Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ना तुम जानो ना हम ... काही
ना तुम जानो ना हम ... काही झालंच नाही अन् सिनेमा संपला पण...
>>> टोटली!
"औरो में कहा दम था" - फॉर अ
"औरो में कहा दम था" - फॉर अ चेंज, मला जरा धीम्या गतीतला हा सिनेमा आवडला. बघताना कंटाळवाणा वाटला होता हे खरंय. पण आफ्टर टेस्ट चांगली होती (म्हणजे दुसर्या दिवशी मनात रेंगाळला ) सई मांजरेकर आणि शंतनू महेश्वरी ने चांगली कामं केली आहेत. तब्बू आणि अजय देवगण चा शेवटचा सीन सुद्धा चांगलाय. ट्विस्ट मोठा नाहीये हे खरंय. पण ठीक आहे.. स्पर्धेतल्या नाटकाइतका ट्विस्ट आहे
औरो में कहा दम था >> हे
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे. हॅट्स ऑफ टू अदे.
औरो में कहा दम था >> हे
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे. >>
ना तुम जानो ना हम ... काही झालंच नाही >> इथे टायटलमधेच सांगितले होते सिनेमाबद्दल
औरो में कहा दम था >> हे
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे.>>>
प्राइमवर आल्यामुळे अत्यत
प्राइमवर आल्यामुळे अत्यत उत्सुकतेने स्त्री-२ पाहिला एकदम ओम फसच झाल म्हणजे डायरेक्ट स्त्री-२ बघितला तर कदाचित आवडेल असा आहे पण नेहमी सिक्वेलची तुलना पहिल्या पार्टशी होतेच...पहिला फार मस्त होता..
थोडक्यात गोडी टाइप, विनोदही इनोसन्ट वाटले होते..आता प्लॉट तोच ठेवुन सगळ्याला वाढिव करत नेल्याने कुठल्या कुठे जातो मुव्ही...व्हिलन मेला आणी दी एन्ड झाला अस वाटाव तर त्यानतर दोन गाणी येतात..सगळ्यात धमाल गाण इतक्या शेवटाला आणण्यापेक्षा मधे कुठे तरी टाकायला हव होत...वरुण ने बालहट्ट केल्याने रोमॅटीक सॉन्ग घुसडले असावे...अक्षय,वरूण दोन्ही अनावश्यक वाटले.
राजकुमार राव, अपारशक्ती आणी पन्कज त्रिपाठीच त्रिकुट नेहमिप्रमाणेच भारी.
तेरे चक्करो मे दुसरी पटायी
तेरे चक्करो मे दुसरी पटायी नही (३ वेळा) आणी भुतनी के लिए आप जादा ही सुन्दर नही है याला मनापासुन हसु आल..
मी शेवट पर्यंत काहीतरी भारी
मी शेवट पर्यंत काहीतरी भारी ट्विस्ट असेल म्हणून बघत बसलो. अगदीच फुसका निघाला. ती शक्यता इतकी घासुन गुळगुळीत झालेली की असूच शकत नाही इतकी खात्री होती माझी. +१००
वेळ वाया गेल्यावर चरफडत बसण्याचा काही उपयोग नसतो हे वेळ गेल्यावर कळते
पिक्चर पहायचा विचारही मी मनात आणला नाही.>>> रमड तू तुझी ताकत & बुद्धी एखाद्य अ & अ साठी प्रीझर्व कर प्लीज. हे असले रटाळ नको. आमिर खानाचा दिल्/दिवाना मुझसा नही वगैरे आहेत. शाहरुख चा कोयला पण आहे.
आबा, जान्हवी बद्दल +१११. तरी ती बरीच पॉलिश झाल्यावरचा सिनेमा पाहिलात तुम्ही. तिचा ह्या पुर्वीचा एखादा सिनेमा (घोस्ट स्टोरी वगैरे) बघा. मठठपणा क्लियर दिसतो.
ते च्रप्स हल्ली दिसत नाहीत. झान्वी & अर्जून कपूर बेस्ट अभिनेते त्यांच्या दृष्टीने.
