चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वाणी कपूरचा चेहरा मला जरा पुरुषी वाटायचा. तरीही ती मला आवडायची (मला कोण हिरोईन आवडत नाही म्हणा..) तर तिचा एक आयुष्मान खुराना सोबत पिक्चर होता चंडीगढ करे आशिकी त्यात ती ट्रान्सजेंडर दाखवली होती. ती भूमिका त्यामुळे सूट झाली म्हणू शकतो. तो पिक्चर सुद्धा मी हल्लीच पाहिला आणि विषय थोडक्यात आटपवला असला तरी आवडला होता.
असो, तर वाणी कपूर खेलखेलमे मध्ये वेगळी आणि नाजूक दिसली आहे असे मलाही जाणवले. त्यामुळे जरा आणखी आवडली.

Hey ya Happy

मला अजिबात आवडला नाही 'खेल खेल में'. वाणी कपूर पहिल्या सिनेमात छान दिसली होती. आता तासून (चपखल शब्द आहे.) घेतल्यासारखी दिसते हे खरे आहे. हल्ली सगळ्याच तशा refined jaws करवून घेतल्यासारख्या अनैसर्गिक दिसतात. याचे कारण 'अनरिअल ब्यूटी स्टँडर्ड्स' आणि सर्वांचे दैवत एकच कॉस्मेटिक सर्जन असावे. ते हॉलिवूड मधे कॉमन होते एकेकाळी.

पंचावन्न(?) वर्षांचा कॅसेनोव्हा अक्षय का बघावा, आधी आवडत होताच. पण या वयात 'एक लडका(?) और लडकी फक्त दोस्तच हो सकते है' तेथे कुठे आता हे Wink

इथे वाचून "Sweet Bobby my catfish nightmare" बघितला. मला ती डॉक्यूमेंटरी स्क्रीप्टेड वाटली. त्या बाईबद्दल अजीबातच सहानुभूती वगैरे काही वाटले नाही. मॉडर्न समाजात राहणारी, शिकली सवरलेली, रेडीओ जॉकीसारखा - ज्यात प्रेझेंस ऑफ माईंड खूप गरजेचा असतो - जॉब करणारी बाई असा टोकाचा मठ्ठपणा कसा करू शकते ? ते काही पटले नाही.

शेवटी त्या बाईचा "internet should be regulated" हा अनाहूत सल्ला तर कायच्या काही होता. आधीच इंटरनेटमुळे आपली माहिती अनेकांकडे असतेच. वर आणखी रेग्युलेशनच्या नावाखाली तो नाक खुपसेपणा कैक पटीने वाढेल. (तसे झाले तर माबोवरच्या ड्युआय बंद पडतील हा फायदा आहे म्हणा Wink ) असे काय रेग्युलेशन आणले की असा मठ्ठपणा टाळता येइल ते पण नाही समजले.

मीनाक्षी शेषाद्रीचं स्केच काढायला घ्यावं आणि अंदाज चुकल्याने चेहरा लांब व्हावा, नाक अनरिपेअरेबल व्हावं, आणि चेहरा गोल ठेवू, अंडाकृती कि चौकोनी असा प्रश्न पडावा....
तशी वाणी कपूर वाटते.

अलिकडच्या हिरविनीत श्रद्धा कपूर, आलिया भट या स्टारकिडस आवडतात. इलियाना डिक्रूजचा चेहरा आखीव रेखीव स्केच सारखा वाटतो. धारदार फीचर्स आहेत. दिशा पटानीचे सिनेमे पाहिलेले नाहीत. पण ठसठशीत आहे. अजून कुठल्या कुठल्या राहिल्या ?

अनुष्का शर्मा आणि वाणी कपूर या हिरविनी वाटत नाहीत. अनुष्का शर्मा प्रोफेसर म्हणून छान वाटली असती.
वाणी कपूर कायनेटिक होंडा किंवा तत्सम कंपनीची एम डी वाटते.

इलियाना डिक्रूजचा चेहरा >>> त्या 'रश्के कमर' गाणं असलेल्या पिक्चरमधे ती सतत डोळे इतके मोठे करत राहते की गाडीचे हेडलाईट म्हणून तिलाच बसवावी पुढे.

खेळ खेळ में बघताना tvf जितू आणि पापा ट्रूथ अँड डेअर खेळतात तो भाग आठवला. तो भाग या पिक्चर पेक्षा जास्त भारी आणि धमाल आहे.

Happy त्या 'रश्के कमर' गाणं असलेल्या पिक्चरमधे ती सतत डोळे इतके मोठे करत राहते की गाडीचे हेडलाईट म्हणून तिलाच बसवावी पुढे. Happy

लीड हिरॉईनचे सुंदर दिसणे फार मॅटर करते. तो सर्वाधिक महत्त्वाचा आणि पहिला लक्षात घेतला जाणारा गुण आहे. त्यानंतर त्याला अभिनयाची जोड असावी.

बाजार १९८२ काल बघितला. गाणी तर बऱ्याचदा ऐकतो मग चित्रपट बघितला.. तसं गाणी बघताना कथेचा अंदाज आलेला बर्यापैकी,

अंतर्मुख करणारा चित्रपट, खासकरून शेवटी ज्या नजरेने नसिरुद्दीन आणि स्मिता तुमच्याकडे बघतात ती नजर..

सुप्रिया पाठक कित्ती गोड, नाजूक होती.. अगदी मनात रुतून बसावी अशी.. शेवट काहीतरी करून वेगळा केला असता तर.. असं वाटत राहतं..

फरदीन खानला त्याच्या बापाने लाआँच केले तेव्हा बापाच्या मते तो ग्रीक गॉड दिसायचा. अगदीच गॉड नसला तरी तुषार कपुरही नव्हता. चांगला दिसायचा. त्याचा प्यार तुने क्या किया मी थेटरात पाहिलेला. छान सिनेमा.

