूर्ण असे काहीच नाही सिनेमात. फरदीन खानला एन्ट्री वगैरे दिली आहे, ह्याला अंबारीत बसवून आणले तरी कुणी ढुंकूनही बघू नये. त्यात सदोष उच्चार... ! तापसीचे काम चांगले आहे पण अक्षय पुढे कुणाला वावच दिला नाही. बाकीचे दोन नवे कलाकार कोण आहेत माहिती नाही.
मी ते लग्न घरात एकत्र येतात
मी ते लग्न घरात एकत्र येतात तोवर बघितला. मग पेशंस संपला आणि बंद केला. तीन जोडपी एक रात्र एकमेकांचे मेसेज राउंड टेबल भोवती बसून... इतकं वाचून मला एकदम एक रुका हुआ फैसलाची आठवण झाली आणि उत्साहाने लावला. पण जे बघितलं ते फार बेगडी वाटलं आणि बंद केला.
उफ तेरी अदा' गाणे मात्र आवडते
उफ तेरी अदा' गाणे मात्र आवडते >> आणि Hey ya गाणे सुद्धा छान आहे. किंबहुना माझे ते जास्त आवडते आहे. अश्या सॉफ्ट बिट्सचे गाणे असले की बॅकग्राऊंड म्युझिक प्रमाणे माझ्या डोक्यात चालत राहते. आणि मूड छान राहतो. विस्मरणात गेले होते. या निमित्ताने पुन्हा ऐकणे झाले.
अमितव, तू तेवढा तरी पाहिलास.
अमितव, तू तेवढा तरी पाहिलास. मी अजिबात पाहिला नाही. प्रोमो पाहूनच माघार घेतली होती. येता जाता वाणी कपूर दिसली एकदा. तिने काय चेहरा तासून छोटा करून घेतला आहे काय? आधीच्या पिक्चर्स मध्ये घोड्यासारखा लांबुळका चेहरा दिसत होता तिचा म्हणून विचार पडला.
Pages