ना तुम जानो ना हम ... काही
ना तुम जानो ना हम ... काही झालंच नाही >> इथे टायटलमधेच सांगितले होते सिनेमाबद्दल >>> खरंय रे. ते लक्षात नाही आलं बघ!
रमड तू तुझी ताकत & बुद्धी एखाद्य अ & अ साठी प्रीझर्व कर प्लीज. >>> हो हो, या अश्या पिक्चरांचे रिव्ह्यू नाही लिहीत मी. मला शक्यतो ९०ज चे पिक्चर आवडतात अश्या उद्योगासाठी.
rmd
rmd
हा घ्या तुमच्या "उद्योगासाठी" पूरक पिक्चर!
खेल हिंदी फूल मूवी - अनिल कपूर - माधुरी दीक्षित - अनुपम खेर
"वक़्त हमारा है" इतकाच मजबूत.
https://www.youtube.com/watch?v=f5qe_E_QzjM
खेल आवडता पिक्चर आहे माझा.
खेल आवडता पिक्चर आहे माझा. त्याची सालं काढायचा प्रयत्न करून बघते. अवघड पडणारे एकूण.
पुन्हा विचार केला तेव्हा,
पुन्हा विचार केला तेव्हा,
खेल माझा पण आवडीचा पिक्चर आहे. पण पिसे काढणे अवघड आहे. सहमत.
खेल वरून dirty rotten
खेल वरून dirty rotten scoundrels काढला आहे. पायावर मारायचा सीन drs आणि जोहर मेहमूद इन हॉंगकॉग मधे खेल मधून घेतलेला आहे.
जोमेहॉं नंतर वेगळा आहे. पण drs ७०% खेल वरून काढला आहे. त्यांनी आधीच बनवला त्यामुळे तक्रार सुद्धा करता येत नाही.
औरो में कहा दम था >> हे
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे. >>
खेल छान होता .. ईवन बेटा पण
खेल छान होता .. ईवन बेटा पण आवडला होता.
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे.>>>
हो हो दोन्ही मस्त होते, खेल
हो हो दोन्ही मस्त होते, खेल पडला पण चांगला असून.
अंजली आणि अतरंगी गिफ्टेड पाहिला, खूप खूप आवडला रेको साठी धन्यवाद. एक दोन ठिकाणी एकदम पाणी आलं डोळ्यात. मस्त चित्रपट.
प्लॅटफॉर्म २ अजिबात नाही आवडला. १ आवडला होता हा फारच अंगावर आला. पूर्ण बघितला पण नाही. सुरुवातीला वाटले छान रूपक वापरली आहेत, पण नंतर एकदम असह्य वाटला.
औरो में कहा दम था >> हे
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे. जबरा !
शेवटपर्यंत थांबलेल्या
शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे
drs ७०% खेल वरून काढला आहे. त्यांनी आधीच बनवला त्यामुळे तक्रार सुद्धा करता येत नाही.
>>>>
प्लॅटफॉर्म१ च असह्य झाला होता त्यामुळे २ अजिबात पहाणार नाही.
औरो में कहा दम था >> हे
औरो में कहा दम था >> हे शेवटपर्यंत थांबलेल्या प्रेक्षकासाठी टायटल दिलेले आहे.
नेटफ्लिक्सवर अक्षयकुमारचा नवा
नेटफ्लिक्सवर अक्षयकुमारचा नवा खेलखेलमें थोडा पाहिला. अक्षयकुमार काय नेहमीसारखा सहजतेने वावरतो पण बाकी सगळे बंडल पंजाबी अभिनयात घुसले आहेत. अगदी तापसी पण. मधेच झोपाळु फरदीन खानचा प्रवेश झाला. त्याला सुदैवाने फार संवाद वा अभिनय करायची संधी दिलेली नाही. पण हळुहळु मला सिनेमा आवडु लागला आहे. टाईमपास होतोय. तापसी पण रुळावर आली व पंजाबी झालर तिने जराशी बाजुला केली. अजुन पुर्ण झाला नाही पण आशा आहे टीपी असेल.
खेल खेलमे कालच बघून संपवला.
खेल खेलमे कालच बघून संपवला.