त्याच्या करीअरसोबतच फिजिक पण ढेपाळले.

त्याच्या करीअरसोबतच फिजिक पण ढेपाळले.
>>>>
हे मला वाटतं बरेच हिरो सोबत झाले आहे.. चंद्रचूरसिंग, जुगल हंसराज, हर्मन बावेजा वगैरे.. आणि ते योग्यही आहे. पडद्यावर कामच नसेल तर खा प्या ऐश करा. टेन्शन क्यू लेने का मामू

किंवा एखाद्याचे असेही असू शकते की काम गेल्याने किंवा इतर काही कारणाने तब्येतीकडे लक्ष नाही दिले आणि कायमचे काम गेले.

अरविंद स्वामी
उर्मिला मातोंडकरचा सिंधी हिरो ... शेवटी नी आहे.

चंद्रचूरसिंग, जुगल हंसराज, हर्मन बावेजा वगैरे..
>>
चंद्रचूड ला हेल्थ इश्यूज झाल्यानं तो ॲक्टिव्ह ॲक्टिंग मधून बाहेर पडला
जुगल ॲक्टिंग हा आपला प्रांत नाही हे ओळखून यशराज प्रॉडक्शन्स मधे कुठल्याशा डिपार्टमेंट चा हेड म्हणून चिकटला
हरमन वेब सिरीज मधे दिसला होता मधे

बाजार, हृदयस्पर्शी.

सुप्रिया पाठक फार स्लिम होती, ती शेखर सुमन बरोबरही एका दूरदर्शन सिरीयलमध्ये होती, दर रविवारी लागायची. गोडवा अजूनही आहे तिच्यात पण स्लिम नाही आता, मला दोन्ही पाठक भगिनी आवडतात. अभिनय चांगला करतात, आईकडूनच आलाय.

बाजार, हृदयस्पर्शी.

सुप्रिया पाठक फार स्लिम होती, ती शेखर सुमन बरोबरही एका दूरदर्शन सिरीयलमध्ये होती, दर रविवारी लागायची. गोडवा अजूनही आहे तिच्यात पण स्लिम नाही आता, मला दोन्ही पाठक भगिनी आवडतात. अभिनय चांगला करतात, आईकडूनच आलाय.

दोन्ही पाठक बहिणींची एक मालिका होती - इधर उधर. बहुतेक दूरदर्शनवर असायची (पण नक्की आठवत नाही आता) ती पण भारी होती.

इधर उधर >>> मस्त मालिका. यूट्यूबवर आहे ही उपलब्ध. सगळे भाग आहेत की नाही ते मात्र माहिती नाही.

चंद्रचूड ला हेल्थ इश्यूज झाल्यानं तो ॲक्टिव्ह ॲक्टिंग मधून बाहेर पडला
>>>
ओह.. हे बहुदा ऐकले होते मागे.. पण नक्की कोणाबद्दल ते आठवत नव्हते

चंद्रचुड सिंग त्या वेब सिरीज मध्ये होता ना.... 'बडे अच्छे लगते है गाणं' लागायचं त्यात. आर्या बहुतेक.
अत्यंत बेकार आणि इरिटेटिंग काम करायचा. लवकर मेला म्हणून बरं झालं. सिरियल मध्ये. सुष्मिता सेन त्याची बायको असते त्यात. महाबंडल म्हणजे काही सीमा नाही इतकं बोरिंग प्रकारे बोलायचा आणि एकूणच काम करायचा. छ्या!!! विचार केला तरी शहारा येतो अंगावर.

अमित+१ हेच आठवले होते.
लवकर मेला म्हणून बरं झालं.>>>> Lol

किती निर्जीव - जड डोळे आहेत. मंद एकदम. त्यांच्या त्या 'बडे अच्छे लगते है' गाण्याने तर उच्छाद मांडला होता. त्याचा माचिस, जोश आणि दाग द फायर आठवतोय. कुठेही लक्षात रहाण्यासारखे काम केलेले नाही. मधे कुठल्यातरी फूड चॅनल वर त्यांच्या राजस्थानी पाककृती सांगत होता. राजस्थानच्या राजघराण्यातील आहे चंद्रचूड सिंह.

'इधर उधर' आठवत नाही पण रत्ना आणि सुप्रिया दोघी बहिणी आणि त्यांचे नवरेही कमालीचे आवडतात.

मला चंद्रचुडची ती एक सिरीयल आठवतेय, ज्यात जावेद जाफरी हिरो आणि सुचित्रा कृष्णमूर्ती हिरॉईन होती. त्यात जावेदशी जमता जमता चंद्रचुडशी जमवतायेत का हीचं वाटायला लागलेलं, मला त्याचे मोठे डोळेच लक्षात राहीलेत, मलाही तो आवडत नाही. नशीब जावेद आणि सुचित्रा शेवटी एकत्र येतात. चंद्रचुड मित्र असतो जावेदचा, कॅरॅक्टर पॉझिटीव्ह होतं. नक्की चंद्रचुडच होता की त्याच्याशी साधर्म्य असणारा कोणी होता, त्याचासारखाच डोळेवाला एक सिरीयलमधे काम करायचा. मी कन्फुज्ड व्हायचे, दोघेही त्या डोळ्यांमुळे नव्हते आवडत.

वरची आख्खी पोस्ट फुकट गेली, पण एडीट करत नाही. तो चंद्रचुड नव्हता, नाव नाहीये त्यात. अली खान नाव येतंय. मी गुगलून बघितलं. सिरीयलचं नाव कश्मकश.

Pages