तापसी आणि अक्षय दोघांचाही अभिनय तोच तोच होऊ लागला आहे.
संकल्पना चांगली आहे पण problems तेच आहेत. नेहमी चेच विषय. तापसी च्या dialogues च timing एकदम खुदकन हसू आणतं . काही काही सीन्स चांगले आहेत , एकंदरीत one time watch वाटला. चित्रांगदा आणि वाणी दोघी खूप smart दिसतात.
अक्षयकुमारला तसं वेगळं काहीच
अक्षयकुमारला तसं वेगळं काहीच करायचं नव्हतं म्हणुनही तोचतोचपणा वाटतो. काही काही सीनमधे खरंच एकदम हसु येतं. एकुण ठीक होता. चि आणि वा ने, खास करुन चित्रांगदाने केवढी प्लास्टिक सर्जरी केलीये!
खेल खेल मे फर्स्ट हाफ पर्यंत
खेल खेल मे फर्स्ट हाफ पर्यंत ओके ओके वाटला मला.
पण शेवटाला येईपर्यंत आवडला.
भले अपेक्षेनुसार त्याच त्याच भानगडी असल्या तरी पुढचा कॉल कोणाचा आणि काय येणार ही उत्सुकता सतत कायम होती.
या सगळ्यात अक्षय कुमारचा त्याच्या मुली सोबतचा फोन कॉल सर्वात जास्त आवडला
अक्षय कुमारबाबत बरेच जणांची हल्ली एकच तक्रार असते की त्याचा तोच तोच पणा झाला आहे. पण तो कधी कुठे चतुरस्त्र अभिनेता होता. तो स्टार होता. त्याची एक स्टाईल आहे. ती कायम राहणार. जर आपल्याला कंटाळा येऊ लागला तर तो आपला प्रॉब्लेम आहे, त्याचे तो काही करू शकणार नाही.
बाकी मला तो आवडतो. स्क्रिप्ट चांगली असेल तर तो नेहमीच धमाल उडवतो. आणि यात तो चांगला वाटला. वय झाले आहे त्याचे हे जाणवते. पण त्यालाच साजेसा अभिनय त्याने यात केला आहे हे आवडले.
वाणी कपूर छान वाटली आहे. चित्रांगदा सुद्धा. हल्लीच्या हिरोईन मला दिसण्याबाबत फार आवडतात.
तापसी तशी दिसायला म्हणून तितकी नाही आवडत पण तिच्या भूमिका कधी शोभेच्या बाहुलीच्या नसतात हे आवडते. मेल डॉमीनेटींग कल्चरमध्ये फिमेल ॲक्टरला जे मिळेल ते ठिक म्हणत तिने कधी पुचाट भूमिका केल्याचे आठवत नाही इतक्यात.
खानो मे खान फरदीन खान मध्येच कुठून आला हे समजले नाही. पण नशीब त्याला मोजकेच संवाद आणि सीन दिले. उदय चोप्रा सारखे फूटेज देत बसले नाही. त्यामुळे सुसह्य झाला. त्याच्याशी जोडले गेलेला प्रॉब्लेम टिपिकल पण मेंडेंटरी होता. तो अँगल दाखवल्याशिवाय सेन्सॉरने परवानगी दिली नसती या चित्रपटाला
खेल खेल मे नावाचा नवीन पिक्चर
खेल खेल मे नावाचा नवीन पिक्चर आहे माहितीच नव्हतं, जुना ऋषी नीतू वाला सॉलिड मस्त होता.
स्त्री टू पाहिला. मस्त आहे.
स्त्री टू पाहिला. मस्त आहे.
राजकुमार रावची एनर्जी कमाल आहे. यंग इज शाहरूख आठवला. दोन्ही भागात शाहरुखच्या रोमान्स सीनचे रेफरन्स सुद्धा वापरले आहेत.
पिक्चरमध्ये हॉरर आणि कॉमेडी एकत्र परफेक्ट जमली आहे. फक्त शेवटाला अमानवीय शक्ती संघर्ष ताणून किंचित बोर करत आहेत असे वाटेपर्यंत आवरते घेतले.
तिसरा भाग येऊ शकतो आणि बघायला आवडेल. तो आल्यास थिएटरमध्ये बघायला जाईन.
दिवाळीत भूल भुलैय्या तीन सुद्धा येत आहे.
एकेकाळी रामगोपाल वर्माचा भूत थिएटरमध्ये बघून जे टरकली होती त्यानंतर कधी हॉरर पिक्चर थिएटर मध्ये बघायची हिम्मत केली नव्हती. पण कॉमेडीचा तडका असेल तर बघायला हरकत नाही. विशेष म्हणजे मुलगी सुद्धा घाबरत नाहीं उलट भूलभुलाईय्या आणि स्त्री दोन्ही सिरीज तिला फार आवडल्या आहेत. त्यामुळे भूलभुलैया-3 देखील थिएटर बघायला जायचा प्लान आहे.
सरफिरा hotstar वर पाहिला.
सरफिरा hotstar वर पाहिला.
Overdramatic, बऱ्याच ठिकाणी आतताई वाटला.
मुळात स्टोरी देखील बरीच बदलली आहे काय असे वाटले.
काल रात्री एकदाचा स्त्री २
काल रात्री एकदाचा स्त्री २ पाहिला.
मनोरंजक आहे. स्त्री मधे स्त्री ला काय हवं असतं ही तात्विक फोडणी बेमालूम जमली आहे. या भागात पुरूषसत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे तात्विक मोहन तितकंसं बेमालूम जमलेले नाही. संवादात एकदा उल्लेख येतो, लगेचच स्त्रियांवरची बंधने अर्धा मिनिटे दिसतात. हे आठवले म्हणून फोडणीत घातले या प्रकारातले वाटले. ही थीम थोडी डेव्हलप केली असती तर स्त्री १ सारखी मजा आली असती.
भूत युनिव्हर्स चे सर्व सिनेमे आणि आगामी प्रोमोज दाखवण्याच्या भानगडीत पकड सुटली आहे अधे मधे. भेडीया पूर्णपणे अनावश्यक होता.
पण तरीही एकूण चांगला आहे. विशेषत: इतर सर्व चित्रपटांनी बराच उजेड पाडलेला असताना मनोरंजन करून घ्यायला शिकणे ही गरज आहे. विनोदाचा बाज ठाकठीक. पहिल्या भागात चुरचुरीत विनोद जास्त होते. पहिल्या भागापेक्षा जास्त किंवा किमान तितकाच चांगला दुसरा भाग अपवादानेच बनतो आपल्या इथे.
बाकी मला तो आवडतो. स्क्रिप्ट
बाकी मला तो आवडतो. स्क्रिप्ट चांगली असेल तर तो नेहमीच धमाल उडवतो. आणि यात तो चांगला वाटला. वय झाले आहे त्याचे हे जाणवते. पण त्यालाच साजेसा अभिनय त्याने यात केला आहे हे आवडले.>>> +१
त्याचा फिटनेस्,डेडिकेशन अवाक करणारा आहे, त्याच वय फक्त चेहर्यातच जाणवत बाकी लॉन्ग शॉट मधे तो यन्गच वाटतो, त्याचे समकालिन सगळेच कधिही इतके फिट नव्हते आणी वाटलेही नव्हते...सगळ्याना व्हीफेक्स लागतात.
अक्की बद्दल +१.
अक्की बद्दल +१.
त्याने इंजेकशन घेऊन बॉडी पीळदार वगैरे प्रयोग केले नाहीत. मस्त आहे तो. चेहरा वयस्क दिसतो आता, विशेष करून हसताना हिरड्या दाखवत
१ काळ खूप हसवलेय त्याने..
अक्षय खन्ना पण सही होता (हंगामा, हलचल) पण फार नाही चालला.
अक्षय खन्ना पण सही
अक्षय खन्ना पण सही
हम राज
जेव्हा त्याचा हिमालय पुत्र आला खुप अपेक्शा होत्या
ताल मधे ऐश्वर्या भाव खाउन गेलि
विनोद खन्न सारख्या तरण्या बान्ड चा मुल गा असुन बापच्या हेरोइन बरोबर काम केले ते पन २-२
Pages